Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पेपरफुटीवर मनसे आक्रमक

$
0
0

शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बारावीच्या अकाऊंट पेपर फुटीप्रकरणी आणि शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या कार्यालयात घोषणाबाजी करीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिक्षण विभागातील गोंधळाला शिक्षणमंत्री जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. अनेक ठिकाणी पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याच मतदारसघांत बारावी अकाऊंटचा पेपर फुटला. व्हॉट्सअपवर थेट प्रश्नपत्रिका फिरल्या. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांच्याच जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित नसल्याने मनसे शिक्षण मंत्र्यांविरोधात रस्त्यावर उतरली आहे. नाशिकमध्ये मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या १२ वीच्या परीक्षांचा सध्या राज्यात बोजवारा उडाला आहे. पेपर फुटल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर झालेच, मात्र पालकांनादेखील मनस्ताप सहन करावा लागला. शिक्षण विभागाच्या या अनागोंदी कारभाराला शिक्षणमंत्री जबाबदार असल्याच आरोप करीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाच्या कार्यालयात गोंधळ घातला.

राष्ट्रवादीतर्फे व्यसनमुक्ती अभियान

जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. १६) सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारक, नाशिक येथे व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाप्रमुख प्रेरणा बलकवडे यांनी दिली. गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व अन्य व्यसनांमुळे अनेक कुटुंबे उध्दवस्त झाली. यापुढे तरुण पिढी व्यसनाधिन होऊ नये म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी मोठे अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा भाग म्हणून सोमवारी दि. १६ मार्च रोजी हुतात्मा स्मारक, नाशिक येथे व्यसनमुक्ती कार्यक्रम करण्यात येत असून, यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रेरणा बलकवडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकमंत्र्यांचे पुतळा प्रेम!

$
0
0

नुकसान पाहणी दौरा ऐनवेळी रद्द; जळगावमध्ये कार्यक्रमाला हजेरी, शेतकरी संतप्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील केले असतांनाच शेतकऱ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी असणारे पालकमंत्री गिरीश महाजन यांना मात्र शेतकऱ्यांचे सोयरसुतक उरले नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अवकाळीचे थैमान सुरू असताना पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांंमध्ये अगोदरच सतांपाची लाट आहे. शेतकऱ्यांच्या संतापात महाजन यांनी शनिवारी आणखी भर टाकली. शनिवारचा नियोजित पाहणी दौरा रद्द करून जळगावमध्ये दिवंगत प्रल्हादराव पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले.

पंधरा दिवसांपासून होत असलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांंचे प्रंचड नुकसान झाले असताना शासकीय पातळीवरून त्यांच्या सात्वंनासह त्यांना धीर देण्याची आवश्यकता आहे. मात्र, शासकीय पातळीवर कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरू आहे, तर ज्यांच्यावर शेतकऱ्यांना संकटात धीर देण्याची जबाबदारी आहे, त्या शासनकर्त्यांची वर्तणुक निरोसारखी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वाऱ्यावर सोडला गेला आहे. रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत असल्याच्या घटनेचा प्रत्यय सत्ताधाऱ्यांकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत आहे. जिल्ह्यात चार वेळा गारपीट होवूनही महाजन शेतकऱ्यांकडे फिरकलेले नाहीत.

पालकमंत्र्यांच्या या दुर्लक्षावर टीका होताच, महाजन यांनी शुक्रवारी नाशिकच्या सिंहस्थ कामांच्या पाहणीसाठी शेतीच्या नुकसान पाहणीचा दौरा निश्चित केला. शासकीय यंत्रणेकडून त्यांच्या दौऱ्याची तयारीही पूर्ण करण्यात आली. शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या. मात्र, ऐनवेळी रात्री त्यांचा दौरा रद्द झाल्याचा निरोप प्रशासनाला मिळाला. पालकमंत्र्यांना दौरा रद्द करण्याचे कारण अधिकारी देऊ शकले नाहीत. काही तरी मोठे कारण असेल असे संगळ्यानाच वाटले. मात्र, पालकमंत्री महोदयांनी नाशिकचा दौरा रद्द करून जळगावमध्ये स्व. प्रल्हादराव पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला हजेरी लावणे पसंद केले. नाशिकचा शेतकरी अस्मानी संकटाने रडत असतांना, महाजन मात्र पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात हास्यविनोदात रंगले होते.

पदाधिकाऱ्यांच्या दबावानतंर आली जाग

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आणि व्यथांकडे पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यावर टीका होत असल्याची बाब स्थानिक पदाधिकाऱ्यांंनी गंभीरतेने घेत, पालकमंत्र्यांना तातडीने येण्याचे निरोप धाडले. पदाधिकाऱ्यांंच्या दबावानंतर पालकमंत्र्यांना पाझर फुटला असून, शनिवारी रात्रीपर्यंत ते नाशिकला पोहचत असल्याचे सांगण्यात आले. रविवारी ते जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील, असा दावाही करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजा घायकुतीला !

$
0
0

जिल्ह्यात गारप‌िटीचा धिंगाणा सुरूच; १० हजार शेतकऱ्यांचे नुकसान

म. टा. प्रतिनिधी, ना‌शिक

नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घालत शेतपिके मातीमोल केली आहेत. शुक्रवारी व शनिवारी झालेल्या गारपिटीमुळे कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष, डाळिंब ही पिके जमीनदोस्त झाली असून, शेतात गारांचा खच पडला होता. लिंबूच्या आकाराच्या गारांनी होत्याचे नव्हते केले असून, शुक्रवारच्या पावसाने एकट्या सिन्नर तालुक्यात ८ हजार २५० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अजूनही पेठ, बागलाण, मालेगाव, येवला, नांदगाव, देवळा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील नुकसानाचा प्राथमिक अंदाज अद्याप मिळाला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. तर शनिवारच्या पावसाने हजारो हेक्टरवरील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर निफाडमधील एका शेतकऱ्याचा गारप‌िटीमुळे बळी गेला आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरूच असून शुक्रवारी (दि. १३) त्यामुळे १४४ गावांमधील सुमारे दहा हजार शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. सर्वाधिक फटका सिन्नर तालुक्यात २३ गावांमधील २७५० हेक्टरवरील पिकांना बसला आहे. त्यातच शनिवारी (दि. १४) मध्यरात्रीपासून पावसाने धुडगूस घातल्याने शेतकरी गलितगात्र झाला आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री आणि दिवसभरात झालेल्या गारपीटीने सिन्नर आणि निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली आहे. सिन्नर, येवला व चांदवड तालुक्यालाही गारपिटीचा सामना करावा लागला. द्राक्ष, डाळिंब बागांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. मालेगाव, कळवण, सटाणा या भागात शनिवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. नाशिक शहरातही शनिवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

पावसाने जिल्ह्यातील एकाही तालुक्याला सोडलेले नाही. सर्वच १५ तालुक्यांमध्ये पावसाने अक्षरश: कहर केला आहे. पंचनामे करायला जावे तर त्यावेळीही पाऊस थैमान घालत असल्याने हे पंचनामे करण्यातही अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतपिकांच्या पंचनाम्यांचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. तालुका आणि गाव पातळीवरील यंत्रणा कामाला लावूनही पंचनामे आटोपण्याच्या कामाला गती मिळत नसल्याचे दिसते. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी झालेल्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान सिन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांना सहन करावे लागले आहे. सुमारे साडे आठ हजार शेतकऱ्यांचे द्राक्ष, डाळींब, टरबुज, कांदा, गहू, मका, हर रा या पिकांचे नुकसान झाले आहे.

शेतमजुराचा मृत्यू

निफाड तालुक्यातील शेतमजूर लक्ष्मण जनक कांबळे (वय ५५, रा. रानवड) यांचा मृत्यू घराचे शेड अंगावर पडल्यामुळे झाला. तुफान गारप‌िटीमुळे जिल्ह्यात घरांच्या पडझडीने अनेक प्रकार झाल्याचा अंदाज आहे. तर विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पाच बैल आणि एका गायीचा मृत्यू झाला. ही संख्या वाढू शकते असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. इगतपुरी येथे मुसळधार पावसादरम्यान वीज अंगावर पडून एका गायीचा मृत्यू झाला. याखेरीज दिंडोरी, निफाड, मालेगाव, चांदवड आणि ना‌शिक तालुक्यात वीज पडून ५ बैल दगावल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबीटी महाविद्यालयात आजपासून ‘क्षितीज २०१५’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मविप्रच्या केबीटी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने सोमवारपासून (दि. १६) एमव्हीपी क्षितीज २०१५'चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत कॉलेजमध्ये नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.

