Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाईक यांचा नाशिक दौरा

$
0
0
आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक उद्या गुरुवारी (दि. २२) जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी साडेदहाला ते सटाणा येथे पोहोचतील. डॉ. संजय पाटील यांनी आयोजिलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील.

नाशिक मनपात कलगीतुरा

$
0
0
सिंहस्थ खर्चासह आर्थिक उत्पन्न कमी झाल्याने आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि नगरसेवकामंध्ये महासभेत मंगळवारी चांगलाच कलगीतुरा रंगला.

आपत्कालीन व्यवस्थापनावर खल

$
0
0
सिंहस्थ काळात आपत्तीजन्य परिस्थिती उदभवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांनी बनविलेल्या आपत्काल‌ीन आराखड्यांचा आढावा मंगळवारच्या साप्ताह‌िक बैठकीत घेतला.

नगरसेवकांना वाढीव ३० लाख

$
0
0
आर्थिक शिस्तीचे कारण देत नगरसेवकांच्या निधीला कात्री लावण्याचा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचा प्रयत्न महासभेने हाणून पाडला. निधीचा प्रश्न प्रतिष्ठेचा करीत नगरसेवकांनी वाढीव ३० लाखांचे दान पदरात पाडून घेतले आहे.

त्र्यंबकला CCTV कंट्रोलरुम

$
0
0
सिंहस्थात शहरात तसेच त्र्यंबकेश्वर येथे तात्पुरत्या स्वरुपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असले तरी त्र्यंबकेश्वर येथे कायमस्वरुपी सीसीटीव्ही कंट्रोल रूम बनविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

धोकादायक शाहीमार्ग

$
0
0
शाही मिरवणुकीच्या नवीन मार्गाला पंचवटीतील सिंहस्थ ग्रामोत्सव कमिटीने तीव्र विरोध दर्शविला आहे. या मार्गामुळे परंपरेला बाधा पोहोचणार असून, काही आखाड्यांचा मानही डावलला जाणार आहे.

मुलीच्या मारेकऱ्यास जन्मठेप

$
0
0
अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीस ​जिल्हा कोर्टाने जन्मठेपेची ​​शिक्षा ठोठवली. ही घटना २८ जुलै २०१२ रोजी पंचवटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती.

राज्यात दुष्काळ पडेल?

$
0
0
यंदा दुष्काळाला सामोरे जावे लागणार असल्याचे भाकीत डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले.

पोलिस-लष्करात शीतयुद्ध

$
0
0
देवळाली कॅम्प परिसरातील रहिवाशी भागात जवान तसेच अधिकाऱ्यांनी जाऊ नये, असा फतवा लष्काराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढला आहे. त्यामुळे देवळाली कॅम्प बाजारपेठेत पूर्णतः शुकशुकाट दिसून येत आहे.

सातपूरमध्ये मंदिरावरुन कलह

$
0
0
सातपूर, श्रमिकनगरमध्ये महापालिकेच्या जागेवर बांधण्यात येत असलेल्या विठ्ठल मंदिरावरून स्थानिक भाजप नेते एकमेकाविरोधात उभे ठाकले आहेत.

शिक्षकांना मिळाला PFचा हिशोब

$
0
0
महापालिकेच्या एक हजार शिक्षकांना पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला भविष्य निर्वाह निधीचा हिशोब मिळाला आहे. तसेच पाच वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या फंडाच्या स्लिपही शिक्षकांना देण्यात आली.

लष्कर-पोलिस चर्चा

$
0
0
उपनगर पोलिस स्टेशनमध्ये लष्कराच्या जवानांनी धुडगूस घातल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी बुधवारी सकाळी देवळाली कॅम्प येथे भेट देऊन लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

अतिक्रमणांवर हातोडा

$
0
0
अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमध्ये शहरातील महत्त्वाच्या आणि अतिशय वर्दळीच्या त्र्यंबकेश्वर रस्त्याला लागून असलेली ८० अतिक्रमणे महापालिकेच्या मोहिमेत जमिनदोस्त केली जाणार आहेत.

रस्त्यासाठी भूसंपादन

$
0
0
सिन्नर-नाशिक रस्त्याच्या चौपदरीकरणाबरोबरच ९.५१ किलोमीटरच्या बाह्य वळण रस्त्याचे मार्किंग करण्याचे काम सुरू असून, गोंदे येथून सुरू झालेली मोजणी गुरुवारपर्यंत पूर्ण होणार आहे.

जाविद अहमद यांचे नगरसेवकपद रद्द

$
0
0
मनपा नगरसेवक जाविद अहमद खातीब मुस्ताक अहमद यांनी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविताना सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द ठरविण्यात आले आहे. ही माहिती मनपा आयुक्त अजित जाधव यांनी दिली.

शेतक-यांना १९ कोटी ३९ लाखांचा निधी

$
0
0
राज्य शासनाकडून येवला तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला होता. खरीप वाया गेलेल्या हंगामानंतर हवालदिल शेतकऱ्यांच्या तोंडचा घास गारपिटीने रब्बीतही हिसकावल्याने दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात राज्य शासनाने पुढे केला आहे. पहिल्या टप्प्यात १९ कोटी ३९ लाख निधी तालुक्याला प्राप्त झाला आहे.

कच-याच्या नियोजनात बेफिकिरी

$
0
0
चेहेडी आणि मखमलाबाद येथे चुकीच्या पद्धतीने कचरा डेपोंचे प्रस्ताव प्रारूप विकास आराखड्यात करण्यात आले.

२७ केबल चालकांचे प्रक्षेपण बंद

$
0
0
वारंवार सूचना करूनही गेल्या तीन महिन्यांपासून थकीत करमणूक कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या शहरातील २७ केबलचालकांचे प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे.

प्रकाश लोंढेंवर टांगती तलवार

$
0
0
आरपीआयचे गटनेते व नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या सातपूरमधील अनधिकृत बांधकामाबाबत पालिकेच्या महासभेत दोन महिन्यात निर्णय घेवून तो नाशिक न्यायालयात सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मिळेना Ph. D. चे विद्यार्थी

$
0
0
संशोधनातूनच नवनवीन संकल्पना आणि प्रणालींचा जन्म होत असला तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल नसल्याचे स्पष्ट होत आहे. विद्यापीठामध्ये पीएचडीसाठीच्या तब्बल ५१०६ जागा रिक्त असून त्यात नाशिक जिल्ह्यातील १३० जागांचा समावेश आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images