Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आरोग्यशत्रू एक्स अन् दीक्षितांची दीक्षा

$
0
0

>>डॉ. शाम अष्टेकर

सिंड्रोम एक्स किंवा मेटाबोलिक ऊर्फ चयापचय सिंड्रोम हा भारतीय वंशामध्ये जगात सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. यात पाच प्रकारचे दोष येतात. रक्तदाब जास्त म्हणजे १३०/८५ पेक्षा अधिक, रक्तातली साखर वाढणे, कमरेभोवती जास्त चरबी साठणे, रक्तातील मेदाम्ले/चरबीचे प्रमाण वाढणे, रक्तातले चांगल्या कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी असणे. यातील एक दोष जरी जास्त असला तरी तुम्हाला हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. तीनपेक्षा अधिक दोष असतील, तर एक्स सिंड्रोम आहे असे धरतात. या दोषसमुहामुळे मधुमेह, धमन्यांचे विकार, अतिरक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचा आजार, मेंदूचा पक्षाघात, यकृतातला मेदसंचय, वगैरे विकार जास्त प्रमाणात होतात. यापुढे शरीरातल्या चेता म्हणजे मज्जातंतू, डोळे यावरही दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. यासाठी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सुचवलेले उपायही कायदेशीर ठरतात.

सिंड्रोम एक्स आपल्याला आहे की नाही हे कळण्यासाठी रक्तदाब मापन, कमरेचा घेर, उपाशीपोटी रक्तातील मेदाम्ले व कोलेस्ट्रोल आणि साखरेचे प्रमाण या तपासण्या कराव्या लागतात. यापैकी तीन तपासण्या सदोष आल्या, तर आपल्याला सिंड्रोम आहे असे गृहीत धरायला हरकत नाही. यामुळे आयुर्मान कमी होणे, वर सांगितलेले आजार लवकर व जास्त प्रमाणात होणे हे धोके संभवतात. त्यामुळे लवकरात लवकर आहारविहार व उपचारातून यावर उपाय करायला हवेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन कमी करणे! यासाठी निदान रोज तीस मिनिटे थोडा जोरकस म्हणजे एरोबिक (दमसांस) व्यायाम आठवड्यातून निदान पाच ते सात वेळा करायला हवा. धूम्रपान असल्यास सोडायला पाहिजे. अतिरक्तदाब असल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य तो औषधोपचार करायला पाहिजे. रक्तातील साखर जास्त असल्यास मधुमेहासाठी आहारविहार नियंत्रण आणि लागल्यास उपचार करावेच लागतात. रक्तातील कोलेस्ट्रॉलबद्दल वैद्यकीय विश्वात थोडे मतभेद आहेत पण, स्टॅटिन प्रकारची औषधे घ्यायला हवीत, अशी साधारणपणे दिशा आहे. या प्रकृतीदोषांचा व्यवस्थित उपचार केला (म्हणजे आहार विहार धरून) तर बहुधा हा बरा होऊ शकतो आणि पुढील त्रास टळू शकतो.

उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला. पौगंडावस्थेपासूनच कमरेचा म्हणजे पोटाचा घेर योग्य राखणे, रक्तदाब वर्ष-सहा महिन्यांनी तपासून त्यावर नियंत्रण ठेवणे. कोलेस्ट्रॉलची पातळी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आहारामध्ये भाकरी, पोळी, भात जास्त खाण्याऐवजी पालेभाज्या, फळे, प्रथिने याचा जास्त समावेश करावा. व्यायामाबरोबरच रोज शारीरिक हालचाली व श्रम असायला पाहिजेत. उदा. जिना असला तर लिफ्ट सोडून नेहमी जिना वापरावा. घरातली कामे, व्यवसायातली छोटी मोठी कामे स्वत: करावीत. बॉडी मास इंडेक्स म्हणजे शरीरभार २३ च्या खाली आणि शक्यतो १८ ते २० च्या दरम्यान राखावा. त्यासाठी वजन दर महिन्याला तपासले पाहिजे.

