Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चांदवडमध्ये १,६८५ शेतकऱ्यांचे नुकसान

$
0
0

अवघ्या काही दिवसांपूर्वी अचानक आलेल्या गारपिटीमुळे चांदवड परिसरातील शेतकरी जरा कुठे सावरत असताना पुन्हा शुक्रवारी रात्रीसह शनिवारी आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने चांदवड परिसरातील १२ गावातील तब्बल १६८५ शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, कांदा आणि द्राक्ष पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान करीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. शनिवारी उशिरापर्यंत अवकाळीचे तांडव सुुरू होते.

शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या गारपिटीने चांदवड तालुक्यातील बहादुरी, बोराळे, शिवरे, जांबुटके, दह्याने, पारेगाव, दुधखेडा, नवापूर, विजयनगर, इंदिरानगर यासह विविध गावातील पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी केली आहे. एकूण १६८५ शेतकऱ्यांच्या ८६० हेक्टरवर निसर्गाने आसूड ओढला आहे. गहू २०० हेक्टर, हरभरा ९० हेक्टर, कांदा २१० हेक्टर आणि द्राक्ष ३६० हेक्टरवरील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सर्वाधिक नुकसान द्राक्ष उत्पादकांचे झाले असून, कांदे सडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या काही महिन्यात सलग अवकाळी पाऊस आणि गारपीट यांनी चांदवड परिसरात धुमाकूळ घातल्याने आभाळ कोसळलेय फिर्याद कुठे करायची अशी सर्वांची अवस्था असल्याचे चित्र आहे. दरम्यान या नुकसानीची शासकीय नोंद करण्यात आली आहे.

मनमाड-नांदगावला पाऊस

मनमाडला विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नांदगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. आमोदे येथे एक पारडू मृत्युमुखी पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीचे संकट हटता हटेेना...!

$
0
0

टीम मटा : सततच्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी जिल्हाभर अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले. सिन्नर, निफाड, दिंडोरी तालुक्यात गारपिटीने तांडव घातले आहे, तर उर्वरित तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची दैना उडवली. कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सिन्नर तालुक्यात सलग दोन दिवस गारपीट झाली. यामुळे कांदा, डाळिंब, द्राक्ष, गहू या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच निफाड तालुक्यात शुक्रवारी पाऊस तर शनिवारी गारपीट झाली. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. चांदवड व दिंडोरी तालुक्यातही गारपिटीने थैमान घालत होत्याचे नव्हते केले आहे. कळवण, मालेगाव, सटाणा, नांदगाव, येवला या तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे.
निफाडला गारपिटीचा तडाखा
निफाड तालुक्यात अवकाळी पावसाचा व गारपिटीचा कहर सुरूच असून, गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसाचे पंचनामे पूर्ण होता न होतात तोच पुन्हा शुक्रवारी व शनिवारी तालुक्याला अवकाळी पाऊस व गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. सततची गारपीट, अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाने शेती व्यवसाय संकटात सापडल्याने कष्टकरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील अनेक भागात तुफान पाऊस झाला, तर शनिवारी सायंकाळी लासलगाव, नैताळे, उगाव, शिवडी, निफाडच्या गोदाकाठातील औरंगपूर, भेंडाळी, भुसे, चापडगाव, आदी काही गावांमध्ये गारपीट झाली. गारपिटीमुळे सर्वात जास्त नुकसान द्राक्षबागांचे होणार असून, शनिवारी निफाड तालुक्यातील द्राक्षपंढरी समजल्या जाणाऱ्या उगाव - शिवडी परिसरातही गारपीट झाल्याने नुकसानीच्या आकड्यात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निर्यातक्षम द्राक्ष, दर्जेदार कांदा, डाळिंब आदी पिकांचे उत्पादन घेण्यात व नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून आधुनिक शेती जोपासण्याकडे कल असलेल्या निफाड तालुक्यातील शेती व्यवसायाला या अस्मानी संकटामुळे जबरदस्त हादरा बसला असून, करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी अंगाचा थरकाप उडविणाऱ्या मेघगर्जनेसह आलेल्या अवकाळी पावसात तालुक्यातील लासलगाव, निफाड, विंचूर, नैताळे, शिवरे, नांदुरमध्यमेश्वर, भेंडाळी, औरंगपुर, सायखेडा, चांदोरी आदी गावांसह जवळपास २४ गावांमधील १२०० शेतकऱ्यांना फटका बसला असून नव्याने सुमारे ८०० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे, कांदा, गहू व इतर शेतमालाचे नुकसान झाले असून, शनिवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीने नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता असल्याची प्राथमिक माहिती निफाडचे तहसीलदार डॉ. संदीप आहेर यांनी दिली.

उरल्यासुरल्या अपेक्षांवर पाणी

मालेगाव शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या ‌दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसला. सतत ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि अवघ्या काही वेळात होत्याचे नव्हते करणारा मुसळधार बेमोसमी पावसामुळे उरल्यासुरल्या अपेक्षांवर पाणी फिरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. सलग तिसऱ्या ‌दिवशी पावसाने झोडपल्याने नक्की नुकसान झाले किती हे पहायला देखील काही शिल्लक नाही. रब्बी हंगामतील गहू हराभरा पिके अगदी काढणीवर आलेली असताना अवकाळी पावसाने कांदा, गहू, हराभरा पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र आहे. खरीप हंगामात काही हाती आले नाही. रब्बीतही शेती व्यवसायावर अवकळा पसरल्याने शेतकरी हालदिल झाला आहे.

दरम्यान, मालेगाव वेधशाळेच्या अंदाजनुसार शनिवारी सायंकालपर्यंत ८.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. आद्रतेचे प्रमाण लक्षात घेता येत्या २४ तासात सतत ढगाळ वातावरण कायम राहणार असून, अवकाळी पावसाची भीती कायम आहे. महसूल विभागाकडून नुकसानीचा अंदाज घेतला जात असून, गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाने तालुक्यात तीन गावात चार बैल मृत झाल्याचे समजते. अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. पंचनाम्यानंतरच नुकसानीचा अंदाज येणार आहे.

