Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अतिक्रमित व्यावसायिकांचा सातपूरला विळखा

0
0
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील सातपूरला अतिक्रमित व्यावसायिकांचा विळखा पडला आहे. यात मशिद आणि महादेववाडी येथील व्यावसायिकांनीच पादचारी मार्गावर सर्वाधिक अतिक्रमण केले आहे.

रब्बीला आले बुरे दिन!

0
0
बागलाण तालुक्यातील सातत्याने घटणाऱ्या पर्जन्यमानाबरोबरच गेल्या सात ते आठ वर्षांपासून सातत्याने वाढलेल्या विजेच्या भारनियमनामुळे रब्बीक्षेत्र दिवसेंदिवस घटू लागले आहे.

भारनियमनाविरोधात इगतपुरीत मोर्चा

0
0
इगतपुरी तालुक्यात वाढते भारनियमन तसेच विजेच्या लपंडावामुळे लघु उद्योग, शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने इगतपुरी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला.

वनसंवर्धनासाठी १५ कोटींची योजना

0
0
तालुक्यातील ममदापूरसह पाच गाव परिसरातील जंगलात वनसंवर्धन योजनेतून कोट्यवधी रुपयांची विकासकामे होणार आहेत. तसेच, हरणांसाठी कुरणे, जलसाठे करण्यात येणार आहेत.

जळगाव-धुळे दरम्यान नॉन स्टॉप बससेवा

0
0
धुळे-नाशिक विनावाहक बायपास बससेवेला प्रतिसाद पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक येथील विभागीय कार्यालयाने जळगाव ते धुळे मार्गावरही विनावाहक बससेवा सुरू करण्यात आली आहे.

घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वाढता वापर

0
0
तालुक्यात ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. मात्र, ग्रामीण भागातील बहुतांशी हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅस सिलिंडरचा खुलेआम वापर करीत असल्याने महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

ग्रामपंचायतीसाठी ऑनलाइनचाच फतवा

0
0
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ऑनलाअन अर्जाची प्रक्रिया सपशेल फसल्यानंतरही निवडणूक आयोगाने पुन्हा ऑनलाइन अर्जांचाच हट्ट धरला आहे. त्यामुळे राज्यात एकूण १४५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक यशस्वी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता

0
0
भाजप सरकाराच्या लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि शिवसेनेचे दादा भुसे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याच्या वाट्याला किमान दोन राज्यमंत्रीपदे येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गुरुजींच्या दंडावर आज काळ्या फ‌िती

0
0
श‌िक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) ‍त्रुटींमध्ये सुधारणा करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज, बुधवारी व‌िव‌िध शाळांमध्ये काळ्या फ‌िती लावून न‌िषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

नोकरभरतीसाठी हवी बंधनात्मक खर्चात कपात

0
0
महापालिकेचा बंधनात्मक खर्च अर्थसंकल्पाच्या ३५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. हा खर्च प्रशासनाच्या अर्थसंकल्पाच्या ३५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, असे राज्य सरकाराचे स्पष्ट निर्देश असल्याने नोकर भरतीचा प्रश्न रेंगाळत पडला आहे.

विश्वस्त मंडळ बरखास्त

0
0
कोट्यवधीच्या मिळकतीमुळे गाजलेल्या नाशिक डायोसेशन कौन्सिलचे विश्वस्त मंडळ धर्मदाय आयुक्त दे. भि. महाले यांनी बरखास्त केले आहे. या ट्रस्टवर बिशप प्रदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भूसंपादनासाठी हवेत ५० कोटी

0
0
भूसंपादनासाठी ५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारला दुरुस्ती करून नुकताच सादर केला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे सुरू झाल्यापासून साधुग्राम वगळता इतर भूसंपादनासाठी तब्बल ७० कोटी रुपये खर्ची घालण्यात आले आहेत.

दबावापोटीच ‘त्या’ शिक्षकावर गुन्हा दाखल

0
0
विद्यार्थिंनीशी अश्लिल चाळे केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकाविरोधात षडयंत्र रचले गेले असून, शाळाबाह्य राजकीय व्यक्तिंच्या दबावामुळेच गुन्हा दाखल झाला आहे.

एलबीटीची अखेर जकातशी ‘बरोबरी’

0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच महसुलाच्या आकड्याने जकातीच्या उत्पन्नाशी बरोबरी साधली आहे. एलबीटी लागू झाल्यापासून पहिल्यांदाच एका महिन्यात ६० कोटी ८२ लाख रुपयांचे उत्पन्न देखील महापालिकेला मिळाले आहे.

आम्ही कल्चर क्लबचे सभासद...!

0
0
नाट्य, संगीत, नृत्य, शिल्प, चित्र अशा विविध कलांमध्ये रंगणाऱ्या नाशिककरांसाठी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे ‘कल्चर क्लब’ हा उपक्रम नाशिकमध्ये सुरू करण्यात आला. सांस्कृतिक क्षितिजं विस्तारण्याची, आपली जाण अधिक व्यापक करण्याची उत्तम संधी या माध्यमातून नाशिककरांना मिळणार आहे.

ब्र‌िटीश कौन्स‌िलतर्फे स्कॉलरशीप इंड‌ियाची घोषणा

0
0
ग्रेट ब्र‌िटन कॅम्पेनचा एक भाग म्हणून ब्र‌िटीश कौन्स‌िल या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने ग्रेट ब्र‌िटन स्कॉलरशीप इंड‌िया २०१५ ची घोषणा करण्यात आली. युकेमध्ये भारतीय व‌िद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या व‌िव‌िध संधींची माह‌िती युवकांना कौन्स‌िलच्या वतीने आयोज‌ित सेम‌‌िनारमधून करून घेता येणार आहे.

धोत्रेंच्या भ्रष्टाचाराचे नाशिक कनेक्शन

0
0
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे वादग्रस्त तत्कालिन कल्याण आयुक्त मोहन धोत्रे यांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे मुंबईपासून ते थेट नाशिकपर्यंत पसरलेली असल्याचे आढळून आले आहे.

तोतया पोल‌िसांकडून दीड लाखाला गंडा

0
0
पोल‌िस असल्याचे खोटे सांगत पुढे दरोडा पडल्याने जवळील दाग‌िने काढून ठेवा, असा सल्ला देत भामट्यांनी दोघा नागरिकांना दीड लाखाला चुना लावल्याच्या घटना नाश‌िकरोड परिसरात घडल्या.

केबल ग्राहक डीटीएचच्या वाटेवर

0
0
शहरातील केबलची सेवा आणि काही चॅनल्सची अनुपलब्धता यामुळे ग्राहकांनी केबलला सोडचिठ्ठी देत डीटीएच सेवेला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ग्राहक टिकवायचे कसे, अशा विवंचनेत केबल ऑपरेटर आहेत.

ओझर विमानतळप्रश्नी बैठक

0
0
ओझर विमानतळाच्या ठिकाणी साकारण्यात आलेल्या सुसज्ज टर्मिनलच्या हस्तांतराचा तिढा पुढील आठवड्यात सुटण्याची चिन्हे आहेत. याप्रश्नी हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ने केलेल्या पत्रव्यवहारानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images