Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

'अवकाळी'चा आंब्याला तडाखा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे काल दुपारी दोन वाजेदरम्यान अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. शहर आणि परिसरात आंबा पिकास पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यात शेकडो एकर आंबा लागवड झाली आहे. केसर आणि हापूस वाणाच्या चांगला भाव असलेल्या फळांच्या सोबतच रानवळ आंबा देखील मोठ्या प्रमाणात येत असतो. मात्र, यावर्षी आंब्यास बदलत्या वातावरणाने हानी पोहचली आहे.

येथील प्रगतशील शेतकरी पांडूरंग भोई यांनी विविध प्रयोग राबवून आंब्याची झाडे जोपासली आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गत महिन्यात वारा आणि पावसाने मोहरलेला तसेच नुकताच कळी धरू लागलेला आंबा झडून गेला होता. त्यानंतर काही प्रमाणात फळे धरली. मात्र, या दोन दिवसातील वातावरणाने हाती काही लागणार नाही, असे दिसते. शासनाने विशेषतः कृषी खात्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

दर महिन्यात अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे आंबा उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. गेल्या वर्षीही खराब हवामानामुळे आंबा पिकावर परिणाम झाला होता. परिणामी चढ्या दराने आंबे खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली होती. तसेच लोणच्याच्या कैरी मिळणेही दुरापास्त झाले होते. यंदाही सातत्याने वातावरणात बदल होत आहे. ढगाळ वातावरणामुळे आधीच आंब्याचा मोहर गळून पडला होता. उरल्यासुरल्या फळांना आता वारा, पाऊस व गारपीटमुळे तडाखा बसत आहे. यामुळे यंदाही आंबा आंबटच लागणार आहे.

वादळी हवामानाने सतत वीज गायब होत आहे. याचा फटका त्र्यंबकच्या पाणीपुरवठ्यास बसला आहे. त्र्यंबक येथे सतत तीन दिवस पाणीपुरवठा झालेला नाही. भर उन्हाळ्यात पाऊस पडतो आणि नळाला मात्र पाणी नाही, अशा विचित्र परिस्थितीत त्र्यंबकचे नागरी जीवन सापडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलने समृद्ध केले जीवन

$
0
0

फणिंद्र मंडलिक

अनेकांना निर्सगाच्या सानिध्यात रमायला आवडते तर काहींना समाजसेवेत. मात्र, सत्तरीकडे झुकलेल्या ज्ञानेश्वर गायकवाड (नाना) यांनी सायकलच्या माध्यमातून जग पालथे घालत पर्यावरण वाचविण्याचा चंग बांधला आहे. नानांनी सायकल मोहीमच नाही तर, भारतातील सर्व उंच शिखरे पालथी घातली असून, पाकिस्तानातील के टू हे शिखर पादाक्रांत करण्याच्या तयारीत आहेत.

ज्ञानेश्वर गायकवाड यांना लहानपणापासून सायकलची आवड. सायकलवरून शाळेत येत जात असत. त्यांची सायकलची आवड पाहून वडिलांनी त्यांना त्याकाळी ४५ रुपयांची नवी सायकल घेऊन दिली. नवी सायकल पाहून त्यांना गगनात मावेनासा आंनद झाला. सायकल म्हणजे त्यांची जीव की प्राणच झाली. सायकलवरून गाईला चारा आणण्याचे काम त्यांना करावे लागत असे. कामाच्या निमित्ताने का होईना सायकल हाताळायला मिळायची हाच त्यांना मोठा आनंद होता. शालेय शिक्षण संपवून त्यांना वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी नाशिकला यावे लागले तरी ही त्यांनी सायकलची साथ सोडली नाही. नाशिकरोड ते कॉलेजरोड हा प्रवास त्यांनी सायकलवरूनच केला. याच काळात त्यांना गिर्यारोहक मित्रांची ओळख झाल्याने नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या मोहिमा आखण्यास सुरुवात केली. नाशिकमधील गडकिल्ले सर झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा अभ्यास करून पालथे घालण्यास सुरुवात केली. आजवर अनेक गडकिल्ले सर केले. नाशिक जिल्ह्यातील गड किल्ल्यांवर जाण्यासाठी त्यांनी बहुतांश वेळा सायकलचा वापर केला. त्यातूनच सायकलची आवड असलेले मित्र भेटले. त्यातूनच नाशिक सायकलिस्ट असोसिएशनची स्थापना झाली. नाशिक सायकलिस्टच्या माध्यमातून गायकवाड नानांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. कुणीही म्हटले 'नाना चला इकडे' तर नाना एका पायावर तयार. इतके त्यांना सायकलचे वेड लागले.

नानांकडे दोन सायकली असून, त्याद्वारे ते रोज सुमारे पन्नास ते शंभर किलोमीटर सायकलिंग करतात. आजवर त्यांनी नाशिक ते पंढरपूर आणि नाशिक ते शेगाव ही मोहिमही दोन वेळा पूर्ण केली आहे. नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत झालेल्या नाशिक ते घोटी व घोटी ते नाशिक या स्पर्धेत नानांनी द्वितीय क्रमांक मिळवला. सायकलिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ठराविक पात्रता गुणांची आवश्यकता असते. त्यासाठी विविध प्रकारच्या मोहिमा आयोजित केल्या जातात. चंबूर ते पानशेत व पानशेत ते चेंबूर हे अंतर बारा तासात पूर्ण करण्याचा विक्रमही नानांच्या नावावर आहे. या मोहिमेत यशस्वी झाल्याने नाना कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यास पात्र ठरले आहेत. नाशिक सायकलिस्टतर्फे आयोजित पॅलेटॉन स्पर्धेत पन्नास वर्षावरील वयोगटात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली. या स्पर्धेत देखील नानांनी तृतीय क्रमांक पटकावला. अभिषेक बच्चन यांच्या हस्ते पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात नानांचा सत्कार केला.

