Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अवकाळी पावसाने शेतकरी चिंताक्रांत

$
0
0
बागलाण तालुक्यात शुक्रवारी सांयकाळी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने अर्ली द्राक्ष बागांवर प्रहार केला असून शेतातील कांद्याचे ऊळे तसेच रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निफाडमध्ये द्राक्षबागांना फटका

$
0
0
निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील गावांना सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपून काढले. शनिवारी सकाळपासून परिसरातील गावांमध्ये ढगाळ वातावरण पसरले होते. तर सकाळी ७ वाजेपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती.

पावसामुळे टोमॅटोचे नुकसान

$
0
0
जिल्ह्यात तीन दिवासांपासून पावसाने संततधार लावली आहे. या बेमोसमी पावसाने सातपूर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे हजोरो एकच द्राक्ष बाग व टोमॅटो पिकांचे नुकसान झाले आहे.

‘त्या’ निरागसांनीही साजरा केला बालदिन

$
0
0
महिंद्रा व महिंद्रा व यश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी गंगापूर रोड येथील महिंद्रा जीप हाऊस येथे पंडित नेहरूंच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केलेल्या बालदिनानिमित्त एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बालकांकरिता बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

सदस्य निवडीचा तिढा सुटला

$
0
0
जिल्हा परिषदेत वादग्रस्त ठरलेल्या स्थायी समितीच्या दोन सदस्यपदाचा तिढा सोडविण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले आहे. शनिवारच्या सर्वसाधारण सभेत या दोन सदस्यांसह विविध समित्यांच्या २३ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दोन दिवसात ११०० रेशनकार्ड वाटप

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार चकरा मारूनही शिधापत्रिका वेळेवर मिळत नसल्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दोन दिवसात रेशनकार्ड वितरीत करण्यात येणार आहे.

शिक्षण मंडळ बरखास्तच

$
0
0
महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय नव्या भाजप सरकारने कायम ठेवला असून, महापालिका शिक्षण मंडळात शिक्षण समित्या गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.

चेन स्नॅ‌चिंगचे कनेक्शन मुंबईपासून श्रीरामपूरपर्यंत

$
0
0
शहरात घडणाऱ्या जबरी चोऱ्यांच्या घटनांमध्ये केवळ मुंबईचेच नव्हे तर श्रीरामपूरचेही चोरटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी पोलिसांनी प्रसंगावधान राखून एका चेन स्नॅचरला अटक केली आहे. संशयित श्रीरामपूरचा राहणारा आहे. त्याचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

खणाणली तिसरी घंटा

$
0
0
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ५४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी आनंद बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

नाशिककर वीर दौडणार सात!

$
0
0
पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाबाबत आणि तसेच सध्या थैमान घातलेल्या डेंग्यू, मलेरियाविषयी जनजागृती करण्यासाठी सात नाशिककर नाशिक ते गोवा हा सातशे किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करणार आहेत. रविवारी सायकल प्रवासाचा शुभारंभ होणार आहे.

शेतकऱ्यांमागे अवकाळी साडेसाती

$
0
0
नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पाऊस आणि अचानक बदलेल्या हवामानामुळे जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब या फळपिकांसह कांदा, टोमॅटो व भातपिकाचे सुमारे पन्नास टक्के नुकसान झाले आहे.

पाचशे लेटलतिफांवर कारवाई

$
0
0
पदभार स्विकारल्यानंतर महापालिकेतील कामांची माह‌तिी घेण्यासह शहराचा दौरा केल्यानंतर नवनियुक्त आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपला मोर्चा पालिकेतील कामचुकार अधिकारी व कर्माचाऱ्यांकडे वळवला आहे.

‘त्यांच्या’ कर्तृत्वाला सलाम

$
0
0
देशावर बाका प्रसंग ओढवलाय…, परकीय सेनेने घुसखोरी केली आहे... त्यांना चारही मुंड्या चित करण्यासाठी हेलिकॉप्टर्स, पॅराशूटमधून सैनिक उतरतात. शत्रूच्या छावण्यांवर तुटून पडतात अन् भारत मातेचा जयघोष करीत तेथे अभिमानाने भारताचा झेंडा रोवतात.

पिकांचे दोनशे कोटींचे नुकसान

$
0
0
नाशिक जिल्ह्यात शनिवारी, सलग तिसऱ्या दिवशी पडलेला अवकाळी पाऊस आणि बदलेल्या हवामानामुळे द्राक्ष, डाळिंब या फळपिकांसह कांदा, टोमॅटो व भातपिकाचे सुमारे ५० टक्के नुकसान झाले आहे. हे नुकसान सुमारे दीडशे ते दोनशे कोटी रुपयांच्या वर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आनंदवल्लीत साडीवाटप

$
0
0
आनंदवल्ली गावातील प्रसिद्ध असलेल्या नवश्या गणपती ट्रस्टच्या वतीने परिसरातील गरजू महिलांना साडींचे वाटप करण्यात आले. सामाजिक भावनेतून असे अनेक उपक्रम हाती घेतल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव यांनी याप्रसंगी सांगितले.

औद्योगिक वसाहतीतही होणार स्वच्छता अभियान

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे आवाहन केल्यानंतर नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातही हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) उद्योजकांना आवाहन केले असून येत्या काही दिवसातच औद्योगिक क्षेत्रात हे अभियान जोरदारपणे राबविली जाण्याची शक्यता आहे.

बालगोपाळांचेही स्वच्छ अभियान

$
0
0
अशोक स्तंभाजवळील बालाजी विहार सोसायटीतील बालगोपाळांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. रविवारच्या सुटीच्या दिवशी स्वच्छता राबवून बालगोपाळांनी आगळा वेगळा आनंद घेतला.

स्वच्छ नाशिक उपक्रम

$
0
0
सनविवि फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त ‘स्वच्छ व निरोगी नाशिक’ या उपक्रमाला शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुरुवात करण्यात आली.

पिसाळलेल्या कुत्र्याचा पाच जणांना चावा

$
0
0
पिसाळलेल्या श्वानाने सातपूर कॉलनीत पाच जणांना चावा घेतल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी परिसरातील संतापलेल्या नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने पिसाळलेल्या कुत्र्याचा पाठलाग करत त्याला ठार केले.

शिवनेरी गार्डनमध्ये साफसफाई

$
0
0
नवीन नाशिकमधील रायगड चौकातील महापालिकेच्या शिवनेरी गार्डेनमध्ये एकनिष्ठ फाउंडेशन यांच्यातर्फे रविवारी धूर फवारणी आणि साफसफाई माहीम राबविण्यात आली. स्थानिक तरुणांनी हातात झाडू घेत उद्यानातील सर्व कचरा गोळा केळा आणि त्याची विल्हेवाट लावली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images