या कार्यक्रमांअंतर्गत प्रोमॅनोफिस्टो प्रोजेक्ट कॉम्पीटीशन, पेपर अझी पेपर प्रेझेंटेशन कॉम्पीटीशन, कोडस्प्रिंट सी, सी प्लस प्लस प्रोग्रामिंग काँटेस्ट, लॅनस्लॅम, गेमिंग कॉम्पीटीशन, फन फेअर, इएलसी आयडॉल, बॉक्स क्रिकेट आदी स्पर्धा होतील. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वाजता होईल. मंगळवारी (दि. १७) स्पर्धेचा समारोप होणार आहे. गतवर्षीही राज्यभरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला होता. यंदाही अपेक्षित नोंदणी होत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जयंत पत्तीवार यांनी दिली. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन संगणक विभाग प्रमुख प्रा. बी. एस. टर्ले, माहिती व तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. व्ही. एस. पवार, संयोजक प्रा. स्नेहल भामरे आणि प्रा. एस. पी. जाधव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

$
0
0

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गत पाच दिवसांत १४ जनावरे मृत्युमुखी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे तब्बल ३२४ गावांमधील शेतकरी बाधित झाले आहेत. जिल्हाभरात सुमारे साडेबावीस हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. या पाच दिवसात वीज पडून १४ जनावरांनी जीव गमावला आहे.

जिल्हाभरात १० ते १४ मार्च या पाच दिवसांमध्ये पावसाने थैमान घातले. पहिल्या दिवशी (१० मार्च) केवळ इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यांतील १७ गावांमध्ये पाऊस पडला. मात्र त्यात शेतपिकांचे नुकसान झाले नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दुसऱ्या दिवशी नाशिक, दिंडोरी, पेठ, निफाड, सिन्नर, येवला व बागलाण या तालुक्यांमधील ४४ गावांना अवकाळी पावसाने तडाखा दिला. त्यामध्ये १६९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तिसऱ्या दिवशी (दि. १२) नाशिक, दिंडोरी, पेठ, बागलाणसह कळवण तालुक्यातील २२ गावांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. त्यामध्ये केवळ ४४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १३ आणि १४ ला सबंध जिल्ह्यातच पावसाने कहर केला.

शुक्रवारी १३ मार्च रोजी सर्वाधिक १४४ गावांमध्ये तर शनिवारी (दि. १४) ला १०७ गावांमध्ये जोरदार गारपीट झाली. या दोन ‌दिवसांत अनुक्रम ३ हजार ३३८ हेक्टर आणि १७ हजार ३५० हेक्टरवरील शेतपिके पावसाने तुडविली आहेत. एकूण २२ हजार ४२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून १४ जनावरांनी जीव गमावला आहे. त्यात शुक्रवारी ६ आणि शनिवारी ५ जनावरे मृत झाले. तर ११ मार्चला तीन जनावरे दगावल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कशी सुधारेल शिक्षणाची काया

$
0
0

>> प्राचार्य डॉ. हरिष आडके

दर्जेदार शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी भारतात स्वातंत्र्यानंतर विविध आयोग नेमून प्रयोग करण्यात आले. डॉ. राधाकृष्ण कमिशन (१९४९), कोठारी आयोग (१९६४), राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (१९६८), कृती शैक्षणिक कार्यक्रम (१९८६), आचार्य राममूर्ती अहवाल (१९९०), शैक्षणिक धोरण (११९२), रेड्डी कमिटी (१९९९), नॅशनल नॉलेज कार्पोरेशन (२००५), यशपाल कमिटी (२००८) आदी त्याची उदाहरणे आहेत. शिक्षणाचा दर्जा उंचविण्याचे असे सतत प्रयोग करूनही जगातील पहिल्या दोनशे विद्यापीठात भारतातील एकही विद्यापीठ नाही, हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल.

जगातील पहिली दहा विद्यापीठे कोणती याची पाहणी केली असता अमेरिकेतील मीट विद्यापीठाने सातत्याने पहिला क्रमांक कायम राखला आहे. केम्ब्रिज, इंम्पेरियल कॉलेज लंडन, हॉवर्ड, ऑक्सफोर्ड, लंडन कॉलेज, स्टॅनफोर्ड, कॅलिफोर्निया, प्रिन्सटोन विद्यापीठाने पहिल्या दहामध्ये नामांकन मिळवले. भारतात युजीसीने प्रारंभी इंग्लंडप्रमाणे व १९९१ नंतर अमेरिकेच्या धर्तीनुसार शिक्षण पद्धती राबविणे सुरू केले. महाराष्ट्राचे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उच्च शिक्षणात चाईस बेस क्रेडीट पद्धत राबविण्याबाबत विद्यापीठांना आदेश दिले. मुंबई विद्यापीठाने २०१३-१४ पासून तशी अंमलबजावणी सुरू केली. पुणे विद्यापीठाने २०१४-१५ वर्षापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमात चाईस बेस क्रेडीट पद्धत आणली आणि २०१५-१६ पासून पदवी स्तरावर ती राबविण्याचा ठरविले आहे. युजीसी व महाराष्ट्र शासन यांच्या धोरणाप्रमाणे ही पद्धत सुरू होणार आहे.

...म्हणून अमेरिका पुढे

या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेतील शिक्षण पध्दती कशी आहे याचा आढावा घेणे गरजेचे आहे. अमेरिकेने चाईस बेसची सुरुवात माध्यमिक, पदवी, पदव्‍युत्तर स्तरावर १९९१ पासून सुरू केली. आपल्याकडे मात्र उच्च शिक्षणापासून चाईस बेस सिस्टिम सुरू झाली आहे. म्हणजे आधी कळस मग पाया असा हा प्रकार आहे. पदवीसाठी उच्च विद्या विभूषित शिक्षक व पदव्युत्तरसाठी मात्र अस्थायी शिक्षक अशी आपली शोकांतिका आहे. अमेरिकेत राष्ट्रीय उत्पन्‍नाच्या दहा टक्के खर्च शिक्षणावर केला जातो. आपल्याकडे सहा टक्के खर्च करण्याचे उद्दिष्ट पहिल्या पंचवार्षिक योजनेत ठरविले होते. मात्र, ६५ वर्षात आपण पावणे चार टक्क्यावर खर्च करू शकलेलो नाही. अमेरिकेतील शिक्षण पद्धतीचा विचार केला, तर आपल्याप्रमाणेच ३ ते ५ नर्सरी, ६ ते ११-१७ प्राथमिक, १८ ते २२ माध्यमिक व नंतर उच्चशिक्षण असा क्रम आहे. अमेरिकेत १९९१ पासून चाईस बेस क्रेडीट पद्धत सुरू असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे शिक्षण दिले जाते. ८ ते १२ या वर्गात त्याला गणित, लिखान, कौशल्ये, वाचन यांची आवड लावली जाते. गुणांऐवजी क्रेडीट देऊन ते विद्यार्थी व पालक यांना दाखविले जातात. नंतर विद्यार्थ्याला स्टुडंट अॅपट्यूट टेस्ट व अमेरिकन कॉलेज टेस्ट द्यावी लागते. ही परीक्षा तीन तास व ४५ मिनिटांची असते. ती पास झाल्यावरच त्याला महाविद्यालयात प्रवेश दिला जातो. चोवीसशे क्रेडीटपैकी किमान आठशे क्रेडीट म्हणजे आपल्याकडील शंभर पैकी ३५ गुण असतात. सर्व प्रश्न बहुपर्यायी असतात. निबंध हा अपवाद असतो. परीक्षेत विद्यार्थ्याची पात्रता, कौशल्ये, गणित, वाचन, लिखान आदी गुण बघितले जातात. त्यामुळे अमेरिकन विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होतो. शिक्षक विद्यार्थी आणि पालक संघ यांच्यात नियमित बैठका होतात. त्यात अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची आवड, सुप्त गुण कौशल्य, गुणवत्ता यावर चर्चा होते. पालकांना पाल्याची आवड, मित्रांची संगत यांची माहिती दिली जाते. पाल्याचा कल लक्षात येतो. यामुळेच अमेरिकन शिक्षण दर्जेदार आहे.