गेल्या दोन दिवसात झालेला अवकाळी पाऊस म्हणजे निसर्गाचा प्रकोप म्हणावा की काय असे वाटत आहे. कधी कडकडीत ऊन पडते, तर अचानक काळेकुट्ट ढग उभ्या पिकावर तुटून पडत आहे. मात्र, खरीप तर गेला पण आता रब्बी हंगामात देखील होत्याच् नव्हतं झाल आहे.

- समाधान पवार, शेतकरी

सिन्नरला गारांचा खच

सिन्नरच्या पूर्व व पश्चिम भागातील गावांना शुक्रवारी दुपारी, तर शनिवारी सकाळी गारपीट आणि वादळी वाऱ्याने चांगलेच झोडपले. अवकाळीच्या पावसाने द्राक्ष, डाळिंब बागा आणि गहू, कांदा, ज्वारीसह इतर रब्बीच्या पिकांचे अतोनात झाले आहे. गेल्या दोन तीन दिवसात पावसाने शेतात उभ्या असलेल्या रब्बीच्या पिकाचा बोजवारा उडवला आहे. हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. वडांगळी, देवपूर, सांगवी, सोमठाणे, तसेच डुबेरे, सोनांबे, कोनांबे व सिन्नर शिवारातील उभ्या पिके शेतात आडवी झाली. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. गेल्या आठवड्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाही तोच पुन्हा गारपिटीचा तडाखा बसला. रब्बी हंगामातील पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. तसेच विघनवाडी, लक्ष्मणपूर, दहिवाडी, मिठसागरे, शहा, कारवाडी आदी भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले. अवकाळीच्या तडाख्यात डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या. भरतपूर येथील सुधाकर गोरडे यांची पाच एकर शेवग्याची बाग उद‌्ध्वस्त झाली. या परिसरात सुमारे १५ मिनिटे सुपारीच्या आकाराच्या गारा पडल्याने शेतातील गहू, हरभरा, मका, कांदे या पिकांबरोबरच द्राक्षे आणि डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वडांगळीसह कीर्तांगळी, सांगवी, सोमठाणे, खडांगळी, हिवरगाव, देवपूर, शहा, भरतपूर, गुळवंच, बारागावपिंप्री, निमगाव तसेच नांदूरमध्यमेश्वर उजव्या कालवा भागातील बागायती पट्ट्यातील गावांना तुफानी गारांचा फटका बसला. रस्त्यात शेतात गारांचा खच पडला होता. तुफान गारपीट व पावसाने या परिसरातील शेती पूर्णतः नामशेष झाली. आधीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे झालेले नसताना पुन्हा अवकाळी पावसाने नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकुपोषण

$
0
0

>> डॉ. शाम अष्टेकर

मेळघाट आणि नंदुरबार किंवा जव्हार मोखाड्यातल्या आदिवासी बालकांचे कुपोषण आपण नेहमी वाचतो, ऐकतो. पण, आपल्या घरामध्ये मुले कुपोषित आहेत की काय याची आपल्याला शंकादेखील येत नाही आणि जागृत मध्यमवर्गालाही याबद्दल नीट माहिती नसते. कुपोषण अनेक प्रकारचे असते. पण, त्याचे दोन मुख्य प्रकार म्हणजे पोषणाची कमतरता (अल्पपोषण) आणि त्याउलट अतिपोषण किंवा स्थूलता. पूर्वी एखादे मूल लठ्ठ आहे, अशी शक्यता अगदीच कमी असायची, इतका की तो चर्चेचा विषय व्हायचा. बहुतेक वेळा अशी मुले काही ना काही संप्रेरक आजारांनी स्थूल झालेली असायची. मात्र, आता आपले मूल लठ्ठ होणे हे एक प्रकारचे कुपोषण आहे हे लक्षात यायला देखील खूप उशीर झालेला असतो. काही लोक तर याला चक्क गुटगुटीतपणा समजतात. खरे म्हणजे हा आपण ओढवून घेतलेला चक्क एक आजार आहे आणि तोही एक मोठा आजार.