आमचे मित्र औरंगाबादचे रोगप्रतिबंधक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिवंगत डॉ. जिचकार यांच्या प्रतिपादनानुसार वजन व रक्तातील साखर कमी करण्याचा एक प्रयोग गेली दोन वर्षे चालवला आहे. त्यात त्यांना बरेच यश आले. त्यांच्या पद्धतीनुसार आहारबदल करणाऱ्यांना दोन महिन्यातच सरासरी ८ किलो वजन कमी झाल्याचा अनुभव आला आहे. हा सल्ला तरूण व प्रौढांना लागू आहे. तसेच, ज्यांना मधुमेह नाही अशांनी याचा वापर करावा. यातले तत्व असे की वारंवार खाणे सोडून २४ तासातून फक्त दोन वेळा आहार घ्यावा, (अर्थातच अशा वेळीही फार खाऊ नये.) यात आपले नेहमीचे भोजन, (उष्मांक, प्रथिने, भाजीपाला वगैरे पदार्थ असावेत). या दोन भोजनांमध्ये निदान ६ तास अंतर असावे. भोजन सुरू केल्यापासून तासाभरात संपवावे. जास्त काळ लांबवू नये. याशिवाय अधेमधे कोणत्याही प्रकारे उष्मांक घेऊ नयेत. म्हणजेच गोड फळे, चिवडा, भजी, स्नॅक्स (अल्पोपहार), साखरेचा चहा किंवा कॉफी, पेढा, बर्फी वगैरे काहीही खाऊ नये. पण, अंड्यातील पांढरे बलक किंवा ताक चालू शकेल. गाजर, काकडी देखील भोजनातच असावी एरवी नाही कारण त्यातही सेल्युलोज असते आणि त्यापासून उर्जा मिळू शकते. (मात्र याविरुद्ध ऋतुजा दिवेकर यांचा फॉर्म्युला

थोडे थोडे अधिक वेळा खाण्याचा आहे.) आठवड्यातून एखादा

अपवाद सोडता कायम हाच नियम पाळावा.

या प्रकारे आहार नियोजन केल्यास रक्तातील इन्शुलीनचे प्रमाण निरोगी स्थितीवर (३ युनिटच्या खाली) येते आणि त्यामुळे ग्लुकोज चयापचय सुधारून रक्तातील साखर कमी होते. रक्तातील साखर व इन्शुलीन वाढल्याने चरबी साठत असते, तीही या आहार नियोजनाने उतरल्याचा अनेकांना अनुभव आहे. मात्र त्यानंतर वजन फार कमी होत नाही. महिन्यातून १-२ किलो फारतर कमी होईल. या पद्धतीत भर व्यायामावर नाही, फक्त भोजन नियंत्रणावर आहे. पण अर्थातच रोज किमान अर्धा तास चांगला एरोबिक व्यायाम करायला पाहिजे. त्याने स्नायू व हृदय, रक्तवाहिन्या निरोगी होतात व मानसिक उत्साह व उर्जा वाढते. आरोग्यासाठी व्यायाम हे एक स्वतंत्र शास्त्र असून वेगळ्या लेखात

आपण ते शिकणारच आहोत. तोपर्यंत डॉ. दीक्षितांची ही दीक्षा घ्यायला हरकत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भविष्याला आव्हान म्हणून स्वीकारा

$
0
0

बॉडीबिल्डर फिल हिथ यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भविष्याकडे खिलाडूवृत्तीने पाहिल्यास यश तुमचेच आहे, असे प्रतिपादन सलग चार वेळा मिस्टर ऑलंम्पिया ठरलेला अमेरिकेचा बॉडीबिल्डर फिल हीथ याने केले. शुक्रवारी रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते.

युवकांना मार्गदर्शन करताना फिल म्हणाले की, प्रत्येकाने आव्हान स्वीकारले तर यश नक्कीच मिळते. कार्यक्रमाच्या सुरुवातील फिल यांचा फेटा बांधून स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी युवकांना व्यायाम व आहारविषयी टिप्स दिल्या. ते म्हणाले की व्यायाम करताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सिक्स पॅक बनवताना शरीराच्या इतर अवयवांची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, शरीरात नको असलेली चरबी घालवण्यासाठी आहाराचे देखील नियोजन करणे गरजेचे आहे. खांदे मजबूत करताना तुमची मान व्यवस्थित असायला हवी. त्याला पाहण्यासाठी युवकांनी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भगवद् गीतेतील फेरफारवर बंदी आणा’

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

भक्तिवेदांत बुक ट्रस्ट, हरे कृष्ण लॅन्ड यांनी प्रकाशित केलेल्या भगवद् गीता अॅज इट इज आणि भगवद् गीता जशी आहे तशी या प्रकाशित पुस्तकांमध्ये लेखक आणि अनुवादक भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांनी फेरफार केल्याचा आरोप ताम्रपटकार जमिलभाई मोहंमद हनिफ रंगरेज यांनी केला आहे. या प्रकाशनावर बंदी आणावी, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

रंगरेज यांनी ताम्रपटावर भगवत गीता कोरण्याचा विक्रम केला आहे. हे करताना त्यांनी अनेक प्रकाशनांच्या भगवद् गीतांचे काळजीपूर्वक वाचन केले आहे. त्यामध्ये काही किरकोळ स्वरुपाच्या चुका पहावयास मिळाल्या. मात्र भक्तिवेदांत बुक ट्रस्ट, हरे कृष्ण लॅन्ड यांनी प्रकाशित केलेल्या भगवद् गीता अज इट इज आणि भगवत गीता जशी आहे तशी ह्या प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. त्यातील श्लोकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. श्लोक लहान मोठे केले आहेत. तसेच ते वाढविले आहेत. अशा प्रकारे श्लोकांमध्ये बदल करण्याचा त्यांना अधिकार काय अशी विचारणा रंगरेज यांनी केली आहे.

