Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कारवाईवर जोर; महसुलात भर

$
0
0

वाळूच्या आणखी १३ गाड्यांवर कारवाई; सहा लाख दंड वसुली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात अवैधरित्या वाळू घेऊन येणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरूच आहे. शनिवारी रामनवमीच्या दिवशीही द्वारका, पाथर्डी फाटा आणि विल्होळी परिसरात मंडळ अधिकाऱ्यांनी १३ गाड्या पकडून त्यांच्याकडून सुमारे सहा लाखांचा दंड वसूल केला.

'वाळू'चे वळू ही वृत्तमालिका महाराष्ट्र टाइम्सने प्रसिध्द केली. मालिका प्रसिध्द झाली तेव्हापासून जिल्हा प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. गौण खनिजांसारख्या सरकारची मालमत्तेची चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बाह्या सरसावल्या आहेत. सरकारला कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता परस्पर गौण खनिजांची वाहतूक आणि व्यवहार करणाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने लक्ष्य केले आहे. याखेरीज वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून गौण खनिजांची सर्रास वाहतूक करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने चोरटी वाहने पकडण्यात येत असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर दंडही वसूल केला जात आहे.

जिल्ह्यातील लोहोणेर, कळवण या सारख्या काही भागांमधून चोरीची वाळू नाशिक आणि नाशिक बाहेर जातेच. परंतु, त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथूनही मोठ्या प्रमाणावर चोरीची वाळू नाशिकमध्ये दाखल होत असल्याचे कारवायांवरून स्पष्ट होत आहे. शनिवारी शिंदे, देवळालीगाव आणि नाशिक मंडळाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी १३ गाड्यांवर कारवाई केली. विल्होळी आणि पाथर्डी फाटा येथे कारवाईदरम्यान पथकाला मुरूम आणि दगडाची बेकायदा वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. काही वाहनांमध्ये पूर्णपणे अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे तर काही वाहने नियम धाब्यावर बसवून वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.

द्वारका परिसरातही वाळू वाहतूक करणाऱ्या आठ गाड्या अडविण्यात आल्या. त्यापैकी चार गाड्यांमधून बेकायदा वाहतूक होत असल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले. काही वाहनांवर क्रमांकच नसल्याचे समजते. बेकायदा वाहतूक करणाऱ्या चार वाहनांकडून दंड आकारण्यात आला आहे. चार वाहनांनी रॉयल्टी भरून वाळू आणली होती. त्यामुळे त्यांना सोडण्यात आल्याची माहिती तहसीलदार गणेश राठोड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'आरोप सवंग लोकप्रियतेसाठी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पाणीटंचाईमुळे महापालिका बरखास्त करण्याचे माजी महापौर दशरथ पाटील यांचे वक्तव्य हे संवग लोकप्रियतेसाठी असल्याची टीका मनसेचे जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी केले आहे. पाटील यांनी वस्तुस्थितीचा अभ्यास केला नसून, पाणीटंचाईचे खापर त्यांनी पाइपलाइनवर फोडले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणा १९९९ च्या असून, त्यात बदल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावाही कोंबडे यांनी केला आहे.

पाणींटचाईला सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरून महापालिकाच बरखास्त करण्याची मागणी पाटील यांनी केली होती. त्याला मनसेतर्फे प्रतिव्यूत्तर देण्यात आले. पालिका बरखास्त करून पाणीटंचाईची समस्या सुटली असती, तर राज्याचा पाणीप्रश्नच शिल्लक राहिला नसता असा टोला लगावत कोंबडे यांनी पाटलांंना अभ्यास करण्याचा सल्ला दिला. सिडको-सातपूरला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन ही १९९९ ची असून, लोकसंख्या मात्र २२ टक्क्यांनी वाढली आहे. शंभर दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाइपलाइनमधून १३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाइनलाइनचे दुरुस्तीचे हाती घेतलेले कामही पूर्ण झाले आहे. पुढील दहा वर्षांच्या लोकंसख्येचे नियोजन करूनच नवीन नाशिकसाठी ९०० एमएमची पाइपलाइन टाकली जाणार आहे. सोबतच मुकणे पाणीपुरवठा योजना कार्यन्वित होताच पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचा दाव त्यांनी केला आहे. नागरिकांना तीन दिवस झालेल्या त्रासाबददल कोंबडे यांनी नाशिककरांची माफी मागीतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीचे पुन्हा सावट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट होत असताना मालेगावात मात्र शनिवारी राज्यातील सर्वाधिक म्हणजेच ४१.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तापमानातील चढउतारांमुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता बळावली आहे. येते दोन दिवस (सोमवार व मंगळवारी) मेघगर्जनांसह पाऊस तसेच गारपीट होण्याचा अंदाज पुण्याच्या भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

शनिवारी जिल्ह्याच्या काही भागात ढग दाटून आले होते. चांदवड तालुक्यासह काही भागांत पावसाने हजेरी लावली. शहराच्या काही भागात पावसाने हलका शिडकवा केला. शुक्रवारी सुद्धा राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यांतील काही गावांमध्ये अवकाळी पाऊस पडला. पेठ तालुक्यात वीज पडून दोघेजण ठार तर अठरा जण जखमी झाले. तालुक्यातील कायरे गावातील ५२ घरांचे या पावसामुळे नुकसान झाले. तर सुरगाणा तालुक्यातही उदायुदरी गावातील ५२ घरांचे पावसामुळे किरकोळ नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. मात्र, या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले नसल्याचा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे. इगतपुरीत सर्वाधिक ६.०, त्र्यंबकेश्वरला ४.०, ‌दिंडोरीत २.६, सुरगाणा २.० मिमी पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांचं हिमोग्लोबिन घटतंय

