Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

७ तहसीलदारांवर निलंबनाची कुऱ्हाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुरगाण्यातील कोट्यवधी रुपयांच्या रेशन धान्य घोटाळ्यात सामील असल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या तहसीलदारांच्या निलंबनावर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा बार उडताच जिल्ह्यातील 'त्या' सात तहसीलदारांना निलंबनाचे आदेश प्राप्त होतील, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

जानेवारी म‌हिन्याच्या अखेरीस सुरगाण्यात पाच कोटींच्या रेशन धान्याचा घोटाळा उघडकीस आला होता. विधिमंडळाच्या अधिवेशनात हे प्रकरण गाजल्याने अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी सात तहसीलदारांसह १६ जणांच्या निलंबनाची घोषणा केली. त्यानंतर महसूल विभागाशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लेखणी बंदचे हत्यारही उपसले. सोमवारी (दि. १३ एप्रिल) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ, प्रभारी सहायक पुरवठा अधिकारी रवींद्र सायंकर यांसह अव्वल कारकून आर. एम. त्रिभूवन, अश्विनी खर्डे आणि लिपीक यांच्यासह लिपीक लता चामनार यांच्या निलंबनाचे आदेश काढले. मात्र, तहसीलदारांच्या निलंबनाचे आदेश प्राप्त झाले नसल्याचे त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते.

मात्र अन्न व पुरवठा विभागाने पाठविलेला अहवाल ग्राह्य मानत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी निलंबनाच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी तहसीलदारांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त होऊ शकतात.

विधिमंडळात घोषणा झाल्यावर पुढील अधिवेशनापर्यंत मागे घेता येत नाही. तरीही ती मागे घेतलीच तर तो हक्कभंग ठरू शकतो. त्यामुळे ही कारवाई अटळ असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. कारवाईनंतर काही दिवसांतच अशा निलंबनाचे आदेश मागे घेतले जाऊ शकतात, अशी शक्यताही या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

यांचा आहे समावेश

नाशिक तालुक्याचे तहसीलदार गणेश राठोड, इगतपुरीचे महेंद्र पवार, त्र्यंबकेश्वरचे नरेशकुमार बहिरम, पेठचे कैलास कडलग, निफाडचे संदीप आहेर, सिन्नरचे मनोज खैरनार यांसह दिंडोरीचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची घोषणा विधिमंडळात झाली होती.

धुळ्याचे जिल्हाधिकारी करणार चौकशी

विधिमंडळातील घोषणेमुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणार हे स्पष्ट झाले होते. कारवाईचा आदेश केव्हाही निघाले तरी चौकशी क्रमप्राप्त आहे. धुळे येथील जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची एक सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरला ६५ हजारांची चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इच्छामणी लॉन्स येथे लग्नासाठी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत तोडून प्लसरवरील चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उपनगर परिसरातील देवळाली को- ऑप बँकेसमोर घडली. चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व एक शॉर्ट पोत तोडली.

याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, हायवेवरील उपनगर व इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पोलिसाकडून दमबाजी

नाशिक महापालिकेच्या शहर फेरीवाला समितीचे सदस्य दत्तात्रय श्रीधर तळेकर यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

एजाज महेबूब पठाण असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, ते भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. १९ तारखेला सकाळी​ ११ वाजता शिवाजीरोड येथील म्हसोबा मंदिराच्या भिंतीलगत पोलिस व्हॅनमधून आलेल्या पठाण यांनी आपल्याला थांबवले. तसेच, फेरीवाला संघटनेचे काम करतो म्हणून तू काय पुढारी झालास काय? असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच राजकीय पक्षाच्या बळावर काही केल्यास खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याचे तळेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. विशिष्ट समाजाच्या लोकांना व्यवसाय करण्यास पोलिस प्रतिबंद करीत असून यामुळे जातीयवादाला प्रोत्साहन मिळते आहे. याप्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणी शहर फेरीवाला समितीतर्फे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला आडकाठी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशात शिक्षण हक्क कायदा करण्यात आला असला तरी तब्बल १४०० विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशापासून वंचित असल्याची बाब समोर आली आहे. महापालिका शिक्षण मंडळाने खासगी विनाअनुदानित शाळांच्या घेतलेल्या बैठकीत शाळांनीच या प्रवेशांची कबुली दिली आहे. अखेर येत्या शनिवारपर्यंत (२५ एप्रिल) प्रवेश देण्याचे निर्देश मंडळाने शाळांना दिले आहेत.

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील पाल्यांना विनाअनुदानित मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. यंदा या प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात आली. शहरात खासगी विनाअनुदानित एकूण ९८ शाळा आहेत. त्यात एकूण जागा ८८०१ तर आरटीई प्रवेशाच्या एकूण २२१८ जागा आहेत. मात्र, आरटीईचे प्रवेश देण्यास शाळांनी चालढकल केल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून आरटीईच्या प्रवेशासाठी पालक शाळांमध्ये चकरा मारत आहेत. मात्र, शाळा त्यास दाद देत नसल्याने पालक हैराण झाले आहेत. याप्रकरणी अनेक पालकांनी महापालिका शिक्षण मंडळात धाव घेतल्यानंतर संबंधित पालकांना मंडळाच्यावतीने पत्र देण्यात येत आहे. संबंधित पाल्यासा तातडीने प्रवेश देण्यात यावा, या पत्रालाही शाळांनी दाद दिलेली नाही. परिणामी, पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

अखेर आरटीई प्रवेशाबाबत शिक्षण मंडळाने शहरातील सर्व खासगी विनाअनुदानित शाळांची सोमवारी दुपारी काठे गल्लीतील महापालिकेच्या शाळेत बैठक घेतली. त्यास शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंडळाच्या प्रभारी प्रशासनाधिकारी वसुधा कुरणावळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आरटीई प्रवेशांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार अद्याप १४०० विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी असल्याचे आढळून आले आहे. तशी माहिती कुरणावळ यांनी दिली आहे. अखेर येत्या २५ एप्रिलपर्यंत शाळांनी कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत. ज्या शाळा प्रवेश देणार नाहीत. त्यांचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाईल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला आहे.