भारतात नेमके चुकते कोठे

भारतात अमेरिकेच्या नेमके उलटे शैक्षणिक धोरण व मानसिकता आहे. पालक पाल्यांना घोड्यावर बसवून त्याच्या मर्जीप्रमाणे पळविण्याचा प्रयत्न करतात. येथेच घोडचूक होते. आपल्याकडे पाल्याला ९४ टक्के गुण मिळाले तरी पालक नाराज होतात. त्याचा परिणाम पाल्याच्या मानसिकतेवर होतो. गमतीने सांगितले जाणारी नेहमीची गोष्ट येथे सांगतो. एके ठिकाणी बारावीच्या निकालाच्या दिवशी एका घरात हुशार मुलगा बसलेला असतो. घरात स्मशान शांतता असते. कारण पाल्याकडून ९८ टक्के गुणाची अपेक्षा असताना तीन टक्के कमी मिळालेले असतात. दुसऱ्या घरात पेढे वाटत असल्याचे चित्र असते. तो पाल्य नापास होणार असे चित्र असताना तो पास झाला म्हणून पेढे वाटण्यात आले. तिसऱ्या ठिकाणी राजकीय नेत्याच्या घरासमोर बॅण्‍ड वाजवून पेढे वाटून आनंद साजरा केला जात असल्याचे चित्र होते. कारण काय तर बोर्डाचा निकाल चाळीस टक्के लागला. म्हणजे साठ टक्के विद्यार्थी नापास झाले. कार्यकर्ता म्हणतो की, साठ टक्के विद्यार्थी नापास झाले. माझा पाल्यही नापास झाला. म्हणजेच तो मेजॉरिटीत आला. या उदाहरणावरून आपल्याकडे कशी मानसिकता आहे, शिक्षणाकडे बघण्याचा सरकार, शिक्षण तज्ञ, समाजाचा दृष्टीकोन कसे विदारक हे दिसून येते. येस आय एम गिल्टी हे सत्य आपण स्वीकारत नाही, कारण वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना दोष देतात. कनिष्ठमधील शिक्षक स्वतःला दोषी न मानता माध्यमिक शिक्षकाला आणि माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षकाला दोषी मानतात. प्राथमिक शिक्षक म्हणतात मी मेहनत करतो पण, मुलेच चांगली नसली तर काय करणार. पालकच याला जबाबदार आहेत. यावरून शिक्षणाबाबतची उदासिनता किती वाईट हे दिसून येते. सर्व शिक्षा अभियानात प्राथमिकमध्ये तीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आणि माध्यमिक विभागात ३५ विद्यार्थ्यामागे एक शिक्षक अपेक्षित आहे. आठवीपर्यंत परीक्षा नाही परंतु, पालक उदासिन आहेत. विद्यार्थी सक्षम व्हावा असे कोणालाच वाटत नाही. विद्यार्थ्याला आपण का शिकतो असे विचारले तर पालक शिकवतात म्हणून शिकतो असे त्याचे उत्तर असते. माझे भविष्य मला घडवायचे आहे, असे फार थोडे जण सांगतात. ही जबाबदारीची जाणीव अमेरिकेत दिली जाते. गुरुकूल पद्धत रयत शिक्षण संस्थेने सुरू केली. विद्यार्थ्याला सकाळी दोन तास अगोदर व शाळेच्या वेळेनंतर दीड तास इंग्रजी, गणित विज्ञान, खेळ, कवायत याबाबत तसेच इंटरनेट, पीपीटी शिकवण्याचा उपक्रम राबवला जातो. तो वाखणण्यासारखा आहे. माहिती तंत्रज्ञानाशिवाय शिक्षण प्रणालीला पर्याय नाही. त्या दृष्टीने भारतीय शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली पाहिजे. जे दोष आहेत ते दूर केले पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी रस्त्यावर

$
0
0

पाथर्डी फाटा परिसरातील महिला संतप्त

म. टा. प्रतिनिधी, सिडको

नाशिकमध्ये नव्याने विकसित होत असलेल्या सिडको, पाथर्डी फाटा तसेच सातपूर प‌रिसरात उन्हाच्या तडाख्यासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कमी दाबाने आणि बेभरवश्याचा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचा संताप होत आहे. पाथर्डी फाटा परिसरातील महिलांनी तर रविवारी पाणी प्रश्नी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.

पाथर्डी फाटा परीसरातील विविध नगरांमध्ये पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. या भागात तीन दिवसांपासून पाणी पुरवठाच झालेला नाही. त्यामुळे महिला आणि नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी उत्स्फूर्तपणे सकाळी रास्तारोको आंदोलन केले. नागरिकांनी पाथर्डीफाटा परिसरातील मूलभूत सुविधांसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

परिसरातील पाणी प्रश्न खूप गंभीर असून तीन दिवसांपासून पाणी आलेले नाही. या परिसरात रात्री बेरात्री अनियमित, कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. पाणी नाही, टँकर नाही. त्यामुळे संतप्त जमावाने अधिकाऱ्यांना जाब विचारला. वरिष्ठ अधिकारी येत नसल्याने आंदोलक संतप्त झाले होते.

अखेर पोलिस अधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात राम बडगुजर, सुजय पाटिल, प्रदीप खताळे, माजी नगरसेवक संजय नवले, दिपक केदार, अजय दहिया, साईनाथ सोनवणे, रवी गामने यांच्यासह नागरिक आणि महिला सहभागी झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांकडून रेल, रास्तारोको

$
0
0

नुकसानभरपाईसह सरसकट कर्जमाफीची मागणी

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची ठोस मदत व संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी रविवारी निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रास्तारोको, रेलरोको आंदोलन केले. निफाड तालुक्यातील शिवडी येथे संतप्त शेतकऱ्यांनी सुमारे दोन तास रेल्वे गाड्या रोखून धरल्या. अखेर निफाडचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे व तहसीलदार संदीप आहेर यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची समजूत काढली. तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले. पालकमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर दोन तासांनी रेलरोको आंदोलन मागे घेण्यात आले.

सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने निफाड तालुक्यातील एकूणच शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. काढणीला आलेली शेतपिके, द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट ठाकले

आहे. या अगोदर झालेल्या नुकसानीची भरपाई तुटपुंजी असून, शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी एकमुखी मागणी निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी केली. रविवारी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उगाव रेल्वे स्टेशनजवळील शिवडी येथे सकाळी ११ वाजेच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करीत सुमारे दीड तास रेलरोको केला. त्यामुळे अप व डाऊनच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती. तर, याच सुमारास निफाड येथे नाशिक-औरंगाबाद महामार्गावरही संतप्त गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. गारपिटीने पिकांची मोठी नासाडी झाल्याने निफाड येथे शेतकऱ्यांनी पिके रस्त्यावर ओतून आपल्या भावना व्यक्त केल्या. जोपर्यंत शासन कर्जमाफीचे ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. उगाव, वनसगाव येथील शेतकऱ्यांनीही काही वेळ महामार्ग रोखून धरला होता.

वनसगाव येथे नुकसानग्रस्त शेतक-यांनी टॉवरवर चढून नुकसानभरपाईची मागणी केली. ठिकठििकणी झालेल्या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली होती. काही शेतक-यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकून आंदोलन केले.

आमदार छगन भुजबळांची कोंडी

खडकमाळेगाव येथे प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अजूनही निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी न केल्याने शेतकरी कमालीचे नाराज झाले होते. त्यांच्या नाराजीचा फटका मात्र भुजबळ यांना सहन करावा लागला. गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खडकमाळेगाव येथे आलेल्या आ. छगन भुजबळ यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी पालकमंत्री महाजन आल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने खडकमाळेगाव येथे वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर पाऊण तासानंतर जवळपास अर्धा किलोमीटर पायपीट करीत खानगाव फाटामार्गे आ. भुजबळ यांना मार्ग काढावा लागला. निफाड तालुक्यात एकाच दिवशी अनेक ठिकाणी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा उद्रेक दिसून येत ठिकठिकाणी रास्ता रोको, रेलरोको आंदोलन छेडल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेतर्फे आज दिंडोरीत रास्तारोको

$
0
0

दिंडोरी : सरकारकडून अद्याप मागील नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यातच पुन्हा पाऊस आणि गारपिटीचे सत्र सुरूच आहे. बँकांची सक्तीची कर्जवसुली देखील सुरू आहे.

