Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

...तर, सरकारविरोधात संघर्ष

$
0
0
अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पीककर्ज माफ करून आपत्तीग्रस्तांसाठी राज्य सरकारने कायमस्वरूपी आपत्कालीन निधी उभारावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

अभियंत्याची भूमिका महत्वाची

$
0
0
जिल्ह्याच्या विकासात अभियंत्याची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे कामांचा दर्जा उचांवून चांगले काम उभे करा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांनी केले.

आता पंतप्रधानांनाच साकडे

$
0
0
मुंबई ते नाशिक दरम्यान अति जलद रेल्वे सुरू करावी, या मागणीसाठी गेल्या दहा वर्षांपासून काटेकोर पाठपुरावा सुरू असला तरी त्यास यश आलेले नाही. रेल्वेमंत्र्यांनी तर यासंदर्भात पोहोच देण्याचीही तसदी घेतली नसून, आता याप्रश्नी थेट पंतप्रधानांकडेच पाठपुरावा करण्याचा निर्णय विठ्ठलराव तिडके यांनी केला आहे.

त्र्यंबकेश्वर येथे पाहणी

$
0
0
नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) अधिकाऱ्यांनी त्र्यंबकला जाऊन पाहणी दौरा केला आहे. त्र्यंबकला गोदावरी नदी काँक्रिटमध्ये बंदिस्त करतानाच तिचा नैसर्गिक प्रवाह बंद केला आहे.

विरोधकांचीही सरकारवर टीका

$
0
0
नाशिक जिल्ह्यासह राज्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारने प्रतिहेक्टरी १० ते २५ हजार रुपये अशी अल्पशी मदत देऊन बोळवण केली आहे. सरकारच्या या तोकड्या मदतीवर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी टीका केली असून, या मदतीतून शेतकरी पुन्हा कसा उभा राहील, असा सवाल उपस्थित केला आहे.

थकबाकीदारांसाठी नवे वर्ष कठीण

$
0
0
२५ हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या तब्बल दोन हजार मिळकतधारकांनी ३१ डिसेंबरपर्यंत थकबाकी जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच मिळकत जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा उपायुक्त आर. एम. बहिरम यांनी दिला आहे.

रामरथ मार्गच नवा शाही मार्ग

$
0
0
आगामी कुंभमेळ्यात आपत्ती होऊ नये यासाठी आता नव्या शाही मार्गाचे नियोजन सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील निर्देश दिल्यानंतर रामरथाच्या मार्गाचा विचार शाहीमार्गासाठी करण्यात येत आहे.

गारपीटग्रस्तांना दिलासा

$
0
0
उत्तर महाराष्ट्रासह कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात १२ ते १५ डिसेंबरपर्यत झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

स्वच्छता बनावी जीवनशैली

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने देशात सार्वजनिक स्वच्छतेबाबत अद्भूत जागरूकता निर्माण झाली आहे. हे वातावरण वाढविणे व स्वच्छता एक जीवन शैली बनविण्यासाठी काही गोष्टी करणे नितांत गरजचे आहे.

गरमागरम सूऽऽऽप

$
0
0
हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवणापूर्वी स्टार्टर्समध्ये पहिली पसंती दिली जाते ती सूपला. थंडी किंवा पावसाळा असेल तर हे गरमागरम सूप प्रत्येकालाच हवं असतं. पण आता हॉटेलमध्येच नव्हे तर घरच्या घरीच तुम्हाला असे सूप्स बनवता येणार आहेत.

चित्रकलेतील सौंदर्यावर व्याख्यान

$
0
0
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशि विभागीय केंद्र, पवार चॅरिटेबल ट्रस्ट, विश्वास को-ऑप बँक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि विश्वास कम्युनिटीतर्फे ‘लोकसंवाद’ या उपक्रमांतर्गत ‘चित्रकलेतील सौंदर्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

रंगणार ‘सुवर्ण मंदार’

$
0
0
संगीत नाटक या मराठी परंपरेतील काहीशा दुर्मिळ होत जाणाऱ्या गायकीचा नाशिककरांना आस्वाद घेता यावा यासाठी एक अनोखी मैफल रसिकांच्या भेटीला येणार आहे.