पहिल्या अध्यायातील अठरावा आणि एकोणीसावा श्लोक, तसेच २० ते ४६ हे श्लोकांमध्ये बदल केले आहेत. दुसऱ्या अध्यायातील २९ वा श्लोक, दहाव्या अध्यायातील १४ वा श्लोक, १३ व्या अध्यायातील पहिला श्लोक आणि १८ व्या अध्यायातील ५९ व्या श्लोकात अक्षम्य चूका केल्याचा दावा रंगरेज यांनी केला आहे. यामुळे पुढील पिढीपर्यंत चुकीचे ज्ञान पोहोचू शकते. म्हणूनच त्यावर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन महिन्यात १०० दुचाकी लंपास

$
0
0

अवघी आठ वाहने मिळाली परत

म टा. प्रतिनिधी, ना​शिक

मागील तीन महिन्यात चोरट्यांनी शहर परिसरातून १०० दुचाकी आणि २१ चारचाकी वाहनांची चोरी केली. सरासरी दिवसाकाठी एक ते दोन वाहने चोरीस जात असताना तपासाचा टक्का मात्र वाढलेला दिसत नाही. नुकतेच शहर पोलिसांनी दोघा संशयितांना अटक करून त्यांच्याकडून आठ दुचाकी जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची मंगेश गणेश राठोड (वय २४) आणि फरहान सय्यद (वय २५) अशी नावे आहेत. राठोड जयभवानी रोडला, तर सय्यद गोसावी वाडी परिसरात राहतो. क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर युनिट दोन आणि तीनमधील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून आठ दुचाकी जप्त केल्या. मात्र, चोरीला जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत जप्त झालेल्या वाहनांची संख्या कमी आहे. याबाबत माहिती देताना क्राइम ब्रँच युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी सांगितले की, वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये नवनवीन गुन्हेगारांची भर पडत आहे. नुकत्याच अटक केलेल्या राठोड आणि सानप यांच्या विरोधात यापूर्वी एकाही गुन्ह्याची नोंद सापडली नाही. तसेच, आठवड्याभरानंतर त्यांना लागलीच जामीन मिळाला. एखाद्या टोळीला अटक केल्यानंतर मोठ्या स्वरूपात वाहनांचोरीचे गुन्हे उघडकीस येतात, असे सानप यांनी शेवटी स्पष्ट केले.

२१ चारचाकी वाहने चोरीस

मागील तीन महिन्यांच्या कालावधीत चोरट्यांनी शहरातील १०० दुचाकींसह २१ चारचाकी वाहनांवर हात साफ केला. यात सहा कार, सात ट्रक, तीन रिक्षा व पाच मल्टी युटिलीटी वाहनांचा समावेश आहे. वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे वाहनचोरी तपासाचा टक्का मात्र २० ते २५ टक्क्यापर्यंतच राहिला आहे. मागील चार वर्षात शहरातून २ हजार ८६८ वाहने चोरीला गेली असून, त्यापैकी फक्त ६०२ वाहने परत मिळवणे पोलिसांना शक्य झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्नावर प्रस्ताव मांडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र-गुजरात पाण्यासंबंधी विधानपरिषदेत प्रस्ताव चर्चेला ठेवून महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्राला राहील असा ठराव आणावा, असे निर्देश विधानपरिषद सभापतींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले.

आमदार जाधव यांनी गुजरातला पाणी देण्याच्या विषयावर लक्षवेधी प्रश्न मांडला होता. त्यावर चर्चा करतांना सभापतींनी हे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या हद्दीतील एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ दिले जाणार नाही. त्यासाठी दमणगंगा खोऱ्यातील पाणी भुगड, खार्गीहील हे दोन धरणे बांधून ते बोगाद्याद्वारे जोडून पिंजाळ धरणात आणले जाईल. त्यातून २० टीएमसी पाणी मुंबईला तर, १० टीएमसी पाणी वैतरणा धरणात व तेथून गोदावरी खोऱ्यात आणण्यात येईल. त्याचबरोबर नार-पार प्रकल्पातील उपलब्ध २९ टीएमसी समुद्राला वाहून जाणारे पाणी ७०० मीटरपेक्षा अधिक उंचीवरून उचलून आणणे व्यवहार्य नसल्याने ते पाणी सरदार सरोवरात टाकले जाईल. सह्याद्री रांगांमधील ११ टीएमसी पाणी गिरणा खोऱ्यात टाकावे आणि या राष्ट्रीय प्रकल्पाचा खर्च केंद्र शासनाने करावा असा राज्य शासनाचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर उर्वरित १६.५० टीएमसी पाण्याचा फरक काक्रापारातून महाराष्ट्राला द्यावा, असा महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव आहे.