सरकारने त्‍वरित पंचनामे करून संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी शिवसेनेतर्फे माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली आज (दि. १६) सकाळी अकरा वाजता दिंडोरी येथे छत्रपती शिवाजी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. ही माहिती तालुकाप्रमुख उत्तम जाधव, शहरप्रमुख रमेश बोरस्ते यांनी दिली.

नुकसानीचे पंचनामे करून त्वरित भरपाई मिळावी, मागील पंचानाम्यांची भरपाई तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळावी, बँकांची सक्तीची कर्जवसुली त्वरित थांबवावी, कर्जमाफ करून सातबारा कोरा करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी रास्तारोको करण्यात येणार आहे. शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नार-पारसाठी लढा उभारणार

$
0
0

म. टा. वृतसेवा, कळवण

उत्तर महाराष्ट्राच्या हक्काच्या नार-पार नद्यांचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा घाट घातला जात आहे. मोदी सरकारने आखलेली ही योजना लाल बावटा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आगामी काळात उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी तसेच, नार - पार योजना पूर्णत्वास नेण्यासाठी लढा उभारण्यात येईल, असे प्रतिपादन माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. सीताराम येचुरी यांनी केले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २१ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने कळवण येथील कृउबा समितीच्या पटांगणात झालेल्या सभेला संबोधित करताना कॉ. येच्युरी बोलत होते. या अधिवेशनाच्या व सभेच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार जे. पी. गावित होते. येचुरी म्हणाले की, केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर अच्छे दिन येतील असे सांगणाऱ्या मोदी सरकारने शेतकरी व कामगार विरोधी भूमिका घेतली आहे. देशात कार्पोरेट लोकांचा चंगळवाद सुरू केला आहे. महागाई आणि गारपीटने होरपळणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन आणण्याची ग्वाही आणि काळा पैसा देशात परत आणण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारला चार महिन्यातच जनतेचा विसर पडला आहे. या देशात श्रीमंत आणखी श्रीमंत आणि गरीब आणखी गरीब बनविण्याची व्यवस्था मोदी सरकारने केली आहे. आगामी काळात शासनाच्या या दुटप्पी धोरणाच्या विरोधात लाल बावट्याचा लढा अजून प्रखर राहणार आहे.

आदिवासींच्या वनजमिनी ताब्यात देऊन तत्काळ त्यांच्या सातबाऱ्याबर नावे लावण्यात यावीत, अन्यथा संपूर्ण देशात चक्काजाम आंदोलन करण्याची सूचनाही कॉ. येचुरी यांनी मांडली. यावेळी केंद्रीय सचिव मंडळ सदस्य कॉ. निलोत्पल बसू, डॉ. अशोक ढवळे, नरसय्या आडम, सुनंदा रमण यांनीही सरकारवर जोरदार हल्ला चढवत जनतेच्या समस्या सोडवायला शासनाला वेळच नसल्याची टीका केली. आमदार जे. पी. गावित यांनी मतदारसंघातील जनतेसाठी आणि विकासासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे सांगून वेळ आली तर नार - पारच्या पाण्यासाठी आणि आदिवासींच्या सातबाऱ्यासाठी उपोषण करण्याचा इशारा दिला. सरचिटणीस कॉ. हेमंत पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विलास पाटलांनाच नको होती जबाबदारी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तत्कालीन जिल्हाधिकारी विलास पाटील सिंहस्थाच्या जबाबदारी स्वीकाण्याबाबत आणि पार पाडण्याबाबत उदासीन होते. सिंहस्थासारखा मोठा सोहळा पार पाडण्यासाठी मरगळ आलेला नव्हे तर उत्साही आणि क्रियाशील अधिकारी हवा होता, असे म्हणत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाटील यांच्या कार्यपध्दतीबद्दल रविवारी उघड नाराजी व्यक्त केली.

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी ते नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पाटील यांच्या कार्यपध्दतीबाबतची नाराजी उघडपणे व्यक्त केली. सिंहस्थाच्या अनुषंगाने पाटील यांच्याबरोबर काही महिने काम करता आले. मात्र, अनेकदा त्यांनी कामाची जबाबदारी उत्साहाने स्वीकारण्यऐवजी उदासीनताच दाखवून दिली. मला सिंहस्थाची जबाबदारी नको असे त्यांनी स्पष्ट केले होते. ते अनुभवी अधिकारी होते. गेल्या सिंहस्थात त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. त्यांचा अनुभव आता कामी येईल म्हणून त्यांची बदली करू नये असा अनेकांचा आग्रह होता. परंतु, नाशिकमध्ये ‍काम करण्याची इच्छा नसलेला अधिकारी अन् सिंहस्थाची जबाबदारी यामुळे नवीन जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचनाम्यांपूर्वी गावोगावी दवंडी पिटा

$
0
0

परिवहन मंत्र्यांसह महसूल राज्यमंत्र्यांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवकाळी पावसामुळे शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. सरकारी अधिकारी त्याच्या दारापर्यंत गेले तर सरकार त्याच्यापर्यंत आले अशी त्यांची भावना होईल. त्यामुळे यंत्रणा कामाला लावून गावोगावी दवंडी पिटा, चावडी वाचनासारखे उपक्रम राबवा असे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते, महसूल राज्य मंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला रविवारी दिले.

अवकाळी पावसाने आमचे कंबरडे मोडले असून जिल्हा प्रशासनाची यंत्रणा अजूनही आमच्यापर्यंत पोहोचली नसल्याची तक्रार सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रावते आणि राठोड यांच्याकडे केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करतानाच त्यांनी गावोगावी दवंडी पिटण्याचे आदेश दिले. या पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर त्यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, अपर जिल्हाधिकारी बी. एच. पालवे, निवासी जिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्यांबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी अजुनही पंचनामे करण्यासाठी आले नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आधार द्यायला हवा. त्यामुळे तात्काळ पंचनामे करा. तालुक्यांमधील नुकसान न झालेल्या गावांमधील तलाठ्यापासून ग्रामसेवकापर्यंतची यंत्रणा नुकसानग्रस्त भागाला कामाला लावा. पंचनामे करतेवेळी शेतकरी तेथे असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या-त्या गावात दवंडी पिटून पंचनामे केव्हा होणार याची माहिती द्या, असे आदेश रावते यांनी दिले.

६५ कोटी निधीची मागणी

ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावेळी करण्यात आलेल्या पंचनाम्यानंतर मदतही जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अजूनही त्यापैकी ६५ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला मिळू शकलेले नाहीत. परिणामी संबंधित शेतकऱ्यांनाही ती मदत देणे प्रशासनाला शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे हा निधी तातडीने मिळावा, अशी मागणी जिल्हाधिकारी कुशवाह यांनी मंत्र्यांकडे केली.

मक्याचा चारा दुष्काळी भागासाठी

अवकाळी पावसामुळे मक्याचे तसेच द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र मक्याचा चारा दुष्काळी भागात उपयोगात आणता येऊ शकतो. राज्य सरकारला अनेकदा कर्नाटकातून चारा आयात करावा लागतो. अवकाळी पावसामुळे मक्याचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने तो चाराही अधिग्रहित करून त्याचेही पैसे शेतकऱ्याला द्यावेत, जेणेकरून त्याला आणखी आर्थिक मदत मिळू शकेल आणि त्याच्याकडून खरेदी केलेला चाराही दुष्काळग्रस्त भागात वापरता येईल. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या द्राक्षांचा मद्य निर्मितीसाठी उपयोग होऊ शकेल का, याचाही विचार व्हायला हवा, असे मत परिवहन मंत्री रावते यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईत अडकला तपासाचा काटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी​, ना​शिक

ऑनलाइन पध्दतीने सुरू असलेल्या देह विक्रीच्या व्यापारातील बडे धेंडापर्यंत पोहचण्यात पोलिसांना अडचणींचा समाना करावा लागतो आहे. क्राइम ब्रँचची एका टीमने दिवा-कळवा, गोरेगाव आदी ठिकाणी तपास केला. मात्र, संशयित आरोपीचे पत्तेच बोगस निघाले. पोलिसांनी अटक केलेल्या दोघा संशयिताची कोठडी १६ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.

