Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

देवळालीत भाजपमध्ये वाद

$
0
0
देवळाली कॅन्टोन्मेट बोर्डाच्या निवडणुकीवरून शहर आणि ग्रामीण भाजपमध्ये महाभारत सुरू झाले असून, उमेदवारी वाटपावरून शहर कार्यकारिणी आणि ग्रामीण पदाधिकारी आमनेसामने आले आहेत.

सिंहस्थासाठी ७५० कोटी

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून ७५७.५६ कोटी रुपयांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यातील ३१५ कोटी रुपये नगरविकास विभागाने दिले आहेत. तर, विविध सरकारी विभागांना ४४१ कोटींचा स्वनिधी मिळाला आहे.

मनसेचे सचिन ठाकरे अखेर भाजपात

$
0
0
मनसेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन ठाकरेंनी अखेर मनसेला बाय बाय करीत देवळाली कॅन्टोन्मेट बोर्डाच्या निवडणुकीत भाजपतर्फे उमेदवारी मिळवली आहे. भाजपनेही त्यांना पायघड्या घालत देवळालीच्या निवडणुकीची सूत्रे बहाल केल्याने देवळाली भाजपात गटबाजी उफाळून आली आहे.

राज बदलणार पक्षाची चौकट

$
0
0
विधानसभेतील पराभवनानंतर जमिनीवर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाशिकवर पुन्हा लक्ष केंद्रित केले आहे. उद्यापासून (दि.१२) ते तब्बल चार दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकणार असून, नव्या जबाबदाऱ्यांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

राज पुन्हा नाशिक दौऱ्यावर

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारपासून नाशिक जिल्ह्याच्या चार दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी बारा वाजेपासून त्यांच्या दौऱ्याला प्रारंभ होईल. पहिल्या दिवशी राज ठाकरे शहरातील विविध प्रकल्प आणि गार्डन्सची पाहणी करणार आहेत.

लवकर बना ‘कल्चर क्लब’ चे मेंबर

$
0
0
रस‌िकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या ‘मटा कल्चर क्लब’ च्या नोंदणीला आमच्या वाचकांनी अल्पावधीत भरभरून प्रत‌िसाद द‌िला आहे. या उपक्रमाच्या मेंबरशीपसाठी आता वाचकांच्या हाती अत्यल्प कालावधी श‌िल्लक आहे. ऑफलाईन सोबत ऑनलाईन नोंदणीचा पर्यायही वाचकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

रुपेरी पडद्यावर अहिराणी सिनेमा

$
0
0
केवळ मौखिक परंपरेने धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या खान्देशी भागात बोलली जाणारी बोलीभाषा अहिराणी! बहिणाबाईंसारख्या प्रतिभासंपन्न कवयित्रिने कवितेत आणली.

पाईप लाईटिंग सेमिनार

$
0
0
बौद्धिक विकासाचे खेळ खेळण्यासोबतच गरज असते ती प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी मिळणेही गरजेचे असते. वस्तूंची माहिती फक्त चित्रांमधून किंवा तोंडी माहितीतून देण्याव्यतिरिक्त मुलांना त्या वस्तू वस्तू तयार करण्याची संधी मिळाली तरच त्यांचा बौद्धिक विकास होणे शक्य असते.

स्वच्छता मोहिमेची नाशकात एेशीतैशी

$
0
0
सातारा आणि रायगड जिल्ह्यातील निर्मल भारत अभियानात सहभागी झालेल्या गावांचा नाशिक जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियान उपक्रमांतर्गत पाहणी दौरा केला.

इगतपुरीतील मनसेला हवंय जिल्हाध्यक्षपद

$
0
0
नाशिक जिल्हा मनसेत संघटनात्मक फेरबदल होणार असल्याचे वृत्त आहे. त्यापार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षपद देण्यात यावे, अशी मागणी रेटली आहे. मनसेच्या स्थापनेपासून इगतपुरी तालुक्याने मनसे वाढीला प्रोत्साहनच दिले आहे.

जिल्ह्याचे पाणी जिल्ह्यासाठीच वापरा

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा हा जेमतेमच असल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठाहा जिल्ह्यातच वापरला जावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

पेट्रोल पंपांवर सौर प्रकाश!

$
0
0
देशात कार्यरत असलेल्या पेट्रोल पंपांच्या ठिकाणी वीजेच्या उपलब्धतेसाठी मोठ्या प्रमाणात इंधन खर्ची होत असल्याने या पंपांना वीजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पेट्रोल पंपांनी सौर ऊर्जेचा वापर करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने एकाढल्याने हे पंप सौर ऊर्जेद्वारे उजळणार आहेत.

सिंहस्थासाठी ९८९ कोटींचा निधी उपलब्ध

$
0
0
नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठी मंजूर आराखड्यानुसार आराखड्यातील समाविष्ट कामासाठी राज्य सरकारच्या विविध विभागाकडून आतापर्यंत ९८९ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माह‌िती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.

मराठी पाऊल पडते पुढे...

$
0
0
दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. पहिल्या मजल्यावर शेवटच्या कोपऱ्याला ते ऑफिस होते. पाहूनच भ्रमनिरास झाला. ज्या ढंगात त्याने फोन केला होता अन् ज्या प्रकारचे हिंदी कम इंग्लिश शब्द वापरून त्याने फिल्मवर चर्चा करण्यासाठी बोलावले होते, असे वाटले होते की हा ज्युनिअर यश चोप्राच असावा.

टेबलावर आपटल्या ४४००० फाईल्स

$
0
0
उत्तर महाराष्ट्रातील आदिवासींच्या प्रलंबित वनदाव्यांच्या प्रश्नासह विविध प्रश्नांसदर्भात लोकसंघर्ष मोर्चाच्या समन्वयक प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता आदिवासी आयुक्तांलयात आयुक्तांना घेरावासह ठिय्या आंदोलन करण्यात आले.

हो, नदीचा प्रवाह बंद केला

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचे पात्र संकुचित करतानाच ते काँक्रिटमध्ये बंदिस्त करण्यात आले असून त्यातूनच मलजल वाहत असल्याची साक्ष याचिकाकर्त्यांनी पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलपुढे दिली आहे. त्र्यंबकेश्वर गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात दाखल याचिकेची गुरुवारी अंतिम सुनावणी झाली.

न्याय द्या किंवा तुरुंगात टाका

$
0
0
नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील आदिवासींचे तब्बल ४४ हजार वनदावे प्रलंबित असतानाही आदिवासी विभाग वनदाव्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे संतापलेल्या आदिवासींनी शुक्रवारी वनदाव्याच्या या कुजलेल्या फाईल्स आदिवासी आयुक्तांच्या टेबलावर ठेवून त्यांना घेराव घातला.

भाजप-शिवसेना आमने सामने

$
0
0
देवळाली कॅन्टोमेन्ट बोर्डाच्या ११ जानेवारीला होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकासाठी आठ जागांसाठी रिंगणात ७२ उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी ४५ जणांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ यांनी ही दिली.

बैठकीत एलईडीवर पुन्हा प्रकाश

$
0
0
एलईडी फिटींग्ज बसवण्याच्या कामात ठेकेदाराला अपयश आले असून, त्याचा फटका शहरवासीयांना बसतो आहे. संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करता येईल, याबाबतचा अहवाल सादर करण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे.

लग्नपत्रिकेतून स्वच्छतेचा संदेश

$
0
0
स्वच्छ भारत अभियानाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणातप्रयत्न केले जात आहेत. या अभियानाची चळवळ व्यापक होण्यासाठी पंचायत समिती स्तरावर गट समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images