नाना फक्त सायकलिंग करतात असे नाही तर आजवर भारतातल्या कांचनगंगा, एव्हरेस्ट बेस कॅम्प, कैलास मानस सरोवर यात्रा, अमरनाथ यात्रा पूर्ण केल्या आहेत. अशा विविध स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग आणि पारितोषिके जिंकल्यानंतर कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, असे विचारल्यावर नाना म्हणतात मी स्पर्धेसाठी कधीच सायकल चालवली नाही. या जगाचे मी काही तरी देणं लागतो, ही वसुधरा चांगली राहावी, प्रदूषण कमी व्हावे, यासाठी सायकल चालवतो. माझ्या शहरातल्या प्रत्येक चारचाकीधारकांनी आठवड्यातून एकादा तरी सायकल चालवावी हे माझे स्वप्न आहे. सायकल स्पर्धेतून मिळालेली बक्षिसाची रक्कम नानांनी स्वतःसाठी कधीच खर्च केली नाही. मिळालेली रक्कम त्यांनी कायमच स्वयंसेवी संस्थांना दान केली आहे. आपल्या पत्नीच्या दोन्ही किडन्या खराब झाल्याने एक वर्षापूर्वी नानांनी आपली किडनी दिली. या धक्क्यातून सावरत असताना नाना आजही सकारात्मक ऊर्जा काय असते याचा आदर्श उदाहरण म्हणून पुढे आले आहेत.

सायकलने माझे आयुष्य समृध्द केले. नियमित सायकल चालविणाऱ्या व्यक्तीतील निगेटीव्ह एनर्जी निघून तो निश्चित सकारात्मक जीवन जगेल यात शंका नाही. - ज्ञानेश्वर गायकवाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रान्सफार्मरचे संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटीतील प्रभाग क्रमांक तीनमधील अमृतधाम परिसरातील विविध नगरांमध्ये वीज महावितरण कंपनीने विविध ठिकाणी बसवलेले ट्रान्सफार्मर नागरिकांसाठी दिवसेंदिवस जीवघेणे आणि डोकेदुखी वाढविणारे ठरत आहेत. केवळ आपल्याच सोयीसाठी सोसायट्यांनी बसविलेल्या या ट्रान्सफार्मरमुळे मात्र अन्य लोकांची गैरसोय होत आहे.

महामार्गावरील रासबिहारी शाळेजवळील मोरया पार्क, औदुंबर नगर जवळील पुष्करनगर तसेच गोपालनगर येथील गार्डनमध्ये बसविण्यात आलेले ट्रान्सफार्मर जीवघेणे ठरत आहेत. मोरया पार्क व पुष्कर सोसायटीचे ट्रान्सफार्मर तर वीज कंपनीने घरांच्या भिंतीला लागून बसवले आहेत. त्यामुळे येथे वावरताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते. कधी काय होईल याची धास्ती सतावत असल्यामुळे वादळी पाऊस झाला की लोक आपापल्या घरातच अंग चोरून आणि घरामध्ये वीजप्रवाह उतरू नये, अशी प्रार्थन करीत बसून असतात. परिसरातील अनेक कुटुंबाना धोका निर्माण झाला आहे.

सोसायटीच्या भिंतीला लागून असलेले हे ट्रान्सफार्मर ताबडतोब हटवावे यासाठी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना वारंवार निवेदन देऊन परिस्थिती समजून सांगितली पण कोणीही ठोस पावले उचलत नाही सहकार्य करीत नाही यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ट्रान्सफार्मर हटवावे यासाठी पंचवटीतील विभागीय अधिकारी आणि द्वारका येथील खरबंदा पार्कमधील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात अनेक वेळा तक्रार केली. विनंती अर्ज दिले. मात्र, अद्याप काम सुरू करणे तर दूरच त्यांची गांभीर्याने दखल सुद्धा घेतली गेली नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

ट्रान्सफार्मर हटविण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी वीज महावितरण कंपनीला काही रक्कम देण्याची तयारी दर्शवित खर्चाचा भार उचलण्यास सहमती दर्शविली. परंतु, तरीही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. गोपालनगरात तर ट्रान्सफार्मरला झाडांनी वेढलेले आहे. त्यामुळे ट्रान्सफार्मर आहे तरी कुठे असा प्रश्न निर्माण होतो. कधीही झाडांच्या फांद्या दूर करून ट्रान्सफार्मरची साफसफाई करण्यात आलेली नाही. घराजवळ वाहने लावणे व लहान मुलांनी खेळणे शक्य होत नाही. संबंधित अधिकारी जबाबदारी टाळतांना दिसतात. झाडे वेली यांनी व्यापलेल्या ट्रान्सफार्मरमुळे धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. लवकरात लवकर पावले उचलून न्याय मिळावा अशी आशा स्थानिकांनी मनात बाळगली आहे.

मी पुष्कर रो हाउसमध्ये राहतो. आमच्या प्रवेशदाराजवळच ट्रान्सफार्मर बसविण्यात आलेला आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रार केली. मात्र, प्रश्न सुटू शकलेला नाही. - अशोक बोरसे

