Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘नासा’ स्पर्धेत चेतन, सुरज अव्वल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ऑटोमोटीव्ह स्पोर्टतर्फे (नासा) घेण्यात आलेल्या ड्रमस्टीक लगून रिसॉर्ट रॅलीत दुचाकी विभागात चेतन अमृतकर तर चारचाकी विभागात सुरज देशमुख विजेते ठरले.

शेवगेडांगचे सरपंच सुरेश पोरजे व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. माजी मोटोक्रॉस खेळाडू व नासाचे संस्थापक कै. विजय देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट रायडर सुरज देशमुख यांना विदुला विजय देशपांडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच क्रेझी कोडरतर्फे स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकाला क्रेझी फिनिशर ट्रॉफी देण्यात आली

नाशिक ऑटोमोटीव्ह स्पोर्ट्स असोसिएशन अर्थात नासाने आयोजित केलेल्या ड्रमस्टिक लगून रिसोर्ट रॅलीचा उदंड उत्साहात रविवारी सकाळी सुरुवात झाली. सकाळी ९ वाजता गंगापूर रोड येथील सी. के. रिक्रिएशन येथे प्रा. राजेंद्र देशपांडे यांच्या हस्ते दुचाकी वाहनाच्या तर कायदेतज्ज्ञ मोहन बक्षी यांच्या हस्ते चारचाकी वाहनाच्या रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात झाली.

रॅलीमध्ये दुचाकी विभागात २० स्पर्धक तर चारचाकी विभागात ३१ स्पर्धक सहभागी झाले होते. दुचाकी विभागात श्वेता मच्छे (यामाहा आर झेड), दर्शना पाटील (सुझुकी अॅक्सेस), रेश्मा गांगुर्डे (यामाहा एफ झेड), रुपाली देशमुख (यामाहा एफ झेड), राधिका पाठक (रॉयल एन्फिल्ड बुलेट) या महिलांनी तर निपा दहिसारिया (स्कोडा), अश्विनी म्हसकर (टाटा नानो), मयुरी कुलकर्णी (महिंद्र वेरिटो), मानसी कोशे (टाटा नानो) या महिलांनी चारचाकी विभागात सहभाग घेतला. स्पर्धा वेळ, वेग व अंतर या पद्धतीची असल्याने वाहतुकीचे सर्व नियम पाळून स्पर्धा पूर्ण करायची होती. एकूण शंभर किलोमीटर अंतर कापण्यासाठी स्पर्धकांना पहिले १६ किलोमीटर अंतर २० च्या स्पीडने, नंतरचे १६ किलोमीटर ३० च्या स्पीडने, नंतरचे ११ किलोमीटर २० मिनिटात, नंतरचे ३ किलोमीटर ३० च्या स्पीडने, नंतरचे ६ किलोमीटर ९ मिनिटात व शेवटचे ४१ किलोमीटर ३० च्या स्पीडने पार करून स्पर्धा पूर्ण करायची होती.

स्पर्धेच्या काही क्षणाआगोदर स्पर्धकांना स्पर्धेचा रोड मॅप देण्यात आला. त्यामध्ये कोठेही ठिकाणाचे नाव न देता फक्त किलोमीटरचा उल्लेख करून वळणाची माहिती होती त्यामुळे स्पर्धका बरोबरच त्याच्या मार्ग दर्शकाची देखील कसोटी पणाला लागली. स्पर्धा गंगापूररोड, महात्मा नगर, सातपूर, पुन्हा महात्मा नगर, जेहान सर्कल, सुयोजित गार्डन रोड, मखमलाबाद गाव, पेठरोड, दिंडोरी रोड, आर. टी. ओ कार्यालय, इंद्रप्रस्थ कार्यालय, गंगापूर रोड, दुगाव फाटा, वाघेरे, पेगलवाडी फाटा, शेवगेडांग असा मार्ग होता. स्पर्धा मार्गामध्ये महात्मानगर, सातपूर भागातील वळणावर स्पर्धक नवीनच असल्याने बऱ्याच जणाची फसगत झाली. वाहतूक पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंग परदेशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

स्पर्धेचा निकाल

दुचाकी विभाग : १) चेतन अमृतकर, सागर शिंदे, २) भारद्वाज आघारकर, सौरभ सिन्हा ३) रेश्मा गांगुर्डे, अश्विनी पाटील

चारचाकी विभाग : १) सुरज देशमुख, समीर मालवाडे (मुंबई), २) ऋतुराज कोहोक, नितीन नागर, ३) जतीन ठक्कर, परितोष कोहोक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायधनी वाडा झालाय भांडारकर!

0
0

जयंत गायधनींच्या संग्रहात जपलाय तीन हजार हस्त‌लिखितांचा ठेवा

रमेश पडवळ, नाशिक

माळ्यावरच्या अडगळीत पडलेल्या पोथ्यांची बाडं आपल्या संस्कृतीचा ठेवा आहेत. त्यातील लाखमोलाच्या असंख्या पोथ्या, हस्त‌लिखिते अन् दुर्मीळ ग्रंथांना जयंत गायधनी यांच्या चिकीत्सक अन् संशोधक नजरेने हेरलं अन् या पोथ्यांना हक्काच घर मिळालं. मेनरोडवरील गायधनी वाड्यात नाशिकचं भांडारकर वसलं आहे असं कोणी म्हटलं तर अतिशयोक्ती वाटू नये... या पोथ्याचं संवर्धन झालं पाहिजे, त्यावर संशोधन व्हायला हवं या भावनेपोटी गायधनी यांनी आतापर्यंत तीन हजार हस्तलिखितांना आपल्या वाड्यात पोटतिडकीने जपलं आहे.

जयंत गायधनी यांना वडिलोपार्जित ग्रंथसंपदा व हस्तलिखिते जपताना हस्तलिखिते संवर्धनाचा छंद जडला. एकदा काशीचे अनंतशास्त्री फडके, सिन्नरचे मालपाठक, भय्याजी जोशी यांच्या संग्रहातील सुमारे पाचशे वर्षांपूर्वीची असंख्य हस्तलिखिते त्यांना मिळाली. त्यानंतरच त्यांनी आपल्या छंदाला हा वारसा जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याच्या दृष्टीने वाहून घेतले. सध्या त्यांच्याकडे तीन हजाराहून अधिक हस्तलिखिते आहेत. योग, धर्म, कविता, गणित, स्थापत्य, आयुर्वेद, व्याकरण, युद्धशास्त्र अशा अनेक विषयांवरील हस्तलिखिते मोडी, देवनागरी, संस्कृत, पारशी, उर्दू, बंगाली, नेपाळी, ओडीशी लिपीतील मात्र संस्कृत भाषेतील ही सहाव्या शतकापासून दीडशेवर्ष जुनी हस्तलिखिते गायधनींच्या संग्रहात आहेत. सहाव्या शतकातील रामायणावरील पोथीही त्यांच्याकडे आहे तर नेपाळी लिपीतील परंतु संस्कृत भाषेत असलेले सुंदरकांड हे हस्तलिखितही येथे आहे. पानिपत युद्धाचे वर्णन असलेली पेशवे बखर मोडीत उपलब्ध आहे. तर वेदांमध्ये आलेल्या व्यवसायांची सूची असलेली पोथीही त्यांच्याकडे आहे. या सर्व हस्तलिखितांच्या संवर्धनासाठी पुण्यातील भांडारकर इन्स्ट‌ट्यिूटच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. अनिता जोशी यांच्या मदतीने आतापर्यंत शंभर हस्तलिखितांचे डिजिटलायजेशनही करण्यात आले आहे.

'मला मोडी, पारशी अथवा बंगाली येत नाही. पण हा ठेवा जपला गेला पाहिजे या भावनेतून हा संग्रह वाढत गेला. हस्तलिखिते खराब होऊ नयेत म्हणून भांडारकर संस्थेकडून देखभाल करून घेण्यात आली आहे. प्रत्येक हस्तलिखिताचा विषय, नाव, लेखक, साल, स्थिती याची सूचीही तयार करण्यात आली आहे. यामुळे हस्तलिखितांच्या अभ्यासासाठी येणाऱ्यांना खूप उपयोग होतो. भावी पिढीसाठी एक महत्त्वपूर्ण बौद्धिक व सांस्कृतिक वारसा जपला जाण्याचा हा एक प्रयत्न आहे.