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

साठ टक्के शालेय विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्याची बाब पुढे आली आहे. नाशिक एज्युकेशन सोसायटीने (नाएसो) जवळपास २० हजार विद्यार्थ्यांच्या केलेल्या आरोग्य तपासणीचा हा निष्कर्ष असून, योग्य आहाराअभावीच हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी राहत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय नाएसोने घेतला. त्यानुसार संस्थेच्या शहरातील सर्व शाळांमधील जवळपास २० हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीचा अहवाल मात्र काहीसा चिंताजनक आहे. तब्बल ६० टक्के विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे (लोह) प्रमाण कमी असल्याचे त्यात आढळून आले आहे. हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति १०० ग्रॅम मध्ये किती टक्के आहे याची तपासणी करण्यात आली. सर्वसाधारणपणे १२ टक्के हे प्रमाण असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, ५० टक्के विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण मध्यम (८ ते ११ टक्के), २५ टक्के विद्यार्थ्यांमध्ये सौम्य (११ ते १२ टक्के) तर ५ टक्के विद्यार्थ्यांमध्ये तीव्र (८ टक्क्यांपेक्षा कमी) आढळून आले आहे. यास प्रामुख्याने आहार कारणीभूत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या सर्व बाबींची दखल घेऊन विद्यार्थी व पालकांमध्ये जागरुकता आणण्याचा निर्णय संस्थेने घेतल्याची माहिती अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी दिली आहे. दरम्यान, नाशिक जिल्हा परिषदेनेही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली असता त्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याची आढळून आले होते. तर, संपूर्ण राज्यातच अशी परिस्थिती असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जंक फूडच कारणीभूत

विद्यार्थ्यांना जंक फूड मोठ्या प्रमाणात आवडते. त्यामुळे विद्यार्थी योग्य आहाराऐवजी जंक फूडला पसंती देतात. शिवाय हिरव्या पालेभाज्या किंवा भाजी-पोळी खाण्यासही टाळाटाळ करतात. पाल्य नाराज होऊ नये यासाठी पालकही जंक फूड देतात, असे आहार तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. तर काही विद्यार्थ्यांना योग्य आहारच उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. हिरव्या भाज्या, पालक, केळी, संत्री यांचा आहारात समावेश असेल तर हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, असे आहार तज्ज्ञांनी सांगितले आहे.

विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठीच आम्ही आरोग्य तपासणीचा निर्णय घेतला. ६० टक्के विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळल्याचे निष्कर्ष आले आहेत. यासंदर्भात पालक व विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करीत आहोत.

- प्रा. सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष नाएसो

पालकांनी मुलांच्या आहाराची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. जंक फुड विद्यार्थ्यांना आवडत असले तरी त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, हे लक्षात घ्यायला हवे.

- डॉ. विकास देवकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेराशे विद्यार्थ्यांची ‘सीईटी’ला हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) या अभ्यासक्रमासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेला (सीईटी) तेराशे विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. ही परीक्षा रविवारीही दोन सत्रात होणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात १६ कॉलेजेसमध्ये एमसीए अभ्यासक्रमाची उपलब्धता आहे. त्यात एकूण ७१९ जागा आहेत. नाशिकमध्ये २७८, धुळ्यात ७२, जळगावात १४५, तर अहमदनगरम मधील २२४ जागांचा त्यात समावेश आहे. एमसीएची सीईटी शनिवार आणि रविवार (२८ व २९ एप्रिल) असे दोन दिवस दोन सत्रांमध्ये ऑनलाईन स्वरुपात घेण्याचे संचालनालयाने घोषित केले होते. त्यानुसार शनिवारी सकाळी १० ते ११.३० आणि दुपारी ३ ते ४.३० अशा दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली. एकूण २०० गुणांची असलेली ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरुपाची आहे.

नाशिक शहरातील मुंजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि गुरु गोविंद सिंग इंजिनिअरींग कॉलेज, अहमदनगरच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, भुसावळच्या संत गाडगेबाबा कॉलेज, दुळ्याच्या भारती संस्थेत, जळगावच्या रायसोनी इंजिनिअरींग कॉलेज, नंदुरबारच्या एमआयटी कॉलेज, संगमनेरच्या अमृतवाहिनी कॉलेजमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. शनिवारी झालेल्या या परीक्षेला दोन्ही

सत्रात एकूण १३०४ विद्यार्थी उपस्थित होते. त्यात नाशिकमध्ये ३३८, धुळ्यात १५९, जळगावमध्ये २३६, भुसावळमध्ये १३४, नंदुरबारमध्ये ६१, संगमनेरमध्ये १५९ आणि नगरमध्ये २१७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर, एकूण ३१ विद्यार्थी शनिवारच्या दोन्ही सत्रात अनुपस्थित असल्याचे जॉईण्ट डायरेक्टर डॉ. डी. आर. नंदनवार यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवारी रात्रीपर्यंत बँका सुरू राहणार

$
0
0

जिल्हाधिका-यांनी काढले आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय स्टेट बँकेच्या महत्त्वाच्या तसेच मोठ्या शाखा ३१ मार्च रोजी रात्री आठपर्यंत सुरू ठेवाव्यात असे आदेश जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी दिले आहेत. स्टेट बँकेची कोषागार शाखा, तसेच नाशिकरोड व देवळाली कॅम्प शाखा, जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणच्या स्टेट बँकेच्या शाखा, शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या अन्य बँक तसेच सुरगाणा येथील देना बँक ३१ मार्चला रात्री आठपर्यंत सुरू ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शासनाकडून वित्तीय वर्ष अखेरच्या दिवशी उशिरापर्यंत प्राप्त झालेले अनुदान खर्ची टाकून जिल्हा कोषागार व तालुका उपकोषागार कार्यालयाकडून वितरित होणारी देयके, धनादेश, ड्राफ्ट स्टेट बँकेत वटवून रक्कम काढणे, महसुली उत्पन्नाच्या रकमा शासनाकडे भरणा करणे यासाठी पुरेसा अवधी मिळावा म्हणून महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम क्रमांक ४०९ अन्वये हा आदेश काढण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर विभागीय आयुक्तांकडे दाद मागू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निधी वाटपात असमानता असल्याने त्याचा निषेध म्हणून सभागृहात उपस्थित राहूनही आम्ही मस्टरवर सह्या करीत नाही, असे सांगत जिल्हा परिषदेतील महिला सदस्यांनी सीईओ सुखदेव बनकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. निधी वाटपाबाबत न्याय मिळत नसेल, तर विभागीय आयुक्तांकडे दाद मागू, अशी भूमिका महिला सदस्यांनी मांडली.