वीज कंपनीचे अधिकारी खाजगीत चूक झाल्याचे कबूल करतात. मात्र, लेखी देत नाही. तसेच चूक दुरुस्तीसाठी प्रयत्नही करीत नाहीत. ट्रान्सफार्मर लवकर हटविले नाही तर रहिवाशी रस्त्यावर उतरतील. - ए. एन. जोशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७२२ खटल्यांचा निपटारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १ हजार ७२२ दाव्यांचा निपटारा करण्यात आला. यात कोर्टातील प्रलंबित १ हजार ४०६, तर कोर्टात खटला सुरू होण्यापूर्वीच्या ३१६ प्रकरणांचा समावेश आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आनंद कारंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी लोकअदालतीच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. लोकअदालतीचे उद्‌घाटन पक्षकाराच्या हस्ते करण्यात आले. प्रलंबित खटल्यांपैकी ७ हजार ६३६ खटले ठेवण्यात आले. तसेच, खटला सुरू होण्यापूर्वीचे म्हणजे दावा पूर्व दाखल ३ हजार १३८ खटल्याचांही यात समावेश करण्यात आला. प्रलंबित खटल्यांपैकी १ हजार ४०६, तर दावा पूर्व प्रकरणातील ३१६ प्रकरणांचा यावेळी निपटारा झाला. लोकअदालतीच्या माध्यमातून ३ लाख ९१ हजार रुपयांची थकीत रकमा बँका तसेच दूरध्वनी कंपन्यांना मिळाल्या. तर, मोटार अपघात प्रकरणातील नुकसानभरपाई तसेच दंडापोटी तब्बल २ कोटी ६७ लाख ९३ हजार ५७३ रुपये वसूल करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश यू. एस. जोशी-फलके, अॅड. महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अविनाश भिडे, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य नितीन ठाकरे आणि जिल्हा सरकारी वकील अॅड. आर. वाय. घुमरे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे स​चिव राजेश पटारे यांनी आभार व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्या आप पीएचडी है?

$
0
0

प्राचार्य डॉ. हरिष आडके

महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्रातील माणसे दिल्लीतील युजीसीच्या कार्यालयात गेल्यावर त्यांना 'आप पीएचडी है क्या' असे विचारले जाते. पीएचडीचा अर्थ पदवी नसून पंजाब, हरियाणा आणि दिल्ली असा आहे. म्हणजेच या प्रदेशातून आलेल्यांनाच येथे आदराची वागणूक मिळते. त्यांची कामे प्राधान्याने होतात. या एकाच गोष्टीवरून युजीसी बरखास्तीची गरज स्पष्ट होते. मनुष्यबळ विकास मंत्रालयापेक्षा (एचआरडी) युजीसी वरचढ झालेली आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचा खेळखंडोबा करणारी, उद्देशापासून भरकटलेली, भेदभावाची वागणूक देणारी युजीसी बरखास्त करून नवीन संस्था आणणे ही काळाची गरज झाली आहे.

भारतीय उच्च शिक्षणाची दिशा ठरविण्यासाठी १९३७ साली डॉ. झाकीर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. ती वर्धा समिती म्हणून प्रसिद्ध झाली. मात्र, तिच्या शिफारशींची दखल घेण्यात आली नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीश सरकारने सर सार्जंट यांच्या अध्यक्षतेखाली १९४४ साली युद्धोत्तर शैक्षणिक पुनर्रचना समिती नेमली. समितीच्या शिफारशींनुसार १९४५ साली विद्यापीठ अनुदान समिती स्थापन झाली. समितीचे काम समाधानकारक न झाल्याने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती बरखास्त करून १९५२ साली राधाकृष्ण आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाचे उद्घाटन भारताचे पहिले शिक्षणमंत्री डॉ. मौलाना अब्दूल कलाम आझाद आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत झाले. सन १९५४ साली विद्यापीठ अनुदान आयोग कायदा आणून १९५६ साली युजीसीची स्थापना करण्यात आली. उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विकास आणि संशोधनासाठी अनुदान देणे, विद्यापीठे, महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी यांना प्रोत्साहन देणे ही उद्दिष्टे युजीसीला देण्यात आली आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या (एचआरडी) धोरणाची अंमलबजावणी युजीसी करीत आहे. एचआरडी हे युजीसी, एआयसीटी, डेन्टल कौन्सिल, बार कौन्सिल, मेडिकल कौन्सिल, आयुर्वेदिक, होमिपॅथी, अग्रीकल्चर, ब्रिटीश कौन्सिल, बायोटेक्निकल, ह्युमन रिसोर्स कौन्सिल, व्हेटर्निटी कौन्सिल, एनसीआरटी अशा तेरा कौन्सिलना अनुदान देऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवते.

देशात ६९३ विद्यापीठे युजीसीच्या अधिपत्याखाली आहेत. राज्य विद्यापीठे, स्वायत्त विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे, अभिमित विद्यापीठे, खासगी व केंद्रशासीत विद्यापीठांचा समावेश त्यात होतो. गेल्या पन्नास वर्षात युजीसीने सर्वात जास्त अनुदान केंद्रीय विद्यापीठांना दिले आहे. दोन वर्षांपूर्वी मेडिकल कौन्सिलच्या अध्यक्षाकडे प्रचंड बेहिशेबी मालमत्ता मिळाली. मेडिकल कौन्सिल म्हणजे सोन्याची खान आहे. तिची निवडणूक होत असताना सात हजार मतपत्रिका दादरच्या एकाच पोस्टातून पाठविण्यात आल्या. यावरून या निवडणुकीचे गौडबंगाल समजते.

युजीसीबाबत डॉ. गौतम यांनी एचआरडीला नुकताच अहवाल सादर केला. त्यात युजीसीचे अध्यक्ष सतत दौऱ्यावर असतात. त्यांचे लक्ष्य नसते आदी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. नियोजन मंडळाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी युजीसी कुचकामी ठरल्याने ती बरखास्त करावी, असे मत तीन वर्षापूर्वीच नोंदवले होते. याबाबतचे विधेयक संसदेच्या पटलावर आहे.