घरात गेल्या २५ वर्षांपासून हस्तलिखितांचा संग्रह जपला जात आहे. हे लहान-पणापासून पाहत असल्याने मीही या हस्तलिखितांचे संशोधनाच्या दृष्टीने प्रयत्न करत असून, सध्या मोडी व शारदा लिपी शिकत आहे.

चैतन्य गायधनी

घरातील हस्तलिखितांचा संग्रह म्हणजे आमच्या कुटुंबातील एक सदस्यच आहे. त्याच्या संवर्धनाची जबाबदारी आम्ही सर्वांनी मिळून उचलली आहे. हा वारसा आपल्या संस्कृतीचा भाग असल्याने त्यावर अभ्यास होण्याची गरज आहे.

बिना गायधनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचीन मंदिरांना मिळणार झळाळी

0
0

पुरातत्व विभागाचा पुढाकार; चार मंदिरांची कामे अंतिम टप्प्यात

अरविंद जाधव, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य पुरातत्व विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या प्राचीन मंदिराच्या डागडुजीचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. त्र्यंबकेश्वरमधील चार मंदिरांची कामे आटोपल्यानंतर शहरातील श्री सुंदर नारायण व गंगाघाटावरील निळकंठेश्वर मंदिराच्या जतनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. केमिकलच्या सहाय्याने होणाऱ्या साफसफाईमुळे प्राचिन मंदिरांना नवी झळाळी प्राप्त होते आहे.

प्राचीन मंदिराचे शहर अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेक मंदिराच्या जतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. देखभाल दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध होत नसल्याची ओरड केली जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य पुरातत्व विभागाने शहरातील श्री सुंदर नारायण, निळकंठेश्वर मंदिर तसेच त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थकुंड, त्रिभुनेश्वर मंदिर, इंद्राळेश्वर मंदिर तसेच बल्लाळेश्वर मंदिर जतन करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. सुरुवातीस याकामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी अपेक्षित होता. नंतर, तो निधी एक कोटी ३१ लाख रुपयांपर्यंत आला. या व्यतिरिक्त केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत त्र्यंबकेश्वर मंदिर जतनाचे काम सुरू आहे. राज्य पुरातत्व विभागामार्फत सुरू असलेल्या कामाबाबत बोलताना उपअवेक्षक यू. डी. देशपांडे यांनी सांगितले, की सध्या त्र्यंबकेश्वरमधील चार मंदिराच्या जतनाचे (देखभाल-दुरुस्तीचे) काम अं​तिम टप्प्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरमधील कामे आटोपल्यानंतर लागलीच शहरातील दोन्ही मंदिराचे कामे सुरू करण्यात येतील. मे महिन्यापर्यंत साफसफाईसह डागडुजीचे कामे पूर्ण होईल, असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला.

सव्वा कोटींचा निधी प्राप्त

कामे हाती घेण्यात आलेली मंदिरे प्राचीन असून त्यांच्या साफसफाईसाठी विशिष्ट प्रकाराचे रसायन वापरले जाते. मंदिरावर बसणारे पक्षी विष्टा करतात. त्यामुळे अनेकदा मंदिरावर झाडे उगवतात. झाडांच्या मुळा काढून तसेच इतर घाण साफ करून डागडुजी केल्यास दगडांची होणारी झीज कमी होते, अशी माहिती देखील देशपांडे यांनी दिली. राज्य पुरातत्व विभागाला या कामासाठी १ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून तो आर्कियोलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाला (एएसआय) देण्यात आला आहे. 'एएसआय'मार्फतच मंदिराच्या साफसफाईची कामे केली जातात.

या मंदिरांचे होणार जतन

श्री सुंदर नारायण मंदिर

निळकंठेश्वर मंदिर (गंगाघाट)

त्र्यंबकेश्वरमधील मंदिरे

कुशावर्त तिर्थकुंड

त्रिभुनेश्वर मंदिर

इंद्राळेश्वर मंदिर

बल्लाळेश्वर मंदिर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ कामांसाठी धावपळ

0
0

त्र्यंबकेश्वरला अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे; कामांच्या प्रगतीबाबत नाराजी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हवामान खात्याच्या अंदाजाने प्रशासन हबकले असून, २७ मे २०१५ रोजी मान्सूनला सुरुवात झाल्यास सिंहस्थ कामांच्या पूर्ततेसाठी धावपळ सुरू झाली आहे. त्र्यंबक नगरपालिका प्रशासनाने सर्व ठेकेदारांची तातडीची बैठक बोलवून कामांना वेग द्या म्हणून तगादा सुरू केला आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी पाहणी दौरा करीत कामांच्या प्रगतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

त्र्यंबकला सिंहस्थ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामे आता पूर्णत्वास येत आहेत. नव्याने वाढीव मिळालेल्या कामांबाबत मात्र वेळेत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. गत आठवड्यात झालेल्या निविदा प्रक्रियेनंतर सहा निवाराशेड आणि पाच रस्ताकामांना प्रतिसाद मिळाला नसून, ठेकेदारांनी या कामांकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले आहे. विकासकामांबाबत नगरपालिका प्रशासन आणि नगरसेवक यांच्यात बेबनाव असल्याचे उघड झाले आहे. प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी प्री फॅब्रिकेटेड शेड देण्यात यावे म्हणून सभागृहाने ठराव मंजूर केला होता. मुख्याधिकाऱ्यांनी याबाबतच्या पुनर्निविदा काढल्याने सभागृहाने ठरविलेल्या कामांना फाटा देण्याचे काम प्रशासन करीत असल्याचे नमूद केले आहे. मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांप्रमाणे कामे होत आहे, असे सांगितले. एकूणच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा हा बेबनाव सिंहस्थ कामांच्या प्रगतीत अडसर ठरणार काय असा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेत आला आहे. शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांनी प्रचंड कालापव्यय केल्याने नागरिक त्रस्त झाले असून, नगरसेवकांना यामध्ये नागरिक आणि प्रशासन यामधील दुव्याची भूमिका बजावण्यास अपयश आले आहे. सिंहस्थ पर्वणी साधण्यासाठी यापूर्वी ठकेदार गळ लावून बसत असायचे. मात्र, यावेळेस कामे घेण्यास कोणी तयार नाही, असे का याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. शाहीमार्गांचे रूंदीकरण हा विषय आता बासनात गुंडळला की काय असाच प्रश्न आता जाणकार नागरिक विचारत आहेत.

आयुक्तांसह विविध उच्चाधिकारी येथे भेट देत आहेत. मात्र, बहुदा सायंकाळी सुरू झालेला हा दौरा अंधारात पाहणी करीत आटोपता घेतला जातो असाच अनुभव कालपर्यंत आला आहे. मेनरोड गंगास्लॅबच्या दोन्ही बाजूस गटारीसाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात येत आहे. या कामाची आजची परिस्थती पाहता हे कितपत यशस्वी होणार असा सवाल उपस्थित झाला आहे.

दरम्यान, वेधशाळेचे अलीकडील बहुतांश अंदाज खरे ठरल्याने २७ मे रोजी पावसाचे आगमन झाल्यास करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्र्यंबक येथील पाऊस सुरू झाल्यास आठ पंधरा दिवस उघडीप देत नाही. त्यात बांधकामे प्रलंबित राहिल्यास सिंहस्थ नियोजन यशस्वी होणे कठीणच ठरणार आहे. अहिल्या व गोदावरी घाटाची कामांची परिस्थिती रेंगाळली आहे. कचरा डेपोचा परिसर महिनाभरात कसा स्वच्छ करणार आणि किती भाविक तेथे स्नानासाठी जाणार या बाबत सांशकता दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्जा तपासणार कोण?