मूलत: भारतीय वंशाच्या जन्मजात बाळांमध्ये देखील (ते सरासरी कमी वजनाचे असले तरी ) एक अंतर्गत लठ्ठपणा असतो असे अभ्यासात दिसून आले आहे. भारतीय बाळांच्या पोटामध्ये चरबीचा साठा ज्यादा असतो आणि त्याचे कारण कदाचित दुष्काळी परिस्थितीशी निसर्गाने जुळवून घेतलेली एक जनुकीय सोय आहे. मध्यमवर्गीय व उच्चमध्यम वर्गीय बालकांना गरजेपेक्षा अधिक खाऊ घालणे, जंक फुडस् म्हणजे खूप तेलकट किंवा गोड मिठाई वगैरे वस्तू खाऊ घालणे आणि त्या मानाने खेळण्या बागडण्याच्या किंवा कामाच्या बाबतीत बंधने घालून लाडोबा करून ठेवणे हे चुकीचे आहे, हे कळायलाच मुळी वेळ जातो. बालमजुरी वाईट असली तरी बालकांनी आपल्या घरात आई-वडिलांबरोबर घरगुती किंवा कौटुंबिक उद्योगात थोडेफार श्रम करणे ही गोष्ट सामान्यपणे चांगली समजायला पाहिजे. पण, त्यांना कामे सांगणे (विशेषत: मुलांना कामे सांगणे) म्हणजे काहीतरी चुकीचे आहे, असा आपण ग्रह करून घेतला आहे. गणिताच्या उदाहरणाप्रमाणे एखाद्या हौदात मोठ्या तोटीने पाणी पडत असेल आणि छोट्या तोटीने बाहेर पडत असेल तर तो हौद लवकर भरत जाईल. शरीरात देखील उर्जा खर्च करण्यापेक्षा अधिक भरली गेली, तर ती चरबी म्हणून साठते. ही चरबी पोटावर, पोटात, पाठीवर, नितंबांवर, हातपाय आणि चेहऱ्यावर देखील साठून राहते. पुढे पुढे तर यकृतामध्ये देखील चरबीचा अतिरिक्त साठा होऊन फॅटी डिजनरेशन ऑफ लिव्हर म्हणजे यकृत पेशींचा बिघाड होऊ शकतो. वाढीव चरबीमुळे मुले आणखीनच संथ व आळशी होतात. पण, वारंवार आणि जास्त खाणे हे थांबत नाही, उलट वेळ जाण्यासाठी किंवा कंटाळा आला म्हणून मुले अधिक खायला लागतात. समस्या दिवसेंदिवस वाढत जाते. कधीकधी आई-वडील याबद्दल टोचून बोलतात आणि इतर मुलांकडून किंवा शाळेत थोडी टवाळीही होऊ शकते. छोट्या कुटुंबात आई-बापांना मुलांकडे नीट लक्ष द्यायला वेळ देखील नसतो, त्याने त्यांचे आणि मुलांचे संबंधही ताणलेले असतात. अशी टीका टिपणी किंवा रागीट सल्ले ऐकण्याची मुलांची मन:स्थिती नसते. आपल्या शरीरात जमलेल्या चरबीचे काय करायचे हे लहान मुलांना माहीत असणे कदापि शक्य नाही. ही समस्या बालपणातून पौगंडावस्थेत वाढतच जाते. फारच कमी मुले यातून सुटू शकतात.

लहानपणापासून मुलांना आपण चालायला देखील जवळ जवळ मज्जाव करतो. शाळांसाठी बस, रिक्षा किंवा स्कूटरवर सोडणे, एखादी वस्तू आणायला देखील दुकानात न जाणे आणि शाळे व्यतिरिक्तचा वेळ शिकवण्या किंवा टीव्ही यात गुरफटून जातो. बाहेरच्या निसर्गाला आणि मैदानांना आपणच त्यांना पारखे करून ठेवलेले आहे. शारीरिक हालचाल व कष्ट यापासून दुरावलेला हा आपला समाज पुढच्या पिढीला अतिकुपोषणाच्या खाईत लोटत आहे. यातून या मुलांची तरुणपणात व पुढे देखील सुटका होण्याची संधीच निर्माण होत नाही. एखादा हितचिंतक, शिक्षक किंवा मित्र चांगला मिळाला तरच प्रयत्नपूर्वक यातून सुटकेची काही शक्यता असते.

शहरांमधली अनेक मुले लठ्ठ आणि बेढब झालेली आढळतात. अपेक्षित वजनाच्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक वजन म्हणजेच स्थूलता. लठ्ठपणा मोजण्याचे अनेक मापदंड आहेत. मुख्य म्हणजे वजन-उंची गुणोत्तर. पोटाचा घेर, त्वचेखालील चरबीची घडी हेही मापदंड उपयुक्त आहेत. सध्या सगळ्यात उपयुक्त मापदंड म्हणजे 'वजन (किग्रॅ) भागिले मीटरमध्ये उंचीचा वर्ग' हे गुणोत्तर २३ पेक्षा जास्त असेल तर वजन जास्त आहे असे समजावे आणि २८ पेक्षा जास्त असेल, तर चक्क लठ्ठपणा आहे असे सिद्धच होते. या लठ्ठपणाचे अनेक गंभीर दुष्परिणाम होतात. पुढे मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयविकार, कर्करोग, गुडघेदुखी वगैरे संभवतात. लैंगिक क्षमता व अपत्य होण्याची शक्यताही कमी होऊ शकते. व्यक्तीमत्वाबद्दलच्या पौगंडावस्थेतील प्रतिमा आणि वास्तव यातील विसंगतीमुळे मानसिकदृष्ट्या मूल विचलित होऊ शकते.

रोग होण्यापेक्षा प्रतिबंध चांगला हे या बाबतीत तरी फारच खरे आहे. मुलांच्या रोजच्या आहारात उष्मांकाबरोबर समतोल प्रमाणात चांगली प्रथिने, भाज्या व फळे असणे महत्त्वाचे असते. साखर, मीठ, तेल कमी करण्याकडे कटाक्ष असायला हवा. मूल तिसऱ्या-चौथ्या वर्षापासूनच सकाळ-संध्याकाळ १-२ तास खेळेल याकडे नक्की लक्ष द्यायला हवे. आपल्याबरोबर छोटी मोठी कामे करणे, दुकानातून वस्तू आणणे, शाळा थोड्या अंतरावर असेल तर सायकलने किंवा चालत जाणे, टीव्हीचा मर्यादित आणि कल्पक उपयोग

आणि वजन-उंची व स्नायू वाढीकडे चौकसपणे लक्ष ठेवणे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळवून देणे हे पालकांचेच काम आहे. याला फारसा खर्च येत नाही पण, आपली संस्कृती बदलावी लागते. आपले शारीरिक काम कमी मोबदल्यात इतर वर्गांवर टाकून शेवटी आपल्या पिढीचे अकल्याण होत आहे याकडे आपण एक शहरी समाज म्हणून लक्ष देणार आहोत का?

