Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रस्त्यांचे होणार 'GSI मॅपिंग'

0
0
शहरातील सिमेंट काँक्रीट, डांबरी, कच्चे रस्ते आणि रस्तेच नसलेल्या भागांचे जीएसआय मॅपिंग (जीऑग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम) करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवी​ण गेडाम यांनी प्रशासनाला दिले आहेत.

‘न हि वैरेन वैरानि’ अव्वल

0
0
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ५४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला.

अधिसूचनेसाठी हालचाली

0
0
महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याची अंतिम अधिसूचना जाहीर करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी येत्या शनिवारी महसूल, वन व जलसंपदा विभागाचे अधिकारी शनिवारी नांदूरमध्यमेश्वरला भेट देणार असून येत्या १५ दिवसात सरकारला त्याचा अहवाल सादर होणार आहे.

प्राचार्या पोलिसांच्या ताब्यात

0
0
व‌िद्यार्थ्यांच्या पालकांकडून फी वसुलीसाठी दबावतंत्र वापरताना शाळेने मुलांना डांबून ठेवल्याच्या आरोपाखाली सेंट फ्रान्स‌िसच्या प्राचार्य व त्यांचे पती या दोघांना मंगळवारी सरकारवाडा पोल‌िसांनी ताब्यात घेतले. या दोघांविरोधात पालकास मारहाण केल्याचीही तक्रार पोल‌िसात नोंदव‌िण्यात आली होती.

प्राध्यापक २ महिने पगाराविना

0
0
डिसेंबर महिना उजाडला तरी राज्यातील प्राध्यापकांचे अॉक्टोबर आणि नोव्हेंबरचे पगारच झालेले नाहीत. विद्यादानाचे कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना सरकारी बाबू सातत्याने डिवचण्याचेच काम करत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

च‌िमुकल्यांच्या नृत्याने वेधले लक्ष

0
0
नाखवा बोटीन फिरवाल का, नगाडे संग ढोल बाजे, देवीच्या नावाचा जागर चालला, दरिया किनारे, एक बंगलो रे अशा व‌िव‌िध गीतांवर व‌िद्यार्थ्यांनी ठेका धरला. मव‌िप्रच्या सांस्कृत‌िक महोत्सवात समूहनृत्याचे सादरीकरण करताना त्यांनी गोंधळी अन् कोळी नृत्यासारख्या समूहनृत्यांनाही उपस्थ‌ितांची दाद म‌िळाली.

तुम्हीही व्हा सभासद...

0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘कल्चर क्लब’ या उपक्रमाला नाशिककरांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. या ‘कल्चर क्लब’च्या माध्यमातून कला आणि संस्कृतीशी या सर्वांची नाळ जोडली जाणार आहे. या उपक्रमांमध्ये चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांनीदेखील मानद सभासदत्व स्वीकारले आहे.

नाश‌िकच्या च‌िन्मयचे उडान

0
0
‘च‌िन्मय, हवाई दलाच्या वैमान‌िक पदासाठी तू तब्बल तेरा वेळा मुलाखतीत नापास झाला आहेस. आम्हाला वाटतयं तू या क्षेत्रासाठी पात्र उमेदवार नाहीस. तुझं मत काय ?’ या प्रश्नावर नाश‌िकचा च‌िन्मय खुर्द उत्तरला, ‘प्रत्येक अपयशात म‌ी माझी चूक सुधारतो आहे.

नाशिकची झेप आकाशाकडे

0
0
नाशिक हे पांरपरिक शहर म्हणून प्रसिध्द आहे. येथील राहणीमान हे सांस्कृतिक व धार्मिक परंपरेला अनुसरून आहे. शहरातील वाडा संस्कृती त्याचाच एक भाग आहे. पेशवेकालीन वाडे, सागवानीच्या नक्षीदार कलाकृती, ऐसपैस पसरलेले वाडे, संयुक्त कुटुंब व साधी राहणीमान या साऱ्या बाबी स्वप्नवतच वाटतात.