कला शाखा १८५७ पासून आहे. तिची अवस्था दयनीय आहे. कारण युपीएससी, एमपीएससी सारख्या परीक्षांमध्ये इंजिनीअरिंग, मेडिकलचे विद्यार्थी पास होतात पण इतिहास, भूगोलासारखे विषय घेऊन पदवी मिळवणारे बी. ए. चे विद्यार्थी नापास होतात. कॉलेजच्या पटावर अगणित संख्या आणि वर्गात उपस्थिती नगण्य, कॉपीचे वाढलेले प्रमाण या सर्वांचा हा परिणाम आहे. चाईस बेस क्रेडिट सिस्टीम २०१५-१६ पासून पदव्युत्तर स्तरावर लागू झाली. त्याला १३० कुलगुरुंनी विरोध केला. पांडेचेरी विद्यापीठात १९९२-९३ पासून कॅफेटेरिया (जेवता जेवता शिक्षण) ही अमेरिकन शिक्षण पद्धती आहे. युजीसी याबाबत २० ते २५ वर्षे मागे आहे. राज्यात उच्चशिक्षण मंत्रालयाला नवीन महाविद्यालये मंजुरी व अनुदानाचे जे अधिकार आहेत ते केंद्रातील एचआरडीलाही नाही. मात्र युजीसीला आहेत. म्हणजेच युजीसी शिरजोर झाली आहे. त्यामुळे स्थानिक खासदारांना जाब विचारण्याची संधी मिळत नाही. राईट टू एज्युकेशनचा (शिक्षणाचा हक्क) विद्यार्थी आता पाचवीत आला आहे. पाचवी ते आठवी, नववी ते बारावी अशा स्थरावर बदल होत आहेत. या बदलांमुळे शिक्षकांची संख्या वाढणार असताना पात्र शिक्षकच मिळत नाहीत. एअर कंडिशनमध्ये बसून जसे वस्तूच्या मालाचे भाव ठरवले जातात तसेच युजीसीचे कारभारी वागत आहेत. नेट-सेटची सक्ती १९-९-९१ पासून एचआरडीने केली. मात्र, युजीसीने नेट-सेट परीक्षा महाराष्ट्रात २४-१०-९२ पासून सक्तीची केली. ४-२-२००९ पर्यंत पीएचडी मिळालेल्यांना नेट- सेट परीक्षेच्या सक्तीतून सूट दिली. मर्यादा सोडून युजीसी वागू लागली आहे. त्यामुळेच सुप्रिम कोर्टाने युजीसीला फक्त अनुदान देण्याचा अधिकार आहे, धोरण ठरविण्याचा अधिकार नाही असे नुकतेच फटकारले. भविष्यात तेरा लाख शिक्षकांची गरज भासणार आहे. ती त्वरित पूर्ण होणार नसल्याने प्रश्न गंभीर होणार आहे. याला कारण युजीसीचा अंदाधुंद कारभार आहे. जगात सर्वात तरूण देश म्हणून भारताची ओळख होत आहे. मात्र, युवकांचे भवितव्य भलत्याच दिशेला नेण्याचे काम युजीसी करीत आहे.

युजीसी गुंडाळून एचआरडीला जास्त अधिकार द्यायलाच हवेत. खासदारांनी संसदेत आवाज उठविल्यास शैक्षणिक विकास, अनुदान आदींबाबतची तळागाळाची गरज भागेल. काळ्याभिन्न पाषणात एक सुंदर फूल उगवते. जाणारा येणारा त्याकडे पाहतो. हवा आल्यावर फूल पाषणावर आदळले की ते फूल पाषणाला म्हणते, बघ माझ्याकडे किती लोक बघतात, तुझ्याकडे कोणी पाहत नाही. पण मोदीरुपी चाणाक्ष शिल्पकार अशा पाषणातून अद्भूत शिल्प तयार करेल आणि समाज त्या मूर्तीकडे आकर्षित होईल. पाषणाचा हेवा करणारे फूल मूर्तीवर वाहतील. अशा तोऱ्यात मिरवणाऱ्या युजीसीच्या फुलाला मनुष्यबळ मंत्रालयाने जागा दाखवणे ही काळाची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने १३५ हेक्टर क्षेत्र प्रभावित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवकाळी पावसाने शनिवारी जिल्ह्यातील पाच तालुक्यांना झोडपून काढले. या तालुक्यांमधील नऊ ते दहा गावांमधील १३५ हेक्टर पावसामुळे प्रभावित झाले असून १३ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. देवळ्यात एकजण जखमी झाला असून नांदगावात ९२ घरांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. नांदगाव, येवला, दिंडोरी, देवळा आणि मालेगाव तालुक्यांमधील गावांना पावसाने झोडपून काढले. नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव आणि हिसवाळ येथील ही गावे अवकाळी पावसामुळे प्रभावित झाली आहेत. तेथे ३.५ मिलीमीटर पाऊस पडला असून त्यामुळे कांदा, डाळींब, हरभरा आणि गहू या पिकांबरोबरच काही शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या मोसंबी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या गावांमधील १०२ शेतकऱ्यांच्या १३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जितेन्द्र काकुस्ते यांनी दिली आहे. याखेरीज तेथे सहा मेंढ्या, तीन शेळ्यांचा मृत्यू झाला असून ९१ घरांचे नुकसान झाले आहे. येवला तालुक्यात नगरसूल, अंदरसूल, जळगाव नेऊर या गावांना पावसाने झोडपून काढले. तेथे वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यात वरखेडा या गावाला तर मालेगावात निमगावला पावसाने थैमान घातले. देवळ्यात वीज अंगावर पडून एकजण जखमी झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक मार्गात बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीची तयारी शहरात पूर्णत्वास पोहचली असून मंगळवारी, १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपासून मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

मिरवणुकीची सुरुवात मोठा राजवाडा (भद्रकाली) येथून होईल. वाकडी बारव, त्यानंतर कादीर चौक - दादासाहेब फाळके रोड - महात्मा फुले मार्केट - भद्रकाली मार्केट - बादशाही कॉर्नर - गाडगे महाराज पुतळा - मेनरोड - महात्मा गांधी रोड - धुमाळ पॉईंट- रविवार कारंजा- रेड क्रॉस- सांगली बँक- नेहरू गार्डन- दीपसन्स कॉर्नर-​शिवाजीरोडने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी पोहचून मिरवणुकीची सांगता होईल. मिरवणुकीच्या दिवशी या मार्गावर हातगाड्या, मोटरसायकल तसेच चारचाकीसह सर्व वाहनांना बंदी असणार आहे. यात मिरवणुकीतील वाहन, पोलिस वाहने, अग्निशमन व अॅम्ब्युलन्स आदी वाहनांना वगळण्यात आले आहे.

