Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

येवल्यात मांजा तपासणी

0
0
संक्रातीत पतंगासाठी नायलॉन मांजा वापरू नये, यासाठी येवला शहर पोलिस व नगरपालिका प्रशासनाने पतंग साहित्य विक्रेत्यांची बैठक येवला शहर पोलिस ठाण्यात बैठक घेऊन नायलॉन मांजा विक्री करू नये, असे आदेश दिले.

शिक्षकासाठी ग्रामस्थ एकवटले

0
0
येवला तालुक्यातील एरंडगाव बुद्रुक येथील उर्दू शाळेवरील एक प्राथमिक शिक्षक तात्पुरत्या स्वरुपात केवळ १५ दिवसांसाठी तालुक्यातील दुसऱ्या एका उर्दू शाळेसाठी देण्यात आला. मात्र महिना उलटला तरी ते शिक्षक परत न मिळाल्याने एरंडगाव येथील ग्रामस्थ अन् पालक चांगलेच संतप्त झाले आहेत.

उदासीन सरकारवर टीका

0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत राज्य सरकार बेफिकीर असल्याचे मत आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांनी व्यक्त केले आहे. तसेच, सरकारच्या उदासीन धोरणावर टीका करीत त्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत.

नायलॉन मांजाची दहशत

0
0
संक्रांती म्हणजे आनंदाचा गोडावा पेरणारा सण. आकाशात पंतग सोडून मनाची मनसोक्त सैर करणारा दिवस. मात्र, या सणावर नायलॉन मांजामुळे दहशतीचे सावट निर्माण झाले आहे. नायलॉन मांजा मनुष्याबरोबरच आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांसाठीही जीवघेणा ठरतोय.

शिवनेरी उद्यानाची दुरवस्था

0
0
सातपूर कॉलनीतील म्हाडाच्या आठ हजार स्किममध्ये महापालिकेने उभारलेले शिवनेरी उद्यान समस्यांच्या विळख्यात अडकले हे. सुमारे दोन एकरवर तयार करण्यात आलेल्या या उद्यानाची दुरवस्था झाली आहे.

चालकाचा तपशील बंधनकारक

0
0
खासगी वातानुकूलित प्रवासी वाहनांमधील प्रवाशांच्या सुव‌िधा आण‌ि सुरक्षेसाठी परिवहन व‌िभागाने नव्याने ‌न‌िर्देश द‌िले आहेत. यानुसार वाहनामध्ये चालकांच्या तपशीलासह प्रवाशांना आपत्कालीन उपयुक्त ठरणारी व‌िव‌िध माह‌ितीही ठळक स्वरूपात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सरकार मनपावर मेहेरबान

0
0
नाशिक महापालिकेच्या हलाखीच्या स्थितीचा विचार करीत राज्य सरकारने सिंहस्थ निधीत पालिकेला दिलासा दिला आहे. सिंहस्थ निधीच्या आर्थिक खर्चाचे सूत्र राज्य सरकारने बदलले असून, आता महापालिकेचा वाटा २५ तर राज्य सरकारचा वाटा ७५ टक्के राहणार आहे.

अतिक्रमणधारकांना आठवड्याची मुदत

0
0
नाशिक शहरातील अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमणे आणि बांधकामे पाडण्यासाठी महापालिकेने सुरू केलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम आठ दिवसांसाठी थांबविण्यात आली आहे. या कालावधीत व्यावसायिकांनी बांधकामांचे नकाशे पाहून स्वतःच अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.

वाहने पेटवली

0
0
देवळाली गावातील धनगर गल्लीत शुक्रवारी पहाटे नारायण भाऊराव सांबर यांच्या दोन मोटरसायकली अज्ञात इसमांनी जाळल्या. त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.

ओझर टर्मिनल हस्तांतरण

0
0
ओझर विमानतळ हस्तांतरणाचा प्रश्न संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी निकाली काढला. हे विमानतळ एचएएलकडे हस्तांतरीत करण्यास पर्रीकर यांनी मंजुरी दिली असून, औपचारिकता म्हणून एचएएलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीत त्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे.