शाळांना लवकरच पैसे

गेल्या तीन वर्षांपासून आरटीई प्रवेशाचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे शाळा आर्थिक अडचणीत येत असल्याची तक्रार शाळांच्या प्रतिनिधींनी केली. यासंदर्भात कुरणावळ यांनी शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. सूर्यवंशी यांनी शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा केली. अखेर येत्या चार आठवड्यात शाळांना गेल्या दोन वर्षातील आरटीईचे प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती शाळांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्याचे कुरणावळ यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला मिळणार मुबलक पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहरसाठी बेझे-गौतमी पाणीपुरवठा योजना यशस्वी झाली असून, नऊ किमी अंतरावरून आणलेले पाणी १९० मीटर उंचीवर पोहचविण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास यश मिळाले आहे. यामुळे त्र्यंबकेश्वरचा पाणीप्रश्न सुटणार आहे.

जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाणी योजना कार्यान्वित होणार, असा शब्द दिला होता. सोमवारी रात्री आठ वाजता योजना कार्यान्वित होताच सर्वांनाच आनंदाचे भरते आले होते. गत आठवड्यापासून पाइपलाइन टेस्टिंग सुरू होती. मात्र, प्रचंड चढउतार असल्याने जागोजाग लाइन फुटणे, पाहिजे तसा दाब न मिळणे आदी सुरू हाते. या सर्वांवर तंत्रज्ञानाने मात करीत सोमवारी गौतमी-बेझे धरणाचे पाणी येथील सुमारे दोनशे मीटर उंच असलेल्या निलपर्वत वरील जलकुंभात पोहचले. उपअभियंता डी. व्ही. सोनवणे, शाखा अभियंता पगार, चौरे, मोरे व सरोदे यांनी सहकाऱ्यांसह तसेच मुख्याधिकारी निवृत्ती नागरे आदींनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले.

आज शहराच्या जवळपास सर्व भागात सहा इंच व्यासाची लाइन पोहचल्याने आणि निलर्पवतीवरील सर्वाच्च ठिकाणी असलेल्या मुख्य जलकुंभ व जलशुध्दीकरण प्रकल्प, त्याचबरोबर वितरीत करण्यासाठी गढई आणि विश्रामगृह परिसरातील जलकुंभ, पूर्वीच्या अंबोली याजनेतील फिल्ट प्लॅन्ट असा सर्व उपयुक्त कारभार यापुढे शहरास पाणीटंचाई जाणवू देणार नाही असे दिसून येते.

येत्या दोन चार दिवसात शहरास भरपूर पाणी मिळणार असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले आहे. तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे येथे श्री संत निवृत्तीनाथ यात्रेकरिता आले आणि खऱ्या अर्थाने या याजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. गोदावरीच्या उगमस्थानी गोदावरीचे पाणी आणण्याचे कसब साधल्याने उलटी गंगा वाहिली तरी ती जनकल्याणासाठीच असेल.

पंचवीस कोटींची योजना

त्र्यंबक शहराची सुमारे पंचवीस कोटींची ही योजना एक आव्हानच होते. गौतमी-बेझे धरणातून पाणी आणणे आणि शहरात वितरीत करणे त्याकरिता शहरातील सुमारे चोवीस वर्षांपूर्वीची वितरण लाइन नव्याने करणे, अशी कामे करावी लागली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावचा पारा ४३.५ अंशावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठवड्यात ३५ ते ४० अंशा दरम्यान स्थिरावणारा तापमानाचा पारा ४३.५ अंशापर्यंत वाढला आहे. जीवाची काहिला करणाऱ्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सोमवारी राज्यात सर्वाधित तापमानाची नोंद मालेगाव तालुक्यात झाली. त्या खालोखाल वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक तापमान होते. नाशिकचे तापमानही ४० अंशापर्यंत पोहोचल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान सोमवारी नोंदले गेले.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला होता. गेल्या आठवड्यातही ढगाळ वातावरणामुळे सुरुवातीचे तीन दिवस पारा ३५ अंशापर्यंत स्थिरावला होता. मात्र, चार दिवसांपासून तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात झाली. भारत मौसम विज्ञान विभागाच्या संकेतस्थळानुसार शनिवार व रविवारी चाळीस अंशाला स्पर्श करणारा पारा मालेगावी सोमवारी ४३.५ अंशापर्यंत पोहोचला. यामुळे रत्यांवर दिवसभर शुकशुकाट होता. मालेगाव खालोखाल वर्धा ‌जिल्ह्यात ४३ अंश तपमान होते. जळगावचा पाराही ४२.३ अंशापर्यंत वाढला आहे. सोमवारी राज्यातील नगर (४०.४), अकोला (४१.६), अमरावती (४१.८), चंद्रपूर (४०.४), नागपूर (४२.८), नांदेड (४१.०), नाशिक (४०.०), परभणी (४०.२), सोलापूर (४०.८) या प्रमुख शहरांचे तापमान चाळीस अंशाच्या पुढे होते.