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्प सादरीकरणावेळी सभागृहातील उपस्थिती अन् प्रत्यक्षात मस्टरवर उपस्थित सदस्यांच्या सह्या या संख्येतील विरोधाभासावर काही सदस्यांनी बोट ठेवत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या प्रकाराबाबत सीईओ सुखदेव बनकर यांनी सवाल उपस्थित करताच निधी वाटपाबाबत अन्यायाची भावना असणाऱ्या महिला सदस्यांनी वरील भूमिका मांडली.

तेराव्या वित्त आयोगातील निधीवरील सुमारे ८० लाखांच्या व्याजाची पळवापळवी होत असल्याचा मुद्दा स्थायी अन् सर्वसाधारण सभेवर आल्यापासून काही महिला सदस्यांमध्ये नाराजी आहे. या नाराजीला बुधवारी अर्थसंकल्पाच्या विशेष सभेत वाट मिळाली. आदिवासी विभागासाठी राबविण्यात येणाऱ्या निधीचे एकत्रीकरण विशिष्ट गटांमध्येच होत असल्याचा मुद्दा यावेळी चर्चेत आल्यानंतर अर्थसंकल्पाचे विषय सोडून चर्चा होत असल्याचा आक्षेप काही सदस्यांकडून घेण्यात आला होता. दरम्यान, मोजक्या गटात या निधीची पळवापळवी होत असेल तर डीपीडीसी निधींतर्गत विविध विकासकामांना देण्यात आलेली प्रशासकीय मंजुरी रद्द करण्यात यावी, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांनी दिले.

दरम्यान, खर्च होणाऱ्या निधीचा तपशील जिल्हा परिषद प्रशासनाने बोर्डावर वेळोवेळी अद्ययावत करावा, निधीच्या नियोजनाबाबत महिला सदस्यांनाही विश्वासात घेण्यात यावे अन् महिला सदस्यांबाबत पक्षपाती भूमिकेचा खुलासा करावा, अशी मागणी महिला सदस्यांकडून करण्यात आली. सीईओ सुखदेव बनकर यांनी यावेळी वेळ मारून नेली. मात्र, प्रशासकीय अधिकारी खुलासा करणार नसतील, तर प्रसंगी विभागीय आयुक्तांकडे दाद मागू, अशीही भूमिका नाराज महिला सदस्यांनी मांडली.

सेसच्या निधीवाढीसाठी धडपड

अर्थसंकल्पासाठी बुधवारी आयोजित झेडपीच्या विशेष सभेत अर्थ समिती आणि प्रशासनाच्या वतीने सेसच्या निधीत वाढ होण्यासाठी कंबर कसली होती. झेडपीच्या स्वत:च्या महसुलातील निधी तथा सेस अंतर्गत निधीत वाढ होण्यासाठी महिला व बालकल्याणच्या तरतुदीत १० टक्के, समाजकल्याणच्या तरतुदीत १० टक्के आणि पाणीपुरवठ्याच्या तरतुदीत २० टक्के निधीची कपात करण्यात येऊन तो निधी सेसकडे वर्ग करण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आला.

त्या लाभार्थींवर हवा 'वॉच'

जिल्हा परिषदेच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींकडून योजनांची वाट लावली जात असल्याचा मुद्दाही विशेष सभेत उपस्थित झाला. अपंगांसाठी झेरॉक्स मशिन देण्याऐवजी इतर योजनेची तरतूद करावी. प्रत्येक गावात झेरॉक्स मशिनला प्रतिसाद नसल्याने काही लाभार्थ्यांना हे मशिन्स मोडीत काढून त्या पैशात अन्य उद्योग उभारल्याचे उदाहरण सदस्यांनी मांडले. यामुळे झेरॉक्स मशिनसारख्या उपकरणांची तरतूद बदलण्याची मागणी झाली. मात्र, वस्तू बदलली तरीही फसविण्याची वृत्ती बदलणार नाही. यासाठी लाभार्थ्यांची उलटतपासणी वेळोवेळी घेणारी समिती स्थापन करावी, जेणेकरून जिल्हा परिषदेच्या डोळ्यात लाभार्थ्यांकडून होणारी धूळफेक थांबेल, अशीही सूचना यावेळी काही सदस्यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांची पसंती ‘स्प्लेंडर’ला!

$
0
0

स्पेअरपार्टसह रिसेल किंमत ठरली डोकेदुखी

अरविंद जाधव, नाशिक

वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबर चोरीच्या घटनांचा आलेख वर्षागणिक उंचावतो आहे. २०११ ते २०१४ या कालावधीत चोरट्यांनी तब्बल २ हजार ८६८ वाहनांची चोरी केली. यात दुचाकीसह तीन आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. अगदी अंगणात पार्क केलेले वाहन असो की, पाच मिन‌िटांसाठी रस्त्याच्या कडेला उभे केलेले. चोरटे हातोहात ते लंपास करतात. वाहनचोरीच्या या कलेवर प्रकाश टाकणारी ही मालिका.