विमानसेवा:७ कंपन्या उत्सुक

0
0
ओझर विमानतळ हस्तांतरणाचा प्रश्न संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी निकाली काढला. विमानसेवा देण्याबाबत सात कंपन्या इच्छुक असल्याने टर्मिनलवरून लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे.

देवळालीत रविवारी मतदान

0
0
देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेट बोर्ड निवडणुकीचा प्रचाराचा धुराळा शुक्रवारी सायंकाळी थंडावला. रविवारी, ११ जानेवारी रोजी आठ वॉर्डांसाठी निवडणूक होत असून रिंगणात ७२ उमेदवार आहेत. राज्यामध्ये युतीची सत्ता असली तरी येथे भाजप-शिवसेना एकमेकांच्या विरोधात आहे.

सरसंघचालक आज नाशकात!

0
0
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रिय कार्यकारिणीच्या ४० सदस्यांची नियोजन बैठक योग विद्याधाम गुरूकुल येथे चार दिवसांपासून सुरू असून, आज, शनिवारी सायंकाळी समारोप होवून सरसंघचालक मोहन भागवत नाशिक येथे रवाना होण्याची शक्यता आहे.

आजी झाली नातवाचा आधार

0
0
हेरंबला कुटुंबाची साथ मिळणे महत्त्वाचे असल्याचे लक्षात आल्यावर हेरंबच्या आजीने त्याच्या सारख्याच मुलांसाठी उत्कर्ष एज्युकेशन ही संस्था उभी केली अन् ऑटिझमवरील प्रत्येक आधुनिक उपचार पद्धतीची माहिती घेऊन नातवाला ऑटिझमवर मात करण्याचे बळ दिले.

बिबट्या विहिरीतून सुखरुप बाहेर

0
0
दिंडोरी तालुक्यातील चिकाडी शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने लाकडी शिडीद्वारे सुखरुपपणे बाहेर काढले. भक्ष्याचा शोधात आलेला बिबट्या शुक्रवारी विहिरीत पडला होता. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाकडी शिडी विहिरीत सोडली.

अपहृत बांधकाम व्यावसायिकाची सुटका

0
0
सिन्नर तालूक्यातून अपहरण करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाची सुखरूप सुटका झाली आहे. अपहरणकर्त्यांनी त्याला धारगाव शिवारात सोडून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रांजल कोलते असे त्या व्यावसायिकाचे नाव असून, ते नाशिकरोड परिसरात राहतात.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली जाहिरात बेकायदा

0
0
‘आगामी १० दिवसात बँक खाते एलपीजी ग्राहक खात्याशी न जोडल्यास गॅस पुरवठा बंद करण्याची कारवाई केली जाईल’ अशा आशयाची जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली जाहिरात पूर्णपणे बेकायदा असून, सर्वसामान्य ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा रोखण्याचा अधिकार कुणालाच नाही, असे स्पष्टीकरण पेट्रोलियम कंपन्यांनी दिले आहे.

अतिक्रमण मोहिमेचा धसका

0
0
रस्त्याचे सामासिक अंतरासह नगररचना नियमाप्रमाणे शहरातील विविध रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतल्यापासून विविध भागातील व्यावसायिकांनी आपापल्या दुकानांसमोरील शेडस स्वतः काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

महापा‌लिकेची पर्यावरण अहवालासाठी निविदा

0
0
शहरातील पर्यावरण स्थितीचा अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. हा अहवाल वर्षाअखेरीस महासभेला सादर करण्यात येतो. नियुक्त केलेल्या संस्थेने शहरातील हवा, पाणी, ध्वनी आदींचे प्रदूषण आणि दुष्परीणामाबाबत माहिती संकलीत करून त्याचा अहवाल सादर करणे क्रमप्राप्त आहे.

चौरसफुटाने फ्लॅट विकणाऱ्या बिल्डरांना दणका

0
0
राज्य सरकारच्या वैधमापनशास्र अधिनियमाप्रमाणे फ्लॅट व प्लॉट विक्रीचा व्यवहार खरेदीखतावर चौरसमीटरने होत असतानाही बिल्डरांकडून मात्र विक्री व्यवहार चौरस फुटानुसार केला जातो. वैधमापन विभागाने या विक्री प्रक्रियेवरच आक्षेप घेतला असून, शहरातील ४५० बिल्डरांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images