तसेच दमणगंगा तसेच नार-पार खोऱ्यातील पाणी वापराबाबत अद्याप कोणताच करार झालेला नाही असे उत्तरात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑडिटपासूनही विद्यापीठ ‘मुक्त’च!

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

ज्ञानगंगा घरोघरी पोहचविण्याचे व्रत घेतलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे गेल्या चार वर्षांपासून ऑडिटच झाले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षात विद्यापीठात 'मुक्त' कारभार झाल्याची साशंकता व्यक्त केली जात असून, हे ऑडिट का झाले नाही, याची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

राज्यभर विस्तार असलेल्या मुक्त विद्यापीठाचा कारभारही 'मुक्त'पणे चालत असल्याचे विविध प्रकरणांद्वारे वारंवार उघडकीस येते. राज्यपालांच्या नियंत्रणाखाली आणि कुलगुरुंच्या मार्गदर्शनाद्वारे विद्यापीठाचा कारभार चालतो. मात्र, गेल्या चार वर्षात विद्यापीठाचा कारभार रामभरोसेच होता की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, विद्यापीठाच्या कामकाजाचे ऑडिटच गेल्या चार वर्षात झाले नसल्याची बाब उजेडात आली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची धुरा डॉ. आर. कृष्णकुमार यांनी २०१० ते २०१४ या काळात सांभाळली. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरुन त्यांना विद्यापीठाचा कारभार पाहताना मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर जानेवारी २०१४मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. नवीन कुलगुरु निवडीची प्रक्रिया राबविण्यात येऊन ऑगस्ट २०१४मध्ये डॉ. माणिकराव साळुंखे यांच्याकडे विद्यापीठाची जबाबदारी देण्यात आली. विद्यापीठाचे विविध कामकाज पारदर्शकपणे सुरु रहावे, यासाठी ऑडिट दरवर्षी होणे गरजेचे आहे. मात्र, हे ऑडिटच गेल्या चार वर्षात झाले नसल्याची बाब डॉ. साळुंखे यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळेच त्यांनी तातडीने ऑडिट करण्याचा निर्णय घेतला असून, एका एजन्सीचीही त्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. आता या ऑडिटद्वारेच विद्यापीठाच्या गत चार वर्षांमधील कामकाजही उघडकीस येणार आहे. दरम्यान, हे ऑडिट करण्यासंदर्भात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी उत्सुकता दाखविली नाही की, ते होऊच नये यासाठी प्रयत्न केले, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

विद्यापीठाच्या कामकाजाचे ऑडिट करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून ऑडिटची प्रक्रिया सुरु आहे.

-डॉ. माणिकराव साळुंखे, कुलगुरु

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय आपत्ती योजनेत गारपीट

$
0
0

केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची घोषणा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अवकाळी आणि गारपीटीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी उद्धवस्त झाल्यानंतर मदतीबाबत शासनाकडून दाखवली गेलेल्या उदासीनतेच्या पार्श्र्वभूमीवर राज्यभर शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. परिणामी, राज्य व केंद्राच्या वतीने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती मदत निधी योजनेत अवकाळी व गारप‌िटीचा समावेश केला जाणार आहे. तर राष्ट्रीय पीक विमा योजनांचे निकष बदलतानांच तात्काळ मदत म्हणून हेक्टरी २५ हजार रूपयांची मदतीची घोषणा केंद्रीय कृष‌िमंत्री राधामोहन सिंग यांनी शनिवारी केली. ही मदत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्याला दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारप‌िटीने नुकसान झालेल्या शेती आणि फळबागांची पाहणी सिंग यांनी शनिवारी केली. जिल्ह्यातील सारोळे खुर्द, वनसगाव, उगाव व शिवडी या गावाना भेटी देऊन त्यांनी द्राक्ष, कांदा व फळबागांची पाहणी केली. यावेळी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. सिंग यांनी शेतांमध्ये जाऊन उद्धवस्त द्राक्षबागांची पाहणी करत, थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी यावेळी संपूर्ण कर्जमाफीसह राष्ट्रीय फळबाग योजनेतून मदतीची मागणी केली.

सिंग म्हणाले,'राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून सध्या केवळ १२ हजार हेक्टरीच मदत दिली जाते. ही मदतही केवळ दुष्काळ, ओल्या दुष्काळासह पूर परिस्थितीतच करता येते. त्यामुळे केंद्र सरकारने या योजनेचे निकष बदलण्याचा निर्णय घेतला असून याबाबत एप्र‌िलमध्ये अहवाल मिळाल्यानंतर त्यात अतिवृष्टी गारप‌िटीचाही समावेश करण्याचा केंद्रसरकारचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगली आर्थिक मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय फळबाग योजनेतून फळबागांच्या उभारणीसाठी मदत केली जाणार असून प्रतिहेक्टरी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत व एप्रिलपासून राष्ट्रीय पीक विमा योजना लागू करण्याची घोषणा केली. येत्या तीन वर्षात देशातील १४ कोटी शेतकऱ्यांच्या जम‌िनीचा पोत तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खापर काँग्रेसवर; मोदी, फडणवीसांची स्तुती

