Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाचा विश्वासघात केला

0
0
निवडणुकीच्या आधी राज्यकर्त्यांनी आश्वासन देऊनही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. त्यामुळे राज्यकर्ते व विरोधक या दोघांनीही मराठा समाजाचा विश्वासघात केल्याचा घणाघाती आरोप ‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे यांनी करत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

आप्तांच्या शोधात ‘त्यांची’ नजर

0
0
राज्यभरातील बेवारस मृतदेहांची ओळख पटावी म्हणून पोलिसांनी सुरू केलेल्या फोटो गॅलरीला आतापर्यंत ३०४ नातेवाइकांनी भेट देत बेपत्ता झालेल्या परिजनांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यातील १२५ नातेवाइक रविवारी आडगाव येथील पोलिस मुख्यालयात दाखल झाले होते.

मनविसेची पुनर्बांधणी लवकरच!

0
0
पक्षाची सर्वात महत्त्वाची आघाडी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) पुनर्बांधणीचे काम सुरू असून लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर केली जाईल, अशी घोषणा आमदार वसंत गिते यांनी केली.

धरणांसाठी पुरेसा निधी देऊ

0
0
दर्जेदार शिक्षण व शेताला पाणी मिळाले तरच आदिवासींची प्रगती होईल, त्यामुळे हरसूल परिसरातील गड दवणे व बोरीपाडा धरणांसाठी निधी कमी पडू देणार नाही. अजून ११ आश्रमशाळांची निर्मिती करणार असल्याची ग्वाही राज्याचे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी ठाणापाडा येथे खावटी वाटप कार्यक्रमात दिली.

निवडणुकीचे नेतृत्व देवकरांकडेच

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचा दावा करत जळगाव महापालिका निवडणुकीचे नेतृत्व हे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरांकडे राहणार असून विद्यमान पालकमंत्री संजय सावकारे यांचे त्यांना सहकार्य करतील, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी रविवारी पक्षाच्या कार्यालयात केली.

आरटीओत रिक्षा-टॅक्सी मार्गदर्शन कक्ष

0
0
ऑटो रिक्षा मीटर, टॅक्सी परवानाधारकांना नूतनीकरणासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व परवान्यांचा विलंब टाळण्यासाठी नाशिकच्या आरटीओ कार्यालयात ऑटो रिक्षा, टॅक्सी वाहनांसाठी मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आला आहे.

तापी नदीत ट्रक कोसळला

0
0
औरंगाबादहून प्रीतमपूरकडे लोखंड घेऊन जाणारा ट्रक पुलावरून तापी नदीत कोसळल्याची घटना रविवारी पहाटे मुंबई-आग्रा हायवेवरील शिरपूरजवळ सावळदे गावानजीक घडली.

रॅश ड्रायव्हर रडारवर

0
0
फ्रेंडशिपडे साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना रविवारी पोलिसंच्या कारवाईला सामोरे जावे लागले. भरधाव वेगात वाहने हाकणाऱ्या रॅश वाहनचालकांवर सहायक पोलिस आयुक्त गणेश शिंदे यांच्या पथकाने संध्याकाळी अचानक कारवाई केली.

खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी वाढविला कचरा

0
0
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला पाऊस आणि या पावसामुळे वाढलेल्या चिखलाने नाशिककरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातच शहरातील खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी वाढविलेल्या कचऱ्याची भर पडली आहे.

र. ज. चौहान शाळेत ‘विज्ञान कुतूहल फळा’

0
0
शाळेचा वर्धापनदिन तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त र. ज. चौहान शाळेत विविध उपक्रम राबवण्यात आले. यावेळी ‘विज्ञान कुतूहल’ फळ्याचे उदघाटनही करण्यात आले.

रमजानच्या खरेदीसाठी लेव्हिट मार्केटमध्ये धूम

0
0
देवळाली कॅम्प येथील लेव्हिट मार्केटमध्ये सध्या रमजान ईद पर्वानिमित्त कपडे खरेदीसाठी धूम उडाली आहे. सौदी अरेबिया, मुंबई, सुरत, अहमदाबाद, दिल्ली या भागातील मॉडर्न व चलती असलेल्या कपड्यांची विक्री याठिकाणी होत असल्याने मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करीत आहे.

भाजप बुथ विस्तारक अभियानाची सांगता

0
0
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीअंतर्गत शहर भाजपतर्फे बुथ विस्तारक अभियान राबविण्यात आले. दहा दिवस राबविलेल्या या अभियानात युवकांसाठी 'वन बुथ टेन युथ' या उपक्रमाचाही समावेश होता.

धोकेदायक कमान उतरविणार कधी?

0
0
नाशिकरोड देवळाली कॅम्प रोडवरील सौभाग्यनगर येथील कमान काही दिवसांपूर्वी कोसळली होती. ही कोसळलेली कमान आजतागायत पडक्या अवस्थेतच असून या पडलेल्या कमानीमुळे परिसरात रोज अपघात घडत आहेत.

बँकांच्या व्यवहारावर कर लावावा

0
0
देशाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी आणि भ्रष्टाचाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी बँकांच्या व्यवहारावर कर लागू करावा, असे प्रतिपादन अर्थसल्लागार मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

बँकांच्या व्यवहारावर कर लावावा

0
0
देशाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी आणि भ्रष्टाचाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी बँकांच्या व्यवहारावर कर लागू करावा, असे प्रतिपादन अर्थसल्लागार मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

... अन् रस्ता चिंब करून गेला

0
0
खड्ड्यांचे अन् पावसाचे अतूट नाते आहे, याचा अनुभव प्रत्येक पावसाळ्यात प्रत्येक जण घेतो. महापाल‌िकेची देण असलेले हे खड्डे नाश‌िककरांना केवळ चीडच आणत नाहीत तर त्यांची मजाही घेतात.

दुभाजकच बनले काळ

0
0
द्वारका येथे पुलाचे काम झाल्यावर रस्त्यावरच्या दुभाजकांचे काम होणे अपेक्षीत होते परंतु ते न झाल्याने रस्त्याची व दुभाजकांची उंची समान झाली आहे. त्यामुळे वाहनधारक कुठूनही रस्ता ओलांडतानाचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळते.

नाठाळाचे माथी हाणू काठी

0
0
हातात टाळ व मुखी पांडुरंगाचे नामस्मरण करणाऱ्या वारकरी समुदायाने धार्मिकतेबरोबरच आपण सामाजिक देणेही लागतो या भावनेने कंबर कसली आहे. राज्यभर वारकरी महामंडळातर्फे दारूबंदीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. नाशिक वारकरी महामंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला.

रिक्षावाल्यांकडून बारा लाख

0
0
प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या इलेक्ट्रॉनिक मीटर मोहिमेत गेल्या महिनाभरात दोषी आढलेल्या सुमारे पाचशे रिक्षाधारकांकडून बारा लाख रूपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

बी.एड. शिक्षक भरतीला लगाम

0
0
राज्यातील सर्व बीएड कॉलेजेसमध्ये समान शिक्षकपदे ठेवण्याच्या उद्देशाने शिक्षक भरतीला लगाम घालण्याचा निर्णय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला आहे. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनच्या (एनसीटीई) नियमानुसार आ‌ता या कॉलेजेसनाही १०० विद्यार्थ्यांमागे १० ऐवजी ७ शिक्षकांची नेमणूक करावी लागणार.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images