Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिककरांना एकदाच पाणी

$
0
0
गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने महापालिका प्रशासनाने यापूर्वीची कपात बंद करीत सोमवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत केला आहे. मात्र यापुढे कोणत्याही परिस्थितीत दोन वेळेस पाणी दिले जाणार नाही अशी भूमिका प्रशासनाने घेतली असून प्रशासनाच्या या निर्णयापुढे सत्ताधारी हतबल झाल्याचे चित्र आहे.

इच्छुकांच्या मुलाखतींनी पक्षकार्यालये गजबजली

$
0
0
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी विविध पक्षांकडे तिकिटांची मागणी करणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती सोमवारपासून सुरू झाल्याने इच्छूक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेसची कार्यालये गजबजून गेली आहेत.

'विनायक मेटे राजीनामा द्या'

$
0
0
निवडणुका जवळ आल्यावर मराठा आरक्षणाची आठवण काढणाऱ्यांनी स्वपक्षावर टीका करण्याआधी आमदारकीचा राजीनामा द्यावा, ही मागणी राज्याच्या विरोधी पक्षाकडून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचेच आमदार विनायक मेटे यांच्याबाबत केली आहे.

इंधन बचतीसाठी मायक्रोडिस्टीलरी शेगड्या

$
0
0
इंधनाच्या अमर्याद वापरामुळे होणारा नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या ‘गार्टी’ या वाइन टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण देणाऱ्या कॉलेजमार्फत विद्यार्थ्यांना संशोधनासाठी या शेगड्या मागविण्यात आल्या आहेत.

रातोरात संपली पाणीटंचाई!

$
0
0
जिल्ह्यात सुरू असलेले १२५ टँकर १ ऑगस्टपासून बंद झाले असून जिल्ह्यातील पाणीटंचाई एका रात्रीतून दूर झाली की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर संशय व्यक्त होत आहे.

पाणी तपासणी शुल्क अन्यायकारक

$
0
0
एमआयडीसीने पाणी मीटर तपासणी शुल्कात केलेली वाढ अन्यायकारक असून ही दरवाढ रद्द करावी, अशी मागणी नाशिक प्लम्बिंग असोसिएशनने केली आहे.

खडसेंच्या कारागृह भेटीने राजकीय चर्चेला उधाण

$
0
0
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी दुपारी जळगाव येथील कारागृहाला भेट दिली. आपण तुरुंग व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी गेलो होतो, असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

सरासरी तीन हजार रुपये क्विंटल भाव

$
0
0
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याला सरासरी तीन हजार रुपये क्विंटल भाव मिळाला. या मोसमातील हा सर्वोच्च भाव आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

डीम्ड कन्व्हेअन्ससाठी समिती

$
0
0
सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या मानवी हस्तांतरणाबाबत ( डीम्ड कन्व्हेअन्स) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील डीम्ड कन्व्हेअन्सबाबत ही समिती आढावा घेणार आहे.

मंगळसूत्र महोत्सव

$
0
0
गेल्या काही वर्षांपासून वर्षा ऋतूमध्ये गोविंद दंडे अॅन्ड सन्स या सराफी पेढीतर्फे विशेष महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा या उपक्रमाचे १५वे वर्ष असून त्या निमित्ताने मंगळसूत्र महोत्सवाची सुरुवात झाल्याची माहिती पेढीच्या संचालकांनी दिली.

न्यायाधीशांना फोनवरून अपशब्द

$
0
0
बसवंत पिंपळगाव येथील फौजदारी व दिवाणी न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेल्या रवींद्र करणकाळ यांना फोनवरून अपशब्द बोलण्यात आल्याप्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. अपशब्द बोलल्याची घटना २४ जुलै रोजी घडली होती.

अवयवदानाबद्दल सावळा गोंधळ

$
0
0
विद्यार्थ्यांना अवयव दानाबाबत प्रवृत्त करण्यासाठी पुणे विद्यापीठामार्फत राबविल्या जाणाऱ्या अवयवदान मोहिमेपासून प्राचार्यच अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले आहे.

ठेवीदारांना मिळणार फुलाची पाकळी

$
0
0
नाशिक क्रेडिट कॅपिटल आणि कोठावदे नागरी सहकारी पतसंस्था अवसायनात गेल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या ८५ ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे. अत्यावश्यक कारणांसाठी या संस्थेच्या ८५ ठेवीदारांना काही प्रमाणात ठेवी परत करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

विम्याचे सर्व प्लॅन बंद होणार

$
0
0
विमा क्षेत्रात अस्तित्वात असलेले जवळपास सर्व प्लॅन येत्या सप्टेंबर अखेर बंद होणार आहेत. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (आयआरडीए) निर्देशानुसार नवे प्लॅन १ ऑक्टोबरपासून विमाधारकांसाठी उपलब्ध होणार आहेत. हे प्लॅन मात्र विमाधारकांवर सर्व्हिस टॅक्सचा बोजा चढविणार आहेत.

‘त्या’ पंखांना मिळणार उडण्याचे बळ

$
0
0
खडतर परिस्थितीतही यशाचा मार्ग शोधणाऱ्या गुणवंतांच्या पंखांना बळ देण्यासाठी हजारो नाशिककरांनी हात पुढे केले. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या हाकेसरशी या विद्यार्थ्यांसाठी जमा झालेल्या मदतीचा ठेवा त्यांच्याकडे सुपूर्द करण्याची वेळ आली आहे.

खतप्रकल्पावरील वजनकाटा बंद

$
0
0
शहरातील संकलित झालेला कचरा विविध घंटागाड्यांद्वारे खतप्रकल्पावर नेण्यात येतो. त्याठिकाणी घंटागाडीतील कचऱ्याचे वजन करून त्यानुसार संबंधित ठेकेदाराला महापालिका मोठ्या प्रमाणावर पैसे अदा करते.

काश्मिरी युवकांची चौकशीनंतर सुटका

$
0
0
जिल्हा परिषदेसमोरील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन काश्मिरी युवकांची चौकशीनंतर सुटका करण्यात आली आहे. उल्फत हुसेन नजीर हुसेन व गुलजार हुसेन फैयाज हुसेन गुर्जर अशी त्यांची नावे आहेत.

एडीजीपी पांडे यांचा जामीन फेटाळला

$
0
0
इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने अतिरीक्त पोलिस महासंचालक पी. पी. पांडे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला. त्यांना अटक करण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे.

नांदुरनाकामार्गे बसेस वाढवा

$
0
0
नांदुरनाक्याहून नाशिकरोडकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून नाशिकरोडकडे येणाऱ्या बसेस अपुऱ्या पडत आहेत. नाशिकरोड ते नांदुरनाका या मार्गावर बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

समाजसुधारकांना अभिवादन

$
0
0
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरा‌त विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील शाळा कॉलेजांमध्येही याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images