Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

संघर्षाचे फल‌ित

$
0
0
कुठल्याही व्यवस्थेची मनमान‌ी ही अंतिम ठरू शकत नाही, असाच संदेश सेंट फ्रान्स‌िस स्कूल व‌िरोधातील आंदोलनाच्या अंती म‌िळाला आहे. मनमानी‌ फी वसुलीतून नफेखोरी करू पाहणाऱ्या शालेय व्यवस्थापनाला रोखण्यात अखेरीस पालकांना यश आले.

विज्ञान एक्स्प्रेसला तुफान गर्दी

$
0
0
भारताच्या जैवविविधतेची माहिती देणाऱ्या विज्ञान एक्स्प्रेेसला तुफान गर्दी होत आहे. दोन दिवसांत २० हजार चारशे लोकांनी भेट दिली. यात दहा हजार विद्यार्थी असल्याची माहिती प्रदर्शनाचे व्यवस्थापक राघव पांड्या यांनी दिली.

टर्मिनलचे हस्तांतर नाममात्र दराने

$
0
0
ओझर येथील विमानतळाच्या ठिकाणी उभारण्यात आलेले पॅसेंजर टर्मिनल हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) नाममात्रदराने हस्तांतरीत केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच, येत्या काही दिवसातच हा प्रश्न निकाली निघेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

एक्झिक्युटिव्ह इंजिनीअरला वॉरंट

$
0
0
त्र्यंबकेश्वर शहरातील नद्यांच्या पूररेषेबाबतची माहिती सादर न केल्याप्रकरणी पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने पाटबंधारे विभागाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनीअरला अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच, आगामी सिंहस्थात त्र्यंबकेश्वरमध्ये मोबाईल मलजल शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

सिंहस्थ निधीसाठी तातडीने दिल्लीवारी

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी देण्याबाबत केंद्रीय नियोजन आयोगाने बोलविणे पाठविल्याने तातडीने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे लवकरच सिंहस्थ निधी मिळण्याची शक्यता आहे.

बलात्कार प्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी

$
0
0
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला १० वर्ष सक्तमजुरी आणि ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ज्ञानेश्वर उर्फ विनायक पंडित वाघ (२९, रा. धानोरे, ता. निफाड, जि. नाशिक) असे त्याचे नाव आहे.

पदाधिकाऱ्याच्या अतिक्रमणावर बुलडोझर

$
0
0
शहरातील रसोई हॉटेलमागील शुचितानगरमधील राज अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या फ्लॅटचे अतिक्रमण सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून तोडण्यात आले.

वीज‍पोल हटविण्यास अखेर मुहूर्त

$
0
0
औद्योगिक वसाहतीतील महावितरणचे सबस्टेशन ते निमा हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील विजेचे पोल हटविण्याचे काम अखेर महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून या रस्त्यावरून जातांना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. पोल हटल्यावर वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

अन् ‘त्यांचा’ डाव उघडकीस आला!

$
0
0
अधिकृत डिग्री व रजिस्ट्रेशन नसल्याने कारवाई करण्याचा धाक दाखवून डॉक्टरांकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीतील घनदाट, कावते आणि वाघ या तिघा युवकांनी सोमवारी केवलपार्कमधील डॉ. अमोल वाजे यांच्या क्लिनीकला ‘रेड’ मारली. आम्ही मीड‌ियाशी संबंधित व्यक्ती असून आम्हाला वैद्यकीय विभागामार्फत पाठवण्यात आले आहे.

आनंदवन ही प्रयोगशाळा

$
0
0
प्रथम मनाचा महारोग गेला तर शरीराचा रोग आपोआप बरा होतो. आमटे कुटुंबियांनी स्वीकारलेला हा वारसा मीही पुढे चालू ठेवला असून, कुष्ठरोगी व आदिवासी समाज यांची सेवा करून त्यांना समाजात उच्च स्थान मिळवून देणे गरजेचे आहे.