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

देशातील सर्वात वेगवान प्रवासी सेवा देणाऱ्या रेल्वेमध्ये सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या पाणी बाटल्यांचा दर्जा तपासणार तरी कोण असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. त्यातच रोजच अनेकविध कंपन्यांचे लाखो बाटल्यांची रेल्वेत विक्री होत असते. यासाठी रेल्वे प्रशासनाने ठरवून दिलेले निकष पाळणाऱ्या कंपन्यांच्याच पाणी बाटल्यांची रेल्वेमध्ये विक्री करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

भारतात प्रवासी साधनांमध्ये रेल्वेचा मोठा सर्वात वाटा आहे. त्यामुळे केंद्राकडून रेल्वे विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जातो. केंद्र सरकार देखील रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधांचा विचार आणि कृती केली जात असते. परंतु, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या रेल्वेत मिळणाऱ्या पाणी बाटलीच्या दर्जाबाबत तपासणी करणार कोण असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. ऐन उन्हाळ्यात उष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याची प्र‍चंड मागणी असते. रेल्वेत गर्दीतून प्रवास करतांना जे उपलब्ध होईल ते बाटलीबंद पाणी घेण्याकडे प्रवाशांचा कल असतो. किंबहुना ती त्यांची गरजच असते. यामध्ये अनेकविध कंपन्यांच्या लाखो पाणी बाटल्यांची रोजच विक्री होते.

तसेच नाशिकरोडला देखील रेल्वेत पाणी वाटणाऱ्या एका खाजगी ठेकेदाराकडून कमी दर्जा असलेल्या पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना पुरविल्या जात असल्याचे प्रवासी सांगतात. यासाठी रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष घालत दर्जेदार व आयएसआय मार्क असलेल्याच सिलबंद पाणी बाटल्यांना रेल्वेमध्ये विक्री करण्याचे बंधन व्यावसायिकांना घातले पाहिजे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

सुरक्षित प्रवासी साधन म्हणून रेल्वेकडे आदराने पाहिले जाते. मात्र, उन्हाळ्यात प्रवाशांना विकल्या जाणाऱ्या पाणी बाटल्यांचा दर्जा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. गर्दीच्या डब्यांमध्ये किंवा अगदी रेल्वे स्टेशनवर सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या दर्जाहीन पाणी बाटल्यांकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देत कारवाई करण्याची गरज आहे.

- गणेश देवरे, प्रवासी

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

एकीकडे रेल्वेत प्रवाशांना विकत देण्यात येत असलेल्या पाणी बाटल्यांचा दर्जा दर्जा माहिती नसतो. तर दुसरीकडे प्रवाशांनी टाकून दिलेल्या रिकाम्या बाटल्या गोळा करून त्यामध्ये रेल्वे स्टेशनवरीलच पाणी भरले जाते. काही वेळ डिपफ्रिझरमध्ये ठेवलेल्या आणि साध्या प्लॅस्टिकने सिलबंद केलेल्या या पाण्याच्या बाटल्या गर्दी असलेल्या रेल्वेतील डब्यांमध्ये सर्रासपणे विकल्या जातात. गर्दीच्या डब्यांमध्ये विकण्याचे कारण की पाणी बाटली घेतांना शक्यतो कुणी फारसे प्रश्न विचारणार नाही, असा विक्रेत्यांचा डाव असतो. या सर्व प्रकाराकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून आलेले आहेत. तसेच प्रवाशी देखील तक्रार करण्याचे धाडस दाखवित नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तीकरदात्यांनो, सजग रहा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

प्राप्तीकर भरणाऱ्यांनी कायम सजग रहावे. वजावटींचे लाभ मिळविण्यासाठी बजेटचे बारकाईने वाचन करून प्राप्तिकरातील नवीन बदल आत्मसात करावेत, असे प्रतिपादन क. का. वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी केले.

पिंपळगाव कॉलेजच्या प्राध्यापक प्रबोधिनी व्याख्यानमालेत प्राप्तीकरातील तरतूदी या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. उपप्राचार्य डी. डब्लू. शेळके, एस. वाय. माळोदे व्यासपीठावर होते. ८० सीसह विविध विविध कलमांखाली मिळणाऱ्या वजावटींची सोप्या शब्दात माहिती देताना प्राचार्य डॉ. शिंदे म्हणाले, की भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्लॅस्टिक मनी ही संकल्पना प्रगत देशात लोकप्रिय झाली आहे. भ्रष्टाचाराच्या गर्तेत बुडालेल्या भारतात ही संकल्पना रुजू लागली असून तिचे स्वागतच करायला हवे. प्रत्येकाला प्राप्तीकरातून काही तरी सूट मिळतेच. त्यासाठी सॅलरी, बिझनेस, प्रापर्टी, कॅपिटल गेन, इनकम फ्राम अदर सोर्सेस हे प्राप्तिकराचे हेडस जाणून घ्यावेत. इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्डस्, देणगी, नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट, एलआयसी आदी मार्गांनी प्राप्तीकरातून सूट मिळवता येते.

रेडीरेकनरमध्ये याची सविस्तर माहिती आहे. शेतीवर कर नसल्याने उद्योजक, व्यापारी शेतीकडे वळत आहेत. लॉटरी, क्रॉसवर्ड पझल, रेस आदींच्या बक्षीसातून ३० टक्के कर वजा होतो. प्रा. ज्ञानोबा ढगे यांनी स्वागत केले. प्रा. व्ही. जी. गायकवाड यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नासा’ स्पर्धेत चेतन, सुरज अव्वल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ऑटोमोटीव्ह स्पोर्टतर्फे (नासा) घेण्यात आलेल्या ड्रमस्टीक लगून रिसॉर्ट रॅलीत दुचाकी विभागात चेतन अमृतकर तर चारचाकी विभागात सुरज देशमुख विजेते ठरले.

शेवगेडांगचे सरपंच सुरेश पोरजे व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. माजी मोटोक्रॉस खेळाडू व नासाचे संस्थापक कै. विजय देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट रायडर सुरज देशमुख यांना विदुला विजय देशपांडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच क्रेझी कोडरतर्फे स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकाला क्रेझी फिनिशर ट्रॉफी देण्यात आली

नाशिक ऑटोमोटीव्ह स्पोर्ट्स असोसिएशन अर्थात नासाने आयोजित केलेल्या ड्रमस्टिक लगून रिसोर्ट रॅलीचा उदंड उत्साहात रविवारी सकाळी सुरुवात झाली. सकाळी ९ वाजता गंगापूर रोड येथील सी. के. रिक्रिएशन येथे प्रा. राजेंद्र देशपांडे यांच्या हस्ते दुचाकी वाहनाच्या तर कायदेतज्ज्ञ मोहन बक्षी यांच्या हस्ते चारचाकी वाहनाच्या रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात झाली.

रॅलीमध्ये दुचाकी विभागात २० स्पर्धक तर चारचाकी विभागात ३१ स्पर्धक सहभागी झाले होते. दुचाकी विभागात श्वेता मच्छे (यामाहा आर झेड), दर्शना पाटील (सुझुकी अॅक्सेस), रेश्मा गांगुर्डे (यामाहा एफ झेड), रुपाली देशमुख (यामाहा एफ झेड), राधिका पाठक (रॉयल एन्फिल्ड बुलेट) या महिलांनी तर निपा दहिसारिया (स्कोडा), अश्विनी म्हसकर (टाटा नानो), मयुरी कुलकर्णी (महिंद्र वेरिटो), मानसी कोशे (टाटा नानो) या महिलांनी चारचाकी विभागात सहभाग घेतला. स्पर्धा वेळ, वेग व अंतर या पद्धतीची असल्याने वाहतुकीचे सर्व नियम पाळून स्पर्धा पूर्ण करायची होती. एकूण शंभर किलोमीटर अंतर कापण्यासाठी स्पर्धकांना पहिले १६ किलोमीटर अंतर २० च्या स्पीडने, नंतरचे १६ किलोमीटर ३० च्या स्पीडने, नंतरचे ११ किलोमीटर २० मिनिटात, नंतरचे ३ किलोमीटर ३० च्या स्पीडने, नंतरचे ६ किलोमीटर ९ मिनिटात व शेवटचे ४१ किलोमीटर ३० च्या स्पीडने पार करून स्पर्धा पूर्ण करायची होती.

