Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पावसाने दिलासा

$
0
0
बागलाण तालुक्यात मंगळवारी झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. शेतकरीवर्गाला या पावसाने दिलासा दिला असला तरी पाणीटंचाई दूर होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू

$
0
0
बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील रत्ना ईश्वर शेवाळे (३२) या महिलेचा बुधवारी स्वाइन फ्लूमुळे नाशिक येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्या गेल्या सहा दिवसांपासून मणक्यांचा त्रास होऊ लागल्याने सटाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या.

घर कोसळून चिमुरडीचा मृत्यू

$
0
0
यंदाच्या पावसाळ्यात दीड महिना दडी मारून बसलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून मनमाड शहरात हजेरी लावली. या पावसामुळे एका दोन वर्षांच्या बालिकेला आपला प्राण गमवावा लागला.

कांदा पुन्हा कडाडला

$
0
0
दोन वर्षांनंतर कांद्याने पुन्हा बाजार भावात प्रतिक्विंटल २,५०० रुपयांचा टप्पा पार करून २,७००पर्यंत मजल मारली आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून कांद्याच्या आवकेत दररोज मोठ्या प्रमाणात घट होत गेल्यामुळे प्रतिक्विंटल सरासरी १,३०० ते १,४०० रुपये भावाने विकला जाणारा कांदा २,७०० रुपयांपर्यंत गेला.

ब्रॉडबँड केबलचा देशभरात तुटवडा

$
0
0
टेलिकॉम क्षेत्रात गतिमान स्पर्धा असतानाही भारत संचार निगम लिम‌िटेडकडे (बीएसएनएल) ब्रॉडबँडसाठी आवश्यक केबलचा देशभरात तुटवडा असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळेच तोट्याच्या गर्तेत असलेल्या बीएसएनएलकडे देशभरातील लाखो ब्रॉडबँडचे अर्ज पडून आहेत.

पवार खून खटल्यातील आरोपी निर्दोष

$
0
0
बागलाण तालुक्यातील दसवेल येथील प्रशांत पवार खून खटल्यात संशयित आरोपी नितीन भामरे यांच्यासह अन्य चार जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. मालेगाव सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती के. जी. राठी यांनी हा निकाल दिला.

मनसेतर्फे बेरोजगारांना मदत

$
0
0
महाराष्ट्र व केंद्र शासनातर्फे अनेक जागांच्या नोकर भरतीसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत सिन्नर तालुक्यातील बेरोजगारांना माहिती हवी असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालय राजगड, सिन्नर येथे संपर्क साधण्याचे मनसे तालुका प्रमुख जयंत आव्हाड यांनी कळवले आहे.

बलात्कार करणाऱ्यास अटक

$
0
0
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस सिन्नर पोलिसांनी सापूतारा येथून अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ४८ तासांत पोलिसांनी त्याचा शोध लावला.

अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

$
0
0
सिन्नर तालुक्यातील दोडी ग्रामीण हॉस्पिटलमध्ये एका सोळा वर्षीय मुलीने मुलाला जन्म दिल्याचे उघडकीस आले. मुलीच्या पोटात दुखत असल्याच्या कारणावरून पालकांनी तिला दोडी येथील ग्रामीण हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

प्रिमियम टूलमधील उत्पादन सुरु होणार

$
0
0
प्रिमियम टूल्स कंपनी व्यवस्थापनाने ऑर्डर्स संदर्भात केलेल्या प्रयत्नांना तत्त्वतः यश मिळाल्याने कंपनीतील उत्पादन प्रक्रिया सुरु होणार आहे. येत्या रविवारपासून दोन शिफ्टमध्ये उत्पादन घेण्यात येईल, असे कंपनीने जाहिर केले आहे.

ट्रॅक्टर, कांदा भरलेली ट्रॉली पळवली

$
0
0
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आलेले ट्रॅक्टर कांदा भरलेल्या ट्रॉलीसह अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना बुधवारी घडली. कांद्याचे भाव तेजीत असताना सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा कांदा व लाखो रुपयांचे ट्रॅक्टर, ट्रॉली चोरीस गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

'विद्यार्थ्यांचे गुण हेरून संस्कार करा'

$
0
0
'प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी निसर्गदत्त गुण दडलेला असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडून एकच अपेक्षा कायम बाळगण्यापेक्षा त्याच्यातील गुण हेरून त्यांच्यावर संस्कार करा' असे आवाहन प्राचार्य किशोर पवार यांनी शिक्षकांना केले.

इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब दृष्टीपथात

$
0
0
नाशकात प्रस्तावित असलेल्या इलेक्ट्रिकल क्लस्टर अंतर्गत इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब दृष्टीपथात आली आहे. यासंदर्भात झालेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय वीज संशोधन संस्थेचे पथक शनिवारी नाशकात चाचपणीसाठी येणार आहे.

बंद रिक्षाचालकांचा; फटका विद्यार्थ्यांना

$
0
0
नाशिकरोड येथे आरटीओ व पोलिस वाहतूक शाखेने केलेल्या धडक कारवाईच्या विरोधात शालेय वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी गुरुवारी सकाळपासून अचानक बंद पुकारला. त्यामुळे विद्यार्थी-पालकांचे अतोनात हाल झाले.

विनास्वरांची बासरी

$
0
0
काहींना लक्षवेधी स्वर आळवण्याची हौस असते. स्वरांच्या यात्रेतही असे हौशै नवशे अन् गवशे भेटतातच. आषाढी एकादशीनिमित्त शहरात अनेक ठिकाणी सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

बोगस मतदारांना वगळून निवडणूक घ्या

$
0
0
जळगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळीला प्रारंभ होत असतानाच गुरुवारी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीमध्ये ६६ हजार ७३३ बोगस मतदारांची नावे उघडकीस आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नीरीला तीन आठवड्यांत पैसे द्या

$
0
0
गोदावरी प्रदूषणासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या नागपूरस्थित नॅशनल एन्व्हायर्नमेंट रिसर्च इन्स्टिट्यूटला (नीरी) तीन आठवड्यांत ४८ लाख रुपये विविध करांसहित जमा करावेत, असा दणका मुंबई हायकोर्टाने नाशिक महापालिकेला दिला आहे.

एमईचा आज अखेरचा राऊंड

$
0
0
अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर वर्गांसाठी आज चौथा आणि अखेरचा कॅप राऊंड असला तरीही राज्यभरातील अभियांत्रिकी पदवीचे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

'मटा'तर्फे मिळाल्या राशी सौंदर्याच्या टीप्स

$
0
0
राशीचे रत्न असतात, राशीचे रंग असतात, मग राशीला सौंदर्य का असू नये, हे सूत्र धरून 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे 'सौंदर्य तुमच्या राशीला' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जात प्रमाणपत्र तपासणीला बळ

$
0
0
मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत सरकारने १८ मे रोजी काढलेल्या परिपत्रकाची दखल राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने घेतली आहे. हे परिपत्रक रद्द करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न लक्षात घेऊन आयोगाने राज्य सरकारकडे याबाबतचा खुलासा मागितला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images