(लेखक वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूरला मिळणार ग्रामीण रुग्णालय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानास भेट दिली. सावरकरांच्या स्मारकासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही देतानाच भगूरमध्ये ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

डॉ. सावंत यांनी शनिवारी आपल्या धावत्या नाशिक दौ-यात सावरकर यांच्या जन्मस्थानास भेट दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, शिवसेना महानगरप्रमुख अजयजी बोरस्ते, भगूर नगरपालिका अध्यक्षा अनिता करंजकर यांनी त्यांचे स्वागत केले. सावरकरांच्या स्मारकासाठी निधी देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष करंजकर यांनी भगूरमध्ये ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली. त्यावेळी सांवत यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. नगरसेवक संजय शिंदे, विक्रम सोनवणे, शाम ढगे, दीपक बलकवडे, बापू शेटे, नगरसेविका सुनीताताई गणोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरसाठी आशा पल्लवित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या प्रस्तावित टप्यात सर्व संबंधितांची बैठक घेवून नाशिकचा समावेश करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत शुक्रवारी विधानपरिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले. आमदार जयंत जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आश्वासन दिले. आता या कॉरिडोरमध्ये नाशिकचा समावेश होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या विद्यमान टप्यातून नाशिकला वगळण्यात आल्याची खळबळजनक माहिती १६ जानेवारी २०१५ मध्ये निदर्शनास आली होती. सदर डीएमआयसी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या उद्योगांकरिता नाशिकमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याचा जलसंपदा विभागाने अहवाल दिल्यानंतर मराठवाड्यातील शेंद्रा आणि बिडकीन यांची निवड डीएमआयसी विद्यमान टप्यात केल्याचे निदर्शनास आले. हे खरे आहे काय? असल्यास जिल्ह्यात २३ लहानमोठी धरणे असल्याने त्यातून नाशिकसह अंशतः मुंबई मराठवाड्यालाही पाणीपुरवठा होतो. त्याचबरोबर डीएमआयसी विद्यमान टप्यात नाशिकचा समावेश करण्यासाठी शासनामार्फत तातडीची उपाययोजना केली आहे काय? असा प्रश्न आमदार जाधव यांनी विचारला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्हीसाठी पुनर्निविदा प्रसिध्द

$
0
0

शहरासाठी एक, तर त्र्यंबकसाठी तीन ठेकेदार उत्सुक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात तसेच त्र्यंबकेश्वर येथे बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीसाठी पोलिस प्रशासनाने पुनर्निविदा प्रसिध्द केली आहे. शहरासाठी फक्त एक, तर ​त्र्यंबकेश्वर येथे सीसीटीव्ही बसवण्यासाठी तीन ठेकेदारांनी मुदतीत अर्ज केले. इच्छुक ठेकेदारांची संख्या वाढवण्यासाठी निविदा पुनर्प्रसिध्द करण्यात आल्याचे पोलिस प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. शहरात ३४८, तर त्र्यंबकेश्वरमध्ये २०८ सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान शहरात तसेच त्र्यंबकेश्वरला लाखो भाविक, साधु-महंत येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव गतवर्षी समोर आला होता. मात्र, कॅमेऱ्यांची संख्या, ठिकाणे सातत्याने बदलत गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासह इतर मंत्र्यांनी कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवण्याबाबत आग्रह धरला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. सीसीटीव्ही कायमस्वरूपी बसवल्यानंतर येणारे इंटरनेट बिल, देखभाल दुरूस्ती यावर महिन्याकाठी कोट्यवधी रुपये खर्चाची तरतूदच करण्यात आली नाही. प्रशासन आणि राज्य सरकारच्या वादातच अखेर फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने भाडेतत्वावर सीसीटीव्ही बसवण्याच्या कामासाठी निविदा प्रसिध्द केल्या. निवीदा प्रसिध्द झाल्यानंतर मुदत संपेपर्यंत शहरासाठी एक, तर त्र्यंबकेश्वर येथे सीसीटीव्ही बसवण्यासाठी तीन ठेकेदारांनी रस दाखवला. शहरासाठी अवघ्या एका ठेकेदाराचा प्रतिसाद मिळाल्याने निविदा पुर्नप्रसिध्द करून वेळ वाढवून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीसीटीव्ही बसवण्यासाठी अद्याप तीन महिन्यांचा कालावधी बाकी असून, या काळात हे काम पुर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शहरातील १५७ ठिकाणी, ३४८ तर त्र्यंबकेश्वर २०८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. यात पॅनोरॅमिक, पीटीझेड, फिक्स, तसेच एएनपीआर अशा कॅमेऱ्यांचा समावेश आहे. कॅमेरे सुरू करण्याबरोबरच त्याचा डाटा काही कालावधीसाठी स्टोअर करण्याची जबाबदारी ठेकेदारावर आहे.

शहरातील सीसीटीव्ही

पॅनोरॅमिक १०३

फिक्स १५२

पीटीझेड ७५

एएनपीआर १८

एकूण ३४८

त्र्यंबकेश्वर येथील सीसीटीव्ही

पीटीझेड ४७

फिक्स ११५

पॅनोरॅमिक २५

एएनपी​आर १८

एकूण २०५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाला कौशल्याची जोड हवी

$
0
0

जेम्स राफेल यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तंत्रज्ञान, व्यवसाय आणि कौशल्य या तिघांच्या जोरावर तरुणांना संधी मिळू शकते. शैक्षणिक संस्थांमध्येच विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण मिळाले तर त्यांचा व्यक्तिमत्व विकास चांगला होतो. त्यामु‍ळे शिक्षणासोबत कौशल्याची जोड हवी, असे प्रतिपादन रिटेलर्स असोसिएशन स्किल कॉन्सिल ऑफ इंडियाचे ते चिफ ऑपरेटिंग ऑफिसर जेम्स राफेल यांनी केले.

