Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

छावाकडून रास्ता रोकोचा प्रयत्न

$
0
0
मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात ठोसपणे बाजू न मांडल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाली, असा आरोप करीत अखिल भारतीय छावा मराठा संघटनेने भाजप सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केले.

कृषी अधिकाऱ्याला घेराव

$
0
0
बैलगाडी खरेदी तसेच विहिर खोदणीच्या कामांसाठी पैसे घेतल्याचा आरोप करीत गंगाम्हाळुंगी येथील संतप्त आदिवासी लाभार्थींनी कृषी अधिकाऱ्याला सोमवारी घेराव घातला.

मनापासून गायलेले गाणे भावते

$
0
0
आकार, इकार आणि ऊकार केवळ भाषेचेच नव्हे तर, संगीताचेही सौंदर्य खुलवितात. आवाजाबरोबरच बुध्दी, मन आणि हृदयापासून गायलेले गाणेच सुंदर होत जाते. असे गाणेच रसिकांच्या हृदयाला भिडते, असे मत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सोमवारी नाशिक येथे व्यक्त केले.

आश्वासनांचा पहिला दिवस कोरडाच

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील अवकाळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठ फिरवताच आपला शब्दही फिरवला आहे. सोमवारी विधिमंडळात गारपीटग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याचे आश्वासन त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रविवारी दिले होते.

टर्मिनलचे हस्तांतरण लवकरच

$
0
0
ओझर विमानतळाच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या पॅसेंजर टर्मिनलचे हस्तांतरण लवकरच होण्याचे सूतोवाच नागपूर येथे सोमवारी झालेल्या बैठकीतून मिळाले आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला हा तिढा मिटण्याची चिन्हे आहेत.

नाशिक @६.३ अंश

$
0
0
गारपीट आणि जोरदार पावसाने दोन दिवसांपूर्वी धुमाकूळ घातल्यानंतर जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी नाशिकचे किमान तपमान तब्बल ६ अंशांनी घटले असून, राज्यातील सर्वात निचांकी (६.३ अंश सेल्सिअस) तपमान जिल्ह्यात सोमवारी नोंदवण्यात आले.

तिला मिळालं सौभाग्याचं लेणं

$
0
0
शासकीय पातळीवर दौरे काढून एकीकडे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे सोपस्कार पार पाडले जात आहेत. मात्र, शेतीसाठी आपल्या सौभाग्यच लेणंही गहाण टाकणाऱ्या आपदग्रस्त महिलेच्या मदतीला शासन नव्हे, तर संकटग्रस्त बांधवच धावून आले.

नाशिकचे व‌िद्यार्थी बनणार लष्करी अधिकारी

$
0
0
एनडीएचे खडतर प्रश‌िक्षण पूर्ण करून नाश‌िकचे दोन व‌िद्यार्थी पुढील मह‌िन्यापासून भारतीय संरक्षक दलामध्ये रूजू होणार आहेत. नाशिकचा सुहास वाघ आणि चिन्मय कोर्डे हे दोघेही म‌ित्र वर्षभराच्या प्रश‌िक्षणासाठी लवकरच रवाना होणार आहेत.

कुसुमाग्रजांच्या साहित्यावर कॅलिग्राफी वर्कशॉप

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुसुमाग्रज अध्यासन आणि अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांतर्फे ९ ते ११ जानेवारी २०१५ या कालावधीत निवासी कॅलिग्राफी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

तुमच्या आयुष्यातील सांता कोण?

$
0
0
ख्रिसमस हा शब्द उच्चारला की लाल कपड्यातला सांताक्लॉज आठवतो. आपण व्यक्त केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा सांता आपल्या जादूई पोतडीमधून सगळ्यांना खूष करण्याचा प्रयत्न करतो.

सप्तशृंग गड स्वच्छ अन् सुंदर

$
0
0
अर्धे शक्तीपीठ सप्तशृंग गडावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. मात्र, ट्रस्ट आणि ग्रामपालिका प्रशासनाने संपूर्ण गडाची स्वच्छता केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

येवल्यात लवकरच निवडणूक

$
0
0
गेल्या ३ वर्ष ८ महिन्यांच्या प्रशासकीय राजवटीनंतर सहकार खात्याच्या वतीने येवला तालुक्यातील अंगणगाव येथील येवला औद्योगिक सहकारी वसाहतीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील वर्षी २० जानेवारी रोजी निवडणूक अन् त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे.

मालगाडीच्या चार डब्यांना आग

$
0
0
तालुक्यातील म्हसावद येथे कोळसा वाहून नेणाऱ्या मालवाहू गाडीच्या चार डब्यांना आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियं‌त्रण मिळविण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.

१४० प्रयोगांचे सादरीकरण

$
0
0
इगतपुरी तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग, विज्ञान अध्यापक संघ व बेलगाव तऱ्हाळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात जवळपास १४० शाळांच्या प्रयोग सादर करण्यात आले आहेत.

कर्मचारी, अधिकाऱ्यांची होणार पडताळणी

$
0
0
मुख्यालयी राहत नसल्यास जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद करण्याच्या नोटिसा उच्च न्यायालयामार्फत निघाल्यानंतर आता जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच अधिकारी अन् कर्मचाऱ्यांबाबत देखील कडक पवित्रा घेण्याचे निश्चित केले आहे.

तीन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

$
0
0
राज्याचे कृषी व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर सावखेडा ये‌थीलही एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली.

‘तो’ लाचखोर अधिकारी निलंबित

$
0
0
आदिवासी लाभार्थींचे अनुदान मंजूर करण्यासाठी लाच घेतल्याची तक्रार असलेल्या नाशिक पंचायत समितीचे कृषी अधिकारी नवलसिंग पवार याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुखदेव बनकर यांनी अखेर मंगळवारी निलंबित केले.

`विराट विजय`... तरीही पराजय!

$
0
0
ऑस्ट्रेलियन दौऱ्यात कोहलीचा विराट प्रयत्न फसला! मात्र, मागील ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील भारताची कामगिरी बघितली तर या कसोटीतील भारताच्या कामगिरीने आगामी कसोटी सामन्यातील कामगिरीबाबत आशा पल्लवित जरूर झाल्या आहेत.

ऑनलाईन वीजबिलास पसंती

$
0
0
महावितरणच्या अॉनलाईन वीज भरणा सुविधेला नाशिक जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या आनलाईन बिल भरण्याच्या संख्येत ७५ हजार २७४ ग्राहकांनी वाढ झाली.

फक्त ८५० पाळीव श्वानांची नोंद

$
0
0
महापालिकेकडून होणाऱ्या पाळीव श्वानांच्या नोंदणीमध्ये २०११ ते डिसेंबर २०१४ या चार वर्षांच्या कालावधीत अवघ्या ८५० श्वानांची नोंद करण्यात आली आहे. २००८ मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी हे पद निर्माण करण्यात आल्यापासून या कामास गती मिळाल्याचे दिसते.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images