Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘काळाराम’चा वाद ‘धर्मादाय’ दारी

$
0
0
प्रसिद्ध काळाराम मंद‌िर संस्थानच्या आजी-माजी विश्वस्तांमधील वाद पुन्हा उफाळून आला आहे. विश्वस्तांच्या चारित्र्यासह गलथान कारभाराचा प्रश्न आता थेट मुंबईच्या धर्मदाय आयुक्तांच्या दालनात पोहचल्याने धर्मादाय आयुक्तांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नाशिकच्या धर्मादाय कार्यालयाला दिले आहेत.

वसाकाची चाके लवकरच फिरणार

$
0
0
गेल्या दोन वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व ऊस उत्पादक, व्यापारी, कामगारांसह वीज मंडळाचे देणे असल्याने बंद अवस्थेत असलेला विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सुरू होण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत.

मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी

$
0
0
विधानसभा निवडणूक आटोपताच निवडणूक आयोगाने मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, याद्वारे मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून हा कार्यक्रम सुरू होणार असून तो २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

सिन्नर रस्त्याला नव्या वर्षातच मुहूर्त

$
0
0
गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या नाशिक ते सिन्नर या रस्त्याचे काम नव्या वर्षातच सुरू होण्याची चिन्हे आहेत. मुंबई हायकोर्टाने भूसंपादनाची स्थगिती उठविल्यानंतर भूसंपादनाला वेग देण्यात येत आहे.

वैद्यकीय सेवेला मिळाली आधुनिकतेची जोड

$
0
0
मोसम नदीमुळे मालेगावचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग होतात. पूर्व भागातील दाट मुस्लिम वस्तीमुळे कायमच आरोग्याच्या समस्या उभ्या राहतात. गेल्या तीस चाळीस वर्षांपूर्वी कॉलरा, पटकी, प्लेग या आजारांनी थैमान घातले होते. त्यावेळी आरोग्य संरक्षणाची साधने व डॉक्टरही कमी होते. अशा परिस्थितीत मनपाचे वाडिया रुग्णालय हेच एकमेव आरोग्यसेवेचे केंद्र होते.

नाशिकरोड जेलला होमगार्डची सुरक्षा

$
0
0
नाशिकरोड कारागृहामध्ये तुरुंगरक्षकांच्या ८० जागा भरल्या जात नसल्याने तेथे प्रायोगिक तत्वावर होमगार्डसची नियुक्ती करण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. येथे ४० होमगार्डसची नियुक्ती करण्यात येणार असून सोमवारपासून ते कामावर रुजू होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नियम डावलून थेट सहीचा शिक्का

$
0
0
धान्य वितरण अधिकाऱ्याने त्याच्या स्वाक्षरीनेच रेशनकार्ड देणे बंधनकारक असताना नाशिकच्या धान्य वितरण कार्यालयाने बिनदिक्कतपणे सहीचा शिक्का बनवून रेशनकार्ड वितरणाचे काम सुरु केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

भूखंड सफाईसाठी रोटरचा वापर

$
0
0
मोकळ्या भूखंडाची साफसफाई करण्यासाठी प्रभाग क्रमांक ४० च्या नगरसेवकांनी रोटर यंत्राचा वापर करून तब्बल ३२ भूखंडाची सफाई केली. इंदिरानगरमधील मोकळ्या भूखंडाची साफसफाई करण्यात महापालिकेला अपयश येत असून याच डासांनी उच्छाद मांडला आहे.

दिंडोरीत द्राक्षबागांवर कुऱ्हाड

$
0
0
दिंडोरी तालुक्यात बेमोसमी पावसाच्या तडाख्याने द्राक्षबागांसह विविध शेतमालाचे नुकसान झाले असून, पावसाच्या उघडपीनंतर नुकसानीची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे.

राज ठाकरेंच्या दौऱ्याकडे नजरा

$
0
0
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या नाशिकच्या दौऱ्याला अंतिम रूप दिले असून, २८ नोव्हेंबरपासून ते तब्बल चार दिवस नाशिकमध्ये तळ ठोकणार आहेत.