नाशिक शहरातही सोमवारी दिवसभर उकाडा जाणवत होता. यामुळे रस्‍त्यांवर शुकशुकाट दिसत होता. वाढत्या तापमानापासून बचाव व्हावा म्हणून योग्य ती का‍ळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर निघणे टाळावे. घरातून बाहेर पडताना रुमाल व गॉगलचा वापर करावा. तसेच दिवसभरात भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थात रामकुंड विकासाचा विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र व राज्य सरकारने सिंहस्थासाठी दिलेल्या निधीचा योग्य वापर होत नसून, रामकुंड परिसराऐवजी अन्य ठिकाणी खर्च होत असल्याचा आरोप पुरोहीत संघाने केला आहे. येत्या काही दिवसात परिसरातील कामाला सुरुवात न केल्यास पुरोहीत संघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला असला तरी ज्या रामकुंडावर शाहीस्नान होणार आहे, लाखो भाविक स्नानासाठी येणार आहेत त्या ठिकाणी राज्य सरकारने व महापालिकेने कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याचे पुरोहीत संघाचे म्हणणे आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नाशिक महापालिकेला सुमारे २५०० कोटी रुपयांचा निधी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून रामकुंड व परिसराचे सुशोभीकरण करण्यात येऊन कायापालट करण्यात येईल, असे आश्वसन देण्यात आले होते. मात्र, सरकारकडून निधी प्राप्त होताच, पैसे अन्यत्र वळवण्यात आले असल्याचे पुरोहीत संघाचे म्हणणे आहे. हा सोहळा ज्या रामकुंडावर होणार आहे त्या ठिकाणी सोयी सुविधा देणे तर दूरच मात्र महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी रामकुंडाच्या विकासाकडे हेतूपुरस्सर कानाडोळा केला आहे. रामकुंडाच्या परिसरात हजारो भाविक देशभरातून रोज येत असतात. दोन महिन्यांवर सिंहस्थ येऊन ठेपला असूनही, या भागात कोणतीही सुधारणा होत नसल्याने ते आश्चर्य व्यक्त करीत आहेत. राम कुंडाच्या पायऱ्या झिजल्या असून, दोन दगडांमध्ये भेगा निर्माण झाल्या आहेत. ज्या प्रमाणे काळाराम मंदिराचे काम करून पुनर्निर्माण करण्यात आले त्याप्रमाणे संपूर्ण रामकुंडाचे पुनर्निर्माण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

गरूड शिल्प नामशेष

रामकुंडावर अरुणा व वरुणा नद्यांचा संगम आहे. या नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी पूर्वी गरुडाचे शिल्प होते. मात्र २००९ मध्ये आलेल्या पुरात हे शिल्प वाहून गेले. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. महापालिकेने त्याची अद्याप दुरुस्ती केलेली नाही. हे शिल्प पूर्ववत लावावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मागील सिंहस्थात मनोहर जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहणासाठी येथे मोठा खांब रोवण्यात आला तो खांब झिजला असून, त्याच्या भोवती बांधण्यात आलेल्या चौथऱ्याला तडे गेले आहेत. रामकुंडावर बांधण्यात आलेल्या छोट्या पुलाचे कठडे तुटलेले असून त्याचे काम करावे तसेच गांधी ज्योतीच्या फरशा रोज तुटत असून त्याचीही दुरुस्ती करावी. तसेच, परिसरात असलेल्या मंदिरांना योग्य ते पॉलिश करून सौंदर्य वाढविण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलावीत, असे सांगण्यात आले आहे. परिसरातील अतिक्रमण हटविण्याचीही मागणी केली आहे.

यात्रेकरुंची दिशाभूल

नव्याने बांधण्यात आलेल्या सर्व घाटांना रामघाट असे नाव देण्यात येत असून, ती भाविकांची दिशाभूल असल्याचे पुरोहीत संघाचे म्हणणे आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना दसक व टाकळी येथे रामघाट असल्याचे भासवून फलक लावण्याचा घाट घातला जात आहे. तो त्वरित बंद करावा व भाविकांची दिशाभूल थांबवावी, असे पुरोहित संघाचे म्हणणे आहे. नाशिक शहराला मोठी परंपरा आहे. नागरिकांची दिशाभूल होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. नागरिकांची दिशाभूल करू नये याबाबत पालकमंत्री गिरीष महाजन यांची भेट घेण्यात येणार असून, त्यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.

महापालिकेने स्मशानालगतच घाट बांधून त्याला रामघाट असे नाव दिले आहे. परंतु मुख्य रामकुंडाला सर्व सोयीपासून अलिप्त ठेवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी मुख्य सोहळा होणार आहे त्या ठिकाणी मात्र अद्यापही एक रुपया देखील खर्च करण्यात आलेला नाही. तातडीने रामकुंडावरची कामे हाती घ्यावीत नाहीतर आंदोलन छेडण्यात येईल

- सतीश शुक्ल, अध्यक्ष पुरोहीत संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप आमदारांचे ‘मॉरल पोलिसिंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी कॉलेजसमोरील हॉटेल सुदिनवर छापा मारीत भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह शे-दीडशे कार्यकर्त्यांनी 'मॉरल पोलिसिंग'चे काम केले. विशेष म्हणजे या छाप्यात एका पती-पत्नीलाच ताब्यात घेऊन शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. हे दाम्पत्य आपल्याच विरोधातच तक्रार देण्याच्या तयारीत पोहचल्याचे पाहून आमदारांनी पक्षीय पातळीवर प्रकरण 'मॅनेज' करीत अखेर सर्व नाट्यावर पडदा पाडला.

आमदार तसेच संबंधित प्रभागचे नगरसेवक शे-दिडशे कार्यकर्त्यांसोबत सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हॉटेल सुदिनजवळ आले. हॉटेलमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करीत कार्यकर्त्यांनी गोंधळ गदारोळ घातला. यावेळी हॉटेलच्या एका रूममध्ये असलेल्या जोडप्याला बाहेर काढण्यात आले. त्यांना शिवीगाळ करीत अनैतिक व्यवसाय उघड केल्याचे कार्यकर्ते सांगू लागले. मात्र, पकडण्यात आलेला युवक चांदवड तालुक्यातील एका गावाचा सरपंच निघाला. विशेष म्हणजे तो भारतीय जनता पक्षाचा सहकारी म्हणजे शिवसेनेचा पदाधिकारी आहे. संबंधित सरंपचाने हे स्पष्टीकरण देऊन सोबत असलेली महिला पत्नी असल्याचे सांगितले. मात्र, सानप यांच्यासह कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी शिवीगळ करीत सरपंचाला जाम चोप दिला. या कालावधीत पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दाम्पत्याला पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आणले. कार्यकर्त्यांनी केलेले 'पोलिसांचे काम' अंगलट येण्याची चिन्हे दिसताच आमदार सानप यांनी सूत्रे फिरवण्यास सुरूवात केली.