क्राइम ब्रँचने ७ मार्च रोजी सापळा रचून देह विक्री करणाऱ्या एका टोळीला अटक केली होती. ही टोळी ऑनलाइन वेबसाईटच्या मदतीने नाशिकसह राज्यातील इतर शहरात हा व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली. मुंबईतील हॅण्डलर्सने शहरात दोघा युवकांना ग्राहकांकडून पैसे जमा करण्यासह मुलींना संभाळण्याची जबाबदारी दिली होती. भाऊसाहेब वाघ (२५) आणि भावेश पवार (२५) अशी या दोघांची नावे आहेत. थत्तेनगरमधील एका फ्लॅटमधून वाघ आणि पवार सूत्रे फिरवत होते. ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशातील ४० टक्के रक्कम संशयित आरोपी मुंबईतील हॅण्डलर्सच्या खात्यावर जमा करीत होते. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी दिवा-कळवा भागातील संशयित आरोपीचा पत्ता शोधून काढला. यासाठी त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली. मात्र, हा पत्ता बोगस निघाला. याठिकाणी पूर्वी संशयित राहत असावा अशी शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यानंतर पोलिसांनी गोरेगाव परिसरात संशयितांची शोध घेऊन नाशिक गाठले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या व्यवसायाची व्याप्ती वेगळी आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईतील संशयितांनी घेऊन बँक खाते सुरू केले असावे. सध्या, आमचे एक पथक तपास करून परत आले असून आणखी धागेदोरे शोधून काढण्याचा प्रयत्न आहे.

- अकील शेख, सिनीअर पोलिस निरीक्षक, क्राइम ब्रांच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांचा काढता पाय!

$
0
0

शेतकरी उद्रेकाचा सामना न करताच परतले

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वारंवार अवकाळी पाऊस आणि गारपीटीत होरपळूनही शासकीय मदत न मिळालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उद्रेकाचा सामना पालकमंत्री गिरीश महाजन यांना रविवारी करावा लागला. सिन्नर व चांदवड या सुरक्षित मतदारसंघामध्येच नुकसानीची पाहणी त्यांनी केल‌ी. यामुळे दोन दिवसात सर्वाधिक नुकसान झालेल्या निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांकडून शेतकऱ्यांच्या रुद्रावताराची कल्पना मिळाल्यानंतर महाजन यांनी सोमठाणे येथूनच थेट नाशिकच गाठले. या घडामोडीमुळे पालकमंत्र्यांकडून दिलासा मिळण्याची असलेली शेतकऱ्यांची आशा पुरती धुळीस मिळाली.

अवकाळी नंतरही नाशिककडे दुर्लक्ष केल्याची टीका झाल्यानंतर पालकमंत्री महाजन शनिवारी रात्री उशिरा नाशिकमध्ये अवतरले. चांदवडच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर रात्री अकरा वाजता त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेवून आढावा घेतला. सकाळी सिन्नर तालुक्यातील वडांगळी, पांचाळ, शाह, रामपूर, शिंदेवाडी, सोमठाणे गावांना भेटी दिल्या. या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या संताप आणि उद्रेकाचा पालकमंत्र्यांना सामना पाकरावा लागला. शिंदेवाडीत शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसह अधिकाऱ्यांनाच जाब विचारत यंत्रणेच्या कामांवरच शंका उपस्थित केल्या. यंत्रणा पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दोन तीन दिवसात तुमच्यापर्यंत मदत पोहचेल, असे आश्वासन देत महाजन यांनी काढता पाय घेतला.

दरम्यान, निफाड चांदवड तालुक्यांमध्ये रास्तोरोको करत शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या भेटीची मागणी केली. उगाव येथे शेतकऱ्यांनी रेलरोको आंदोलन केले. पालकमंत्र्यांनी आम्हाला भेटावे अशी मागणी त्यांनी माजी मंत्री छगन भुजबळांमार्फत केली. सिन्नरसोबतच निफाडमध्ये अधिक नुकसान असल्याने शेतकरी अधिक संतप्त झाले होते. शेतकऱ्यांचा उद्रेक पाहून पोलीसांसह शासकीय यंत्रणेने महाजन यांना निफाड दौरा न करण्याचा आग्रह केला. पालकमंत्र्यांनीही थेट नाशिक गाठले. त्यामुळे निफाडमधील शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त करत पळ काढल्याचा आरोप केला. निदान आमचे सात्वंन तरी करा अशा आर्जव यावेळी शेतकऱ्यांनी केले. मात्र, सगळ्याच नुकसानग्रस्त ठिकाणी जाणे शक्य नसल्याचे पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

गेल्या नुकसानीचे काय?

दौऱ्यात शेतकऱ्यांनी थेट पालकमंत्र्यांनाच खिंडीत पकडत, गेल्या नुकसानीच्या मदतीचे साहेब काय झाले अशी विचारणा केली. त्यावर जिल्ह्याला ४०० कोटी मंजूर झाल्याचे सांगितले. मात्र, हे खरीपाचे असल्याने अवकाळीचे काय असा थेट प्रश्न विचारला. त्यामुळे पालकमंत्र्यांचीही कोंडी झाली. शेतकऱ्यांना काय उत्तर द्यावे हे कळेना. दोन तीन दिवसात मदत मिळेल असे आश्वासन देत त्यांनी वेळ मारून नेली.

डिसेंबरची मदत लवकरच

जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले असून ते शब्दात सांगणे शक्य नाही. परिस्थिती गंभीर असून वेदनांची मलाही जाणीव असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. कर्जमाफ करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू. डिसेंबरपर्यंत झालेल्या नुकसानीची ६७ कोटीची मदत दोन-तीन दिवसात मिळेल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

शासन निकषाप्रमाणेच मदत

गारपीटग्रस्तांना केंद्राकडून मदत होईल हे अद्याप सांगता येत नाही. मात्र, नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करू, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना अवकाळीतही मोठी मदत मिळण्याची शक्यताही कमीच आहे. शेतकऱ्यांमध्ये संताप आणि उद्रेक आहे. यात सरकारची चूक आहे का? असा प्रश्न करीत सरकारने मदत करावी अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा असल्याचेही त्यांनी मान्य केले.

शेतीसाठी त्रिसूत्री

शाश्वत शेतीसाठी सरकार प्रयत्न करत असून शेतकऱ्यांना मदतीसाठी नवीन त्रिसूत्री शासन तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. पिक विमा योजनेत बदल करणे, आणेवारी पद्धत बदलने आणि सुरक्षित शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा त्यात समावेश आहे. सध्याची पिक विमा पद्धती ही कंपन्याना धनदाडंगे करणारी आहे. त्यामुळे त्यात लवकरच बदल होणार आहे. पिक आणेवारीचे निकषही सरकार बदलत आहे.

जिल्हा बँकेच्या माथी खापर

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीपासाठीची दिलेली मदत मिळू न शकण्याचे खापर पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर फोडले आहे. बँकेत अपुरा कर्मचारी वर्ग असल्याचे सांगत, रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याचा जावईशोध शासकीय यंत्रणेसह पालकमंत्र्यांनी लावला. विशेष म्हणजे सिन्नरमधल्या एका नेत्याने पालकमंत्र्यांची दिशाभूल करत, बँकेच्या निवडणुकीसाठी हा मुद्दा वापरल्याची चर्चा नंतर शेतकऱ्यांमध्येच पसरली होती.

यंत्रणा अपुरी पडल्याची कबुली

शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यात अपुरी पडत असल्याचे पालकमंत्र्यांनी मान्य केले. यंत्रणेसंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी खऱ्या आहेत, मात्र यंत्रणेच्याही मर्यादा आहे. चावडी वाचन करून प्रत्येकाच्या शेताचे पंचनामे केले पाहिजेत असे आदेश यंत्रणेला दिले असून पंचनामे न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला आहे.

मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा

शेतीचे नुकसान पाहून आपलेही डोळे पानावल्याचे महाजन यांनी पत्रकारांना सांगितले. एका शेतकऱ्याच्या मुलाने तर साहेब मी वडील वारल्यावरही एवढा रडलो नाही, एवढा आता पिक वाया गेल्याने रडत आहे. हे पाहून आपल्या डोळ्यात पाणी आल्याचे सांगत आपणही शेतकऱ्याचाच मुलगा असल्याचे महाजन यांनी भावूक होऊन सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भांडण

$
0
0

कोणतीही व्यक्ती ही नव्व्यान्नव टक्के तिच्या राशीनुसारच वागते. विश्वास नाही ना बसत? गेल्या आठवड्यातील एका घटनेचे अवलोकन करता हेच समोर येते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीच्या कार्यक्रमात सिंह व वृषभ राशीचे भांडण असे काही रंगले की त्यात बिचारी मेष रास नाहक पिसली गेली.

मुलाखतकार व मुलाखतदार या दोन्हीही तशा अजबच वल्ली. दोघेही समान, तोलामोलाचे असले तर बेहत्तर नाहीतर उगाचच रंगाचा बेरंग होतो. मुलाखत रंगवायची की नाही हे मुलाखतकाराच्या मनावर अवलंबून असते हे ही तितकेच खरे. त्याने मुलाखतदाराला खुलूच द्यायचे नाही असे ठरवले तर सर्व संपलेच समजा. दोघे समान, तोलामोलाचे हवे या विधानामागे पार्श्वभूमी आहे हे एव्हाना चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल. गेल्या आठवड्यात कुसुमाग्रज स्मारकात अवधूत डोंगरे यांच्या मुलाखतीदरम्यान विनायकदादा पाटील व मुरलीधर खैरनार एकमेकांना चांगलेच भिडले. त्यांचा रंगलेला सवाल जबाव 'याचि देही याचि डोळा' पाहण्याचे भाग्य अनेकांना लाभले.

कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रम नानविध गोष्टींनी गाजला. खरेतर प्रतिष्ठानने स्मरणच्या निमित्ताने अनेक चांगले कार्यक्रम घेतले. सांस्कृतिकतेला उजाळा मिळाला. कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. परंतु, उडदामाजी काळे गोरे. कुसुमाग्रज अभ्यासवृत्ती मिळालेला नव्या दमाचा लेखक अवधूत डोंगरे याची मुलाखत घेण्यासाठी मुरलीधर खैरनार यांना पाचारण करण्यात आले होते. खैरनारांचे वाचन प्रचंड आहे. नाटकातील त्यांचे योगदान वाखाणण्यासारखे. (अगदी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याइतके) त्यांनी मुलाखत घ्यायची म्हणजे मुलाखतदाराला कसून तयारी करावी लागावी इतका त्यांचा दरारा नक्कीच. आता मुलाखत म्हटली की ती रंगवणे आलेच व रंगवणे म्हणजे पाल्हाळ आलेच. परंतु, हेच पाल्हाळ (स्वत: मात्र वेल्हाळ भाषण करणाऱ्या) विनायकदादांना आवडले नाही. आता दादा म्हणजेही प्रचंड वाचन. अनेक दिग्गज राजकारण्यांचा सहवास, साहित्यिकांचा सहवास. त्यामुळे कार्यक्रमांना उपस्थितीचे प्रमाणही तसेच प्रचंड. दादा म्हणजे जनसामान्याने ज्येष्ठत्वाचा अधिकार बहाल केलेले व्यक्तिमत्त्व.

मुलाखत सुरू झाल्यापासून काही वेळाने दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. दादांनी (वृषभ राशीला न शोभणाऱ्या) प्रेमळपणाने खैरनारांना समजावले. आता सिंहच तो, कसा गप्प बसणार? ते उसळले. मग दोघांनी एकमेकांना खरेखोटे सुनावले. (प्रेक्षकांचा वेळ घेताय म्हणणारे दादा आपणही एका दृष्टीने तेच करतोय हे एव्हाना विसरून गेले.) मानापमान नाट्य झाले. खैरनार बाहेर पडले, दादांची मुद्रा विजय‌ी झाली. या मनोहारी सोहळ्यात मेषीच्या अवधूत डोंगरेंचे मात्र चांगलेच मरण झाले. दादांच्या बाजूने बोलावे की खैरनारांच्या असे होऊन त्यांनी प्रेक्षकांची क्षमा मागण्याचा तिसराच मार्ग पत्कारला. प्रेक्षागृहात बसलेले कुणीही असो त्यांनी सभेचे नियम पाळले पाहिजे. व्यासपीठावर कुणी बोलत असताना आपण बोलू नये हा सर्वसाधारण नियम आहे, तर प्रेक्षागारातून कुणी सूचना केली तर ती व्यासपीठावरील मान्यवराने मान्य करावी असाही नियम आहे. दोघांनी दोघांचे नियम तोडले. प्रेक्षकांनी दोघांचे ज्येष्ठत्व मान्य केल्याने म्हणा की दबावापोटी म्हणा कुणी काही बोलले नाही. एक दोघांनी बोलण्याचा प्रयत्न केला, तर खैरनारांनी त्यांनाही जाता जाता 'प्रसाद' दिला. असो. कोणतीही व्यक्ती ही नव्व्यान्नव टक्के तिच्या राशीनुसार वागते याचा हा मासलेवाईक नमुना. श्रेष्ठ व ज्येष्ठांनी आपापल्या वलयानुसार आचरण केले तर असे प्रश्न कदाचित निर्माण होणार नाहीत. नाही का?

- अशांत किरकिरकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कामगार पॅनल’ची विजयी वाटचाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

भारत प्रतिभूती आणि चलार्थ पत्र मुद्रणालयातील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणूकीत 'आपला पॅनल'चा पूर्ण धुव्वा उडवत 'कामगार पॅनल'ची सलग दुसऱ्यांदा सत्ता येणार हे स्पष्ट झाले. रात्री साडेनऊपर्यंत मतमोजणीची दुसरी फेरी संपली तेव्हा या पॅनलने सर्व २९ जागांवर विक्रमी आघाडी मिळवल्याने कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला.

गेल्या निवडणुकीत आपला पॅनलचे नेते रामभाऊ जगताप हे सरचिटणीसपदावर निवडून आले होते. यंदा ती जागाही राखणे 'आपला पॅनल'ला अवघड झाले. त्यांच्यावर जगदीश गोडसे यांनी आघाडी घेतली. 'कामगार पॅनल'ने जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, माधवराव लहांगे यांच्या नेतृत्वाखाली तर 'आपला पॅनेल'ने रामभाऊ जगताप, अशोकराव गायधनी, जयंत गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. मुंबई येथील कामगार नेते जे. आर. भोसले यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने उर्वरित २९ जागांसाठी निवडणूक झाली. पहिल्या फेरी अखेर पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य अशा सर्व २९ जागांवर 'कामगार पॅनल'चे उमेदवार आघाडीवर होते.

आघाडीवरील पदाधिकारी - उपाध्यक्ष- राजेश टाकेकर (८६९), सुनील आहिरे (८५५), केरू पाळदे (८४९), माधवराव लहांगे (९५९), कार्याध्यक्ष - ज्ञानेश्वर जुंद्रे (१०८२), जनरल सेक्रेटरी - जगदीश गोडसे (९१०), संयुक्त सचिव - जयराम कोठुळे (८९६), शिवाजी कदम (८७५), रमेश खुळे (९३८), इरफान शेख (८०२), उल्हास भालेराव (८४६), दिनकर खर्जुल (९३९), खजिनदार - उत्तम रकिबे (९०१).

कार्यकारिणीचे आघाडीवरील सदस्य

सुदाम चौरे, राजेंद्र जगताप, दिपक दिंडे, प्रकाश घायवटे, शरद अरिंगळे, उल्हास देशमुख, संपत घुगे, संदीप व्यवहारे, विनोद गांगुर्डे, कार्तिक डांगे, सचिन तेजाळे, संतोष ताजनपुरे, दत्तू गवळी, मनोज सोनवणे, अरुण गिते, अविनाश देवरुखकर.

विजयामुळे गोडसे झाले भावूक

'कामगार पॅनल'ला एकहाती विजय मिळवून देणारे जगदीश गोडसे यांचा शनिवारी वाढदिवस होता. पॅनलने त्यांना विजयाची भेट देण्याचा दावा केला होता. तो पूर्ण केल्यामुळे भाऊक झालेले गोडसे म्हणाले, की हा विजय कामगारांचा आहे. गेल्या तीन वर्षात कामगार हिताचे अनेक निर्णय घेऊन त्यांची अमलबजावणी केली. त्यामुळे कामगारांनी आमच्यावर विश्वास टाकल्याची ही पावती आहे. या पॅनलचे नेते ज्ञानेश्वर जुंद्रे म्हणाले, की कामगार आणि कार्यकर्ते यांच्या भक्कम पाठींब्यामुळेच प्रचंड मताधिक्याने हा विजय मिळाला. त्यांच्या विश्वासास आम्ही तडा जाऊ देणार नाही.