स्पर्धेच्या काही क्षणाआगोदर स्पर्धकांना स्पर्धेचा रोड मॅप देण्यात आला. त्यामध्ये कोठेही ठिकाणाचे नाव न देता फक्त किलोमीटरचा उल्लेख करून वळणाची माहिती होती त्यामुळे स्पर्धका बरोबरच त्याच्या मार्ग दर्शकाची देखील कसोटी पणाला लागली. स्पर्धा गंगापूररोड, महात्मा नगर, सातपूर, पुन्हा महात्मा नगर, जेहान सर्कल, सुयोजित गार्डन रोड, मखमलाबाद गाव, पेठरोड, दिंडोरी रोड, आर. टी. ओ कार्यालय, इंद्रप्रस्थ कार्यालय, गंगापूर रोड, दुगाव फाटा, वाघेरे, पेगलवाडी फाटा, शेवगेडांग असा मार्ग होता. स्पर्धा मार्गामध्ये महात्मानगर, सातपूर भागातील वळणावर स्पर्धक नवीनच असल्याने बऱ्याच जणाची फसगत झाली. वाहतूक पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंग परदेशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

स्पर्धेचा निकाल

दुचाकी विभाग : १) चेतन अमृतकर, सागर शिंदे, २) भारद्वाज आघारकर, सौरभ सिन्हा ३) रेश्मा गांगुर्डे, अश्विनी पाटील

चारचाकी विभाग : १) सुरज देशमुख, समीर मालवाडे (मुंबई), २) ऋतुराज कोहोक, नितीन नागर, ३) जतीन ठक्कर, परितोष कोहोक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायधनी वाडा झालाय भांडारकर!

0
0

जयंत गायधनींच्या संग्रहात जपलाय तीन हजार हस्त‌लिखितांचा ठेवा

रमेश पडवळ, नाशिक

माळ्यावरच्या अडगळीत पडलेल्या पोथ्यांची बाडं आपल्या संस्कृतीचा ठेवा आहेत. त्यातील लाखमोलाच्या असंख्या पोथ्या, हस्त‌लिखिते अन् दुर्मीळ ग्रंथांना जयंत गायधनी यांच्या चिकीत्सक अन् संशोधक नजरेने हेरलं अन् या पोथ्यांना हक्काच घर मिळालं. मेनरोडवरील गायधनी वाड्यात नाशिकचं भांडारकर वसलं आहे असं कोणी म्हटलं तर अतिशयोक्ती वाटू नये... या पोथ्याचं संवर्धन झालं पाहिजे, त्यावर संशोधन व्हायला हवं या भावनेपोटी गायधनी यांनी आतापर्यंत तीन हजार हस्तलिखितांना आपल्या वाड्यात पोटतिडकीने जपलं आहे.

जयंत गायधनी यांना वडिलोपार्जित ग्रंथसंपदा व हस्तलिखिते जपताना हस्तलिखिते संवर्धनाचा छंद जडला. एकदा काशीचे अनंतशास्त्री फडके, सिन्नरचे मालपाठक, भय्याजी जोशी यांच्या संग्रहातील सुमारे पाचशे वर्षांपूर्वीची असंख्य हस्तलिखिते त्यांना मिळाली. त्यानंतरच त्यांनी आपल्या छंदाला हा वारसा जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याच्या दृष्टीने वाहून घेतले. सध्या त्यांच्याकडे तीन हजाराहून अधिक हस्तलिखिते आहेत. योग, धर्म, कविता, गणित, स्थापत्य, आयुर्वेद, व्याकरण, युद्धशास्त्र अशा अनेक विषयांवरील हस्तलिखिते मोडी, देवनागरी, संस्कृत, पारशी, उर्दू, बंगाली, नेपाळी, ओडीशी लिपीतील मात्र संस्कृत भाषेतील ही सहाव्या शतकापासून दीडशेवर्ष जुनी हस्तलिखिते गायधनींच्या संग्रहात आहेत. सहाव्या शतकातील रामायणावरील पोथीही त्यांच्याकडे आहे तर नेपाळी लिपीतील परंतु संस्कृत भाषेत असलेले सुंदरकांड हे हस्तलिखितही येथे आहे. पानिपत युद्धाचे वर्णन असलेली पेशवे बखर मोडीत उपलब्ध आहे. तर वेदांमध्ये आलेल्या व्यवसायांची सूची असलेली पोथीही त्यांच्याकडे आहे. या सर्व हस्तलिखितांच्या संवर्धनासाठी पुण्यातील भांडारकर इन्स्ट‌ट्यिूटच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. अनिता जोशी यांच्या मदतीने आतापर्यंत शंभर हस्तलिखितांचे डिजिटलायजेशनही करण्यात आले आहे.

'मला मोडी, पारशी अथवा बंगाली येत नाही. पण हा ठेवा जपला गेला पाहिजे या भावनेतून हा संग्रह वाढत गेला. हस्तलिखिते खराब होऊ नयेत म्हणून भांडारकर संस्थेकडून देखभाल करून घेण्यात आली आहे. प्रत्येक हस्तलिखिताचा विषय, नाव, लेखक, साल, स्थिती याची सूचीही तयार करण्यात आली आहे. यामुळे हस्तलिखितांच्या अभ्यासासाठी येणाऱ्यांना खूप उपयोग होतो. भावी पिढीसाठी एक महत्त्वपूर्ण बौद्धिक व सांस्कृतिक वारसा जपला जाण्याचा हा एक प्रयत्न आहे.

घरात गेल्या २५ वर्षांपासून हस्तलिखितांचा संग्रह जपला जात आहे. हे लहान-पणापासून पाहत असल्याने मीही या हस्तलिखितांचे संशोधनाच्या दृष्टीने प्रयत्न करत असून, सध्या मोडी व शारदा लिपी शिकत आहे.

चैतन्य गायधनी

घरातील हस्तलिखितांचा संग्रह म्हणजे आमच्या कुटुंबातील एक सदस्यच आहे. त्याच्या संवर्धनाची जबाबदारी आम्ही सर्वांनी मिळून उचलली आहे. हा वारसा आपल्या संस्कृतीचा भाग असल्याने त्यावर अभ्यास होण्याची गरज आहे.

बिना गायधनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचीन मंदिरांना मिळणार झळाळी

0
0

पुरातत्व विभागाचा पुढाकार; चार मंदिरांची कामे अंतिम टप्प्यात

अरविंद जाधव, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य पुरातत्व विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या प्राचीन मंदिराच्या डागडुजीचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. त्र्यंबकेश्वरमधील चार मंदिरांची कामे आटोपल्यानंतर शहरातील श्री सुंदर नारायण व गंगाघाटावरील निळकंठेश्वर मंदिराच्या जतनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. केमिकलच्या सहाय्याने होणाऱ्या साफसफाईमुळे प्राचिन मंदिरांना नवी झळाळी प्राप्त होते आहे.

प्राचीन मंदिराचे शहर अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेक मंदिराच्या जतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. देखभाल दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध होत नसल्याची ओरड केली जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य पुरातत्व विभागाने शहरातील श्री सुंदर नारायण, निळकंठेश्वर मंदिर तसेच त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थकुंड, त्रिभुनेश्वर मंदिर, इंद्राळेश्वर मंदिर तसेच बल्लाळेश्वर मंदिर जतन करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. सुरुवातीस याकामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी अपेक्षित होता. नंतर, तो निधी एक कोटी ३१ लाख रुपयांपर्यंत आला. या व्यतिरिक्त केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत त्र्यंबकेश्वर मंदिर जतनाचे काम सुरू आहे. राज्य पुरातत्व विभागामार्फत सुरू असलेल्या कामाबाबत बोलताना उपअवेक्षक यू. डी. देशपांडे यांनी सांगितले, की सध्या त्र्यंबकेश्वरमधील चार मंदिराच्या जतनाचे (देखभाल-दुरुस्तीचे) काम अं​तिम टप्प्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरमधील कामे आटोपल्यानंतर लागलीच शहरातील दोन्ही मंदिराचे कामे सुरू करण्यात येतील. मे महिन्यापर्यंत साफसफाईसह डागडुजीचे कामे पूर्ण होईल, असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला.