चांदवड तसेच नाशिकरोडच्या नेतेमंडळींनी सारवासारव करीत सरपंचाची समजूत काढली. त्यामुळे मार खालेल्या सरपंचासह त्याच्या पत्नीनेही फिर्याद देण्यास नकार दर्शवला. हॉटेल मालकानेही तीच भूमिका घेतली. पोलिसांकडे तक्रारच नसल्याने त्यांनी ताब्यात घेतलेल्या दाम्पत्याला सोडून दिले. दरम्यान, या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले असून, राजकीय पक्षांनी 'मॉरल पोलिसिंग' करण्याऐवजी समाजकार्याकडे लक्ष देण्याचा सल्ला नागरिक देत आहेत.

हॉटेलमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली होती. याबाबत, पंचवटी पोलिसांना वारंवार कळवण्यात आले. मात्र, कारवाई झाली नाही. आज सकाळी एका जमावाने हॉटेलमध्ये राडा घातल्याचे समजले. त्यावेळी पोलिस निरीक्षकांना माहिती देऊन तिथे पोहचलो. तोपर्यंत जमावाने एका दाम्पत्याला बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

- बाळासाहेब सानप, आमदार

अनैतिक व्यवसाय सुरू असतील तर नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करणे अपेक्षित होते. यापूर्वी अशी कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. कायदा हातात घेऊन नैतिकतेचे धडे देणे हा गुन्हा ठरतो. तुर्तास, याप्रकरणी मारहाण झालेल्या दाम्पत्यासह हॉटेल मालकाने तक्रार देण्यास नकार दर्शवल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.

- शांताराम अवसरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लर्निंग व्हॅनवर ‘मुक्त’ धूळ!

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये कम्प्युटर साक्षरतेसाठी राबविण्यात येणारी मोबाइल लर्निंग व्हॅन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नाकर्तेपणामुळे चक्क धूळखात असल्याचे उघड झाली आहे. विद्यापीठाच्याच आवारामध्ये या व्हॅनवर धूळ साचत असली तरी विद्यापीठ प्रशासन मूग गिळून गप्प आहे.

शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचविण्याचाच एक भाग म्हणून आदिवासी भागात कम्प्युटर साक्षरतेसाठी मुक्त विद्यापीठाने मोबाइल लर्निंग व्हॅनची संकल्पना मांडली. विशेष म्हणजे, कॉमनवेल्थ युथ प्रोग्राम आशिया केंद्र आणि पवार ट्रस्ट यांनी त्यास तातडीने मदतीचा हात दिला. त्यानुसार मोबाइल व्हॅनमध्ये काही कॉम्प्युटर्स ठेवून ती व्हॅन आदिवासी भागामध्ये नेली जायची. व्हॅनमध्ये प्रत्यक्ष येवून विद्यार्थ्यांना कम्प्युटरची माहिती दिली जायची. या उपक्रमाद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत थेट कॉम्प्युटर पोहचतानाच कम्प्युटर शिकण्याची आवडही त्यांच्यामध्ये निर्माण होत असल्याचे दिसून आले. मात्र, विद्यापीठाच्या बोंगळ कारभाराचा फटका या अभिनव संकल्पनेला बसला आहे. त्यामुळेच विद्यापीठाकडे असलेल्या दोन्ही व्हॅन्स सध्या चक्क 'मुक्त'पणे विद्यापीठाच्याच आवारात धूळखात असल्याचे चित्र आहे.

व्हॅन्समधील कॉम्प्युटर जुनाट झाल्याचे कारण देत ही संकल्पनाच गुंडाळण्याचे अभिनव धाडसही विद्यापीठातील मुखंडांनी केले आहे. त्यामुळे आदिवासी भागात मोठा प्रतिसाद लाभणारी व्हॅन आता पार्किंगमध्ये गेल्या वर्षभरापासून उभी करण्याची किमयाही विद्यापीठ प्रशासनाने केली आहे. आदिवासी विकास महामंडळाकडून येणारे अनुदान बंद झाल्यानेही व्हॅनला ही अवकळा प्राप्त झाल्याचा गळा विद्यापीठ प्रशासनाने काढला असला तरी प्रत्यक्षात नाविन्यपूर्ण संकल्पनेचा गळा घोटण्यात मात्र प्रशासन यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.

प्रभावी संकल्पना

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागासह हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागापर्यंत व्हॅनद्वारे लहान बालकांना, युवकांना कॉम्प्युटरची ओळख करुन दिली जायची. जवळपास सर्वच वाड्या आणि पाड्यांवर या व्हॅनचे जल्लोषात स्वागत व्हायचे. मॉनिटर, सिपीयू, माऊस यांच्यासह कॉम्प्युटरचा वापर कसा होतो, त्याचे फायदे काय अशा विविध बाबींचा प्रचार केला जात होता.

प्रौढांसाठी नाशिकमध्ये व्हॅक्सिनेशन सेंटर

$
0
0

रमेश पडवळ, नाशिक

लहान मुलांना होणाऱ्या आजारांपासून संरक्षण देण्यासाठी जशी लसीकरणाची (व्हॅक्सिनेशन) गरज असते, अशीच गरज प्रौढांनाही असते. मात्र आजारी पडल्याशिवाय आपण अशा लसीकरणाचा विचार करीत नाही. वाढत्या घातक आजारांमुळे प्रौढांमध्येही व्हॅक्सिनेशनची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्रातील पहिले 'अॅडल्ट व्हॅक्सिनेशन सेंटर' आस्थातर्फे सुरू झाले आहे. या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे व्हॅक्सिनेशनबाबत समुपदेशनाची सोयही करण्यात आली आहे.