कर्मवीर अ‍ॅड बाबुराव ठाकरे इंजिनिअरींग कॉलेजमध्ये 'एम्प्लॉयबिलीटी स्कील आणि एम्प्लॉयमेंट कॉनक्लेव्ह'चे शनिवारी आयोजन करण्यात आले. त्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, इन्स्टो कॉस्मेटिक्सचे उदय खरोटे उपस्थित होते. राज्यात दरवर्षी लाखोंच्या संख्येने इंजिनिअर उत्तीर्ण होऊन बाहेर पडत आहेत. मात्र अनेकांना रोजगार उपलब्ध होत नाही. त्याचे कारण कौशल्य हे असल्याचे राफेल म्हणाले. शिक्षण संस्था आणि उद्योग या दोघांनी आता हातात हात घेणे आवश्यक आहे. तसे झाले तरच उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल. त्याचबरोबर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य संधीही लाभू शकेल. आजघडीला उद्योगांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. कारण, त्यांना हवे असलेले कुशल कामगार मिळत नाहीत. यासाठीच ठोस आणि प्रभावी असे धोरण तयार होणे गरजेचे आहे, असे मतही राफेल यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्हिजन ऑफ स्कीलिंग इंडिया' या महत्त्वाकांक्षी उपक्रमावर आधारीत ही कॉनक्लेव्ह आहे. सरकारी व निमसरकारी संस्था आणि शैक्षणिक संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे उद्दिष्ट सफल झाल्याचे प्राचार्य डॉ. जयंत पत्तीवार यांनी सांगितले.

ब्रिजिंग द एम्प्लॉयबिलीटी स्किल्स अँड प्लेसमेंटस गॅप बिटवीन कॉलेजेस अँड कॉर्पोरेटस या विषयावर परिसंवादही झाला. त्यात आर्ट ऑफ लिव्हिंगचे सलिल पुळेकर, एचएएलचे डीजीएम एम ए हाफिज, डीटीईचे सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार, महिंद्राचे डीजीएम भारत मेवाडा, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वास पाटील यांनी सहभाग घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक सर्वार्थाने पर्यटनास अनुकूल

$
0
0

छगन भुजबळ यांचे मत;`तान`तर्फे टूरिझम कॉनक्लेव्हचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशातील झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांच्या स्पर्धेतील नाशिक शहर हे पर्यटनास अत्यंत अनुकूल आहे. नाशिकमधील नागरिकांपासून तर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी या परिसराच्या पर्यटनासंदर्भातील अनुकूल संदेश सर्वदूर पोहचवावा, असे आवाहन माजी पर्यटनमंत्री व विद्यमान आमदार छगन भुजबळ यांनी केले.

जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ नाशिक (तान) यांच्यावतीने हॉटेल एक्सप्रेस इन येथे आयोजित टूरिझम कॉनक्लेव्हच्या बी टू बी मीटमध्ये त्यांनी देशातील टूर ऑपरेटर्सशी संवाद साधला. या कॉनक्लेव्हसाठी देशातील विविध राज्य आणि शहरांमधून सुमारे साडेचारशे टूर ऑपरेटर्स उपक्रमात सहभागी झाले आहेत.

भुजबळ पुढे म्हणाले, 'झपाट्याने विकास साधणाऱ्या शहरांच्या तपशीलानुसार नाशिकचा देशात १६ वा तर राज्यात तिसरा क्रमांक आहे. या जिल्ह्यात धार्मिक आणि कृषी पर्यटनालाही चांगला वाव आहे. राज्यातील प्रमुख शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेला हा जिल्हा चार आणि सहापदरी महामार्गांच्या सोबतच, दूर अंतराचे रेल्वेमार्ग आणि नजिकच्या विमानतळांमुळे जगाशी जोडला गेला आहे. या सुविधांचा लाभ शहर आणि जिल्ह्यांच्या पर्यटन विकासासाठी शक्य आहे. या दिशेने टूरिझम कॉनक्लेव्हसारखे प्रयोग व्हायला हवेत,' अशीही अपेक्षा यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केली.

सुरूवातीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी यावेळी प्रास्तविक केले. नाशिक आणि परिसराच्या पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी चेंबरच्या माध्यमातून गत पाच वर्षांपासून सुरू असणाऱ्या प्रयत्नांचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. नाशिक महापालिकेच्या वतीने बोलताना नगरसेवक सचिन महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. शहरातील पर्यटन व्यवसायाच्या वृध्दीसाठी महापालिकेकडून अपेक्षित सहकार्य केले जाईल, असाही विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

स्टॉल्सला मिळाला प्रतिसाद

देशभरातील टूर ऑपरेटर्सना शहरातील हॉटेल्स आणि पर्यटकांना पूरक अशा बाबींची माहिती उपलब्ध होण्यासाठी हॉटेल व्यावसायिक आणि बिल्डर्स, उद्योजकांनी कॉनक्लेवहच्या ठिकाणी स्टॉल्स उभारले आहेत. देशभरातून आलेल्या टूर ऑपरेटर्सनी या स्टॉल्सला भेटीगाठी देत शहरातील पर्यटन विषयक बाबींचीही माहिती करून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलांचे सोमवारी कामबंद आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अलाहाबाद येथे पोलिसाकडून वकिलाची कोर्टाच्या आवारातच गोळी मारून हत्या करण्याची घटना बुधवारी घडली. या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी नाशिक बार असोसिएशनतर्फे कामबंद आंदोलन छेडण्यात येणार आहे. मागील महिन्यातही वकिलांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन छेडले होते.

अलाहाबाद येथील स्थानिक कोर्टात वैयक्तिक वादातून एका पोलिसाने गोळी झाडून वकिलाची हत्या केल्याची घटना बुधवारी घडली. यानंतर उत्तर भारतातील अनेक कोर्टांत वकिलांनी कामबंद आंदोलन छेडले. आता, ऑल इंडिया बार असोसिएशने भारतभर हे आंदोलन छेडण्याचे पत्र पाठवले आहे. त्यानुसार शनिवारी कोर्टात नाशिक बार असोसिएशनची बैठक पार पडली. कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्णय झाल्याची माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीए प्रवेश परीक्षेला अडीच हजार विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एमबीए अभ्यासक्रमासाठी शनिवारी झालेल्या प्रवेश परीक्षेला उत्तर महाराष्ट्रातून जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. दोन सत्रात झालेली ही परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडली. रविवारीही दोन सत्रात ही परीक्षा पार पडणार आहे.

