Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

६ हजार बासऱ्यांतून अवतरला ‘यमन’ राग

$
0
0
एकाच वेळी सहा हजार बासरी वादकांच्या मुखातून बाहेर पडणारा यमन राग त्याच्या साथीला त्रिताल साक्षात स्वर देवता प्रसन्न झाल्याची अनुभूती देत होता. निमित्त होते आर्ट ऑफ लिव्हींग परिवारातर्फे नाशिक येथे उद्या (१२ जानेवारी) सादर होणाऱ्या वेणुनाद कार्यक्रमाची रंगीत ताल‌‌ीमीचे.

जातपंचायत विरोधी कायदा व्हावा

$
0
0
‘राज्यात जातपंचायतीच्या दहशतीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यांचे अमानुष न्याय निवाडे आणि शिक्षेच्या फतव्यांमुळे पिडीत कुटुंबातील व्यक्तींवर जीव गमावण्याची वेळ येऊ लागली आहे. राज्य सरकारने जात पंचायत विरोधी कायदा बनवावा,’ अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

मनसे नगरसेवक पुणे दौऱ्यावर

$
0
0
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील कचऱ्यापासून बायो ग्रॅस प्रकल्प तसेच २४ तास पाणी पुरवठा आदी प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक पुणे दौऱ्याला गेले आहेत. र‌विवारी दुपारी मनसेचा चमू पुण्याकडे रवाना झाला.

आता ओटे वाटपाची प्रतीक्षा !

$
0
0
सातपूर कॉलनीतील मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांसाठी ओटे तयार झाले आहेत. आता ओट्यांना केवळ भाजी विक्रेत्यांना वाटप कधी होतील याचीच प्रतीक्षा उरली आहे. यात महापाल‌किा व स्थानिक नगरसेवकांनी लवकरात लवकर भाजी विक्रेत्यांना ओटे वाटप करण्याची मागणी होत आहे.

पुरोह‌ित संघाकडून वस्त्रहरण

$
0
0
कुंभमेळ्यात एक कोटी लोक ज्या रामकुंडामध्ये स्नान करणार आहेत त्या परिसरात अजून एक रुपयाचेही विकास काम झालेले नाही. कोट्यवधी रुपयांच्या निधीतून भाविकांच्या सुविधेची कामे करण्याऐवजी निरर्थक चर्चेतच वेळ वाया जातो आहे.

दापुरला महाराष्ट्र बँकेवर दरोडा

$
0
0
सिन्नर तालुक्यातील दापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर शुक्रवारी मध्यरात्री दरोडा टाकून चोरट्यांनी सुमारे २६ लाख रुपयांची रोकड लांबवली. बँकेजवळ असलेले मेडिकल दुकानही चोरट्यांनी फोडले. चो-या व इतर गुन्ह्यांच्या सत्राने हैराण झालेल्या तालुक्यात या दरोड्यामुळे खळबळ उडाली आहे.

रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा बळी

$
0
0
एकलहरेजवळील गोदावरी पुलाजवळ रविवारी रेल्वेच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला. सहा दिवसांपूर्वीच एकलहरेजवळील कोटमगाव येथे विहीरीत पडून बिबट्याच्या पिलाचा मृत्यू झाला होता.

शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका

$
0
0
‘मातीत प्राण ओतू, दुर्दम्य आस आहे दाही दिशा ओलांडण्याचा, आम्हा जोश आहे’ चा गजर करीत आणी निसर्गाच्या कोपाने येणाऱ्या अस्मानी आणि आर्थिक संकटांनी धीर खचून जाऊन आत्महत्या करू नका, असे आग्रहाचे आर्जव करीत बळीराजाला जगण्याचा धीर देण्यासाठीचा प्रयत्न येवला एसटी स्थानकाच्या आवारात चिमुरडी मुले करीत होते.

माळेगावला होणार वाढीव पाणीपुरवठा

$
0
0
माळेगाव औद्योगिक वसाहतीततून माळेगाव ग्रामपंचायतीस वाढत्या लोकसंख्येसाठी वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या योजनेस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तत्त्वत: मान्यता दिली. यासह येथील इतर समस्यांबाबत आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेवून चर्चा करण्यात आली.

बाजार समिती झाली हायटेक

$
0
0
प्रशासकीय राजवटीत येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे रूप आता पालटू लागले आहे. बाजार समितीत दररोज येणाऱ्या शेतकरी, कर्मचाऱ्यांना पिण्याचे शुध्द पाणी, शिपायांना नवीन ड्रेसकोड, सुरक्षेसाठी १६ सीसीटीव्हींसह कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रीक इलेक्ट्रॉनिक हजेरी पत्रक यंत्र बसविण्यात आले आहे.