शहरात स्वाइन फ्लू व इतर फ्लू नेहमीच तापदायक ठरताना दिसतात. त्याच बरोबर धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला, कांजण्या, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, गोवर, गालफुगी, न्यूमोनिया, मेंदूज्वर, कावीळ अ आणि कावीळ ब आदी आजार रुग्णांमध्ये दिसतात. लहान मुलांना वाढत्या वयाप्रमाणे व्हॅक्सिनेशनचे वेळापत्रक डॉक्टरांनी करून दिलेले असते. त्यामुळे पालक म्हणून आपण वेळोवेळी हे व्हॅक्सिनेशन त्यांना देत असतो. मात्र हे आजार प्रौढ व्यक्तीलाही होण्याचा धोका असतो. हा धोका टाळता यावा यासाठी व्हॅक्सिनेशनच्या गरजेबाबत समाजात पुरेशी जागरूकता नाही. त्यामुळे आजारी पडल्यानंतरच याचा विचार होतो. ह्रदयविकार, डायबेटीस, कॅन्सर रुग्णांना हे आजार अधिक घातक ठरत असल्याचेही समोर आले आहे. तसेच ज्येष्ठ ना‌गरिकांना वेळोवेळी व्हॅक्सिनेशनची गरज पडते हे लक्षात घेऊन आस्था क्ल‌िनिकने उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या जेनेरिक औषध स्टोअरनंतर एमआरपीच्या दरात 'अॅडल्ट व्हॅक्सिनेशन सेंटर' सुरू केल्याचे 'आस्था'चे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव बुचके यांनी सांगितले.

आरोग्यसेवा दिवसेंदिवस महाग होत आहेत. त्यामुळे आजार होऊ नये याबाबत उपाययोजनांवर गांभीर्याने विचार व्हायला हवा. प्रौढांमध्ये वेळोवेळी व्हॅक्सिनेशन किती गरजेचे आहे. कोणी कोणत्या प्रकारचे व्हॅक्सिनेशन केले पाहिजे याबाबत 'आस्था'तर्फे मोफत सुविधा व समुपदेशन उपलब्ध करण्यात आले आहे. लसीच्या एमआरपी किंमती व्यतिरिक्त कोणताही खर्च आकारला जात नसल्याचेही बुचके यांनी सांगितले. गंगापूर रोड येथील आकाशवाणी टॉवरजवळ समर्थ जॉगिंग ट्रॅकसमोर आस्था जेनेरीकमध्ये 'अॅडल्ट व्हॅक्सिनेशन सेंटर' सुरू झाले आहे.

संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अनेकदा परदेशात जाताना यलो फिव्हरचे व्हॅक्सिनेशन सक्तीचे केले जाते. हे व्हॅक्सिनेशही सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. तर न्यूमोनियामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे यावरही व्हॅक्सीनेशची मांत्रा उपयोग ठरत असून, याबाबतही जनजागृती केली जात आहे.

वैभव बुचके, मुख्य कार्यकारी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षय्य तृतीयेला आंब्याचा क्षय

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

यंदाच्या मोसमात झालेली गारपीट अन् बेमोसमी पावसाचा तडाखा आंब्यालाही चांगलाच बसला. याचा परिणाम अक्षय्य तृतीयेच्या बाजारात जाणवला. या दिवशीचा खास मेन्यू म्हणजे आमरसाच्या आनंदावर मात्र पुरा अन् दर्जेदार आंब्यांच्या अनुपलब्धतेमुळे विरजण पडले.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळपासून बाजारपेठेत उत्साह दिसून येत होता. उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर अक्षय्य तृतीयेपासून आंबे खाण्यास सुरुवात करण्याची प्रथा आहे. देवपूजन आणि पितरांचे तर्पण केल्याच्या विधीनंतर पुरणपोळी अन् आमरसाचा खास मेन्यू घरोघरी बनविण्याची प्रथा रूढ आहे. परिणामी दोन ते तीन दिवसांपासून बाजारपेठेत आंब्याला मागणी वाढली आहे. पण यंदा मागणीच्या तुलनेत आंब्याचा पुरवठा होऊ शकलेला नाही. यंदा महाराष्ट्रात कोकणासह विविध परिसर व इतर राज्यातूनही आंब्याची आवक झाली.

आंब्याच्या वृक्षांना मोहोर फुटण्याच्या कालावधीतच यंदा बेमोसमी पाऊस आणि गारपीटीने मोहोर गळून पडला. तर काही ठिकाणी हा मोहोर येण्याची प्रक्रियाच लांबली. याचा प्रतिकूल परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने यंदा आंब्याच्या भावही चांगलेच वाढले आहेत. सण साजरा करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठेत मंगळवारी आंब्याला पसंती दिली. तरीही खिशाला कात्री लावणाऱ्या आंब्याची नाममात्र ग्राहकांकडून केली जात होती.

यंदा आंब्याच्या मोजक्याच जाती

अक्षय्य तृतीयेच्या कालावधीपर्यंत नेहमी फळांच्या बाजारपेठेत आंब्याचेच राज्य असते. राज्याच्या काही भागांसह परराज्यांमधून मोठ्या प्रमाणावर होणारी आंब्याची आवक अन् आंब्याच्या उपलब्ध असणाऱ्या जातींची रेलचेलही मोठ्या प्रमणावर होते. यंदाच्या वर्षाची सुरुवात मात्र या चित्राला अपवाद ठरली. नुकत्याच झालेल्या बेमोसमी पावसाने आंबाही झोडपून निघाला अन् नाशिकच्या बाजारपेठेत प्रामुख्याने लालबाग, हापूस अन् बदाम या आंब्याच्या जाती उपलब्ध आहेत. ७० ते ८० रूपये किलोपासून सुरू झालेले आंब्याचे भाव पाचशे रूपयांच्याही पलिकडे गेले आहेत. खवय्यांचा लाडका असलेल्या हापूस आंब्याची सुरुवातच पाचशे रूपये किलोपासून झाली. सुमारे सातशे ते आठशे रूपयांपर्यंत हे भाव भिडले आहेत. तर, एरवी चांगली मागणी असणारा लंगडा, केशर, दशहरा या आंब्याच्या जाती अपवादानेच नजरेला पडताहेत. परिणामी, आंब्याच्या भावांवरही परिणाम दिसून येत आहे.