शेतकऱ्यांशी संवाद साधतांना सध्याच्या योजना आणि मदतीसंदर्भातील खापर सिंग यांनी गत काँग्रेस सरकार फोडले. गेल्या सरकारने ६७ वर्षात शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंच‌ित राह‌िला आहे. मात्र मोदींना व्हिजन असून शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबविल्या जातील, असे त्यांनी यावेळी सांगीतले. तर आपल्या दौयात सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्य सरकारसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली. मोदी यांनी गुजरातचा कृषी विकास दर दहा टक्क्यांवर नेला असून शेतकऱ्यांचा त्यांना क‍ळवळा आहे. तर अवकाळी पाऊसात मदत देण्यात राज्यसकार आघाडीवर असून शेतीचे पंचनामेही समाधानकारक आहेत. फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री असून शेतकऱ्याचा विकास करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारप‌ीटग्रस्तांना आर्थिक पॅकेज

$
0
0

खडसेंची घोषणा;

कर्जाचे पुनर्गठन होणार तसेच शैक्षणिक,

वीज बिलात सवलती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारप‌ीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी विधानसभा अधिवेशन संपण्यापूर्वीच आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याचे आश्वासन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी नाशिक दौऱ्यात दिले आहे. सोबतच वीज बिलात सवलत, शैक्षणिक शुल्क माफी आणि कर्जाचे पुनर्गठन आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर डिसेंबरपर्यंत झालेल्या नुकसानीची मदतीचे वाटप सोमवारपासून सुरू होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

फेब्रुवारी आणि मार्चमध्ये नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारप‌िटीने नुकसान झालेल्या शेती आणि फळबागांची केंद्रीय कृष‌िमंत्री राधामोहन सिंग यांनी शनिवारी पाहणी केली. यावेळी एकनाथ खडसे आणि पालकमंत्री गिरीश महाजन हेही उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना खडसे यांनी सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत आल्याचे सांगून दिल्लीची मदत न मिळूनही राज्यसरकारने डिसेंबरपर्यंत झालेल्या नुकसानीच्या मदत वाटपाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या नुकसानग्रस्तांनाही प्रतिहेक्टर २५ हजाराची मदत दिली जाणार आहे. सोबतच वीज बिलात सवलत, शैक्षणिक शुल्क माफी, कर्जाचे पुनर्गठन केले जाणार असून, मदतीसाठी आर्थिक पॅकजची घोषणा विधानसभा अधिवेशन संपण्यापूर्वीच केली जाईल, अशी घोषणाही खडसे यांनी केली. केंद्राकडून राज्याला चारपट मदत पुढील आठवडयात मिळणार असून त्यांचेही वितरण होणार असल्याचे त्यांनी सांग‌ितले.

कर्जमाफीची घोषणा?

शेतकऱ्यांनी खडसेकडे संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. मीही शेतकऱ्यांचा मुलगा आहे. तुमच्या मनात जे आहे तेच माझ्याही मनात आहे. मात्र आता अधिवेशन सुरू असल्याने कर्जमाफीची घोषणा करता येणार नाही असे सांगत तिजोरीचा विचार करून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

पालकमंत्र्यांची दिलग‌िरी

पालकमंत्र्यांनी संतप्त शेतकऱ्यांमुळे निफाडचा दौरा रद्द केला होता. याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांसमोर दिलगीरी व्यक्त केली. वातावरण तप्त असल्याने प्रशासनाने निफाडमध्ये जाण्यास मज्जाव केला होता. मात्र मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुमचे दुःख समजतो, असे त्यांनी सांगितले.

'गारप‌िटग्रस्तांना मदत मिळणार नसल्याचे आपण बोललोच नव्हतो', असे सांगत माध्यमे आपली वक्तव्ये अर्धवट दाखवात असा खुलासा खडसेंनी यावेळी शेतकऱ्यांसमोर केला. 'एकदा मदत दिल्यावर दुसऱ्यांदा देत नाही; मात्र राज्य सरकार आपल्या तिजोरीतून मदत करेल' असे आपण बोललो होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नासर्डी नदीवर पूल मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

औरंगाबाद नाका ते विजयममता थिएटर दरम्यान असलेल्या तपोवन लिंक रोडवर नासर्डी नदीवर नऊ मीटरचा पूल सिंहस्थ निधीतून मंजूर झाला आहे.

शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नगरसेविका अर्चना चंद्रकात थोरात यांच्या हस्ते पुलाचा कामाचा शुभारंभ करण्यात आला. या पुलामुळे तपोवन लिंक रोडची वाहतूक अधिक सुरळीत होणार असून, द्वारका चौकातील वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे. नासर्डी नदीवर यापूर्वी नऊ मीटरचा पूल होता. मात्र, त्यामुळे वाहतूक सुरळीत होत नव्हती. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी होणार असल्याने या पुलाची मागणी थोरात यांनी केली होती.