सव्वा कोटींचा निधी प्राप्त

कामे हाती घेण्यात आलेली मंदिरे प्राचीन असून त्यांच्या साफसफाईसाठी विशिष्ट प्रकाराचे रसायन वापरले जाते. मंदिरावर बसणारे पक्षी विष्टा करतात. त्यामुळे अनेकदा मंदिरावर झाडे उगवतात. झाडांच्या मुळा काढून तसेच इतर घाण साफ करून डागडुजी केल्यास दगडांची होणारी झीज कमी होते, अशी माहिती देखील देशपांडे यांनी दिली. राज्य पुरातत्व विभागाला या कामासाठी १ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून तो आर्कियोलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाला (एएसआय) देण्यात आला आहे. 'एएसआय'मार्फतच मंदिराच्या साफसफाईची कामे केली जातात.

या मंदिरांचे होणार जतन

श्री सुंदर नारायण मंदिर

निळकंठेश्वर मंदिर (गंगाघाट)

त्र्यंबकेश्वरमधील मंदिरे

कुशावर्त तिर्थकुंड

त्रिभुनेश्वर मंदिर

इंद्राळेश्वर मंदिर

बल्लाळेश्वर मंदिर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीआयपी कामगारांचा वनवास संपेना!

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर एमआयडीसीतील व्हीआयपी कंपनीमधील कामगारांचा वनवास संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. यात २८ महिन्यांपासून प्रलंबित वेतनवाढीची मागणी पूर्ण व्हावी यासाठी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कामगार उपायुक्त कार्यालयांसह शासकीय कार्यालयात खेटा माराव्या लागत आहेत. वेतनवाढ करार लवकर न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार असल्याचे कामगार संघटनेचे आधार पगार यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले. मात्र, कामगारांना कुणी तरी वाली मिळावा अशी आशाही पगार यांनी व्यक्त केली.

औद्योगिक वसाहतीत एकेकाळी नावाजलेली कंपनी म्हणून व्हीआयपी कंपनीची ओळख होती. परंतु, कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्या चुकीच्या काही बाबींमुळे कामगारांची होरपळ झाली. काही वर्षांपासून कंपनीतील कामगार निवृत्तीचे वय ५६ वर्षांहून ६० करावे यासाठी लढा सुरू आहे. विशेष म्हणजे सरकारच्या नियमाच्या विरोधात कामगारांना ५६ वयात निवृत्ती घ्यावी लागत असतांना कामगारांना न्याय मिळत नसल्याची भावना आहे. कंपनी सुरू झाली त्यावेळी तीन हजार कामगार होते. परंतु, कंपनीने निवृत्ती वय ५६ वर्षे केल्यानंतर आता केवळ २९० कामगार उरले आहेत. येत्या मे महिन्यात ५० कामगारांना निवृत्ती घ्यावी लागणार आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत असलेल्या 'व्हीआयपी'मधील कामगारांचा वनवास संपणार तरी कसा असा प्रश्न कामगार उपस्थित करीत आहेत.

बैठकांवर बैठक; तोडगा नाहीच

व्हीआयपी कंपनीतील कामगारांच्या वेतनवाढीसाठी कंपनी व्यवस्थापन व कामगार उपायुक्त यांच्याकडे २५ पेक्षा अधिक बैठका झाल्या. मात्र, अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. यासाठी कामगार उपायुक्त जाधव यांनी पुढाकार घेण्याची वेळोवेळी कामगारांनी मागणी करून देखील कामगारांना न्याय मिळत नसल्याने नाराजीची भावना आहे.

दुहेरी संकटात फसला कामगार

निवृत्तीचे वय ५६ वरून ६० वर्षे करावे अशी कामगार मागणी करत असतांना दुसरीकडे २८ महिन्यांपासून वेतनवाढीचा करार कंपनी व्यवस्थापनाने केलेला नाही. यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे. कामगार आंदोलनाच्या तयारीत असल्याचे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रश्नी कामगारांनी अनेक आमदार, खासदार व राजकीय पक्षांकडे आपली गाऱ्हाणी मांडली. मात्र, अद्याप मार्ग न निघाल्याने कामगारांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.

'व्हीआयपी'मधील कामगारांना अनेक वर्षांपासून संकटांना समोरे जावे लागले आहे. व्हीआयपीच्या नंतर आलेल्या अनेक कंपन्यांमध्ये अधिक वेतन दिले जात आहे. निवृत्तीच्या वयात केवळ १५ हजार वेतन घेऊन कामगारांना घरी बसावे लागत आहे. याकडे कामगार विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे.

- आधार पगार, सदस्य, व्हीआयपी कामगार संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाट चुकलेला बछडा आईच्या कुशीत!

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

गंगापूर गोवर्धन शिवारात नेहमीच बिबट्याचे दर्शन होते. मंगळवारीही दुपारी बिबट्याच्या बछडा आढळून आला आणि गंगापूर गोवर्धन शिवारातील गवकऱ्यांची पाचावर धारण बसली. वाट चुकलेल्या या बछड्याचा मुक्त संचार आणि त्याला दुरून बिबट्या मादीकडून दिला जाणार आवाज असा सुमारे चार तास खेळ चालला. अखेर बिबट्या आईच्या कुशीत विसावला. काही क्षणात दोघे बिबटे गवताच दिसेनासे झाले आणि सगळ्यांनीच सुटकेचा सुस्कारा सोडला.

गेल्या काही महिन्यांपासून गंगापूर गोवर्धन शिवारात रात्रीच्या सुमारास मादी जातीच्या बिबट्याचे अनेकदा वाहनचालकांना दर्शन झाले आहे. याबाबत वनविभागाकडे शेतकऱ्यांनी व मुक्त विद्यापिठाने तक्रार केली असता, विद्यापिठात पिंजरा बसविण्यात आला होता. परंतु, विद्यापिठात बसविण्यात आलेल्या पिंजऱ्याकडे बिबट्या फिरकलेलाच नसल्याने अद्यापही मुक्त संचार करत आहेत. दरम्यान, सोमवारी दुपारी बारा वाजेनंतर गोवर्धन शिवारात असलेल्या पेन अॅण्ड सुला लॅण्ड लिमिटेड या खाजगी मालकाच्या जागेवर बिबट्याचे बछडे मुक्त संचार करत असलेले येथील सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. यानंतर वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी देखील बछडा असलेल्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी मादी बिबट्याकडून बछड्याला आवाज देण्यात येत होता. काही तासानंतर मादी बिबट्याच्या आवाजाच्या दिशेने बछडा निघून गेला असल्याचे वनविभागाचे गणेश वाघ यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी विद्यापिठात पिंजरा बसविण्यात आल्याचेही वाघ म्हणाले. परंतु, भविष्यात मादी बिबट्याकडून जिवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण असेल, असा सवाल गंगापूर गोवर्धन शिवारातील शेतकरी करत आहेत. यासाठी वनविभागाने पेन अॅण्ड सुला लॅण्ड लिमिटेड या खाजगी मालकाच्या जागेवर दुसरा पिंजरा बसविण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

आईकडून ‌शिकारीचे प्रशिक्षण?

बिबटा मोठा होऊ लागला की त्याला आईकडून शिकार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे बिबट्याला आई स्वत:पासून दूर करते. अशा प्रसंगी ती बछड्यावर नजर सुद्धा ठेवते. सोमवारीही बिबट्या आईपासून दूर होण्याची घटना शिकारीचे प्रशिक्षण देण्यासाठीच असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

गंगापूर गोवर्धन शिवारात अनेक महिन्यांपासून मादी जातीच्या बिबट्याचे अनेकदा वाहनचालकांना दर्शन झाले आहे. याबाबत वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर मुक्त विद्यापिठात पिंजरा बसविण्यात आला होता. त्यातच मंगळवारी दुपारच्या सुमारास मादीच्या बछड्याचा मुक्त संचार गोवर्धन शिवारात पहायला मिळाला. यासाठी वनविभागाने दुसरा पिंजरा लावण्याची गरज आहे.

