Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘सेल टॅक्स’चा उद्योजकांना झटका

0
0
उद्योजकांने खरेदी केलेल्या मालाचे पेमेंट संबंधित पुरवठादाराला केल्यानंतरही त्या पुरवठादाराने विक्रीकर भरला नसल्यास त्याची भरपाई संबंधित उद्योजकाकडून वसूल करण्यात येत आहे. उद्योजकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. यासंदर्भात आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी विक्रीकर सहआयुक्तांकडे धाव घेतली आहे.

चौथ्या दिवशीही रेल्वेला विलंब

0
0
वर्धा नागपूर रेल्वे मार्गाच्या रुळाखालील भराव वाहून गेल्याने नागपूरकडे जाणारी वाहतूक कोलमडली असून सलग चौथ्या दिवशीही परिस्थिती आटोक्यात न आल्याने अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहेत तर काही गाड्या उशिराने धावत आहे.

...पण मी कानसेन

0
0
व्यासपीठावर एखादा राजकारणी असेल तर जाहीर कार्यक्रमात त्याची स्तुती करून हवे ते पदरात पाडुन घेणाऱ्यांची कमी नाही. विशेष म्हणजे ही गणितं ज्यांना जमतात त्यांच्या स्तुतीवर भाळून त्यांचे एखादे काम मार्गी लागूनही जाते परंतु एखादा राजकारणी मात्र असा भेटतो की तो ताकास तूर लागू देत नाही.

बेरोजगारांसाठीचे गाईड

0
0
आमच्या काळात किती झटपट नोकरी लागत होती, आणि आता बघा मुलं प्रयत्न करतात तरी त्यांच्या पदरी निराशा येते, सगळीकडे वशिला लागतो असा संवाद नेहमी आपल्या कानावर येतो. शहरात अनेक ठिकाणी व्यवसाय मार्गदर्शन केंद्रे आहेत.

अन्यथा आयटीआयचे कामकाज बंद पाडू

0
0
आयटीआयची प्रवेश प्रक्रिया शनिवारपर्यंत सुरू न केल्यास कामकाज बंद पाडण्याचा इशारा भारतीय विद्यार्थी सेनेने सोमवारी दिला. १७ जुलैला प्रसिध्द होणारी प्रवेश यादी अद्यापही न झाल्याने विद्यार्थी सेनेने आयटीआयमधील प्राचार्यांच्या केबिनमध्ये चार तास ठिय्या आंदोलन केले.

रिंगरोडमधून पैसा उकळण्याचा प्रयत्न

0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली पावसाळी गटार योजनेचे पाप झाकण्यासाठीच महापालिकेला आर्थिक डबघाईच्या खाईत लोटणाऱ्या ३३० कोटी रुपये खर्चाच्या प्रलंबित देयक योजनेचा कट आखण्यात आला आहे, असा आरोप करीत नाशिककरांच्या मानगुटीवरील हे भूत स्वतः राज ठाकरेंनी उतरावे असा सल्ला माजी महापौर दशरथ पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हाधिकाऱ्यांचे एमआयडीसीला आदेश

0
0
शहरातील सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याने पोलिसांच्या मदतीने विशेष मोहिम राबवावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहेत.

रस्त्यांसाठी मिळणार १७५ कोटी

0
0
सिंहस्थांच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये शहरातील रस्त्यांना विशेष प्राधान्य देण्यात आले असून लवकरच रस्त्यांच्या कामांसाठी १७५ कोटी रूपयांच्या निविदा प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती महापौर अॅड. यतीन वाघ यांनी दिली.

जळगावातील धरणे तहानलेलीच

0
0
जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी पावसाच्या ५२.२ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली. मात्र जिल्ह्यातील आठ धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील लहानमोठ्या धरणांचा विचार करता केवळ ७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात अद्याप २० टँकर सुरू आहेत.

‘वेबिनार’मधून उलगडला दहावीचा खजिना

0
0
दहावीचा अभ्यास नेमका कसा करायचा, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ व ‘एड्नेक्सा’मार्फ‌त वेबिनार या ऑनलाइन मार्गदर्शनसत्राचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर दहावीच्या अभ्यासाचा खजिनाच खुला झाला.