त्याला मंजुरी मिळून पुलाच्या कामाचा शुभांरभ करण्यात आला. या पुलासाठी अर्चना थोरात यांनी विशेष प्रयत्न करून हा पूल मंजूर करून घेतला. यावेळी चंद्रकात थोरात, योगेश कानडे, जय माळी, स्वामी शर्मा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या १७ वाहनांचे रजिस्ट्रेशन

$
0
0

बाजारपेठ गजबजली; आरटीओत शांतता

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

गुढीपाडव्याचा मुहूर्त साधणाऱ्या वाहन बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. मात्र, सुट्टी असूनही वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी सुरू ठेवण्यात आलेल्या प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) विपरीत चित्र दिसून आले. दिवसभरात आरटीओकडे फक्त १७ वाहनांची नोंदणी करण्यात आली.

आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी फक्त चार वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले. यातून ७ लाख १० हजार रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुदाम सूर्यवंशी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केला की, आरटीओ कार्यालय दिवसभर सुरू होते. मात्र, वाहनांचे अपेक्षित रजिस्ट्रेशन झाले नाही. सोमवारनंतर वाहनांच्या रजिस्ट्रेशनचे काम वेग पकडेल. सलग सुट्ट्या असल्याने अनेक वाहनमालक देवदर्शनाला जाण्यास पसंती देतात. त्यामुळे सोमवारपासून वाहनांचे रजिस्ट्रेशन होऊ शकते, असे अन्य एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. गुढीपाडव्यासारख्या मुहूर्ताच्या दिवशी नागरिक वाहन बूक करणे, बूक केलेले वाहन घरी नेणे किंवा वाहनाचे र​​जिस्ट्रेशन करणे अशा बाबींना महत्त्व देतात. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी रजिस्ट्रेशनचे काम खोंळबू नये म्हणून कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुढील आठवड्यात वाहनांच्या नोंदणीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार धावले मदतीला

$
0
0

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी ऐकल्या ‍सारोळे खुर्द ग्रामस्थांच्या व्यथा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गारपिटीने सर्वाधिक नुकसान होऊनही शासकीय पातळीवर दुर्लक्षित झालेल्या आणि असहकार आंदोलन पुकारलेल्या सारोळे खुर्द ग्रामस्थांची केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्यासह राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. ग्रामस्थांच्या घर ते बांधापर्यंत जाऊन त्यांची विचारपूस करीत मंत्र्यांनी त्यांच्याशी एक तास चर्चा करीत त्यांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेतल्या. तसेच, शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देत असहकार मागे घेण्याची विनंती केली.

निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द गावात गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीने ७०० हेक्टरवरील द्राक्षबाग आणि १३७ घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. तरीही शासनाने त्याची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी एकमताने शासनाशी असहकार करण्याचा ठराव केला होता. ग्रामस्थांच्या या व्यथा आणि कैफियत 'मटा'ने राज्यभर मांडली होती. 'मटा'च्या वृत्तीची गंभीर दखल घेत थेट केंद्रीय पथकाने दुसऱ्याच दिवशी गावात जावून शेतकऱ्याची भेट घेतली. त्यानंतर शनिवारी सिंग यांच्यासह राज्याच्या मंत्र्यांनी सर्वप्रथम गावात जाऊन शेतीची पाहणी केली. सिंग यांनी उद्ध्वस्त द्राक्षबागांची पाहणी केली. शेतकरी तोडत असलेल्या द्राक्षबागा बघून सिंग यांचेही मन हेलावले. परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगत जास्तीत जास्त मदतीचे आश्वासन त्यांनी दिली. सिंग यांच्यासह खडसे, महाजन यांनी आपल्या धावत्या दौऱ्यात शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. यावेळी संरपंच कैलास भोसले यांनी गाव दत्तक घेण्यासह संपूर्ण कर्जमाफी आणि रेशनचा पुरवठा दुप्पट करण्याची मागणी केली. सोबतच किराण्यालाही पैसे नाहीत त्यामुळे वीज बिलही माफ करण्यात यावेत अशी व्यथा मांडली. त्यावर सिंग यांनी संरपचाची स्तुती करीत राष्ट्रीय फळबाग मिशन अतंर्गत द्राक्षबागा उभ्या करण्यासाठी फळबाग बोर्डाला आदेशित केले. यावेळी खडसे यांच्यासह महाजन यांनीही ग्रामस्थांना समजावत आपण गेल्या वेळेस येवू शकलो नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

'महाराष्ट्र टाइम्स'मुळेच आमची दखल

मटाने आमची कैफीयत राज्यभर पोहचवली. त्यानंतरच सरकारी यंत्रणा खबळून जाग झाली आणि आमच्या दारावर येवून आमची चौकशी केली. अधिकाऱ्यांसह मंत्र्यांनी आमची विचारपूस करीत आम्हाला आधार दिला.