कंटाळवाणी मतमोजणी

या निवडणूकीत चार हजार मतदान होते. त्यापैकी ९५ टक्के मतदान झाले. निवडणूक अधिकारी माधवराव भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसपी रेस्ट शेड येथे मतमोजणी झाली. सकाळी आठची वेळ असताना दहाला मतमोजणी सुरू झाली. पंधराशे मतांच्या दोन आणि बाराशे मतांची तिसरी फेरी होती. पहिल्या फेरीचा निकाल जाहीर होण्यास सायंकाळचे पाच वाजल्याने कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहापैकी दोनच एसीपी हजर

$
0
0

पूर्ण क्षमतेच्या पोलिस अधिकाऱ्यांची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलासाठी सहा सहायक पोलिस आयुक्तांची (एसीपी) नितांत गरज असताना फक्त दोन अधिकारी हजर झाले आहेत. हजर झालेल्या दोन एसीपी व्यक्तिरिक्त आणखी चार अधिकाऱ्यांची शहर पोलिसांना आवश्यकता असून किमान कुंभमेळ्यापूर्वी हे वरिष्ठ पोलिस अधिकारी पूर्ण संख्येने हजर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

साधारणतः दोन ते अडीच महिन्यापूर्वी एसीपी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नतीने बदली झाली. या प्रक्रियेत शहर पोलिस दलातील दोन एसीपींचा समावेश होता. आधीच एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची कमतरता असलेल्या पोलिस दलावर यामुळे ताण वाढला. त्यातच बदली झालेल्या एसीपींना तातडीने पदमुक्त करण्यासाठी गृह विभागाकडून दबाव वाढवला. याचाच भाग म्हणून तीन आठवड्यापूर्वी एसीपी हेमराजसिंग राजपूत यांना पदमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. राजपूत यांच्या जागी रायगड येथील अतुल झेंडे यांनी पदभार स्वीकारला. क्राइम ब्रांचचे एसीपी पंकज डहाणे यांनी देखील पोलिस उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर हे पद रिक्तच होते. झेंडे यांच्यानंतर भंडारा येथे कार्यरत असलेल्या सचिन गोरे यांनी नुकतेच क्राइम ब्रांचचा कार्यभार हाती घेतला. गोरे यांच्याकडे कंट्रोल विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

शहर पोलिस दलातील रिक्त जागांवर प्रशांत वाघुंडे (ठाणे ग्रामीण), विवेक पाटील (शिर्डी) आणि मोहन ठाकूर (नागपूर सिटी) हे अधिकारी हजर होण्याची चर्चा फोल झाल्याचे दिसून येते आहे. यामुळे झेंडे आणि गोरे हजर होऊनही ट्रॅफिक, प्रशासन, कंट्रोल तसेच गुन्हे आर्थिक शाखेला अद्यापपर्यंत कायमस्वरूपी​ एसीपी मिळालेले नाहीत.

नजरा गृह विभागाकडे

सध्या, शहर पोलिस दलात रवींद्र वाडेकर (झोन एक) आणि स्पेशल ब्रांचमध्ये कार्यरत असलेल्या रश्मी नांदेडकर कार्यरत आहेत. एसीपीपदाची आठ पदे मंजूर असताना अजूनही शहरासाठी पूर्ण क्षमतेने ​अधिकारी देण्यात आलेले नाही. आठ पदापैकी ४ पदे रिक्त असून कुंभमेळ्यापूर्वी ही पदे गृहविभागाने भरणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायपर नाशिकलाच आणू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल फार्मा एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (नायपर) नाशिकलाच आणण्याचा निर्धार नायपर कृती समितीच्या बैठकीत रविवारी करण्यात आला. उंटवाडी येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्समध्ये झालेल्या या बैठकीला महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा, आमदार देवयानी फरांदे, वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्यासह नाशिकमधील विविध संस्था-संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याच आठवड्यात बैठक घेण्याचे आमदार फरांदे यांनी यावेळी सांगितले, तर नायपरसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात येईल, अशी घोषणा उपमहापौरांनी केली. तसेच, नायपरसाठी आवश्यक प्रोजेक्ट रिपोर्ट आणि नाशिक शहराचे प्रेजझेंटेशन तयार करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. त्यामुळे नायपर नाशिकला येण्याच्या दृष्टीने ठोस कार्यवाही सुरू झाली आहे. 'मटा'चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांनी प्रास्ताविक केले.

नायपरसाठी नाशिक हे सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे. तरी त्यासाठी आपल्या सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील. नाशिकचा नावलौकिक वाढण्यासाठी नाही तर राज्याच्या विकासालाही चालना मिळावी यासाठी नायपर नाशिकला हवी आहे.

- डॉ. दौलतराव आहेर, माजी आरोग्यमंत्री

फार्मसी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलेले असल्याने नायपर ही संस्था नाशिकलाच यावी अशी मनोमन इच्छा आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यानाही पत्र दिले आहे. आपण सर्वांनी मिळून ही मागणी केली, तर नायपर नाशिकला निश्चित येईल.

- देवयानी फरांदे, आमदार

नाशिक सर्वच आघाड्यांवर पुढे येत आहे. नायपरसारखी संस्था नाशिकला येणार असेल तर विकासाला आणखी वेग येईल. नायपरसाठी आवश्यक ती सर्व मदत करायला महापालिका सज्ज आहे.

- अशोक मुर्तडक, महापौर

नायपरसाठी राष्ट्रीय संस्था नाशिकला येण्याने राज्याच्या विकासालाही गती येणार आहे. नायपर नाशिकला व्हावे, असा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला जाईल आणि वेळ आली तर राज्य आणि केंद्र सरकारकडे मागणीसाठी रस्त्यावरही उतरू.

- गुरुमीत बग्गा, उपमहापौर

सर्व जागतिक सर्वेक्षणांमध्ये नाशिकचा समावेश होत आहे. त्यामुळे नाशिकला नायपर येणे स्वाभाविकच आहे. त्यासाठी लोकशाही मार्गाने आपण सर्व ते प्रयत्न करू. महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सहकारी संस्था या सर्वांचे ठराव मिळवू. मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी करून नायपर नाशिकसाठी मागू.

- वनाधिपती विनायकदादा पाटील

नाशिकमधून किमान १० मुले दरवर्षी देशभरातील विविध नायपरमध्ये उच्च शिक्षणासाठी जातात. नाशकात नायपर झाली, तर नाशिकमधील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी नाशकातच संधी मिळेल. शिवाय उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढेल. राजकीय पाठबळ लाभले, तर नायपर नाशिकला नक्कीच येवू शकते. प्रारंभीच्या काळात आमच्या कॉलेजच्या परिसरातही त्याचे काम सुरू होऊ शकते.

- डॉ. दिलीपराव डेर्ले, माजी संचालक, एआयसीटी

नायपरमुळे नाशिकमध्ये उच्चशिक्षणाच्या मोठ्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच नाशिक परिसरातील फार्मसी उद्योगांनाही मोठा लाभ होईल. नायपरसाठी आवश्यक तो कृती आराखडा तयार केला आणि ठोस प्रयत्न झाले, तर निश्चितच नायपर नाशिकला येईल.

- अशोक देशपांडे, मॅनेजर, ग्लॅक्सो

नाशिकचे दोन्ही खासदार, सर्व आमदार आणि सर्व संघटनांचे प्रमुख यांच्या एकत्रित प्रयत्नांना आता सुरुवात होईल असे मला वाटते. मुख्यमंत्र्यांना भेटून आपण सादरीकरण करू आणि नायपर नाशिकला आणू.

- जितेंद्र ठक्कर, अध्यक्ष, नाशिक

सिटीझन फोरम

नायपर नाशिकला येणे ही काळाची गरज आहे. आपल्याकडचे इन्फ्रास्ट्रक्चर सर्वोत्तम आहे. राजकीय बाबी बाजूला ठेवून आमचा पक्ष नायपरसाठी सर्वांसोबत आहे. वेळेप्रसंगी आंदोलन करायलाही आम्ही तयार आहोत.