परराज्यातून आवक

महाराष्ट्रातून कोकण पट्टयासह आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, उत्तरप्रदेश, केरळ, तामिळनाडू या राज्यातून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर होते आहे. या राज्यांमधून बदाम, गुलाबकश, बेगनफल्ली, केसर, पायरी, दशहरी या आंब्याची आवक होत आहे. तर विजयवाडा येथून मद्रास केसर, बदाम, रायचोरीहून बेगनफल्ली, गुलाबकश, वरंगलहून बदाम तर जगतीयाहून बदाम व देशी आंब्याची आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

हवामानातील बदलांचा परिणाम

गत दीड वर्षांपासून अवकाळी पावसाच्या तडाख्यात कृषी व्यवस्था सापडली आहे. परिणामी, हंगामी पिकांवर याचा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. दरवर्षी आंब्यास मोहोर येण्याचा कालावधी प्रामुख्याने नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीदरम्यान असतो. मात्र हवामान बदलांच्या परिणामस्वरूपी यंदा फेब्रुवारी दरम्यान मोहोर येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीपर्यंत आंब्याची आवक बाजारात वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेसुमार जंगलतोड बिबट्यांच्या मुळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक परिसरात बेसुमार वृक्षतोड सुरू असल्यामुळेच बिबट्यांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. त्यामुळेच मानवी रहिवासी भागात बिबट्याचा शिरकाव होत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. वृक्षतोड थांबविण्यासाठी वनविभागाकडून नेहमीच प्रयत्न केले जात आहे. मात्र, आजही अनेकांकडून वनविभागाने लावलेल्या वृक्षांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. त्याचा थेट परिणाम वन्य प्राण्यांवर होत आहे. वनविभागाने वृक्ष तोडणाऱ्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

नाशिक शहरालगत वनविभागाची हजारो एकर जमीन आहे. यात बहुतांश ठिकाणी वनविभागाने वनराई निर्माण केली आहे. परंतु, वनविभागाच्या गेल्या काही वर्षांपासून वृक्ष लागवड केल्या ठिकाणी झालेल्या दुर्लक्षामुळे अनेक जणांकडून वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड झाली आहे. त्यातच जंगली प्राण्यांना झाडाझु़डपांमध्ये वास्तव्य असते. परंतु, बेसुमार जंगलतोड सुरू असल्याने बिबट्यांसारखे हिंसक प्राणी मानवी वस्तीकडे वाटचाल करीत आहेत. दोनच दिवसांपूर्वी निफाडजवळ तीन वर्षीय बालकाला बिबट्याने घराजवळून ओढून नेले होते. तसेच सोमवारी गंगापूर गोवर्धन शिवारात मादी बिबट्याचे बछडे पेन इन सुला लॅण्ड लिमिटेड या खाजगी कंपनीच्या शेडमध्ये तब्बल चार तास मुक्त संचार करत होते. बेसुमार जंगलतोड सुरू असल्यामुळे बिबट्या नागरी वस्तीत दाखल होत असल्याचे कारण वनविभागाने दिले आहे.

बिबट्याचा रहिवाशी भागात संचार कमी करण्यासाठी जंगलातील वृक्षतोड थांबविणे हाच उपाय आहे. काही वेळेस पिण्याच्या पाण्याची कमतरता वन्य प्राण्यांना भासल्यास ते रहिवाशी भागाकडे वळतात. - गणेश वाघ, वन अधिकारी

शिकारीच्या शोधासाठी स्थलांतर

गंगापूर गोवर्धन शिवारात बिबट्यासह मादी व एक बछडे असल्याचेही वन विभागाच्या सूत्रांनी म्हणाले. जंगलात शिकार मिळाली नसल्यास रात्रीच्या वेळी गंगापूर गोवर्धन, गंगावऱ्हे, सावरगाव, वासाळी, महिरावणी, दुडगाव आदी भागात बिबट्याच्या कुटुंबासह शिकारीसाठी येत असल्याचीही माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. काही महिन्यांपूर्वी महिरावणी गावात बिबट्याने गायीच्या पारडूवर हल्ला केला होता. यासाठी त्या ठिकाणीही पिंजरा लावण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंडिया बुल्सच्या पाइपलाइनचा ‘ब्लास्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी नदीवरील एकलहरे थर्मल पॉवरच्या बंधाऱ्यापासून सिन्नरकडे जाणाऱ्या इंडिया बुल्स कंपनीच्या पाइपलाइनचा मंगळवारी साडेचार वाजता ब्लास्ट झाला. प्रेशर पाइपलाइनमधून तब्बल ४० ते ५० फुटापर्यंत पाण्याचा फव्वारा उडून हजारो लिटर पाणी रस्त्यावर आले. पाण्याच्या दाबमुळे नाशिक-औरंगाबाद हायेववरील दोन कार अपघातग्रस्त झाल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

इंडिया बुल्स सेझ प्रकल्पासाठी ओढ्या जवळील बंधाऱ्यामधून पंपिंगद्वारे पाइपलाइनच्या मदतीने इंडिया बुल्स सेझ प्रकल्पासाठी सांडपाणी नेण्यात येणार आहे. नुकतेच या पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असून सध्या त्याची चाचणी घेतली जात असल्याची माहिती घटनास्थळावरील कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र, अधिक तपशील देण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली.