- शरद बेंडकुळे, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधीच्या मशीन खरेदीचा डाव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटलच्या विस्तारीकरण व बांधकामापूर्वीच वैद्यकीय विभागाकडून सिंहस्थाच्या नावाखाली तब्बल २३ कोटी रुपयांची मशीनखरेदी करण्याचा डाव घातला जात आहे. एमआरआय, सीटी स्कॅन आणि डिआरआय सिस्टीम्ससाठी २३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे शासकीय रुग्णांलयामध्ये पीपीपी अंतर्गत कंपन्या स्वखर्चाने या मशिन बसवण्यास तयार असतांना वैद्यकीय विभागाच्या मशिन्स खरेदीच्या मोहावर आक्षेप घेतला जात आहे. शिवसेनेसह, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआयने या मशिन्स खरेदीला विरोध केला आहे.

महापालिकेच्या वतीने बिटको रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात येत असून ५०० खाटांची सात मजली इमारत उभी केली जात आहे. सध्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचेही काम पूर्ण झालेले नाही. एकीकडे रुग्णालयाचे बांधकाम सुरू असतांनाच, वैद्यकीय विभागाला मात्र या रुग्णालयासाठी मशीनरी खरेदीचा मोह निर्माण झाला आहे. शिखर समितीने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाला विविध कामांसाठी ३१ कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यात हॉस्पिटलच्या आधुनिकीकरणासह आरोग्य सुविधांवर भर दिला जाणार आहे. वैद्यकीय विभागाने मात्र या निधीतून थेट बिटको हॉस्पिटलसाठी मशीन खरेदीचा डाव रचला आहे. हॉस्पिटलसाठी १२ कोटी रुपये खर्चून एमआरआय मशीन्सची खरेदीसह सीटी स्कॅनसाठी ७ कोटी, डीआर सिस्टीम्ससाठी दीड कोटी, ब्लड बँक आणि लॅबसाठी अडीच कोटीचा खर्च केला जाणार आहे. हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच प्रशासनाची मशीन खरेदीची घाई कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

थेट खरेदीचा घाट का?

पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या उपक्रमांतर्गत उत्पादक कंपन्याकडूनच शासकीय हॉस्पिटलमध्ये या मशीन बसवून रुग्णांना कमी दरात सेवा पुरविली जाते. त्यात मनुष्यबळासह सर्व तांत्रिक सेवा कंन्यांकडून पुरविली जाते. पिंपरी चिंचवड आणि मुंबई महापालिकेतील अनेक हॉस्पिटलमध्ये 'पीपीपी'च्या धर्तीवर रुग्णांना सेवा दिली जाते. यात महापालिकाच दर निश्चित करत असून उत्तम प्रकारची सेवा मिळते. सोबतच सरकारचा मशीन खरेदीचे पैसेही वाचतात. वैद्यकीय विभागाने मात्र 'पीपीपी'च्या धर्तीवर मशीन्स बसविण्याऐवजी थेट खरेदीचाच घाट घातला आहे.

मशीन ठेवणार तरी कुठे?

हॉस्पिटलचे काम पूर्णही नसतांना खरेदी केलेल्या मशीन कुठे ठेवणार असा सवाल शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक आणि आरपीआयचे गटनेते प्रकाश लोंढे यांनी केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआयने या खरेदीला विरोध केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैशाख वणव्याचा नाशिकला तडाखा

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

सूर्य तळपू लागल्यानंतर उन्हाचा पारा ४० अंशावर जाऊन ठेपला आहे. दुपारी तर उन्हाचे चटके असह्य होत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून देवळाली कॅम्प शहर ओळखले जाते. मात्र, शेतीशिवारांनी बहरलेल्या या भागातही वैशाख वणव्याचा तडाखा जाणवू लागला आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात मुंबई, गुजरात सारख्या भागातील व्यापारी वर्ग देवळालीत उन्हाळ्याची सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येतात. आरोग्यधाममध्ये तर अधिकच वर्दळ असते. मात्र, वाढत्या उन्हाच्या चटक्याने पर्यटकांनीही देवळालीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. देवळाली कॅम्पमध्ये तापमानाचा पारा ३९ अंश सेल्सियस पार करून गेला आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी सनगॉगल, टोपी, डोक्यावर कॉटनचा रुमाल, तर महिला वर्ग सनकोट, हातमौजे आदीसारख्या संरक्षक वस्तूंचा वापर करीत असल्याचे दिसते आहे. रस्त्यांवरील विविध रसाचे गाडे, आंबारस विक्रेते, कुल्फी, बर्फगोळा विक्रेत्यांकडे ग्राहक वर्ग आपली उन्हाची तीव्रता शमविण्यासाठी गर्दी करत आहे. याउलट पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या या परिसरात पहाटे ५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत हवेत गारवा राहत असल्याने रस्त्यांवर नागरिक सकाळच्या फेऱ्या मारण्यासाठी फिरत दिसत आहेत. खंडोबा टेकडीच्या ठिकाणी सकाळी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप मंत्र्यांनी केली फसवणूक

0
0

विनोद पाटील, नाशिक

गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी महिनाभरापूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी फसवणूक केल्याचा आरोप निफाड तालुक्यातील सारोळे खुर्दच्या ग्रामस्थांनी केला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मदत मिळेल, असे आश्वासन देवून गेलेल्या सिंह यांची पाठ फिरून महिना लोटला तरी मदतीचा छदामही मिळाला नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

अक्षयतृतीयेनंतर ग्रामसभा घेवून सिंह यांच्यासह महसूलमंत्री आणि पालकमंत्र्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा ठराव केला जाणार आहे, अशी माहिती सरपंच कैलास भोसले यांनी दिली आहे. त्यामुळे सिंह यांच्यासह राज्यसरकारमधील मंत्र्यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यात निफाड तालुक्यातील, सारोळे, उगाव या गावांवर तर आपत्तीच कोसळली होती. सततच्या अवकाळी पावसाने नुकसान होवूनही सरकारने नुकसान भरपाई दिली नसल्याने सारोळे ग्रामस्थांनी असहकार आंदोलन सुरू केले होते. सरकार वा प्रशासकीय यंत्रणेशी थेट दोन हात करण्याऐवजी गांधीगिरीचा मार्ग सारोळे खुर्द गावाने निवडला. यापुढे कोणतीही सरकारी देणी न देण्याचा ठरावच ग्रामपंचायतीने केला आहे. तसेच गावात कुणी आत्महत्या केल्यास आमदार, खासदार व पालकमंत्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा ठरावही करण्यात आला आहे. आता गावातील एकही जण घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबिल अथवा टोल भरणार नसल्याचा ठराव करण्यात आला होता.

गावकऱ्यांच्या या असहकार आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. केंद्रीय पथकाने गावाला भेट देवून नुकसानाची पाहणी केली. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह, राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ग्रामस्थांचे सात्वन केले. शेतकऱ्यांशी संवाद साधत, फळबागाच्या पूनर्वसनासह एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात आर्थिक मदत मिळेल, असे आश्वासन दिले. कृषिमंत्र्यांनी सारोळे खुर्दसह वनसगाव, उगाव आणि चिवडी या गावांना भेटी देवून मदतीचे आश्वासन दिले. खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच आश्वासन दिल्याने ग्रामस्थ सुखावले. मात्र, दिलेल्या आश्वासनाला आता महिना लोटला तरी छदामही ग्रामस्थांपर्यंत पोहचला नाही. ग्रामस्थांचे सुमारे ७०० हेक्टर पिकांचे नुकसान तर दीडशे घरे जमिनदोस्त झाली. मात्र, महिनाभराच्या काळात गावाकडे कुणीही नेता अथवा अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी मदतीच्या आठवणीसाठी ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. त्यानंतरही शासकीय यंत्रणेकडून ग्रामस्थांना प्रतिसाद मिळाला नाही.

गरज पडल्यास कोर्टातही जाणार

महिनाभरानंतरही उघड्यावर पडलेले संसार, ओसाड जमिनी, उदध्वस्त बागा, भुईसपाट झालेली पिके अशा बिकट स्थितीतही मायबाप सरकार शेतकऱ्यांवर मायेचा हात फिरवायला तयार नाही. थेट मंत्र्यांनीच दिलेला शब्द शासकीय यंत्रणेने पाळला नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सारोळकरांसह संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थांची फसवणूक झाल्याचा आरोप केला असून असहकार आंदोलन कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या फसवणुकीविरोधात ग्रामसभा घेवून सिंह यांच्यासह खडसे, महाजन आणि जिल्हा प्रशासनाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा ठराव ग्रामस्थांकडून केला जाणार आहे. या फसवणुकीविरोधात गरज पडल्यास थेट न्यायालयात दाद मागण्यात येणार असून मंत्र्यांच्या आश्वासनांची व्हिडिओ टेप आणि भेटीचे फोटो पुरावे म्हणून सादर केले जाणार आहे.