- अर्जुन टिळे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

इन्क्युबेशन सेंटर आणि आर अॅण्ड डी यासारख्या बाबतीत नायपरला लागेल असे पोषक वातावरण नाशकात आहे. ही राष्ट्रीय संस्था नाशिकला येण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.

- अपूर्वा जाखडी, स्पेस एज्युकेटर

१९९४ मध्ये नायपर नागपूरला स्थापन होणार होती. मात्र, ती चंदीगडला गेली. आता नायपर नाशकात आणण्यासाठी आपल्याला कठोर प्रयत्न करावे लागतील. त्यास यश आले, तर फार्मसी क्षेत्रात अतिशय प्रभावी असे काम येत्या काळात नाशकात होईल. राहुरी कृषी विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ, आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नायपर यांच्या संयुक्त विद्यमाने बहुविध बाबी घडू शकतील.

- डॉ. राजेंद्र भांबर, प्राचार्य, फार्मसी कॉलेज

नायपरसाठी आपण आवश्यक ती लाइन ऑफ अॅक्शन साधायला हवी. आवश्यकता असेल तर नाशिकचे एक शिष्टमंडळ दिल्लीला जावून सादरीकरण करेल. आवश्यक तो रिपोर्ट तयार करून आग्रही पाठपुरावा करावा लागेल.

- विवेक जायखेडकर, आर्किटेक्ट

वेगाने विकसित होणाऱ्या नाशिकला नायपर आले, तर मोठे यश प्राप्त करता येईल. त्यासाठी आवश्यक ती मदत करायला मी व माझा पक्ष तयार आहे. आपण सर्वांनी एकजूट करून नायपरसाठी पाठपुरावा करू या.

- रमेश पवार, पदाधिकारी, काँग्रेस

नाशिकच्या विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठीच कुठलीही मदत लागली तर आमची संस्था सदैव तत्पर आहे. यापुढेही कार्यक्रमांसाठी काही योगदान लागले तर आम्ही करू. नायपर नाशिकला येण्यासाठी आम्ही आग्रही मदत करू.

- नरेंद्र बिरारी, अध्यक्ष, दि. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स

नाशिकमध्ये मॅन्युफॅक्चरिंग उद्योग येण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. त्यामुळे नायपरसारखी सर्व्हिस इंडस्ट्री नाशिकला येणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ निर्मिती होतानाच उच्च शिक्षणाची दारे यातून खुली होतील.

- श्रीधर व्यवहारे, राष्ट्रीय अध्यक्ष, निपम युवा

रोजगाराच्या संधी मिळाव्या म्हणून नाही तर उच्चशिक्षण, संशोधन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन अशा पातळ्यांवर नायपर मोलाची आहे. प्रत्येक महसुली केंद्राला विद्यापीठ आहे. मात्र, नाशिकला नाही. ही मोठी खंत आहे. पक्षभेद विसरून आपण एकत्र येवू या आणि नायपरला नाशिकमध्ये आणू या.

- प्रा. सुहास फरांदे, प्रदेश प्रवक्ते, भाजप

यांची उपस्थिती लाभली

विक्रीकर सहआयुक्त सुमेरकुमार काले, अपारंपरिक ऊर्जा तज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, कॅटाफार्मा केमिकल्सचे चेअरमन डॉ. श्रीकांत कारवा, आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य एस. एल. दासरी, ट्रीपल आयडीचे चेअरमन हेमंत दुगड, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ, डेल्टा फिनोकेम प्रा. लि.च्या संचालक शरयू देशमुख, सामाजिक कार्यकर्ते पद्माकर मोराडे, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष राजगोपाल मुंदडा.

आज प्राचार्यांची बैठक

शहरातील विविध फार्मसी आणि मेडिकल कॉलेजेसच्या प्राचार्यांची बैठक सोमवारी दुपारी चार वाजता होणार आहे. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या फार्मसी कॉलेजमध्ये होणाऱ्या या बैठकीत नायपरबाबत चर्चा केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतीक्षा ‘स्वच्छ अन् मोफत’ची

$
0
0

गायत्री काळकर, नाशिक

नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने महिला घराबाहेर पडतात तर नाशिकमध्ये रोज येणाऱ्या पर्यटकांमध्ये दोन ते अडीच हजार महिला असतात. शहराच्या विविध भागात वेगवेगळ्या कारणांनी महिलांचा सतत वावर असतो. किंबहुना पुरुषांइतक्याच संख्येने महिला रस्त्यावर असतात. परंतु शहराच्या नियोजनात महिलांचा विचारच केलेला दिसत नाही. पुरूषांसाठी मोफत मुतारी उपलब्ध करून देताना या गरजेबाबत महिलांचा विचारच केला नसल्याचे दिसते. महापालिकेने शहरात महिलांसाठी ११० मोफत मुताऱ्या उपलब्ध केल्याचा दावा केला आहे. मात्र त्या स्वच्छ आणि मोफत मिळत नसल्याचे दिसते.

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे चित्र पाहता महिलांनी त्याचा लाभ घेणेच अशक्यच आहे अशी स्वच्छतागृहाची अवस्था आहे. महापालिकेने शहरात महिलांसाठी २,७४६ स्वच्छतागृहे उपलब्ध केल्याचा दावा केला आहे. मात्र त्यातील जवळपास १,२९८ स्वच्छतागृहे सुलभ तसेच सुलभ इंटरनॅशनल या संस्थांना चालविण्यासाठी देण्यात आली आहेत. त्यामुळे महिलांना त्याच्या वापरासाठी किमान ५ रुपये मोजावे लागतात. तर महापालिकेने शहरातील काही भागात पुरूषांसाठी मोफत मुताऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. याबाबत मा‌त्र महिलांच्या समस्येकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले दिसते.

महापालिकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वच्छतागृहांमध्ये कोणतीही मुलभूत सुविधा योग्य प्रकारे पुरविण्यात न आल्यामुळे या स्वच्छतागृहांचा वापर करणाऱ्या महिलांची संख्याही फारच अल्प आहे. पुरुषांसाठी मुताऱ्यांची सोय असल्याने त्यांना मात्र कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाहीत. परंतु महिलांना याबाबत दुय्यम वागणूक दिली जात आहे. महिलांसाठी मोफत आणि स्वच्छ मुताऱ्या असणे ही आरोग्याच्या दृष्टिने अत्यावश्यक बाब आहे. ही सोय उपलब्ध करुन देण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने राज्यभरातील सर्व महापालिकांना दिला आहे. परंतु या प्रश्नाकडे अद्यापही फारसे गांभीर्याने पाहिले जात नसून केवळ कागदोपत्री पुरावे दिले जात आहेत.

महापालिकेमार्फत महिलांसाठी शहरामध्ये मोफत मुताऱ्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. परंतु त्या कुठे आहेत याबाबत नेमकी माहिती नाही. याबाबतच्या अहवालात ही माहिती आहे.

डॉ. सुनील बुकाणे, आरोग्य अधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीतही सेना-भाजपात दुरावा

$
0
0

जिल्हाधिकाऱ्यांबरोबर स्वतंत्र बैठका; सिन्नरमध्येही तीच तऱ्हा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील गारपीटीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात रविवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह शिवसेनेच्या मंत्र्यांनीही पाहणी दौरा केला. मात्र या अवकाळीच्या दौऱ्यातही सेना भाजपच्या मंत्र्यामंध्ये दुरावा पहायला मिळाला. गिरीष महाजन आणि सेनेच परिवहन मंत्री दिवाकर रावते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सिन्नरमध्ये स्वतंत्र दौरे केले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचीही गोची झाली.

विशेष म्हणजे शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री उपस्थित असताना सेनेच्या मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली. त्यात पालकमंत्र्यांना डावलून अवकाळीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश सेनेच्या मंत्र्यांनी दिले. त्यामुळे अवकाळीतही शिवसेना भाजपमधील दुराव्याचीच चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये होती. अवकाळी सारख्या गंभीर आपत्तीतही सेना भाजप मंत्र्यामधल्या या दुराव्यामुळे नुकसानग्रस्तांची फरफट होऊ नये म्हणजे झाले, अशी प्रतिक्रिया उमटली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images