शेतकऱ्यांना भेटू दिला नसल्याचा आरोप

केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांना भेटण्यासाठी आलेल्या निफाड तालुक्यातिक काही शेतकऱ्यांना पोलिसांनी बाळाच्या जोरावर भेटण्यास मज्जाव केला. त्यांना कर्जमाफी आणि वीज बिल माफीच निवेदन देण्यासठी निफाड तालुक्यातील कारसूळ गावातील शेतकरी एकत्र जमले होते. सरकारी मदत पोहचत नसल्याच्या निषेधार्थ या शेतकऱ्यांच गेल्याचार दिवसापासून उपोषण चालू आहे. तीच कैफियत हे शेतकरी कृषीमंत्र्यासमोर मांडणार होते. मात्र मंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा ठरू नये यासठी पोलिसानी तगडा बंदोबस्त तैनात करून शेतकऱ्यांना मंत्र्यांच्या भेटीपासून रोखले.

मटाने आमची कैफीयत मांडताच दुसऱ्याच दिवशी केंद्राचे पथक गावात येऊन आमची चौकशी करून गेले. त्यानंतर थेट केंद्रीय आणि राज्याचे मंत्री येऊन त्यांनी मदतीचे आश्वासन दिले.

- कैलास भोसले, सरपंच, सारोळे खुर्द

सातपूरला दुमदुमला भवानी मातेचा गजर

$
0
0

बारागाड्या ओढण्याची यात्रा उत्साहात

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

'भवानी माते की जय, संतोषी माते की जय, जगदंबा माते की जय' असा जल्लोष करत मराठी नूतन वर्षांनिमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी सातपूरला होणारी बारागाड्यांची यात्रा उत्साहात झाली. पाडव्याचा सण शनिवारी आल्याने यात्रेला कामगारांना सुट्टी असल्याने प्रचंड गर्दी झाली. यात गर्दीवर नियंत्रण ठेवतांना पोलिसांची मात्र दमछाक झाली. मोठ्या उत्साहात गणेशाने बारागाड्या ओढून शांततेच यात्रा पार पडली.

सातपूर गावातील ग्रामस्थांच्या पुढाकाराने सन १९८९ पासून गढीपाडव्याच्या दिवशी बारागाडा यात्रा होते. या यात्रेत पंचक्रोशीतील गावकरी मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. यंदा बारागाड्या ओढण्याचा मान अविनाश सुरेश निगळ यांना मिळाला होता. यात्रेनिमित्त सातपूर परिसरात उत्साहाचे वातावरण होते. सातपूर गावातून सायंकाळी चार वाजेनंतर बारागाड्या ओढणाऱ्या गणेशाची संवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी गणेशाचे स्वागत केले. यानंतर त्र्यंबकेश्वर रस्त्यावर लावण्यात आलेल्या बारागाड्यांना नमन करत गणेशाने एमआयडीसीतील सप्तश्रृंगी व संतोषी मातेचे दर्शन घेतले. बारागाड्यांची पूजा करत गणेशाने बारागाड्या ओढल्या. याप्रसंगी आमदार सीमा हिरे, महापौर अशोक मुर्तडक, नगरसेवक प्रकाश लोंढे, सचिन भोर, सलिम शेख, नगरसेविका उषा शेळके, धीरज शेळके, सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक व्ही. एन. मेढे, हेमंत सावंत, सातपूर ग्राम विकास मंडळाचे दादा निगळ, शांताराम निगळ, गणेश निगळ यात्रा उत्सव समितीचे तुकाराम मोराडे, राजाराम निगळ, सुनील मौले, नीलेश भंदुरे, सचिन पगारे यांसह पंचक्रोशितील ग्रामस्थ, कामगार कुटुंबासह मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले.

यात्रेच्या दरम्यान सुमारे एक लाखपेक्षा अधिक भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांना आटोक्यात आणण्यासाठी तुलनेने पोलिस अतिशय कमी संख्येने उपलब्ध होते. त्यामुळे पोलिसांनी पुरती दमछाक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निष्क्रिय पोलिस; बेशिस्त नाशिककर