केंद्रीय मंत्री आणि राज्याच्या मंत्र्यांनीच मदतीचा शब्द दिला होता. मात्र हा शब्द महिना झाला तरी पाळला गेला नाही. त्यामुळे केंद्रीय कृषिमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री यांच्यासह जिल्हा प्रशासनाविरोधात फसवुणीकीचा तक्रार ग्रामस्थांतर्फे केली जाणार आहे. यासाठी दोन तीन दिवसात ग्रामसभा घेवून ठराव केला जाणार आहे.

- कैलास भोसले, सरपंच, सारोळे खुर्द

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी शहरात सोमवारी पहाटेच्या सुमारास जैनमंदिर शेजारील जुने पिंपळाचे झाड अचानक कोसळले. या झाडाखालील पानमसाला टपरी ही जमीनदोस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली. दिवसभर या झाडाखाली प्रवासी वाहने, प्रवासी उभे असतात. सुदैवाने रात्रीच्या वेळी झाड पडल्याने जीवित हानी टळली. मात्र वाहतूक विस्कळीत झाली होती. पिंपळाच्या झाडाखाली रोज काळीपिवळी टॅक्सी उभ्या राहतात. शेजारी अनेक टपऱ्याही आहेत. तसेच दिवसा अनेक प्रवासी याच झाडाखाली उभे राहतात. दिवसा ही घटना न घडल्याने अनर्थ टळला. याच ठिकानावरून मोठ्या प्रमाणात शहरातील तसेच शिर्डी भंडारदरा जाणारा मार्ग असल्याने शहरात आज दिवसभर वाहतूक विस्कळीत झाली होती. दिवसभर हे झाड तोडण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाकाठ परिसरात बिबट्याची दहशत

0
0

किशोर वडनेरे, लासलगाव

गेल्या शुक्रवारी निफाड तालुक्याच्या भुसे गावातील पोटे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात अवघा चार वर्षाचा मुलागा ठार झाला. यामुळे गोदाकाठातील गावे पुन्हा एकदा नरभक्षक बिबट्याच्या दहशतीमुळे हादरून गेली आहेत. मनुष्याच्या जीविताला धोका ठरू पाहत असलेल्या या नरभक्षकांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने काही ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली

गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने उन्हाळ्याच्या दिवसात एप्रिल ते जूनच्या मध्यापर्यंत या भागातील काही गावांना बिबट्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. पाळीव प्राण्यांपाठोपाठ माणसांवरही बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्याच्या अनेक घटना परिसरात घडल्याने या प्रकाराने गंभीर रूप धारण केले आहे. सुमारे तीन वर्षापूर्वी शिवरे गावातील दोन लहान मुलांना एकाच महिन्यात बिबट्याने ठार केले होते. त्यानंतरही बिबट्यांनी जीवघेणे हल्ले करून गोदाकाठातील लहानग्यांना ठार मारण्याचा घटनाक्रम सुरुच ठेवला असल्याचे भुसे येथे शुक्रवारी घडलेल्या घटनेने स्पष्ट होत आहे.

नैसर्गिक भक्ष मिळणे दुरापास्त झाल्याने भुकेपोटी ही जंगली श्वापदे आता मानवी वस्त्यांकडे आकर्षली जात आहेत. यामुळे वन्यजीवांचा जगण्यासाठीचा संघर्ष आता आणखी कठीण होत चालल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. गोदाकाठातील गावांमध्ये सायंकाळी अंधार गडद होऊ लागताच मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यांच्या भीतीने येथील रहिवाशांना एकटे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यांनी कळस गाठल्याने हिंस्त्र श्वापदांचे लहान मुलांवर होणारे हल्ले चिंतेचा विषय बनत चालला आहे.

गेल्या महिनाभरापासून भुसे, मांजरगाव परिसरातील रहिवाशी बिबट्याचा जीवघेणा थरार अनुभवत आहेत. सातत्याने बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असल्याने या परिसरात बिबट्यांची संख्या वाढल्‍याची शक्यता आहे. त्यातही यातील काही बिबटे माणसाच्या रक्ताला चटावल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. दिवसभर शेतावर काम करून सायंकाळी घरी परतणाऱ्या मजुरांमध्ये या हिंस्त्र श्वापदांची मोठी दहशत पसरली आहे. निर्ढावलेले नरभक्षक बिबटे दिवसाढवळ्या जनावरांपाठोपाठ खुलेआम लहान मुलांवर हल्ले करू लागल्याने परिसरातील नागरिकांचे रोजचे जगणे कठीण होऊन बसले आहे.

मांजरगाव, भुसे, चाटोरी, बेरवाडी, करंजगाव, सोनगाव, शिंगवे, कुरडगाव, कोठुरे, सुंदरपूर, जळगाव, काथरगाव, सायखेडा व नांदूरमधमेश्वर परिसरातील काही गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. भक्ष मिळणे दुरापास्त झाल्याने भुकेपोटी ही जंगली श्वापदे आता रस्त्याने ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांनाही लक्ष करू लागली आहेत. जंगले नष्ट झाल्याने वन्यजीवांना पाण्यासाठी व भक्षासाठी दूरवर भटकंती करण्याची वेळ येवून ठेपली आहे.

ऊसतोडमुळे मिळेना लपायला जागा

सिन्नर व निफाड तालुक्याच्या सरहद्दीतील गावांमध्ये बिबटे व तरस यांचा नेहमीच संचार राहिला आहे. मांजरगाव, चापडगाव, भुसे, शिंगवे, सोनगाव, नांदुरमधमेश्वर, शिवरे, सारोळेथडी, नैताळे, सोनेवाडी ते पुढे थेट सायखेडा, चांदोरीपर्यंतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस लागवड क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्या, तरस, लांडगे, कोल्हे, रानमांजर या वन्यजीवांना लपण्यासाठी हे ऊस लागवड क्षेत्र उत्तम अधिवास ठरले आहे. एरवी सायंकाळी नजरेस पडणारे बिबटे आता दिवसाही विहिरीकडेला, वस्त्यांजवळ नजरेस पडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, पिंजऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरला गोदावरीचे प्रदूषण होणार कमी

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या रिव्हर सिव्हर योजनेबद्दल साधू-महंतांनी समाधान व्यक्त केले आहे. त्र्यंबक तालुक्यातील बेझे गाजरवाडी येथील श्रीराम शक्तीपीठ आश्रमाचे सोमेश्वर चैतन्य बालब्रह्मचारी साहिबान महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्ताची पाहणी केली. कुशावर्तातील अस्वच्छतेबाबत तीव्र शब्दात नापसंती व्यक्ती केली. अर्थात याच वेळेस येथे गोदावरी नदीत सांडपाणी मिसळणाऱ्या गटारी स्वतंत्र बांधण्यात येत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.

त्र्यंबकेश्वर येथील मेनरोड गंगास्लॅबच्या दोन्ही बाजूस भूमिगत गटारी निर्माण करण्यात येत आहेत. यासाठी सुमारे ६७ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. याबाबत बालब्रह्मचारी रामभक्त साहिबान महाराज यांनी समाधान व्यक्त केले. यापुढे स्वच्छ गोदावरी जल भाविकांना स्नानासाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, कुशावर्त तीर्थाता फुले, नारळ आदी पूजा साहित्य सोडल्याने तसेच धार्मिक विधींदरम्यान काही विद्राव्य घटक पाण्यात मिसळत असल्याने पाणी दूषित होत आहे. भाविकांना दूषित पाण्यात स्नान करावे लागते. याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. याबाबत केवळ प्रशासनावर खापर फोडणे याग्य नाही तर, भाविकांनी स्वतः याची काळजी घेतली पाहिजे. येथे पूजा साहित्याचा कुशावर्ताच्या पाण्यास स्पर्श करून नंतर ते वेगळ्या भांड्यात ठेवले तर अधिक योग्य होईल, तशी तजवीज प्रशासनाने केली पाहिजेे, असे अधोरेखीत केले.