अनुभवा बॉलीवूडचा प्रवास

$
0
0
बॉलीवूडचा प्रवास प्रत्येकाच्याच आवडीचा. गेल्या कित्येक पिढ्यांनी बॉलीवूडचा हा रंजक प्रवास पाहिला आणि अनुभवला. त्यामुळेच बॉलीवूडने शंभर वर्षांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. संगीत असो वा नृत्य सर्वच माध्यमातून बॉलीवूडने रसिकांचे मनोरंजन केले.

थंडीची ऐशी-तैशी

$
0
0
गेल्या चार दिवसात नाशिककर थंडीने गारठलेले दिसत आहेत. पण या थंडीला घाबरुन घरात बसतील ते यंगस्टर्स कसले. अशाच काही यंगस्टर्सशी संवाद साधला असता, हा थंडा थंडा कूल कूल मोसम एन्जॉय करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

फुटपाथ नव्हे, फ्रुटपाथ!

$
0
0
फुटपाथ हा शब्द समोर येताच आपल्या समोर येते अतिक्रमण. दुकानदारांचा, फेरीवाल्यांचा, वाहनांचा जमेल त्या प्रकारचे अतिक्रमण. ही एक फार खेदजनक गोष्ट आहे. खरे तर, फुटपाथ म्हणजे सर्वसामान्यांचे व सर्वांसाठीची एक हक्काची वहिवाट.

पुरूषोत्तम इंग्ल‌िश स्कूलने पटकावला यशवंत चषक

$
0
0
संत यशवंतराव महाराज देवमामलेदार यांच्या १२७ व्या पुण्यत‌िथीच्या न‌िम‌ित्ताने आयोज‌ित न‌िबंध स्पर्धेचा न‌िकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेन‌िम‌ित्त देण्यात येणारा यशवंत चषक नाश‌िकरोड येथील पुरूषोत्तम इंग्ल‌िश स्कूलने पटकाव‌िला आहे.

टॅलेंट हंट झाले, पुढे काय?

$
0
0
नाशिकला कविता राऊत, अंजना ठमके, मोनिका आथरे, संजीवनी जाधव, किसन तडवी यासारख्या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या धावपटूंची परंपरा आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिच्या वाढदिवसानिमित्त हरसूल येथे टॅलेंट हंट स्पर्धा घेण्यात आली.

रक्तदान शिबिराला प्रतिसाद

$
0
0
एचडीएफसी बँकेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतून बॅँकेतर्फे संपूर्ण भारतात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. यंदाही संपूर्ण नाशिक शहरात रक्तदान शिबिर आयोजित करून ६५३ बॅग संकलित करण्यात आल्या.

...अन् शाळाही झाल्या काही क्षण स्तब्ध

$
0
0
ताल‌िबानी दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे पाकिस्तानमधील पेशावर शहरात आर्मी स्कूलवरील केलेल्या हल्ल्याचा व‌िव‌िध शाळांमध्ये न‌िषेध करण्यात आला.

तीन वर्षांपासून नाही घरपट्टी, पाणीपट्टी

$
0
0
बांधकाम व्यावसायिकाने अर्पाटमेंटचे काम पूर्ण केल्यानंतर महापालिकेकडून कप्लिशन अर्थात इमारत पूर्णत्वाचा दाखला घेतला. मात्र, त्यानंतरही घरपट्टी, पाणीपट्टीसाठी सोमेश्वर कॉलनीतील रहिवाशांची वणवण थांबू शकलेली नाही. तीन वर्षांपासून घरपट्टी व पाणीपट्टीच महापालिकेने दिलेली नाही.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images