वाहन चोरी रोखणे आणि चोरीला गेलेले वाहन परत मिळवणे, असे दुहेरी काम करताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडते आहे. २०१३ चा अपवाद वगळता वाहनचोरीला ब्रेक लावण्यात पोलिसांना फारसे यश आलेले नाही. चोरट्यांनीही आपला मोर्चा हिरोहोंडा आणि बजाज या सर्वाधिक खप असलेल्या वाहनांकडे वळवला असून, चोरीला जाणाऱ्या वाहनांमध्ये हिरोहोंडा कंपनीची 'स्प्लेंडर' चोरट्यांच्या सर्वाधिक पसंतीस उतरली आहे. २०१४ मध्ये चोरट्यांनी शहर परिसरातून ६८५ वाहने चोरी केली होती. यातील १४१ वाहने परत मिळवण्यात पोलिसांना यश आले. चोरीला गेलेल्या एकूण वाहनांपैकी ४०९ वाहनांचे वर्गीकरण केले असता, त्यात चोरट्यांनी हिरोहोंडा कंपनीच्या वाहनांना लक्ष केल्याचे दिसते. वर्गीकरण केलेल्या ४०९ वाहनांपैकी २२८ वाहने ही या कंपनीची असल्याचे स्पष्ट होते. यानंतर बजाज (८५), टीव्हीएस (२४), महिंद्रा व सुझुकी कंपनीच्या अनुक्रमे तीन आणि सात तसेच चारचाकी (३८) यांचा नंबर लागतो. हिरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर ही दुचाकी चोरट्यांच्या रडारवर आहे. गत वर्षात तब्बल ७६ स्प्लेंडर चोरी झाल्या. यानंतर, पॅशन आणि अॅक्टीव्हा अनुक्रमे २९, तर, सीडी १००, सीबीझेड, डियो, ड्रिम युगा, युनिकॉर्न, करीझ्मा, डिलक्स, प्लेझर यासह इतर मिळून ३२ वाहने लंपास करण्यात आली. याबरोबर, चोरीला गेलेल्या, मात्र पोलिसांकडे फक्त हिरोहोंडा या कंपनीच्या नावाने रजिस्टर असलेल्या ६२ वाहनांचाही यात समावेश आहे. हिरोहोंडा पाठोपाठ बजाज कंपनीची सर्वाधीक म्हणजे ८५ वाहने चोरीला गेल्याचे वर्गीकरणातून स्पष्ट होते. बजाजच्या पल्सरला चोरट्यांकडून सर्वाधिक 'मागणी' आहे. ८५ वाहनांमध्ये ३७ पल्सर दुचाकींचा समावेश आहे. यानंतर, डिस्कव्हर १२, सीटी १०० पाच, बॉक्सर आणि प्लॅटीना अनुक्रमे चार आणि तीन अशी वाहने चोरीला गेली आहेत. दुचाकीचा प्रकार नोंद नसलेल्या १८ वाहनांचाही यात समावेश आहे.

दरम्यान, वाढत्या वाहनचोरीला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा दावा पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी केला. परजिल्ह्याबाहेर वाहनांचे होणारे रिसेल आणि स्पेअरपार्टची विक्री या दोन बाबी तपासात अडचण निर्माण करतात, असे त्यांनी सांगितले. विशेषतः हिरोहोंडाच्या जुन्या दुचाकींना चांगला भाव मिळतो. त्यामुळे चोरट्यांनी स्प्लेंडरसह हिरोहोंडाच्या इतर वाहनांना लक्ष केले असावे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातबाऱ्यावरील शिक्के निघणार

$
0
0

झोडगेसह जळकू, चिखळओहळला मिळणार लाभ

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव तालुक्यातील झोडगे, चिखलोहाळ व जळकू या गावातील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न २००९ पासून प्रलंबित होता. शेतकऱ्यांचा जमीन देण्यास वाढता विरोध आणि औद्योगिक वसाहतीस लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा आभाव लक्षात घेता शासनाने या भागातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील शिक्के काढण्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी झोडगेसह जळकू, चिखलओहोळ, सायने बु., सायने खुर्द या पाच गावांमधून सुमारे ३ हजार ४६४ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते. १९ फेब्रुवारी २००९ च्या अधिसूचनेनुसार राजपत्र प्रसिध्द करण्यात येऊन सदर क्षेत्रास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ च्या प्रकरण ६ च्या तरतुदी लागू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वरील क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर औद्योगिक वसाहतीचे शिक्के लावण्यात आले होते. मात्र, या निर्णयास झोडगेसह उर्वरित गावातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला होता.

भूसंपादनाविरोधात रास्तारोकोसह आंदोलने करण्यात येऊन विरोध दर्शविण्यात आला. यासंदर्भात सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा देखील केला होता. तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन सदर भूसंपादन रद्द करावे, यासाठी मागणी केली होती. पाठपुराव्यामुळे औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरून भूनिवड समितीने पाण्याचा अभाव व भूसंपादनास असलेला विरोध तसेच इतर बाबी अहवालात नमूद केल्या होत्या. याची नोंद घेत राणे यांनी झोडगे, चिखलओहोळ व जळकू या तीन गावातील अधिसूचित क्षेत्र भूसंपादनातून वगळण्याच्या प्रस्तावास मंजुरी देत स्वाक्षरी केली होती. मात्र, त्याची अधिसूचना २३ जानेवारी २०१५ रोजी काढण्यात आली व त्यानुसार पुढील प्रक्रियेला आता वेग आला आहे.

शेत व्यवहारांना मिळणार चालना

गत पाच वर्षापासून औद्योगिक वसाहतीचे शिक्के लागल्यामुळे झोडगेसह परिसरातील गावांमध्ये शेती व्यवहार पूर्णत: ठप्प झाले होते. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला यश आले असून, सातबारा उताऱ्यावरील शिक्के निघणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईवर जोर; महसुलात भर

$
0
0

वाळूच्या आणखी १३ गाड्यांवर कारवाई; सहा लाख दंड वसुली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात अवैधरित्या वाळू घेऊन येणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरूच आहे. शनिवारी रामनवमीच्या दिवशीही द्वारका, पाथर्डी फाटा आणि विल्होळी परिसरात मंडळ अधिकाऱ्यांनी १३ गाड्या पकडून त्यांच्याकडून सुमारे सहा लाखांचा दंड वसूल केला.

'वाळू'चे वळू ही वृत्तमालिका महाराष्ट्र टाइम्सने प्रसिध्द केली. मालिका प्रसिध्द झाली तेव्हापासून जिल्हा प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. गौण खनिजांसारख्या सरकारची मालमत्तेची चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बाह्या सरसावल्या आहेत. सरकारला कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता परस्पर गौण खनिजांची वाहतूक आणि व्यवहार करणाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने लक्ष्य केले आहे. याखेरीज वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून गौण खनिजांची सर्रास वाहतूक करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने चोरटी वाहने पकडण्यात येत असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर दंडही वसूल केला जात आहे.