'काळाराम'चा वाद धर्मादाय कोर्टात

$
0
0
नाशिकमधील काळाराम मंदिर संस्थानच्या ढिसाळ कारभाराचा वाद धर्मादाय आयुक्तांकडे पोहोचला आहे. विश्वस्तांच्या नियुक्त्यांसह मंदिरात सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबतची सर्व पुराव्यानिशीची कागदपत्रे माजी विश्वस्त सुशील पुजारी यांनी सोमवारी धर्मदाय सहआयुक्त कार्यालयाच्या निरीक्षकाकडे सादर केली.

जऊळके वणी रस्त्याची दुरवस्था

$
0
0
दिंडोरी तालुक्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या लखमापूर फाटा ते कादवा कारखाना मार्गे जऊळ्के-वणी या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. केवळ डागडूजी न करता संपूर्ण रस्त्याचे रूंदीकरण व नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांडून होत आहे.

बागलाणमध्ये युवकांना संधी

$
0
0
बागलाण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अत्यंत धक्कादायक निकाल हाती आले आहेत. प्रस्थापितांना हादरा देणारे तर, युवकांना संधी देणारे निकाल लागले आहेत.

मनपात राजकारण तापणार

$
0
0
विधानसभा निवडणुकीची धामधूम संपत नाही तोच मालेगाव मनपामध्ये महापौर निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. महापौर निवडीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी नगरसेवक गळाळा लावण्याचे सर्वतोपरी प्रयत्न चालू केले आहेत.

संजीवनगरच्या रस्त्यांची दुर्दशा

$
0
0
अंबड लिंकरोडवरील संजीवनगर व विराटनगर परिसरात रस्त्यांची वानवा वाहनचालकांना भासत आहे. त्यातच मोकळे भूखंड म्हणजे कचऱ्याचे जणू आगरच बनले आहेत. घंडागाडी नियमित येत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. यासाठी महापालिका व नगरसेवकांनी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पेपरफुटीचे वास्तव

$
0
0
संवेदनशील व‌षियांबाबत विकृत वृत्तींकडून, हेतूपुरस्सर अफवांचा होणारा फैलाव नवा नाही. मात्र, अफवांशी संबंध‌ति क्षेत्रातील यं‌त्रणांनी या व‌षियाकडे गांभीर्याने पहायला हवे. पुणे विद्यापीठाच्या इंज‌िनिअरिंगच्या तथाकथित प्रश्नप‌त्र‌िका फुटीने परीक्षा यंत्रणेतील कारभार अधोरेखित केली आहे.

रोहित्रांची झाडाझडती

$
0
0
कृषिपंपांचे रोहित्र जळण्याचे प्रकार नियंत्रणात राहण्यासाठी महावितरणने मुख्यालयातून दररोज झाडाझडती सुरू केली आहे. विजेचा अनधिकृत वापर किंवा मंजूर भारापेक्षा जास्त क्षमतेच्या मोटारीचा वापर यामुळे रोहित्रे जळत असून, त्यामुळे भारनियमनासारखी परिस्थिती निर्माण होत आहे.

निविदांचा ऑनलाइन कारभार

$
0
0
ई-निविदेसोबत देण्यात येणारी अनामत रक्कम ऑनलाइन भरण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. ई-निविदा राबवताना होणारा घोळ यामुळे संपुष्टात येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, या सुविधेचा प्रत्यक्षात उपयोग केव्हा होणार असा प्रश्न समोर आला आहे.

गोदावरी स्वच्छता मोहीम

$
0
0
कचरा गोदावरी नदीच्या पात्रात टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, अशी सूचना विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केली. शहर परिसरात कचरा टाकून अस्वच्छता करणाऱ्या हॉटेल मालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

‘स्क्रुटीनी’ची धास्ती

$
0
0
कामावर उशिरा येणाऱ्या किंवा गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या नोटीसांना उत्तर दिले आहे. नोटीसांना उत्तर देणाऱ्यांची संख्या मोठी असून सध्या प्रशासनातर्फे या उत्तरांची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images