रस्त्याचे काम जानेवारीपासूनच

$
0
0
नाशिक ते सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम कुठल्याही परिस्थितीत जानेवारीपासून सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सोमवारी जाहीर केले आहे. भूसंपादनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जनसुनावणी घेतली. यावेळी त्यांनी ‌जिल्हा प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.

डॉक्टरांकडून होतेय वसुली

$
0
0
अधिकृत डिग्री व रजिस्ट्रेशन नसल्याने कारवाई करण्याचा धाक दाखवून डॉक्टरांकडून खंडणी उकळणाऱ्या एका टोळीचा सोमवारी पर्दाफाश झाला. टोळीतील दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून एकजण फरार झाला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितल्यानंतरच आपण डॉक्टरकडून वसुली केल्याचा जबाब संशयितांनी दिला असून यामुळे महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

अडतला स्थगिती; लिलाव पूर्ववत

$
0
0
शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून आडत व तोलाई वसूल करण्याच्या पणन संचालकांच्या निर्णयाला सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांनी पुढील आदेश येईपर्यंत स्थग‌तिी दिली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील व्यापारी आणि आडतदारांनी सोमवारी बेमुदत बंद घेत लिलावात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला.

उघड्या नाल्यात हॉटेलचे सांडपाणी

$
0
0
गंगापूररोडवरील बारदान फाट्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलचे सांडपाणी उघड्या नाल्यात सोडले आहे. यामुळे सोडलेल्या सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून पादचारी व वाहनचालकांना नाक, तोंड कपड्याने झाकून प्रवास करावा लागत आहे.

शिक्षकांच बिऱ्हाड आंदोलन सुरूच

$
0
0
आदिवासी विकास मंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळत नसल्याने आदिवासी आश्रमशाळामंधील तासिका शिक्षक आणि रोजदांरी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम आहे. संघटनेचे प्रमुख पदाधिकारीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याने चर्चा अर्धवट राहील्याने प्रशासननही हतबल झाले आहे.

वर्षभरात डेंग्यूचे ४९२ रुग्ण

$
0
0
नाशिक शहरातील ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. डिसेंबर महिन्यात शहरात नव्याने ६३ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वर्षभरात शहरात घेण्यात आलेल्या ११६६ डेंग्यूच्या संशयितांपैकी तब्बल ५९२ रुग्णांचे अहवाल पॉझीटिव्ह आला आहे.

रुग्णांच्या वेळबचतीसाठी टेलिमेडिकल प्रणाली

$
0
0
एकदा उपचार घेऊन गेलेल्या रुग्णांना पूनर्तपासणीसाठी पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यावे लागू नये, यासाठी सुरू केलेल्या टेलिमेडिकल प्रणालीला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

सिव्हिलमध्ये आणखी एक इर्मजन्सी वॉर्ड

$
0
0
अपघात आणि तत्सम आपत्कालीन परिस्थितीमध्ये एकाच वेळी २० रुग्णांना दाखल करता यावे यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणखी एक सुसज्ज तात्कालिक कक्ष निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे हॉस्पिटलमधील तात्कालिक कक्षांमधील एकूण बेडची संख्या आता ५० पर्यंत पोहोचली आहे.

अग्निशमन केंद्रांची उद्योजकांना प्रतीक्षा

$
0
0
सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत लघु, मध्यम व मोठे दीड हजारांपेक्षा अधिक उद्योग आहेत. यात सातपूर औद्योगिक वसाहतीत अग्निशमन केंद्र आहे तर अंबडला अग्निशमन केंद्रासाठी जागा देण्यात आली आहे.

अखेर सूर्यकांत गवळी यांची गच्छंती

$
0
0
राज्याच्या ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा असला तरी केंद्रीय मंत्र्याचा बडेजाव मिरविणाऱ्या सूर्यकांत गवळी यांची राज्य सरकारने अखेर गच्छंती केली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय ग्राहक दिनालाच गवळी यांना अध्यक्षपदावरुन डच्चू देण्यात आला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images