जिल्ह्यातील लोहोणेर, कळवण या सारख्या काही भागांमधून चोरीची वाळू नाशिक आणि नाशिक बाहेर जातेच. परंतु, त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथूनही मोठ्या प्रमाणावर चोरीची वाळू नाशिकमध्ये दाखल होत असल्याचे कारवायांवरून स्पष्ट होत आहे. शनिवारी शिंदे, देवळालीगाव आणि नाशिक मंडळाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी १३ गाड्यांवर कारवाई केली. विल्होळी आणि पाथर्डी फाटा येथे कारवाईदरम्यान पथकाला मुरूम आणि दगडाची बेकायदा वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. काही वाहनांमध्ये पूर्णपणे अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे तर काही वाहने नियम धाब्यावर बसवून वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.

द्वारका परिसरातही वाळू वाहतूक करणाऱ्या आठ गाड्या अडविण्यात आल्या. त्यापैकी चार गाड्यांमधून बेकायदा वाहतूक होत असल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले. काही वाहनांवर क्रमांकच नसल्याचे समजते. बेकायदा वाहतूक करणाऱ्या चार वाहनांकडून दंड आकारण्यात आला आहे. चार वाहनांनी रॉयल्टी भरून वाळू आणली होती. त्यामुळे त्यांना सोडण्यात आल्याची माहिती तहसीलदार गणेश राठोड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'आरोप सवंग लोकप्रियतेसाठी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पाणीटंचाईमुळे महापालिका बरखास्त करण्याचे माजी महापौर दशरथ पाटील यांचे वक्तव्य हे संवग लोकप्रियतेसाठी असल्याची टीका मनसेचे जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी केले आहे. पाटील यांनी वस्तुस्थितीचा अभ्यास केला नसून, पाणीटंचाईचे खापर त्यांनी पाइपलाइनवर फोडले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणा १९९९ च्या असून, त्यात बदल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावाही कोंबडे यांनी केला आहे.

पाणींटचाईला सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरून महापालिकाच बरखास्त करण्याची मागणी पाटील यांनी केली होती. त्याला मनसेतर्फे प्रतिव्यूत्तर देण्यात आले. पालिका बरखास्त करून पाणीटंचाईची समस्या सुटली असती, तर राज्याचा पाणीप्रश्नच शिल्लक राहिला नसता असा टोला लगावत कोंबडे यांनी पाटलांंना अभ्यास करण्याचा सल्ला दिला. सिडको-सातपूरला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन ही १९९९ ची असून, लोकसंख्या मात्र २२ टक्क्यांनी वाढली आहे. शंभर दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाइपलाइनमधून १३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाइनलाइनचे दुरुस्तीचे हाती घेतलेले कामही पूर्ण झाले आहे. पुढील दहा वर्षांच्या लोकंसख्येचे नियोजन करूनच नवीन नाशिकसाठी ९०० एमएमची पाइपलाइन टाकली जाणार आहे. सोबतच मुकणे पाणीपुरवठा योजना कार्यन्वित होताच पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचा दाव त्यांनी केला आहे. नागरिकांना तीन दिवस झालेल्या त्रासाबददल कोंबडे यांनी नाशिककरांची माफी मागीतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीचे पुन्हा सावट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट होत असताना मालेगावात मात्र शनिवारी राज्यातील सर्वाधिक म्हणजेच ४१.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तापमानातील चढउतारांमुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता बळावली आहे. येते दोन दिवस (सोमवार व मंगळवारी) मेघगर्जनांसह पाऊस तसेच गारपीट होण्याचा अंदाज पुण्याच्या भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

शनिवारी जिल्ह्याच्या काही भागात ढग दाटून आले होते. चांदवड तालुक्यासह काही भागांत पावसाने हजेरी लावली. शहराच्या काही भागात पावसाने हलका शिडकवा केला. शुक्रवारी सुद्धा राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यांतील काही गावांमध्ये अवकाळी पाऊस पडला. पेठ तालुक्यात वीज पडून दोघेजण ठार तर अठरा जण जखमी झाले. तालुक्यातील कायरे गावातील ५२ घरांचे या पावसामुळे नुकसान झाले. तर सुरगाणा तालुक्यातही उदायुदरी गावातील ५२ घरांचे पावसामुळे किरकोळ नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. मात्र, या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले नसल्याचा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे. इगतपुरीत सर्वाधिक ६.०, त्र्यंबकेश्वरला ४.०, ‌दिंडोरीत २.६, सुरगाणा २.० मिमी पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांचं हिमोग्लोबिन घटतंय

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

साठ टक्के शालेय विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्याची बाब पुढे आली आहे. नाशिक एज्युकेशन सोसायटीने (नाएसो) जवळपास २० हजार विद्यार्थ्यांच्या केलेल्या आरोग्य तपासणीचा हा निष्कर्ष असून, योग्य आहाराअभावीच हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी राहत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय नाएसोने घेतला. त्यानुसार संस्थेच्या शहरातील सर्व शाळांमधील जवळपास २० हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीचा अहवाल मात्र काहीसा चिंताजनक आहे. तब्बल ६० टक्के विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे (लोह) प्रमाण कमी असल्याचे त्यात आढळून आले आहे. हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति १०० ग्रॅम मध्ये किती टक्के आहे याची तपासणी करण्यात आली. सर्वसाधारणपणे १२ टक्के हे प्रमाण असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, ५० टक्के विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण मध्यम (८ ते ११ टक्के), २५ टक्के विद्यार्थ्यांमध्ये सौम्य (११ ते १२ टक्के) तर ५ टक्के विद्यार्थ्यांमध्ये तीव्र (८ टक्क्यांपेक्षा कमी) आढळून आले आहे. यास प्रामुख्याने आहार कारणीभूत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या सर्व बाबींची दखल घेऊन विद्यार्थी व पालकांमध्ये जागरुकता आणण्याचा निर्णय संस्थेने घेतल्याची माहिती अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी दिली आहे. दरम्यान, नाशिक जिल्हा परिषदेनेही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली असता त्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याची आढळून आले होते. तर, संपूर्ण राज्यातच अशी परिस्थिती असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जंक फूडच कारणीभूत

विद्यार्थ्यांना जंक फूड मोठ्या प्रमाणात आवडते. त्यामुळे विद्यार्थी योग्य आहाराऐवजी जंक फूडला पसंती देतात. शिवाय हिरव्या पालेभाज्या किंवा भाजी-पोळी खाण्यासही टाळाटाळ करतात. पाल्य नाराज होऊ नये यासाठी पालकही जंक फूड देतात, असे आहार तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. तर काही विद्यार्थ्यांना योग्य आहारच उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. हिरव्या भाज्या, पालक, केळी, संत्री यांचा आहारात समावेश असेल तर हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, असे आहार तज्ज्ञांनी सांगितले आहे.

विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठीच आम्ही आरोग्य तपासणीचा निर्णय घेतला. ६० टक्के विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळल्याचे निष्कर्ष आले आहेत. यासंदर्भात पालक व विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करीत आहोत.

- प्रा. सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष नाएसो

पालकांनी मुलांच्या आहाराची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. जंक फुड विद्यार्थ्यांना आवडत असले तरी त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, हे लक्षात घ्यायला हवे.

- डॉ. विकास देवकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णवाहिकेची रुतली चाके

$
0
0

इंधनखर्च मिळत नसल्याने वाताहत; येवला ग्रामीण रुग्णालयातील अवस्था

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'जननी शिशु सुरक्षित योजने' अंतर्गत ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रसूती झालेल्या मातांना डिस्चार्जनंतर रुग्णवाहिकेतून मोफत त्यांच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था आहे. या व्यवस्थेसाठी ग्रामीण रुग्णालयांना इंधनखर्च निधी दिला जातो. मात्र, येवला ग्रामीण रुग्णालयाला मिळणारा हा निधी जवळपास गेल्या वर्षभरापासून थकल्याने रुग्णवाहिका इंधनाविना उभी ठेवावी लागत आहे. तसेच, रुग्णालयात प्रसूती झालेल्या मातांना तीन दिवस दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या सुविधेसाठीचा निधी देखील तब्बल आठ महिन्यांपासून वरिष्ठ स्तरावर प्रलंबित असल्याने येवला ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

रुग्णवाहिकेसाठी जननी शिशू सुरक्षित योजनेंतर्गत निधी अडखळताना परतेक वेळी तुम्ही खर्च करा, त्याची प्रतिपूर्ती होईल, असे वरिष्ठ पातळीवरून सल्ला मिळत आला आहे. येवला ग्रामीण रुग्णालयाने पगार निधी, तसेच इतर निधी रुग्णवाहिकेच्या इंधनावर खर्च केला. मात्र, त्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी अद्यापही वरिष्ठ पातळीवरून निधीच उपलब्ध झालेला नाही. यामुळे येवला ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाने आता हात आखडते घेतले आहेत.

जवळपास वर्षभरापासून सदरचा निधी अडकल्याने इंधनाअभावी सदरची सेवा देण्यात येवला ग्रामीण रुग्णालयास अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी प्रसूती झालेल्या मातांना बाळासह मोफत त्यांच्या घरी पोहोचविण्याच्या शासकीय योजनेला खिळ बसला आहे.

येवला ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका चालक असूनही इंधनासाठी पैसाच नसल्याने उभी आहे. कधी कधी प्रसूती झालेल्या मातांच्या घरचे अन् नातेवाईकांनी स्वतः पदरमोड करीत डिझेलचा खर्च केला. मात्र, असा भुर्दंड आता कुणीही सोसण्यास तयार नसल्याने मातांना घराकडे पोचविणाऱ्या येवला ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेचे चाके ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातच रुतून पडल्याचे दिसत आहेत. याकडे आरोग्य विभाग व त्याच्या वरिष्ठांनी गांभीर्याने बघण्याची गरज आहे.

भोजन निधीही थकला

शासनाच्या नियमाप्रमाणे ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलांना तीन दिवस रुग्णालयात ठेवून औषधोपचार केले जातानाच या तीनही दिवशी त्यांना मोफत जेवणाची सुविधा देण्यात येते. शासनाच्या नियमानुसार त्या त्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या पातळीवर स्थानिक खासगी व्यक्ती नेमून त्यांच्यामार्फत मातांना सदरचे जेवण पुरविले जाते. पुढे हा निधी शासनाच्या आरोग्य विभागाकडून ग्रामीण रुग्णालयांना अदा केला जातो. असे असताना येवला ग्रामीण रुग्णालसयास ऑगस्ट २०१४ ते आतापावेतो अर्थातच तब्बल ८ महिन्यांचा जेवणासाठीचा निधीच न मिळाल्याने स्थानिक प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे. वरिष्ठ स्तरावर येवला ग्रामीण रुग्णालयाने याबाबत सातत्याने मागणी करूनही अद्याप बिले प्रलंबित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरमहिन्याला होतात ८० ते १०० प्रसूती

येवला ग्रामीण रुग्णालयातील प्रत्येक महिन्याला झालेल्या आजवरच्या महिला प्रसूती आकडेवारीवर नजर टाकता आजपावेतो दरमहिन्याला साधारणतः ८० ते १०० च्या आसपास महिलांची प्रसूती झाल्याचे रुग्णालयातील फलकच दर्शवतो. या प्रत्येक महिन्यातील प्रसूती झालेल्या मातांची संख्या, त्यांना ३ दिवस दिले जाणारे भोजन अन् गेल्या ८ महिन्यांपासून याबाबत वरिष्ठस्तरावर प्रलंबित असलेली बिले याचा विचार करता येवला ग्रामीण रुग्णालयाचे जवळपास लाखोंची बिले अडकली आहेत. त्यामुळेच आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने बघताना तातडीने प्रलंबित बिले, निधीचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पावसाच्या सरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला असताना, विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सटाणा, निफाड, मालेगाव, सिन्नर आदी तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.

शेतकरी चिंताक्रांत

सिन्नर शहर व परिसरात ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उन्हाळ कांदा शेतात काढून पडला आहे. अधूनमधून कोसळणाऱ्या सरींमुळे कांदा वाचवण्यासाठी ताडपत्री, प्लास्टिक कागदाने कांदा झाकताना शेतमळ्यात दिसत आहेत.