मतदार नोंदणी हरकतींबाबत १६ पर्यंत मुदत

0
0
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत नाशिक जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून, मतदान नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रारूप मतदार यादीनुसार, जिल्ह्यात ४० लाख ९७ हजार ९५६ मतदार आहेत.

नुसते चिंतन नको, हवेत ठोस उपाय!

0
0
फिलिप ह्युज एका गुणी क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच क्रिकेटविश्वाला दुसरा हादरा बसला. चेंडू मानेला लागल्याने मूळचे भारतीय असलेले व इस्रायलच्या क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन आणि अम्पायर म्हणून काम करत असलेले हिल्लेल आवस्कर यांचा मृत्यू झाला.

डेंग्यू रुग्णांच्या तपासणीत प्रशासनाकडून दिरंगाई

0
0
डेंग्यूमुळे रुग्णांचे बळी जाण्याचे प्रकार घडत असतांना प्रशासकीय पातळीवर जबाबदारी घेण्याबाबत उदासिनता आणि दिरंगाई कायम असल्याचे चित्र आहे. डेंग्यू झाल्याची माहिती दिल्यानंतर तब्बल आठवडाभरानंतर पाहणी केली जात आहे.

टोमॅटो शेड लवकरच हटणार

0
0
पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेल्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने अचानक घूमजाव करीत सर्वोच्च न्यायालयातून अपील मागे घेतले आहे.

ए २ दुधाचा देश

0
0
दूध हे शाकाहारींसाठी चांगल्या प्रथिनांचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे, अर्थात ते पुरेसे मिळाले तर! भारतात वेदकाळापासून दुधाची महती व गायीची खिल्लारे यांची चर्चा आहे.

मार्केट ऑन व्ह‌ील्स

0
0
नाशिक शहर मॉलचे शहर बनू पाहत असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ब्रॅण्ड नाशिकमध्ये रूजू पाहत आहेत. मात्र, शहरवासीयांची क्रयशक्ती असूनही मॉल संस्कृती सर्वसामान्याच्या मनात रूजू शकलेली नाही.

गुरूजींनी बांधल्या काळ्या फिती

0
0
श‌िक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) ‍त्रुटींमध्ये सुधारणा करुन श‌िक्षक व श‌िक्षकेतर पदांवरील टांगती तलवार दूर करावी आण‌ि श‌िक्षण घातकी धोरणांना पायबंद घालावा, या मागणीसाठी ज‌िल्हाभरातील शेकडो शाळांमधील हजारो श‌िक्षक व श‌िक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काळ्या फ‌िती लावून सरकारच्या धोरणांचा न‌िषेध केला.

महापालिका शाळांमध्ये आंदोलन

0
0
महापालिकेच्या शिक्षण मंडळातील वडागावची शाळा क्रमांक १८ मधील शिक्षक शाह मुश्ताक सांडू यांच्यावर चुकीचे आरोप करून त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ महापालिकेच्या १२८ शाळांतील शिक्षकांनी काळ्या फिती लावून ज्ञानदान केले.

घंटागाडी कर्मचाऱ्यांचा पुन्हा घंटानाद

0
0
नाशिक महापालिकेतील घंटागाडी कर्मचाऱ्यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तीन टप्प्यात सेवेत सामावून घ्यावे व इतर मागण्यांसाठी नाशिक महापालिका श्रमिक संघाच्यावतीने बुधवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला.

मक्याची विक्री अखेर तोट्यातच

0
0
सरकारने प्रत्येक जिल्ह्यात हमी भावाद्वारे खरेदी केलेला मका अखेर तोट्यातच विकण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील ९५ हजार क्विंटल मक्याची विक्रीही तोट्यातच होणार असून, सरकारला प्रति क्विंटल किमान ५०० ते ६०० रुपये घाटा येणार आहे.

प्रत्येक माणसाकडून शिकायला मिळतं

0
0
चित्रपटाच्या शूटिंगमुळे किंवा चित्रपटांच्या प्रमोशनमुळे विविध शहरांमध्ये फिरणे होत असते. नेहमी प्रवासात वेगवेगळी माणसे भेटत असतात. काही वेळेस तिच-तिच माणसं समोर येत असतात.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images