या पाहणी दौऱ्यात महाराजांच्या शिष्यमंडळासोबत श्रीनाथ महाराज, सिद्धिनाथ महाराज तसेच त्र्यंबकेश्वर येथील भक्त डॉ. सचिन काळे, डॉ. मयूर गाजरे, अभय मोरे आदी सहभागी झाले होते. जवळपास सत्तर टक्के भूमिगत गटारी झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाबरोबरच वाढली पाण्याची टंचाई

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

कडाक्याच्या उन्हामुळे नांदगाव तालुक्यातील विविध गावात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ ग्रामीण भागातील महिलांवर आली आहे. नांदगाव तालुक्यात सध्या आठ गावे व ३९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वाढत्या उन्हाबरोबरच पाण्याची टंचाई आणखी वाढणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी साठवण्याची तसेच जपून वापरण्याची वेळ आली आहे.

तापलेल्या जमिनीवर उन्हाच्या प्रखर झळा सोसत पाण्याचा शोध घेणे जिकिरीचे असून, तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. नांदगाव तालुक्यातील वाड्या-वस्तींवर आतापासूनच पाणीटंचाईचे सावट पसरल्याची स्थिती आहे. नांदगाव तालुक्यातील तब्बल आठ गावे आणि ३९ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने पाच पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली आहे. टँकरने पाणी मिळण्याची सोय झाल्याने ग्रामीण भागातील जनतेचे काही प्रमाणात हाल कमी होण्यास हातभार लागला आहे. पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी विहिरी अधिग्रहित करण्याचे ही काम सुरू असून, नांदगाव तालुक्यात अशा विहिरींची संख्या सात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कडाक्याच्या उन्हामुळे टंचाईग्रस्त गावे, वाड्या यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या पुढील काळात पाणी समस्या अधिक बिकट होण्याची चिन्हे आहेत. अवकाळी पावसाने ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून, आता पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

नांदगाव तालुक्यातील मनमाड शहराच्या पाचवीलाच पाणीटंचाई पूजली आहे. उन्हाळ्यात तर बावीस दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ गेल्या वेळी आली होती. सध्या मनमाडला सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुका असल्यामुळे इच्छुकांनी टँकरने पाणीपुरवठा करून मनमाडकरांची तहान भागवली होती. यंदा मात्र, टँकरने पाणीपुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास मनमाडकरांवर पाणी विकत घेण्याची वेळ येऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत निवडणुका उधारीवरच!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामपंचायत निवडणूक यंत्रणेवरील खर्च भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाच कोटी चार हजार रुपयांची मागणी केली असली तरी तूर्तास प्रशासनाला अवघे एक कोटी १८ लाखच प्राप्त झाले आहेत. प्राप्त निधीमध्ये निवडणुकीचा खर्च कसा भागवायचा असा पेच प्रशासनापुढे निर्माण झाला असून ही निवडणूकही उधारीवरच पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक विभागावर येऊन ठेपली आहे.

जिल्ह्यात बुधवारी (दि. २२) ग्रामपंचायत निवडणुकांचा बार उडणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरील खर्चापोटी २० हजार रुपये याप्रमाणे जिह्यातील अडीच हजार मतदान केंद्रांसाठी पाच कोटी चार हजार रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने राज्य सरकारकडे केली होती. मात्र, राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात केवळ २५ लाखांचा निधी दिला. १०३ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे प्रशासनाचा खर्चही सुमारे दोन कोटी रुपयांनी कमी होणार आहे. आता ४८७ ग्रामपंचायतींमधील १६५६ केंद्रांसाठी प्रशासनाला ३ कोटी ३१ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र सोमवारी प्रशासनाला आणखी ९३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

निवडणूक कामासाठी आतापर्यंत १ कोटी १८ लाख रुपये निधी मिळाला आहे. सरकारने प्रतिग्रामपंचायत १५ हजार रुपये याप्रमाणे निधी दिला असला तरी निवडणुकीसाठी वापरली जाणारी वाहने, त्यांना लागणारे इंधन, कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पगार व तत्सम कारणांसाठी प्रतिकेंद्र २० हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, अपेक्षित निधी अद्याप मिळू शकलेला नाही. ओझरसारख्या ग्रामपंचायतीमध्ये ३८ केंद्र आहे. एका केंद्रावर पाच कर्मचारी म्हटले तरी येथे सुमारे दोनशे कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. मात्र या ग्रामपंचायतीसाठीही केवळ १५ हजार रुपये निधी मिळाला आहे. एवढ्या निधीमध्ये खर्च कसा भागणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

उधारीवर मिळेना डिझेल

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या सरकारी वाहनांमध्ये उधारीवर इंधन भरून देण्यास पेट्रोलपंप चालक नकार देत असल्याची कैफियत जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी मांडली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १५० बसेस पुरविण्याचे मान्य केले असले तरी अपेक्षित प्रवास भाड्याच्या किमान ५० टक्के अनामत रक्कम भरण्यास सांगितले आहे. मात्र तरीही हा सगळा व्यवहार उधारीवरच रेटून नेण्याची जबाबदारी या विभागावर येऊन पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशी पर्यटकांची टॅक्सी चालकाकडून लूट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मॉरेशियसमधून भारतात आलेल्या एका वृध्द दाम्पत्याला मुंबई नाका परिसरात टॅक्सी चालकाने लुटले. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, संशयित टॅक्सी चालकाच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. लुटीची घटना शनिवारी संध्याकाळी घडली होती.

मॉरिशेसमध्ये राहणाऱ्या बेबी फैजा अब्दुला खान (वय ७१) आणि त्यांचे पती १७ एप्रिलरोजी मुंबईत आले. मॉरेशियसमध्ये जेलरच्या कामातून निवृत्त झालेले खान दाम्पत्य विविध दर्ग्यांना भेटी देण्यासाठी भारतात येत असतात. दोन वर्षापूर्वी देखील ते भारतात आले होते. भारतात आल्यानंतर वृध्द दाम्पत्य मुंबईतील डोंगरी परिसरात राहिले होते. त्यावेळी माजगाव परिसरात राहणाऱ्या अक्तर चौगुले या टॅक्सी चालकाने त्यांना पुणे येथील काही दर्गांमध्ये नेले होते. परतीच्या प्रवासात चौगुलने शितपेये दिल्यानंतर खान दाम्पत्य झोपी गेले. या दरम्यान, चौगुलने त्यांच्याकडील दोन हजार डॉलरसह एका मोबाइलची चोरी केली. चोरीच्या घटनेनंतर मॉरशीस गाठलेले पती-पत्नी १७ एप्रिलरोजी परत मुंबईत आले. भेंडी बाजार येथे संशयित चौगुले त्यांना दिसून आला. चोरीच्या घटनेबाबत विचारणा केली असता, पैसे देतो असे सांगत चौगुले त्यांना त्याच्या घरी, माजगावला घेऊन गेला. तेथील पाहुणचार आटोपल्यानंतर चौगुलेने खान दाम्पत्याला विविध दर्ग्यांना जाऊ असे सांगितले. संशयित आरोपी शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई नाका येथील सैलानी बाबा दर्गेजवळ पोहचला. तिथे त्याने खान दाम्पत्यास दमदाटी करण्यास सुरुवात केली. तुम्हाला ड्रग्ज तस्करीच्या खोट्या केसमध्ये अडकवतो, असे सांगून त्याने दोघा वृध्दांकडून सोन्याचे दागिने, अमेरिकन डॉलर असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला. यानंतर शहरातील एका नातेवाईकाच्या मदतीने खान दाम्पत्य भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, टॅक्सी चालकाच्या शोधासाठी एक पथक मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे.

२८ होर्डिंगसाठी भाड्याने जागा

नाशिक : महापालिकेन शहरातील २८ रिकाम्या जागा होर्डिंग लावण्यासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. एक वर्षाच्या करारावर या जागा दिल्या जाणार असून, त्यातून पालिकेला चांगले उत्पन्न मिळेल, असा दावा केला जात आहे. ई-टेंडरिंग करून या जागा खासगी संस्थाना दिल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live

Latest Images