मिरवणुकीच्या दिवशी या मार्गावरील वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. याबरोबर दिंडोरी नाका, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल मार्गे शालिमार व सीबीएसकडे जाणाऱ्या शहर वाहतुकीच्या बसेस व इतर सर्व प्रकाराची वाहने दिंडोरी नाका येथून पेठ फाटा सिग्नल-मखमलाबाद नाका-रामवाडी पुल- अशोकस्तंभ- मेहर सिग्नल- सीबीएस सिग्नल-त्र्यंबकनाका- गडकरीचौक सिग्नलमार्गे नवीन नाशिक व ना​​शिकरोडकडे जातील. वरील मार्गातील बदल १४ ए​प्रिल रोजी सकाळी १२ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत अंमलात राहतील. यावेळेस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरला दिवसाआड पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने वरूणराजा रूसला तर कुंभमेळ्यात करायचे काय, हा प्रश्न प्रशासनाच्या विवंचनेत भर घालत आहे. १४ जुलै २०१५ रोजी ध्वजारोहनाने कुंभमेळ्याची दुदुंभी वाजेल आणि पौराणिक महामेळा सुरू झाला, असे जाहीर होईल. हजारो साधू आणि लाखो भाविक यांची त्र्यंबकला मांदियाळी उसळेल. शाहीस्नानाच्या पर्वकालाच्या व्यतिरिक्त सुमारे चार महिने शहर गजबजणार आहे. तत्पूर्वी किमान दीड ते दोन महिनाभर अगोदर शहरात वाढत्या गर्दीचा कालावधी असेल. या सर्वांना पिण्यासाठी पाणी ही मूलभूत गरज भागवितांना प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

गत काही वर्षांपासून ७ जूनला लागणारे मृग आणि त्यानंतरचे नक्षत्र संपूर्ण कोरडे गेल्याचा अनुभव येत आहे. यावर्षी ८ जूनला मृग आणि २२ जूनला आद्रा लागत आहे. पंचागशास्त्रानुसार या नक्षत्रांना कोल्हा आणि उंदीर असे कमी पाऊस देणारे वाहन आहे. एकूणच पाऊस लांबला तर, स्नानासह पिण्याच्या पाण्याची आणीबाणी निर्माण होणार, असे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

त्र्यंबकला आज दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अर्थात त्र्यंबक शहराच्या जवळच असलेला बिल्वतीर्थ बंधारा तसेच, तळेगाव काचुर्ली धरण यामध्ये चांगला पाणीसाठा आहे. शासनाने हा पाणीसाठा जपून वापरण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्याची गरज आहे. गौतमी बेझे धरणातून पाणीपुरवठा योजना होत आहे. ही योजना वेळीच कार्यान्वित होईल, असे सध्या दिसून येत आहे. अर्थात पाऊस पडला नाही तर या धरणातील शिल्लक पाणी वापरता येईल का याचा आढावा शासनाने आजच घेण्याची गरज आहे.

पाण्याचा धंदा तेजीत

शहरात पिण्यासाठी पाणी नाही ही एप्रिलच्या प्रारंभीची स्थिती आहे. आखाड्यातील साधू, निवासी नागरिक आणि व्यावसायिक असे जवळपास ७० टक्के रहिवासी पिण्याचे पाणी विकत घेत आहेत. ५० रुपयला एक जार असे लिटरच्या हिशेबाने नागरिक पाणी विकत घेऊन गरज भागवत आहेत. पिण्याच्या पाण्याचा धंदा येथे तेजीत आला आहे. वापरासाठी टँकर उपलब्ध असून, पाण्यापायी दिवसाकाठी शे पाचशे खर्च करण्याची मानसिकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. शहर आणि परिसरात कोट्यवधींची बांधकामे सुरू आहेत. शासनाने दिलेल्या सोयीसुविधांच्या कामांसोबतच आखाड्यांमध्ये स्वमालकीची कामे होत आहेत. या बांधकामांना पाणी आणायचे कोठून अशी समस्या निर्माण झाली आहे. उशिराच्या निविदा त्यानंतर झालेल्या दिरंगाईमुळे कामे उशिरा सुरू झाली. सध्या येथे पिण्यासाठी पाणी नाही तर, बांधकामांना कसे मिळणार अशी विवंचना बांधकाम व्यावसायिकच नव्हे तर, साधू-महंत व्यक्त करीत आहेत. पाण्यासाठी सातशे ते आठशे रुपये प्रति टँकर मोजावे लागत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने टँकरच पोहचत नाही.

................

शहरातील तलाव आज कोरडेठाक पडले आहेत. त्र्यंबकला अंबोली धरणातून पाणीपुरवठा होत असतो. हे धरण गाळाने भरले आहे. अपुरा पाणीसाठा असल्याने त्र्यंबक शहरास एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहरातील अहिल्या धरण तसेच तलाव यांची दुरुस्ती संवर्धन कार्यक्रम किमान दोन वर्ष अगोदर हाती घेण्याची गरज होती. तसे झाले असते तर आज शहरास पाणीप्रश्न भेडसावला नसता. सिंहस्थ येणार आणि कोट्यवधींची विकासकामे होणार मात्र पिण्यासाठी आणि वापरासाठी पाणीच उपलब्ध झाले नाही तर काय परिस्थिती उद्भवेल याचा गांभीर्याने विचार झालेला दिसून येत नाही. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कॉलरशीपला जोड ‘आधार’ची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बनावट विद्यार्थी दाखवून स्कॉलरशीप लाटण्याच्या प्रकाराला चाप लावण्यासाठी आता त्याला आधारची जोड देण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तसा निर्णय घेतला आहे. आदारकार्डशी संलग्न बँक खात्यातच विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप रक्कम जमा होणार आहे.