काही दिवसांपासून अवकाळी तसेच, गारपिटीने शेतकरी चिंतातूर झालेला असताना गेल्या एक दोन दिवसापासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच, ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांची घालमेल सुरू झाली आहे. या वातावरणामुळे उन्हाळी कांदा खराब होण्याची शक्यता आहे. यावर्षी महागडे कांदा रोप घेत शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड केली. आता काढून तयार झालेल्या अवस्थेत असताना ढगाळ हवामान झाल्याने शेतकरीवर्गात चिंता पसरली आहे. याच महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर दव पडून कांद्यावर करपा पडून उत्पादनात घट झाली आहे. कांदा शेतात काढलेला असल्याने प्लास्टिक अच्छादनासाठी शेतकरीवर्गास ऐनवेळेस धावपळ करावी लागत आहेत. त्यातच बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.

निफाडमध्ये हजेरी

लासलगावसह निफाड तालुक्यातील बहुतांशी भागात रविवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शनिवारी व रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण व प्रचंड उष्मा जाणवत होता. अखेर रविवारी सायंकाळी उशिरा लासलगाव व परिसरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

सततची गारपीट, अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाने इथला शेती व्यवसाय संकटात सापडल्याने कष्टकरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शनिवारीपासून लासलगाव, निमगाव, पाचोरा, मरोळगुई, भरवस, गोंदेगाव, विंचूर, नैताळे, निफाड, उगाव, शिवडी, वनसगाव व निफाडच्या गोदाकाठातील औरंगपुर, भेंडाळी, भुसे, चापडगाव, मांजरगाव, सायखेडा, चांदोरी आदी गावांसह संपूर्ण तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले होते. सध्या परिसरात शेवटच्या टप्प्यातील लाल कांदा काढणीचे व गहू सोंगणीचे काम सुरू असून, ढगाळ वातावरणाने व अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावले आहेत. द्राक्ष बागाईतदार शेतकऱ्यांमधेही पावसामुळे भीतीचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद पथदीप, आरोग्यावरून खडाजंगी

$
0
0

नाशिकरोड प्रभाग समिती बैठकीत नगरसेवक आक्रमक

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

महापालिका प्रभाग समितीची महासभा महापालिकेच्या येथील विभागीय कार्यालयात झाली. सभापती कोमल मेहरोलिया अध्यक्षस्थानी होत्या. नगरसेवकांनी बंद पथदीप, आरोग्य, अतिक्रमण आदी प्रश्नांवर आक्रमक पवित्रा घेतला.

नगरसेवक सूर्यकांत लवटे म्हणाले, की पथदीप बंद असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाकडे तक्रार करूनही उपाय केले जात नसल्याचा आरोप लवटे यांनी केला. मलेरिया विभागाकडून धुराळणी व फवारणी होत नसल्याने वालदेवी, गोदावरी, नासर्डी नदीकाठी डासांचे प्रमाण आणि हिवतापाचे रुग्ण वाढले असल्याचा आरोप नगरसेवक संभाजी मोरुस्कर व अन्य नगरसेवकांनी केला. त्यावर अधिकाऱ्यांनी मलेरिया विभागात फक्त ६० कर्मचारी असल्याने कामांमध्ये अडथळा येत असल्याची कबुली दिली.

पूर्वसूचना न देता अतिक्रमण हटाव

नगरसेवक हरिष भडांगे यांनी अतिक्रमण काढताना अधिकारी भेदभाव करत असल्याने वाद होतात असे सांगितले. पूर्वसूचना न देता अतिक्रमणे हटवली जात असल्याने अतिक्रमणधारकांचे नुकसान होत असल्याचा आरोप नगरसेवक अशोक सातभाई यांनी केला. नगरसेवक सुनील वाघ, संपत शेलार, ललिता भालेराव, शोभना शिंदे, रंजना बोराडे, सुनीता कोठुळे, वैशाली भागवत यांच्यासह विभागीय अधिकारी किशोर चव्हाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला ‘नायपर’साठी साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (नायपर) ही राष्ट्रीय संस्था नाशिकलाच व्हावी यासाठी अवामी विकास पार्टीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाव्दारे साकडे घातले आहे. नायपरसाठी नाशिकलाच योग्य असून नवनवीन औषधांचे संशोधन आणि ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणे जसे गरजेचे आहे.

नाशिकमधील पायाभूत सुविधांबरोबर येथील हवामान नायपरसाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे नायपर ही राष्ट्रीय संस्था नाशिकला व्हावी अशी नाशिकरांसह मागणी आहे. असे पार्टीचे जिल्हा अध्यक्ष फय्याज उस्मान पठाण निवेदनात नमूद केले आहे.

नाशिकचे थंड हवामान, दक्षिण गंगोत्रीच्या नावाने ओळखली जाणारी गोदावरी, पर्यटन आणि धार्मिक स्थळ म्हणून जगभरात असलेली नाशिकची ओळख, विभागीय संदर्भ सेव रुग्णालयसह नाशिकमध्ये येत असलेली मोठमोठी हॉस्पिटल, औद्योगिक क्षेत्राने केलेली प्रगती, मालेगांव येथे असलेले युनानी कॉलेज व संशोधन केंद्र नाशिक येथे असलेले सुमारे ५० औषध कंपन्या, महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ, नाशिकमध्ये बारा ते तेरा सुरू झालेले हेल्थ रिसॉर्ट याशिवाय नाशिक परिसरातील त्र्यंबकेशवर, दिंडोरी, पेठ, हरसूल, सुरगाणा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिळत असलेले वनौषधी या सर्व बाजूंचा विचार करून नाशिकलाच नायपर व्हावे अशी मागणी पठाण यांनी निवेदनात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे मिशन मार्च एण्ड

$
0
0

सातपूर-सिडकोमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी वसुली मोहिमेला गती

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महापालिकेच्या सातपूर विभागाकडून मार्च अखेरच्या अगोदर घरपट्टी, पाणीपट्टी यासह विविध करवसुली मोहीम जोरदारपणे सुरू आहे. यात अनेक ठिकाणी वसुली होत नसलेल्या घरमालकांवर जप्तीची मोहीम देखील राबविली जात आहे. महापालिकेच्या विविध विभागांनी दिलेल्या उद्दिष्ट्यापैकी करवसुलीमध्ये बहुतांश टार्गेट पूर्ण केल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेच्या सातपूर विभागात घरपट्टीचे १० कोटी ९५ लाख ८२ हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात शुक्रवारपर्यंत ७ कोटी ५० लाख ६८ हजाराची वसुली करण्यात आली आहे. यात गतवर्षांपेक्षा ९० लाखाने घरपट्टी वसुली वाढ झाली आहे. तसेच पाणीपट्टी वसुलीचे १० कोटी ७८ लाख ३८ हजार उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये आजपर्यंत ४ कोटी ७४ लाख १९ हजार रुपयांची वसुली झाली आहे. यात गेल्या वर्षांपेक्षा १ कोटी ४ लाखाने पाणीपट्टीच्या वसुलीत वाढ झालेली आहे. तर विविध कर वसुली देखील २ कोटी २३ लाख ३५ हजार झाली असून ३१ लाख रुपयांची वाढ झाली आहे. मार्च अखेरपर्यंत सातपूर विभागातील मिळकतधारकांनी आपले कर भरण्याचे आवाहन सातपूर विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे यांनी केले आहे.