$
0
0

>>दिलीप देशमुख

कडू कारलं व लोहचुंबक यांच्या कितीही खांडोळ्या केल्या तरी ते आपले गुणधर्म सोडत नाहीत हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. तद्वतच हेच गुणधर्म नाशिक पोलिस व नाशिककर यांच्यात ठासून भरते आहेत. पोलिसांचे लक्ष्याकडे लक्ष व मोबाईल नाशिककरांचे सिग्नलकडे दुर्लक्ष असा एक मानसिक रोग सध्या नाशिकमध्ये स्वाइन फ्लूसोबत स्पर्धा करीत आहे. स्वतःबरोबर दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करणाऱ्यांना Reckless बेजबाबदार आणि अशा वागण्याला Kamikaze Behavior म्हणतात. म्हणजे स्वेच्छेने मोबाईलवर बोलत कोणाला तरी बाईकची धडक देऊन स्वतःचाही मृत्यू ओढवून घ्यायचा. पोलिस सवयीने आपली कार्यपद्धती बदलतात. स्वतः मोबाईलवर बराच वेळ बोलत राहून सिग्नलजवळच्या चहाच्या टपरीवर २-३ च्या टोळीने एकाच ठिकाणी उभे असतात. वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहिल्यास कोणाच्या हाती काय लागले हे कळत नाही त्यामुळे हिशेब चुकतो म्हणून ही तडजोड.

एका ज्येष्ठ नागरिकासोबत ट्रॅफिक अधिकारी यांची भेट घेऊन ज्येष्ठांना काही अधिकार देण्यासंबधी चर्चा केली. ३ मिनीटात चर्चा संपली. कारण साहेबांना विषयाचे गांभीर्य लक्षात नाही आले. ते पूर्णवेळ कॉम्प्युटरमध्ये होते. सर्वसामान्य नागरिकांकडे पाहण्याचा त्यांचा हा दृष्टीकोन सर्वश्रृतच आहे. कार्यालयीन शिस्तीचा अभाव (सॉफ्ट स्किलचे अज्ञान) आम्हाला जाणवला. त्यांच्याकडून अत्यंत कोरडा प्रतिसाद मिळाला. वर्तमानपत्रात वारंवार छापून आलेल्या बातम्या व फोटो याच्या प्रती त्यांना दिल्या. परंतु, आमची अशी खात्री आहे की आमची पाठ फिरताच त्या प्रती केराच्या टोपलीत गेल्या असणार.

थुंकणे उच्चभ्रूंपासून सर्वांनी प्रचंड प्रमाणात अंगिकारलेला एक घृणास्पद प्रकार व स्वाइन फ्लूचा एक स्त्रोत. मुद्दे बरेच आहेत पण लक्षात कोण घेणार हा मिलियन डॉलर प्रश्न उरतोच. नाशिककरांनी नुकताच बेशिस्तीचा व बेजबाबदारपणाचा नमुना दाखलाच. अस वाचनात आलं की 'जनस्थान पुरस्कार' सोहळ्यात मान्यवरांची भाषणे चालू असताना मोबाईल खणखणतच होते. साहित्याचा दर्जा असलेल्या अशा कार्यक्रमात सुशिक्षित, सुसंस्कृत व संस्कारक्षम मंडळीच हजेरी लावतात पण कोणाला कोण काय बोलणार? सर्वच अहंकाराने फुरलेलेले. दुसरा प्रकार कुसुमाग्रज स्मारकामध्ये घडला. 'नटसम्राट'च्या निमित्ताने दिग्गज कलाकार मंडळी याठिकाणी जमली होती. एका डॉक्टरांच्या अंगात एकदम वार शिरलं व त्यांनी नाना पाटेकरांना म्हणे शाबासकी ‌दिली.

आता वाघाच्या जबड्यात हात घातल्यावर काय होणार नानांनी आपल्या भाषेत उत्तर देऊन त्यांना त्यांची जागा व दर्जा दाखवून दिला हे उत्तम झाले. बेशिस्तीचे असे वागणे लाज वाटणाऱ्या मार्गांनी प्रगट होत असते. हे पोलिस व नाशिककर यांना सारख्या प्रमाणात लागू आहे. पोलिस क‌मिशनर तळमळीने काम करीत आहेत; परंतु त्यांच्या मदतनिसांचे काय?

नुकतेच वाचनात आले की नाशिक शहरात ५ सिग्नलस प्रस्तुत आहेत. बेशिस्त नाशिककरांना या सिग्नलचा काय उपयोग? त्यामुळे खरेदी, दुरुस्ती, देखभाल व बिल यासाठीचा खर्च कशासाठी? पोलिसांनाही आता वेगळ्या अर्थाने निष्क्रिय राहून चालणार नाही. गैरप्रकारात महसूल खाते आपला पहिला नंबर सोडावयास तयार नाही अस वाचनात आलं व पाठोपाठ बाहुबलींची पिलावळ बळ मिळाल्यामुळे शिक्षणसम्राट शिष्यवृत्तीचे पाठबळ मिळाल्यामुळे पहिल्या नंबरच्या शर्यतीत मुसंडी मारण्यासाठी सक्रीय झाले आहेत. असो. नाशिक महापालिकेने त्यांच्या एका उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांना 'समाजसेवा' म्हणून समाविष्ट करून घेतले आहे. ठाण्याहूनही अशीच बातमी वाचनात आली आहे तेव्हा ट्रॅफिकबाबत पोलिस खात काय करणार आहे?

(लेखक माजी सैनिक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live

Latest Images