व्यावसायिकांकडूनच अतिक्रमण निर्मूलन

$
0
0
जेलरोड येथे अतिक्रमण मोहीम राबविण्याचे महापालिकेने जाहीर केल्यानंतर रविवारी सुमारे ५० व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे काढून घेतली. नवीन नियोजनानुसार नाशिकरोडला सोमवारी, १९ जानेवारीपासून अतिक्रमणे काढली जाणार आहेत.

‘ईएसआय’चे रस्ते खड्यात

$
0
0
कामगारांना रुग्णसेवाचे अत्यंत महत्त्वाचे असलेले कामगार विमा रुग्णालय परिसरातील सर्वच अंतर्गत रस्ते खड्यात गेले आहेत. या रुग्णलायाची निर्मिती झाल्यापासून रस्त्यांची दुरुस्तीच झाली नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. रुग्णालयात येणाऱ्या आजारी व्यक्तींचा त्रास कमी करण्यासाठी रस्त्यांची दुरुस्तीची मागणी कामगारांनी केली आहे.

सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणांवर फुल्या

$
0
0
रस्त्यावरील शेडस व इतर अतिक्रमण काढून टाकण्यापूर्वी त्यावर डिमार्केशन करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यासाठी शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी अतिक्रमण निर्मूलन, नगररचना तसेच विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम केले. यामुळे नागरिकांना स्वतः अतिक्रमण काढणे सोपे होत आहे.

रेल्वेच्या धडकेमुळे बिबट्याचा मृत्यू

$
0
0
एकलहरेजवळील गोदावरी पुलाजवळ रविवारी रेल्वेच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला. सहा दिवसांपूर्वीच एकलहरेजवळील कोटमगाव येथे विहीरीत पडून बिबट्याच्या पिलाचा मृत्यू झाला होता.

नाल्यांचे प्रदूषण रोखणार ‘फायटोरीड’

$
0
0
शहरातील विविध भागातील छोट्या-मोठ्या नाल्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व संशोधन संस्थेने (न‌ीरी) विकसित केलेल्या ‘फायटोरीड’ या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. शहरातील चार नाल्यांवर ही योजना लवकरच कार्यन्वित होणार असून यापैकी सोमेश्वर येथील प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे.

लोकसहभागाची शैक्षणिक चळवळ

$
0
0
विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची देवाण-घेवाण होण्यासाठी, माहितीचे रुपांतर ज्ञानात होण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्त्वगुण विकसित करण्यासाठी आणि ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीशी नाळ जोडण्यासाठी या केंद्रांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.

पॉवरग्रीडला विरोध कायम

$
0
0
पालखेड व रानवड परिसरात पॉवरग्रीड या कंपनीच्या अती उच्च दाबाची लाइन टाकण्याच्या कामाने एकीकडे गती घेतली असतानाच दुसरीकडे मात्र या लाइनमुळे वित्त व जीवितहानी होण्याचा धोका वाढणार असल्याचे सांगत पॉवरग्रीड लाइन परिसरातून जाऊ देण्यास पालखेड व रानवड परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध कायम ठेवला आहे.

महाराष्ट्र केसरी चौधरीची धुळ्यात मिरवणूक

$
0
0
महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा सायगाव (ता. चाळीसगाव) येथील पहिलवान विजय चौधरी याची धुळे जिल्हा व तालुका तालीम संघातर्फे रविवारी धुळे शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

विद्यार्थी पाठांतराच्या कोंडवाड्यात बंदिस्त

$
0
0
शाळा व महाविद्यालयातील शिक्षण लोप पावत चालले असून, अभ्यासक्रम पाठांतराच्या कोंडवाड्यात विद्यार्थी बंदिस्त होत चालले आहेत. याचा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या जबाबदार घटकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी केले.

अखेर प्राचार्यच करणार उपोषण

$
0
0
डॉ. एल. ए. पाटील यांना प्रताप कॉलेजच्या प्राचार्यपदी नियुक्त न केल्याने तिढा वाढला असून, आता हा प्रश्न आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. चौकशी समितीच्या चालढकलपणामुळे आश्वासनानंतरही डॉ. पाटील यांना प्राचार्यपदी नियुक्त न केल्याने त्यांनी आता सोमवारपासून उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images