तंत्रशिक्षण विभागातर्फे एमबीए या अभ्यासक्रमासाठी शनिवारी आणि रविवार असे दोन दिवस दोन सत्रात प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. सकाळी दहा ते दुपारी दीड आणि दुपारी २ ते साडेचार या वेळात ही परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेचा शनिवारी पहिला दिवस होता. नाशिक शहरातील मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये दोन्ही सत्रात एकूण १६८, गुरू गोविंदसिंग पॉलिटेक्निकमध्ये एकूण ३२३, गुरू गोविंद सिंग इंजिनिअरींग कॉलेजमध्ये एकूण २०३ आणि संदीप फाऊंडेशनमध्ये एकूण ८८५ विद्यार्थी उपस्थित होते. तर, धुळे येथील भारती बहुद्देशीय संस्थेच्या ठिकाणी झालेल्य़ा परीक्षेला दोन्ही सत्रात अनुक्रमे ८७ आणि ८८ विद्यार्थी उपस्थित होते. जळगावच्या रायसोनी इंजिनीअरींग कॉलेजमध्ये झालेल्या परीक्षेला दोन्ही सत्रात अनुक्रमे २७८ आणि २८५ विद्यार्थी हजर होते. नंदुरबारच्या एमआयटी कॉलेजमध्ये झालेल्या प्रवेश परीक्षेला दोन्ही सत्रात प्रत्येकी २१ विद्यार्थी उपस्थित होते. नाशिकमध्ये एकूण १५३९, धुळ्यात १७५, जळगावमध्ये ५६३ तर नंदुरबारमध्ये एकूण ४२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. रविवारीही दोन सत्रात ही परीक्षा पार पडणार असल्याचे तंत्र शिक्षण मंडळाचे सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर एका दिवशी एकच पेपर

$
0
0

लॉसाठी पुणे विद्यापीठाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लॉच्या अभ्यासक्रमाचे दोन पेपर एकाच दिवशी नियोजित करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला अखेर जाग आली असून, एका दिवशी एकच पेपर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे विद्यापीठाने जाहीर केले आहे.

पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार नेहमीच चर्चेत राहतो. यंदाही विद्यापीठाने लॉचे दोन पेपर एकाच दिवशी ठेवून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होता. विद्यापीठाच्या वेबसाईटवर आगामी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले होते. त्यात ही बाब उघड झाली होती. त्याची दखल घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष चिन्मय गाढे, महेश सोनवणे, अमोल सरोदे, दीपक भुसाळ आदींच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाच्या उपकेंद्राचे समन्वयक रावसाहेब शिंदे याची भेट घेतली होती. विद्यापीठाने लॉच्या १२ वी नंतरच्या ५ वर्षांच्या अभ्यासक्रमांचे आणि पदवीनंतर ३ वर्षांच्या अभ्यासक्रमांचे एप्रिल-मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. ज्या विद्यार्थ्यांचा गेल्या सेमिस्टरचा राहिलेला पेपर आणि यंदाच्या सेमिस्टरचा पेपर हे दोन्ही एकाच दिवशी नियोजित करण्यात आला होता. बीसीएल-४ या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाचे २८ एप्रिल रोजी ११ ते २ या वेळेत मागील सत्राचा फॅमिली-२ या विषयाचा ३ ते ६ या वेळेत न्यायतत्वशास्त्र असे दोन पेपर एकाच दिवशी होते.

विद्यार्थ्यांना दोघांपैकी एका विषयाचाच अभ्यास करता येणार असल्याने या दोन्ही विषयांपैकी एका विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थींचे हे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पेपर एकाच दिवशी न ठेवता वेगवेगळ्या दिवशी ठेवावेत, अशी मागणी राविकाँने निवेदनात केली. त्याची दखल घेऊन एकाच दिवशी एकच पेपर घेण्याचे विद्यापीठाने जाहिर केल्याचे गाढे याने सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नायपर’साठी आज बैठक

$
0
0

कृती समितीची होणार स्थापना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल फार्मा एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (नायपर) नाशिकमध्ये स्थापन व्हावी यासाठी उंटवाडी येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्समध्ये रविवारी महत्त्वपूर्ण बैठकत होत आहे. या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

गेल्यावर्षी मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) आणि कृषी अनुसंधान केंद्र हे महाराष्ट्रात स्थापन करण्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र, या दोन्ही संस्था नाशिकच्या वाट्याला आल्या नाहीत. आयआयएम हे नागपूरला तर कृषी अनुसंधान केंद्र औरंगाबादला स्थापन करण्याचे निश्चित झाले. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी जाहीर झालेली नायपर ही संस्था नाशकात यावी, यासाठी आता जोरदार मागणी होऊ लागली आहे. त्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'नेही पुढाकार घेतला आहे. नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मोठी जनचळवळ उभी राहिली होती. त्याचप्रमाणे नायपरसाठीही कृती समिती स्थापन करण्याच्या उद्देशाने रविवारी सकाळी साडेअकरा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला खासदार हेमंत गोडसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, सर्व पक्षांचे पदाधिकारी, शहर परिसरातील विविध स्वयंसेवी संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. या कृती समितीद्वारे येत्या काळात नायपरसाठी आवश्यक तो पाठपुरावा राज्य आणि केंद्र सरकारकडे केला जाणार आहे. नायपरमुळे नाशिकच्या विकासाच्या वाटा अधिक विस्तीर्ण होतानाच उच्च शिक्षणाच्या संधी नाशिकमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहेत. या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात रस्त्यांचे मायक्रो प्लॅनिंग

$
0
0

पोलिस यंत्रणा सज्ज; ७० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी​, ना​शिक

कुंभमेळ्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या सात प्रमुख मार्गावरील भाविकांची गर्दी, बॅरकेडींग आणि बंदोबस्तासाठी पोलिसांनी मायक्रो प्लॅ​निंगची सुरूवात केली आहे. यासाठी ७० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून, १५ मार्च रोजी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांना आढावा सादर करण्यात येणार आहे.

कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक शहरात दाखल होण्याची शक्यता असून, प्रत्येक विभागामार्फत मायक्रो प्लॅनिंग होणे आवश्यक आहे. सध्या, शहर पोलिसांमार्फत शहराशी सलंग्न असलेल्या प्रमुख सात मार्गांवर बंदोबस्त तैनात करण्याच्या दृष्टीने प्लॅ​निंग केले जाते आहे. यात बॅरेकेडींग, नो इंट्री झोन, नो व्हेईकल झोन, बाह्य आणि आतील पार्किंगमधील भाविकांचा ओघ आदी बाबींचा समावेश आहे. याबाबत माहिती देताना पोलिस सूत्रांनी सांगितले की, मुंबई आग्रा हायवेवरील राजुर बहुला येथे ७२ एकर जागेत बाह्य पार्किंग उभारले जाणार आहे. तेथून एसटी बसेसच्या मदतीने शहरातील पार्किंग मध्ये म्हणजे महामार्ग बस स्टॅण्ड येथे भाविकांना आणले जाईल. याबरोबर ना​शिक-पुणे हायवेवरील चिंचोली आणि मोहगाव येथून सिन्नर फाटा येथील मार्केट यार्डपर्यंत भाविकांना बसेसने आणण्यात येणार आहे. औरंगाबादरोड वरील माडसांगवी येथे, धुळेरोडवरील आडगाव येथे तर दिंडोरीरोडवर म्हसरूळ येथे बाह्य पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेठरोडवर मखमलाबाद येथे वाहने पार्क करून भाविकांना शरदचंद्र पवार मार्केट यार्डापर्यंत आणण्यात येईल.

गंगापूररोडवरील दुगाव फाटा येथे बाह्य वाहनतळ उभारण्यात येणार असून, तेथून भाविकांना सातपूर बस स्टॉपपर्यंत नेण्यात येईल. शाही स्नानावेळी ३६ तासापर्यंत शहरातील मुख्य रस्ते नो व्हेईकल झोन ठेवण्यासाठी पोलिस प्रयत्न करणार आहेत. या कामांत सुमारे ७० अधिकारी आणि कर्मचारी गुंतले असून, आज कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. १५ मार्च रोजी या कामाचा सविस्तर अहवाल पोलिस आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक

रेल्वे विभाग शहर पोलिसांच्या मदतीने मायक्रो प्लॅ​निंग तयार केले जाणा आहे. यासाठी आज, शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलिस आयुक्तालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. रेल्वेच्या मदतीने किमान दीड ते दोन लाख भाविक कुंभमेळ्यासाठी शहरात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. यापार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन परिसरात सुरक्षा, बाहेर पडण्याचे प्रशस्त मार्ग, स्टेशनमधून बाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी एसटी बसेसची सुविधा आदी प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. दोन ते तीन दिवसांनी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी शहरात दाखल होणार असून, त्यांच्या समवेत चर्चा केल्यानंतरच रेल्वेच्या मायक्रो प्लॅनिंगचे काम गती पकडेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपरफुटीवर मनसे आक्रमक

$
0
0

शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बारावीच्या अकाऊंट पेपर फुटीप्रकरणी आणि शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या कार्यालयात घोषणाबाजी करीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिक्षण विभागातील गोंधळाला शिक्षणमंत्री जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. अनेक ठिकाणी पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याच मतदारसघांत बारावी अकाऊंटचा पेपर फुटला. व्हॉट्सअपवर थेट प्रश्नपत्रिका फिरल्या. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांच्याच जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित नसल्याने मनसे शिक्षण मंत्र्यांविरोधात रस्त्यावर उतरली आहे. नाशिकमध्ये मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या १२ वीच्या परीक्षांचा सध्या राज्यात बोजवारा उडाला आहे. पेपर फुटल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर झालेच, मात्र पालकांनादेखील मनस्ताप सहन करावा लागला. शिक्षण विभागाच्या या अनागोंदी कारभाराला शिक्षणमंत्री जबाबदार असल्याच आरोप करीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाच्या कार्यालयात गोंधळ घातला.

राष्ट्रवादीतर्फे व्यसनमुक्ती अभियान

जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. १६) सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारक, नाशिक येथे व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाप्रमुख प्रेरणा बलकवडे यांनी दिली. गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व अन्य व्यसनांमुळे अनेक कुटुंबे उध्दवस्त झाली. यापुढे तरुण पिढी व्यसनाधिन होऊ नये म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी मोठे अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा भाग म्हणून सोमवारी दि. १६ मार्च रोजी हुतात्मा स्मारक, नाशिक येथे व्यसनमुक्ती कार्यक्रम करण्यात येत असून, यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रेरणा बलकवडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांचे पुतळा प्रेम!

$
0
0

नुकसान पाहणी दौरा ऐनवेळी रद्द; जळगावमध्ये कार्यक्रमाला हजेरी, शेतकरी संतप्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील केले असतांनाच शेतकऱ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी असणारे पालकमंत्री गिरीश महाजन यांना मात्र शेतकऱ्यांचे सोयरसुतक उरले नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अवकाळीचे थैमान सुरू असताना पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांंमध्ये अगोदरच सतांपाची लाट आहे. शेतकऱ्यांच्या संतापात महाजन यांनी शनिवारी आणखी भर टाकली. शनिवारचा नियोजित पाहणी दौरा रद्द करून जळगावमध्ये दिवंगत प्रल्हादराव पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले.