पुणे विद्यापीठाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका परिपत्रकानुसार, विद्यापीठाशी संलग्न कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आधारकार्ड काढून त्यास संलग्न बँक खातेही उघडावे, असे विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

विद्यार्थ्यांना मिळणारे केंद्र व राज्य सरकारच्या विविध स्कॉलरशीपचा लाभ थेट बँक खात्यात जमा होतो. त्याचा आढावा विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्या समवेत जोडलेल्या सरकारच्या परिपत्रकात करण्यात आलेल्या उल्लेखानुसार शिक्षण सहसंचालकांच्या आदेशाप्रमाणे संलग्न कॉलेजसने जिल्हाधिकारी कार्यालयांशी संपर्क करून आधारकार्ड बनवण्यासाठी शिबिर घ्यावे. कार्यवाहीचा अहवालही कॉलेजनी विद्यापीठाला सादर करायचा आहे.

सध्या आधारकार्ड बंधनकारक नसले तरी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी प्राथमिक प्रयत्न कॉलेजनी करायचे आहे. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक तत्काळ मिळवण्याच्या सूचना परिपत्रकात आहेत. आधार कार्ड नोंदणीमुळे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण माहितीची नोंद राहील. स्कॉलरशीपची रक्कम डिजिटल पद्धतीने खात्यावर जमा होतील. स्कॉलरशीप वेळेवर मिळण्यातही यामुळे मदत होणार आहे. शिवाय स्कॉलरशीपसाठी वेळोवेळी तगादा लावण्याचीही गरज राहणार नसल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकळीत तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

टाकळीतील समतानगरमध्ये शनिवारी (ता.११) रात्री झालेल्या खूनप्रकरणी उपनगर पोलिसांनी रविवारी दुपारी मुख्य संशयिताला अटक केली. त्याला आज (ता.१३) न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईक आणि मित्रांनी टाकळीत एका नेत्याच्या घराबाहेर घोषणाबाजी करीत लाईटिंगच्या माळा तोडून फलक फाडले. उपनगर पोलिस ठाण्यात जाऊन नेत्याच्या अटकेची मागणी केली. त्यामुळे तणाव कायम आहे. मृत सुजीतवर नाशिकच्या अमरधाममध्ये पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

समतानगरमधील पंचशीलनगर भागात शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास सुजीत शाम लोट या वीस वर्षाच्या युवकाचा जुन्या वादातून खून झाला. त्याचा मित्र राजू दाणीने उपनगर पोलिस ठाण्यात मुख्य संशयित चरण नाथा उजागरे याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. सुजीत व राजू दाणी पानाच्या टपरीवर उभे असताना उजागरेने त्यांना बोलावून घेतले. वाद वाढल्यानंतर सुजीतवर वार करण्यात आले. रात्री टाकळीत सुजीतच्या नातेवाईकांनी मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी करीत पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. जिल्हा रुग्णालय, उपनगर पोलिस ठाणे येथे काल रात्री साडेबारापर्यंत मोठा जमाव जमला होता. तणाव वाढल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

होर्डिंग्ज कारणीभूत

खुनाचे मूळ कारण जुना वाद आणि विजय-ममता समोरील दत्तमंदिराजवळील होर्डिंग्जची उभारणी हे असल्याचे सांगितले जाते. नाशिकरोडला दोन महिन्यात चार खून झाले. सिन्नरफाटा येथे एका युवकाचा खून झाल्यानंतर विहीतगावात युवकाचा खून करून मृतदेह शौचालयाच्या टाकीत टाकण्यात आला होता. रंगपंचमीला जेलरोड येथे कालेज युवकाची कोयत्याने हत्या करण्यात आली होती. आता टाकळीत कालेज युवकाचा खून झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर दिवसांत १३ बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

खून व खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटनेत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. गेल्या १०० दिवसांत तब्बल १३ जणांचा खून करण्यात आला असून, खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटनांत देखील वाढ झाली आहे. यामुळे शहरात गुन्हेगारी पुन्हा बळावली असल्याचा प्रत्यय येत आहे.

सातपूर भागात मागील १२ दिवसात दोन खुनाच्या घटना घडल्या. यातील मोहिते खून प्रकरणातील तिघा आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. काही वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी संशयित आरोपी दीपक भालेराव, रोशन काकड आणि बाळू नागरे यांनी अमोल मोहितेची हत्या केली. वसाळी भागात घडलेल्या या खून प्रकरणाचा पोलिस तपास करीत असतानाच दोन दिवसांपूर्वी संतोष नामदेव कसबे (वय ३०) या रिक्षाचालकाचा खून झाल्याची बाब समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर शनिवारी रात्री टाकळी येथील समतानगरमध्ये सुजीत लोट (वय २०) या कॉलेज युवकाचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आल्याची बाब समोर आली. धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार करण्यात आले होते. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. गेल्या दोन महिन्यात नाशिकरोड परिसरातील खुनाची ही तिसरी घटना आहे.

पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले की, खुनाच्या घटना तत्कालीक व वैयक्तिक कारणातून झाल्या आहेत. मोहिते खून प्रकरणातील तिघा संशयितांची ओळख पटली असून, उर्वरित घटनांत आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे. बहुतांश वेळा तत्कालीक कारणातून होणारे प्रकार टाळता येत नाही. तशी शक्यताही नसते, असे उपायुक्त पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खून किंवा खुनाच्या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश येत असल्याची टीका होत आहे. रस्त्यावरील पोलिसांची संख्या कमी झाली असून कोंम्बिंग, मिशन ऑलआऊट सारख्या प्रतिबंधक उपाययोजनांना गुंडाळून ठेवण्यात येत असल्याने गुन्हेगारांवरील वचक कमी होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

गतवर्षापेक्षा प्रमाण वाढले

मागील वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत खुनाच्या सहा घटना घडल्या होत्या. तेच उपरोक्त कालावधीत चालू वर्षात १० जणांचे बळी गेले आहेत. सातपूरच्या दोन आणि नाशिकरोडच्या शनिवारच्या घटनेने हा आकडा १२ एप्रिलपर्यंत १३ वर पोहचला आहे. खुनासोबत खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटनेत देखील वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. गेल्या वर्षी पहिल्या तीन महिन्यात खुनाचा प्रयत्न झाल्याच्या ६ घटना घडल्याची नोंद पोलिसांकडे आहे. तेच, चालू वर्षात जानेवारी ते मार्च या कालावधीत खुनाचा प्रयत्न केल्याच्या १४ घटना घडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२०० विद्यार्थ्यांची परदेश भरारी

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी परदेशात जाण्याचा ट्रेण्ड आता नाशकातही रुळल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात नाशिक जिल्ह्यातून तब्बल २०० विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी गेले असून, हे प्रमाण येत्या काही वर्षात आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

जागतिकीकरणामुळे विविध प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शिक्षण क्षेत्रालाही त्याचा मोठा फायदा होत आहे. त्यातच सध्या असलेल्या अत्याधुनिक आणि इंटरनेटच्या युगात तर परदेशात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या आवडत्या विषयाचे उच्च शिक्षण किंवा संशोधन परदेशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठातून करण्याची संधी मिळते आहे. त्याचा फायदा असंख्य विद्यार्थी घेत आहेत. हा ट्रेण्ड आता नाशिकमध्येही सुरु झाला आहे. परदेशात शिक्षण घेण्यासाठी जो अर्ज केला जातो त्यासोबत ट्रान्सक्रिप्ट हे प्रमाणपण जोडले जाते. हे प्रमाणपत्र घेण्यासाठी नाशिकचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असल्याचे दिसून येत आहे. सामनगाव येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून दरवर्षी किमान १० विद्यार्थी ट्रान्सक्रिप्टसाठी अर्ज करीत आहेत. तर, सावत्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील विभागीय केंद्रातही ट्रान्सक्रिप्टसाठी अर्ज करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत. आजवर या केंद्रातून जवळपास १०० विद्यार्थ्यांना ट्रान्सक्रिप्ट प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

नाशिक विभागीय केंद्रात देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये ट्रान्सक्रिप्टचाही समावेश आहे. या केंद्रातून आतापर्यंत १०० विद्यार्थ्यांनी ट्रान्सक्रिप्ट घेतले आहेत. - डॉ. रावसाहेब शिंदे, समन्वयक

आमच्या कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच वर्षाकाठी किमान १० विद्यार्थी ट्रान्सक्रिप्टसाठी अर्ज करतात. त्यांना आम्ही ते तत्काळ देतो. - डॉ. डी. आर. नंदनवार, प्राचार्य

सर्व वर्षांचा निकाल एकत्रितरित्या उपलब्ध होणाऱ्या प्रमाणपत्राला ट्रान्सक्रिप्ट असे म्हटले जाते. हे प्रमाणपत्र परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी ग्राह्य धरले जाते. पदवी अथवा पदव्युत्तर पदवी विद्यापीठातून संपादन केलेला कोणताही विद्यार्थी ट्रान्सक्रिप्टसाठी अर्ज करू शकतो. गेल्या काही वर्षांत पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये जाण्याचा ट्रेण्ड वाढत असल्याने परदेशी विद्यापीठांना समजेल अशा साध्या-सोप्या पद्धतीत पदवीचा एकत्रित निकाल ट्रान्सक्रिप्टद्वारे करून घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. ट्रान्सक्रिप्टमध्ये विद्यार्थ्यांनी पदवीच्या सर्व वर्षांच्या निकालाच्या झेरॉक्स एकाच प्रमाणपत्रात उपलब्ध होतात. यामुळे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणातील 'एटीकेटी' किंवा 'इयर डाऊन' झाकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील आंबेगण येथील डांग सेवा मंडळाच्या ठक्कर बाप्पा आश्रमशाळेतील पाचवीतील विद्यार्थ्याच्या तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेने पुन्हा एकदा आश्रमशाळेतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, संस्थेने या प्रकरणी मुख्याध्यापकासह तिघांना निलंबित केल्याचे वृत्त आहे.

नाशिक-पेठ रस्त्यालगत दिंडोरी तालुक्यातील आंबेगण येथे डांग सेवा मंडळाची ठक्कर बाप्पा आदिवासी मुलामुलींची आश्रमशाळा आहे. येथे पाचवीत शिकणारा रवींद्र सजन राधड (वय १२ रा. फोफळवाडे ता. दिंडोरी) हा मुलगा शनिवार दुपारपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह रविवारी दुपारी झार्ली बंधाऱ्यात आढळून आला. येथील शाळेतील विद्यार्थ्यांना दर शनिवारी अंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी शाळेजवळील झार्ली वळण बंधाऱ्यात नेले जात होते. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास असेच सर्व विद्यार्थ्यांना तलावावर नेण्यात आले होते. मात्र यावेळी विद्यार्थ्यांसोबत पहारेकरी उमेश म्हसदे होता. जबाबदार अधीक्षक वगैरे कुणीही नव्हते. मुले अंघोळ करीत, कपडे धूत असताना रवींद्र पाण्यात बुडाला. मात्र, याची कुणाला माहिती लागली नाही. मुलांना आश्रमशाळेवर नेण्यात आले. यानंतर रवींद्रची बहिण दीपाली हिने आपला भाऊ कुठे आहे विचारणा केल्यावर तो हरवल्याचे सांगण्यात आले. हवालदार के. के. बोकड यांनी शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. त्यानंतर तब्बल तीस तासानंतर रविवारी दुपारी तीन वाजता रवींद्रचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. यापूर्वीही दोन मुलांचे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. याप्रकरणी अधीक्षक एस. वी. रौंदळ, मुख्याद्यापक ए. के. सावंत, पहारेकरी उमेश म्हसदे यांना निलंबित केल्याची माहिती डांग सेवा मंडळ संस्थेतर्फे देण्यात आली.