मंगळवारी चाचणीचे काम सुरू असताना साडेचार वाजता ओढा गावाजवळील रेल्वे पुलानजीक पाइपलाइनचा ब्लास्ट झाला. पाण्याचा दाब एवढा प्रंचड होता की पाणी ४० ते ५० फुटापर्यंत वर गेले. चिखल आणि पाणी थेट महामार्गावर आले. पाइपलाइन ब्लास्ट झाली त्यावेळी तिथून निवृत्ती सहाणे यांची स्विफ्ट कार चालली होती. कारमध्ये निवृत्ती सहाणे यांच्यासह त्यांच्या दोन मुली माधुरी आणि प्रियंका होत्या. ब्लास्टनंतर अचानक दाबाने आलेल्या पाणीमुळे त्यांची कार फरफटत गेली. कार तेथील पुलाच्या कठाड्याला जाऊन अडकल्याने पुढील अनर्थ टळला. इतर नागरिकांनी लागलीच धाव घेऊन कारमधील सर्वांना बाहेर काढले. मात्र, कार पूर्णतः निकामी झाली. याच वेळेत जाणाऱ्या अन्य कारच्या काचा फुटल्याने वाहनातील प्रवाशी जखमी झाले. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली हेेती. या घटनेतील जखमींवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पाणी आणि ​चिखलाचा खच रस्त्यावर आल्याने तब्बल दोन तास महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. ओढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल पवार, कर्मचारी सोमनाथ शिंदे, संजय ढापते यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. वाहनांचा दूरच दूर रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती समजल्यानंतर इंडिया बुल्सच्या कर्मचाऱ्यांनी सिस्टिम बंद करण्यास सुरुवात केली. मात्र, पाण्याचा दाब लागलीच कमी करण्यात यश मिळाले नाही. दरम्यान, या घटनेबाबत काहीही बोलण्यास उपस्थित कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शवली.

लहान मुलांसोबत मुलींना घेऊन वस्तीवर निघालो होतो. पुलानजीक आल्यानंतर पाइपलाइन फुटून अचानक पाणी आले. यात कार वाहून जाऊ लागली. सुदैवाने पुलाच्या कठाड्याला कार अडकली. कारचे पूर्णतः नुकसान झाले आहे. या घटनेस इंडिया बुल्स जबाबदार असून त्यांनी नुकसानभरपाई द्यावी. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करणार आहे. - निवृत्ती सहाणे, अपघातग्रस्त वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा भर कांदा विक्रीवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर बाजार समितीच्या मुख्य आवारात आणि नायगाव दोडी आणि नांदूरशिंगोटे उपबाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तालुक्यात गेल्या चार महिन्यांत चौथ्यांदा गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने उन्हाळ कांद्यास फटका बसला आहे. शेतातील आणि काढलेल्या कांद्यासही गारपिटीचा मार बसल्याने कांदा खराब होऊ लागला आहे. यामुळे कांदा साठवण्याऐवजी मिळेल त्या भावात विक्री करण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे येत्या काळात कांद्याची टंचाई निर्माण होऊन दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिन्नर बाजार समितीच्या मुख्य आवारात आणि नायगाव दोडी आणि नांदूरशिंगोटे उपबाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भिजलेला मोकळा कांदा शेतकरी सिन्नर आणि नायगाव उपबाजारात विक्रीसाठी आणत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून सिन्नर बाजार समितीत सरासरी साडेतीन ते चार हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. मात्र, बाजारात कमी प्रतवारीचा कांदा विक्रीस येत असल्याने व्यापाऱ्यांना खळ्यावर हा कांदा निवडावा लागत आहे. त्यात वेळ जात असून, खळ्यावर कांदा साठवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी मागील शुक्रवारी कांदा लिलाव बंद ठेवले होते.

गेल्या काही महिन्यांपासून गारपिटीमुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या उन्हाळ कांद्यांना गारपिटीचा मारा बसल्याने त्यांची गुणवत्ता कमी झाली आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी कांदा शेतात साठवून ठेवला होता. त्यांनाही गारांचा मार बसला. त्यामुळे शेतातच कांदा खराब झाला. पाणी लागलेला कांदा चाळींमध्ये टिकणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी मिळेल त्या दरात कांदा विक्रीस प्राधान्य दिले आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने दरात घसरण झाली असून, बंद गोणीतील कांद्यास कमाल १४००, तर सरासरी ८०० रुपये दर मिळत आहे. मोकळ्या कांद्यास मात्र कमाल १३००, तर किमान ३०० रुपये क्विंटल अल्प दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही फिटणे अवघड झाले आहे.

मालाची प्रतवारी खराब

भिजलेला कांदा सध्या बाजारात विक्रीसाठी येत असल्याने येणाऱ्या मालापैकी सुमारे ७५ टक्के कांद्याची प्रतवारी सुमार आहे. त्यामुळे केवळ २५ टक्केच चांगला कांदा आहे. साहजिकच दरही अल्प मिळत आहे. कांदा निवडण्यात वेळ जात असल्याने खळ्यांवर माल ठेवायला जागाच शिल्लक नाही. भविष्यात कांद्याचा काही प्रमाणात तुटवडा जाणवल्यास दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या पंधरा दिवसात दोडी, नांदूर शिंगोटे, नायगाव उपबाजार व सिन्नर बाजार समितीत जवळपास एक लाख ४० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष उत्पादकांना दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

ओझरखेड कालव्यातून उपकालव्यांना पाणी सोडण्यात आल्यामुळे निफाड तालुक्यातील पाचोरे वणी, शिरवाडे वणी, वावी, गोरठाण, पालखेड, रानवड, खडक माळेगाव आदी परिसरातील द्राक्ष उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ऐन एप्रिल महिन्यात द्राक्ष छाटणीच्या काळातच द्राक्षबागांना ओझरखेड कालव्यातून मुबलक पाणी मिळाल्याने परिसरातील द्राक्ष उत्पादकांची उन्हाळ्याची चिंता मिटली आहे. दि. ५ एप्रिल रोो ओझरखेड धरणातून शेतीसाठी आरक्षित असलेले या वर्षाचे शेवटचे आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे ओझरखेड कालवा लाभ क्षेत्रातील द्राक्ष उत्पादकांची एप्रिल महिन्यात द्राक्षबाग छाटण्याची लगबग सुरू होते.