शहरात १५९ मतदानकेंद्रे वाढली

0
0
नाशिक शहर परिसरातील मतदानकेंद्रांची संख्या १५९ ने वाढली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचना आणि वाढलेली मतदारसंख्या यांच्या आधारे निवडणूक शाखेने मतदान केंद्रांची फेररचना केली आहे.

चौकाचौकात लागणार घंटागाडीचे वेळापत्रक

0
0
शहरातील घंटागाडीच्या वेळाबाबत अजूनही नियमितता नसून ठेकादारांना नवीन अटी शर्ती लागू झालेल्या नाहीत. मात्र कराराचे तांत्रिक काम पूर्ण झाल्यानंतर घंटागाडीने दररोज ठराविक वेळेत प्रत्येक प्रभागात पोहचणे आवश्यक आहे. अन्यथा ठेकेदाराविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

तीन कोटींचा गुटखा जप्त

0
0
अन्न आणि औषध प्रशासनाच्या नाशिक विभागातर्फे वेळोवेळी टाकलेल्या छाप्यात तीन कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. १३० खटले दाखल करण्यात आले आहे.अन्न सुरक्षा अधिनियमानुसार राज्यात सर्वत्र गुटखाबंदी असून काही ठिकाणी गुटखा विक्री होत असल्याच्या माहितीवरून नाशिक विभागाच्या वतीने छापे टाकण्यात आले.

पालिकेला कोर्टाची तंबी

0
0
शहरातील वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून महापालिका याबाबत उदासीन आहे. महापालिकेला आपले म्हणणे मांडण्याची शेवटची संधी देत असल्याचे सांगत कोर्टाने महापालिकेचे कान उपटले. याप्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे.

बाफनाप्रकरणी आरोपींना मोक्का

0
0
ओझर येथील बिपीन बाफना हत्याकांडात पोलिसांनी अटक केलेल्या पाचही संशयित आरोपींवर पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगार कायदा) कलमानुसार गुन्हा दाखल केला. खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यापासून आरोपी जेलमध्येच आहे.

वीज कंपनीविरोध वाढला

0
0
वीज वितरण कंपनीच्या विरोधात उद्योजकांसह इतर क्षेत्रातूनही सातत्याने तक्रारी येत असल्याने वीज वितरणचा प्रश्न जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांकडे मांडणार असल्याचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी जाहीर केले.

पार्कला वीज वितरणचा शॉक!

0
0
मालेगाव तालुक्यातील प्रस्तावित टेक्स्टाइल पार्कच्या विकासाला वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा शॉक बसला आहे. गुजरातमधील अनेक बड्या कंपन्या येथे येण्यास इच्छुक असताना विजेच्या अनुपलब्धतेमुळे हे पार्क अद्याप कागदावरच राहिल्याची बाब उघडकीस आली आहे.

STखाली चिरडून बालिकेचा मृत्यू

0
0
एसटी बसखाली चिरडून चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना धुळे तालुक्यातील रावेर गावाच्या बसथांब्याजवळ सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. ‌दिव्या विनोद देवरे असे या मुलीचे नाव असून तिचा हात आईच्या हातात असताना ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी बस चालकास बेदम मारहाण केली.

नाशकातही पट्टेरी वाघ?

0
0
नाशिक जिल्ह्यात पट्टेरी वाघ असून सद्यस्थितीत तो अनेकांना दृष्टीस पडत असल्याचा दावा वाइल्ड लाइफ वॉर्डन अमित खरे यांनी केला आहे. आपल्या या दाव्याच्या पुष्ट्यर्थ वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे गोळा करण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे. वनविभागाने मात्र तो बिबट्या असल्याचे सांगितले आहे.

करमणूक कराचा तिढा सुटणार

0
0
केबलचे डिजिटीलायझेशन झालेल्या राज्यातील महानगरांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून करमणूक कर वसुलीबाबत निर्माण झालेला तिढा सुटण्याची चिन्हे आहेत. मंत्रालयात सोमवारी झालेल्या बैठकीत सरकारने सकारात्मक पावले उचलण्याचे सूतोवाच केले असून एमएसओंनी (मल्टिसिस्टीम ऑपरेटर) सरकारला दुप्पट महसूल जमा करण्याची तयारी दर्शविली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images