करवसुलीसाठी कर्मचाऱ्यांची धावपळ

महापालिकेच्या सिडको विभागात देखील कर्मचाऱ्यांकडून वसुलीचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यात शुक्रवारपर्यंत घरपट्टीची १४ कोटी २० लाखांची वसुली झाली आहे. गेल्या वर्षांपेक्षा वसुलीत १ कोटी २५ लाखाची वाढ झाली. तर पाणीपट्टीची वसुली ८ कोटी ४७ लाख झाली असून गतर्वर्षापेक्षा ९३ लाखांची वाढ झाली असल्याचे विभागीय अधिकारी राजेंद्र गासावी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आई तुला मी कुठे ठेवू’

$
0
0

कालिदास कलामंदिरात आयोजित नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माणसाचं वय वाढलं की ती घरात अडचण ठरू लागतात. माणसांचं जिणं हे परावलंबी झालं की त्यांच्या नात्यांचे बंध सैलावू लागतात, नाती निरर्थक होऊ लागतात; नात्यांचं मूल्य 'अर्था'वर ठरू लागतं. हीच समस्या समस्या नाटककार अशोक पाटोळे यांनी हेरली आणि त्यावर 'आई, मी तुला कुठं ठेवू?' या नाटकातून ती मांडली.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब' उपक्रमांतर्गत आयोजित एसएमएस कॉन्टेस्टचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत विचारलेल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देणाऱ्या सभासदांना 'आई तुला मी कुठे ठेवू?' या नाटकाचे फ्री पासेस देण्यात आले. रविवारी कालिदास कलामंदिरात झालेल्या नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या नाटकात नाती ही माणसाच्या किमतीवर जगतात तुमच्याकडे पैसा असेल तर मुल विचारतात नाहीतर तीही विचारत नाही. आपली गरज संपली की मुलंही आईला विचारत नाही, प्रत्यक्षात मात्र आई या विषयावर डॉक्युमेंटरी करताना खोट्या कल्पनांना स्थान दिले जाते. आई मुले यांच्या अर्थपूर्ण नात्यावर बेतलेल्या नाटकात रसिकांना विचार करायला भाग पाडले. आई तुला मी कुठे ठेवू? या नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांनी केले होते. आई याच विषयावर त्यांनी आई रिटायर होते हे नाटक लिहले होते. नाटकात दिर्गदर्शनाची बाजू पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांभाळली होती. रूपेश पाटोळे, सुरभी भावे, योगिनी चौक, सिद्धेश शेलार, मंदा देसाई, विद्याधर जोशी आणि रोहिणी हट्टंगडी यांनी भूमिका साकारल्या. यातील रोही हट्टंगडी यांनी साकारलेली सासूची भूमिका विचार करायला लावणारी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाकडून छेडछाड

$
0
0

मदत करणाऱ्या बसचालकास अटक

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

नृत्याच्या शिकवणीहून घरी परतणाऱ्या सोळा वर्षीय मुलीस अडवून छेड काढल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित पोलिस कर्मचारी ​अनिल जाधव याच्यासह बसचालक मनोज तुकाराम चंदनशिव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. रविवारी संध्याकाळी बसचालक चंदनशिव यास पोलिसांनी अटक केली. छेडछाडीची घटना शिवाजीरोड परिसरात घडली होती.

कमोदनगर परिसरात राहणारी सोळा वर्षीय मुलगी नृत्याच्या शिकवणीसाठी सीबीएस येथे जाते. शनिवारी सायंकाळी शिकवणी संपल्यानंतर घरी जाण्यासाठी ती शिवाजीरोडहून सीबीएसकडे येत होती. त्यावेळी साध्या वेशातील पोलिस कर्मचारी अनिल जाधव याने तिची छेड काढली. यानंतर अल्पवयीन मुलीने त्याच्या मुस्काटात वाजवली. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याने तुझ्यावर गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देत तेथून काढता पाय घेतला. यानंतर पीडीत मुलगी घराकडे निघाली. संशयित पोलिस कर्मचाऱ्याने दोन मित्रांना सोबत मुलीचा पाठलाग केला. तिला अडवून पुन्हा दमबाजी केली. तसेच मोबाइल नंबर असलेली एक चिट्टी तिच्या हातात दिली. हा प्रकार मुलीने आईला सांगितला. यानंतर मुलीच्या आईने थेट इंदिरानगर पोलिस स्टेशन गाठले. तसेच, मुलीच्या पालकांनी मोबाइल नंबरवर कॉल केला. समोरून शिव्या दिल्यानंतर फोन बंद करण्यात आला. दरम्यान, छेडछाडीचा प्रकार भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला असल्याने रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी तपासास सुरुवात केली. पीडित मुलीला चिठ्ठीवर नंबर देण्यात आला होता, तो मोबाइल नंबर नाशिकमधीलच पण, शहापूर बस डेपोत काम करणाऱ्या मनोज चंदनशिव या बस ड्रायव्हरचा असल्याचे निष्पण झाले. घटना घडली त्यावेळी त्याने खाकी ड्रेस परिधान केला होता. याच माहितीवरून पोलिसांनी त्याला अटक केली. गुन्ह्यात सहभागी असलेल्या शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी अनिल जाधव याचा शोध घेतला जात असून रात्री त्यास अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live

Latest Images