पंधरा दिवसांपासून होत असलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांंचे प्रंचड नुकसान झाले असताना शासकीय पातळीवरून त्यांच्या सात्वंनासह त्यांना धीर देण्याची आवश्यकता आहे. मात्र, शासकीय पातळीवर कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरू आहे, तर ज्यांच्यावर शेतकऱ्यांना संकटात धीर देण्याची जबाबदारी आहे, त्या शासनकर्त्यांची वर्तणुक निरोसारखी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वाऱ्यावर सोडला गेला आहे. रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत असल्याच्या घटनेचा प्रत्यय सत्ताधाऱ्यांकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत आहे. जिल्ह्यात चार वेळा गारपीट होवूनही महाजन शेतकऱ्यांकडे फिरकलेले नाहीत.

पालकमंत्र्यांच्या या दुर्लक्षावर टीका होताच, महाजन यांनी शुक्रवारी नाशिकच्या सिंहस्थ कामांच्या पाहणीसाठी शेतीच्या नुकसान पाहणीचा दौरा निश्चित केला. शासकीय यंत्रणेकडून त्यांच्या दौऱ्याची तयारीही पूर्ण करण्यात आली. शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या. मात्र, ऐनवेळी रात्री त्यांचा दौरा रद्द झाल्याचा निरोप प्रशासनाला मिळाला. पालकमंत्र्यांना दौरा रद्द करण्याचे कारण अधिकारी देऊ शकले नाहीत. काही तरी मोठे कारण असेल असे संगळ्यानाच वाटले. मात्र, पालकमंत्री महोदयांनी नाशिकचा दौरा रद्द करून जळगावमध्ये स्व. प्रल्हादराव पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला हजेरी लावणे पसंद केले. नाशिकचा शेतकरी अस्मानी संकटाने रडत असतांना, महाजन मात्र पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात हास्यविनोदात रंगले होते.

पदाधिकाऱ्यांच्या दबावानतंर आली जाग

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आणि व्यथांकडे पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यावर टीका होत असल्याची बाब स्थानिक पदाधिकाऱ्यांंनी गंभीरतेने घेत, पालकमंत्र्यांना तातडीने येण्याचे निरोप धाडले. पदाधिकाऱ्यांंच्या दबावानंतर पालकमंत्र्यांना पाझर फुटला असून, शनिवारी रात्रीपर्यंत ते नाशिकला पोहचत असल्याचे सांगण्यात आले. रविवारी ते जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील, असा दावाही करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजा घायकुतीला !

$
0
0

जिल्ह्यात गारप‌िटीचा धिंगाणा सुरूच; १० हजार शेतकऱ्यांचे नुकसान

म. टा. प्रतिनिधी, ना‌शिक

नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घालत शेतपिके मातीमोल केली आहेत. शुक्रवारी व शनिवारी झालेल्या गारपिटीमुळे कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष, डाळिंब ही पिके जमीनदोस्त झाली असून, शेतात गारांचा खच पडला होता. लिंबूच्या आकाराच्या गारांनी होत्याचे नव्हते केले असून, शुक्रवारच्या पावसाने एकट्या सिन्नर तालुक्यात ८ हजार २५० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अजूनही पेठ, बागलाण, मालेगाव, येवला, नांदगाव, देवळा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील नुकसानाचा प्राथमिक अंदाज अद्याप मिळाला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. तर शनिवारच्या पावसाने हजारो हेक्टरवरील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर निफाडमधील एका शेतकऱ्याचा गारप‌िटीमुळे बळी गेला आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरूच असून शुक्रवारी (दि. १३) त्यामुळे १४४ गावांमधील सुमारे दहा हजार शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. सर्वाधिक फटका सिन्नर तालुक्यात २३ गावांमधील २७५० हेक्टरवरील पिकांना बसला आहे. त्यातच शनिवारी (दि. १४) मध्यरात्रीपासून पावसाने धुडगूस घातल्याने शेतकरी गलितगात्र झाला आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री आणि दिवसभरात झालेल्या गारपीटीने सिन्नर आणि निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली आहे. सिन्नर, येवला व चांदवड तालुक्यालाही गारपिटीचा सामना करावा लागला. द्राक्ष, डाळिंब बागांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. मालेगाव, कळवण, सटाणा या भागात शनिवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. नाशिक शहरातही शनिवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

पावसाने जिल्ह्यातील एकाही तालुक्याला सोडलेले नाही. सर्वच १५ तालुक्यांमध्ये पावसाने अक्षरश: कहर केला आहे. पंचनामे करायला जावे तर त्यावेळीही पाऊस थैमान घालत असल्याने हे पंचनामे करण्यातही अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतपिकांच्या पंचनाम्यांचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. तालुका आणि गाव पातळीवरील यंत्रणा कामाला लावूनही पंचनामे आटोपण्याच्या कामाला गती मिळत नसल्याचे दिसते. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी झालेल्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान सिन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांना सहन करावे लागले आहे. सुमारे साडे आठ हजार शेतकऱ्यांचे द्राक्ष, डाळींब, टरबुज, कांदा, गहू, मका, हर रा या पिकांचे नुकसान झाले आहे.

शेतमजुराचा मृत्यू

निफाड तालुक्यातील शेतमजूर लक्ष्मण जनक कांबळे (वय ५५, रा. रानवड) यांचा मृत्यू घराचे शेड अंगावर पडल्यामुळे झाला. तुफान गारप‌िटीमुळे जिल्ह्यात घरांच्या पडझडीने अनेक प्रकार झाल्याचा अंदाज आहे. तर विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पाच बैल आणि एका गायीचा मृत्यू झाला. ही संख्या वाढू शकते असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. इगतपुरी येथे मुसळधार पावसादरम्यान वीज अंगावर पडून एका गायीचा मृत्यू झाला. याखेरीज दिंडोरी, निफाड, मालेगाव, चांदवड आणि ना‌शिक तालुक्यात वीज पडून ५ बैल दगावल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Latest Images