या पाण्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना छाटणी काळात मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातील शेतकरी द्राक्षबागांना मोकळे पाणी भरण्यात व्यस्त आहेत. यंदा निफाड तालुक्यात प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस पडला असला तरी उत्तर भाग हा पारंपरिक दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे डिसेंबर महिन्यानंतर या उत्तर भागात पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याची समस्या भेडसावत असते. मात्र, ओझरखेड कालवा उत्तर भागातून गेल्यामुळे तसेच मुख्य कालव्यापासून पाच ते सात कि.मी. अंतराचे उपकालवे तयार केल्यामुळे ओझरखेड कालवा वरदान ठरला आहे. धरणातील उपलब्‍ध पाण्यानुसार दरवर्षी रब्बी हंगाम व उन्हाळी हंगामासाठी उपकालव्याव्दारे पाणी आरक्षित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माठ अन् शीतपेयांच्या दरातही वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तापमानाचा पारा वाढतच चालल्याने मालेगावकर हैराण झाले आहेत. त्यातच पाचवीला पुजलेल्या भार‌नियमनामुळे उकाडाही सहन होईना, अशी अवस्था झाली आहे. भारनियमनामुळे फ्रीज बंद राहत असल्याने पांरपरिक मातीच्या माठांना मागणी वाढली आहे. मात्र, माठांच्याही ‌‌किमती वाढल्याने उन्हाबरोबरच महागाईचे चटके मालेगावकरांना बसत आहेत.

माठ विक्रेत्यांनी वेगवेगळ्या आकाराचे, डिझाइनचे माठ, रांजण, घागर बाजारात विक्रीसाठी ठेवले आहेत. ग्राहकांकडील वाढती मागणी लक्षात घेता या मातीच्या माठांच्या किमती देखील वाढल्या आहेत. १५० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत माठांच्या किमती आहेत. मठातील पाणी जास्त काळ थंड राहत असल्याने व आरोग्याला अपायकरक नसल्याने माठ खरेदीत वाढ झाली आहे. मालेगावचा तापमानाचा पारा ४३ अंशावर गेला आहे. उन्हाचा पारा वाढू लागल्यामुळे रस्त्यांवर दुपारनंतर शुकशुकाट पहायला मिळत असून, रसवंती, शीतपेय, ज्युसची चौकाचौकात दुकाने सजली असून ग्राहकांची गर्दी होत आहे.

महागाईच्या झळा शीतपेयांना देखील बसल्या आहेत. दहा रुपयात फूल ग्लास मिळणारा उसाचा रस आता १५ ते २०, २५ रुपये इतका महाग झाला आहे. फळांच्या ज्यूसच्या किमतीतमध्ये देखील वाढ झाली आहे. मँगो, पायनापल, संत्रा, मिक्स फ्रूट अशा वेगवेगळ्या फ्लेव्हर्समध्ये हे ज्युस उपलब्ध आहेत. तसेच, उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून बाजारात टोपी, हातरुमाल, सूती कपडे यांची मागणी वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघडे DP, मृत्यूचा धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

जुने नाशिक परिसरात उच्च विद्युत दाब असलेल्या उघड्यावरील अनेक डीपी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. या धोकादायक डीपींना स्पर्श होऊन अनेकांचा बळी गेल्यानंतर महावितरण कंपनी प्रशासन जागे झालेले नाही. या डीपींना संरक्षक जाळ्या कधी बसविल्या जाणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

खडकाळी परिसरातील गैबनशहा नगर येथे नागरी वस्तीत उच्च विद्युत दाबाची डीपी आहे. मात्र, झाकण नसलेली ही उघडी डीपी जमिनीपासून अगदी तीन फुटावर आहे. तिला कोणाचाही सहज स्पर्श होऊ शकतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. गंजमाळ बसस्थानक येथेही उघड्यावरील डीपीला जवळच लहान मुले खेळतात. यामुळे वीज महावितरण कंपनीने संरक्षक जाळी बसविण्याची मागणी वारंवार त्रस्त नागरिकांनी वेळोवेळी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जुने नाशिक परिसरातील वडाळानाका येथे तर अनेक वर्षांपासून उच्च दाबाच्या डिपी आहेत. या डीपींना संरक्षक जाळ्या बसविण्यात टाळाटाळ होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

नागजी परिसर व वडाळारोडवरही उघड्यावर अनेक डीपी नागरिकांच्या जिवितास धोकादायक ठरत आहे. शालिमारपासून जवळच असलेल्या नेहरू उद्यानालगत शाळा आहे. या शाळेजवळच उघडी डीपी आहे. याशिवाय जुने नाशिक परिसरातील अनेक भागात कोणतेही सरंक्षक जाळ्या व झाकण नसलेल्या उघड्यावरील डीपी आहेत.

कधी जागणार महावितरण प्रशासन?

डीपीला चिकटून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यावर महावितरण कंपनीचे अभियंते, अधिकारी घटनास्थळी अवतरतात. लवकरच संरक्षक जाळी लावू, असे ठरलेले आश्वासने देऊन गायबच होतात. काही महिन्यांपूर्वीच बडी दरगाह शरीफ येथे आठ वर्षीय मुलाचा उघड्यावर असलेल्या डीपीला स्पर्श झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही महावितरण कंपनीला जाग आलेली नाही. अजून किती लोकांचा जीव गेल्यानंतर प्रशासन संरक्षक जाळ्या बसविणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live

Latest Images