हकनाक बळी

शासन सर्वच आश्रमशाळांसाठी लाखो रुपये खर्च करीत सोयीसुविधा उपलब्ध करून देते. मात्र, सोयीसुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवल्या जात नसून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आंबेगण आश्रमशाळेत सावळा गोंधळ सुरू असून येथे संरक्षक भिंत नाही शिक्षक निवासी राहत नसल्याचीही तक्रार आहे. शौचालय आहे मात्र ते वापरत नसून मुले उघड्यावर जातात. अंघोळीसाठी शाळेच्या आवारातच व्यवस्था केलेली असताना मुलांना बाहेर अंघोळीसाठी का नेले जात आहे व त्याकडे यापूर्वी अशा दुर्घटना होऊनही प्रशासनाने का दुर्लक्ष केले असा सवाल उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ स्पेशल FM

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा काळात बसने प्रवास करणाऱ्या भाविकांना बसल्याजागीच सिंहस्थाशी संबंधित घडामोडींची माहिती तसेच मार्गदर्शन मिळणे शक्य होणार आहे. या काळात नाशिकमध्ये धावणाऱ्या सर्व बसेसमध्ये एफएम रेडीओ बसविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

सिंहस्थ काळात प्रवाशी वाहतुकीची सर्व जबाबदारी राज्य मार्ग परिवहन महामंडळावर असणार आहे. म्हणनूच प्रवाशांच्या सेवेसाठी तब्बल ३ हजार बसेसचा ताफा तैनात ठेवण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. लाखो भाविक बसनेच प्रवास करणार असल्याने त्यांच्यापर्यंत आवश्यक सूचना पोहोचविण्यासाठी एफएम रेडीओ हे सर्वात्तम माध्यम ठरण्याचा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केला जातो आहे.

त्यामुळे भाविकांना मार्गदर्शन मिळू शकेल, त्यांना उपयुक्त ठरू शकेल अशी माहिती एफएमद्वारे प्रसारित केली जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा काळात अफवांचे पेव फुटण्याची शक्यता अधिक आहे. घटना आणि घडोमोडींची तातडीने माहिती मिळू शकली नाही तर त्यातून आणखी गोंधळ उडण्याची शक्यता बळावते. तसे होऊ नये यासाठी ही एफएम सेवा उपयुक्त ठरणार आहे. जे भाविक शहरातून पायी फिरतील त्यांच्यासाठीही ठिकठिकाणी उदघोषणा सुरू राहणार आहेत.

पब्लिक ऍड्रेस सिस्टिमव्दारे त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचविण्यात येणार आहेत. भाविकांपर्यंत योग्य संदेश जावा याची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल. - दीपेन्द्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरे झाली बोडकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शनिवारी दुपारी व सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नांदगाव तालुक्यात कांदा आणि डाळिंबाचे अतोनात नुकसान झाले आहे. सातत्याने येणाऱ्या या अस्मानी संकटाने शेतकरी हवाल‌दिल झाला आहे.

नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात नुकत्याच झालेल्या गारपिटीने पळाशी, सावरगाव, न्यायडोंगरी, मूळ डोंगरी, तळवाडे, रोहिले या गावातील शेतकऱ्यांना झळ पोहचली असून, काढणीला आलेला उन्हाळी कांदा आणि डाळिंबाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. गारांमुळे डोंगळे उद्ध्वस्त झाले आहेत. उत्पन्नाची आस असताना उन्हाळी कांद्याची वाट लागल्याने शेतकरी भविष्याच्या काळजीने

चिंतातूर झाला आहे. नांदगाव तालुक्यात एक गाय व सोळा शेळ्या वीज कोसळल्याने ठार झाल्या. येवला तालुक्यातही पावसाने मोठे नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

नांदगाव तालुक्यातील पांझणदेव येथे अवकाळी पावसाने गव्हाच्या पिकाला नुकसान पोहचवले आहे. गारपीट, वादळी वारे आणि पावसाच्या सरींचा हा भोग कधी सरेल आणि चांगले दिवस कधी येतील याकडे तालुक्यातील बळीराजा डोळे लावून बसला आहे. दुष्काळग्रस्त भागातील ही अवकाळी पावसाने सातत्याने चालवलेली वाताहात थांबणार कधी हा बळीराजाचा सवाल सर्वांचे काळीज कुरतडून टाकणारा ठरत आहे.

शनिवारी झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने येवला तालुक्यात अनेक ठिकाणी नासधूस केली. पाऊस कमी मात्र जोरदार वाऱ्याने वृक्ष, महावितरणचे विजेचे पोल आदींना कचाट्यात घेतले. अनेक ठिकाणचे डेरेदार वृक्षही उन्मळून पडले. येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात अनेकांच्या राहत्या घरांचे छतेच वारे आपल्या संगे घेऊन गेला. अचानक राहत्या घरांचे छत उडून गेल्याने घरातील सर्वांनाच उघड्या आकाशाकडे डोळे ताणावे लागले तर काही ठिकाणी राहत्या घराच्या भिंती, आजूबाजूचे झाप देखील उडून गेल्याने डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. छप्पर उडाल्याने रात्र जागून काढावी लागली.

Latest Images