Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

डॉक्टरबंधूंची सायकलभरारी

$
0
0
चार वर्षांपूर्वी हौसेखातर सायकल चालवणाऱ्या डॉ. महेंद्र आणि डॉ. हितेंद्र महाजन या नाशिकमधील बंधूंनी सायकलिंगला आव्हान मानत जगातील मानाच्या सायकल रेसपैकी असलेल्या ‘रॅम’मध्ये (रेस अक्रॉस अमेरिका) धडक मारली आहे.

रुग्णालय, नाट्यगृहापासून वंचित

$
0
0
अनेक वर्षांपासून महापालिकेच्या रुग्णालयाची सिडकोवासियांची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. महापालिकेचे अन्य विभागात १०० ते २०० बेड्सचे रुग्णालय आहेत. मात्र, सिडकोवासिय रुग्णालय, नाट्यगृह अश्या अनेक मागण्यांपासून उपेक्षितच आहेत.

रस्ता होईल, पार्किंगचे काय?

$
0
0
अशोक स्तंभ ते रविवार कारंजा या एकेरी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, यात रुंदीकरणाचा विचार करण्यात आला नसून याचा फटका स्थानिक व्यापाऱ्यांसह सर्वसामन्यांना बसणार आहे.

भुजबळांना `सर्वपक्षीय` साकडे

$
0
0
केंद्रापाठोपाठ राज्यातही नवे सरकार स्थापन झाले तरी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या महापालिकेतील सत्ताधिकाऱ्यांनी निधीसाठी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व आमदार छगन भुजबळ यांना साकडे घातले आहे.

शिवसेना नगरसेवकांमध्ये जुंपली

$
0
0
मनसेचे माजी आमदार वसंत गितेंची भेट घेणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या भूमिकेवर भाष्य करणारे विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांच्यावरच नगरसेवकांनी आता आक्षेप घेतला आहे.

सावानाचे आवार बनले ‘दीन’

$
0
0
सुमारे पावणेदोनशे वर्षांचा इत‌िहास सांगणारे सार्वजन‌िक वाचनालयाचे आवार या संस्थेच्या पदाध‌िकाऱ्यांच्या आपसातील लाथाळ्यांमुळेच दीन बनले आहे. तब्बल दोन वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली फोडून ठेवलेले हे आवार दुरुस्त करण्यासाठी व अग्न‌िशमन यंत्रणेसाठी आतापर्यंत तब्बल ४५ लाख रुपयेही अदा करण्यात आले आहेत.

कम्युनिटी कॉलेज सुरू करणार

$
0
0
मुक्त विद्यापीठाद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील काळात अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून बहुतांश अभ्यासक्रमातील बदल करण्यात येतील.

ग्राहकांसाठी आता सुवर्णयोग

$
0
0
धनत्रयोदशीनंतर सोन्याच्या भावामध्ये सुरू झालेली घसरण अद्याप थांबलेली नाही. तुलसी व‌िवाह पार पडल्यानंतर आता वधू आण‌ि वरप‌ित्यांच्या नजरा व‌िवाहमुहूर्तांकडे लागल्याने सराफ बाजारातील गर्दी वाढू लागली आहे.

‘पर्ल्स’मध्ये ५०० कोटींच्या ठेवी

$
0
0
पर्ल्स ग्रुपच्या पीएसीएल लिमिटेड या कंपनीमध्ये नाशिकच्या ३१ हजार गुंतवणुकदारांच्या सुमारे ५०० कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. कंपनीचे शहरातील कार्यालय नियमित सुरू असले तरी सेबीच्या निर्बंधांमुळे तेथील ठेवी अडकून पडल्याने प्रत्येक घडामोडीगणिक गुंतवणूकदारांची धडधड वाढतेच आहे.

प्रशासनाचे वरातीमागून घोडे

$
0
0
डेंग्यूमुळे मृत्यूमुखी पडलेल्या ​जितेंद्र कुलकर्णी यांचे शितला अपार्टमेंटमध्ये घर आहे. या भागात अस्वच्छतेमुळे अनेक समस्या उद्भवल्या असून, याबाबत महापालिकेच्या हेल्पलाईनवर तक्रार देखील केली. मात्र, आजवर त्यावर कारवाई झाली नाही.

डेंग्यूचे दोन बळी

$
0
0
धोकादायक पध्दतीने पसरणाऱ्या डेंग्यू या जीवघेण्या आजाराने दोन नागरिकांचा बळी घेतला आहे. यामुळे इंदिरानगर आणि अंबड परिसरातील दत्तनगर भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शोध ‘स्व’चा

$
0
0
आपण माणूस आहोत ही भावना कशा प्रकारे उत्पन्न होते? जिवंत असल्याची संवेदना कशा प्रकारे जाणवते? आपलं अस्तित्त्व आणि स्वत:ची ओळख कशा प्रकारे तयार होते? म्हणजे हे सगळं तयार होताना काय घडतं? आतली खबर बात काढायची का? बघायचं का? चालेल ना?

बंधाऱ्यासाठी अधिकारी, पदा‌धिकाऱ्यांचे श्रमदान

$
0
0
इगतपुरी तालुक्यातील धरणग्रस्त वाळविहीर या गावात पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी व ग्रामसेवक संघटनेने भातपिकाच्या नुकसानीची पाहणी करण्याबरोबरच वनराई बंधारा कामाच्या श्रमदानातही सहभाग घेतला. तालुक्यात पहिल्यांदाच असा उपक्रम राबविल्याने वाळविहीर गावानेही यात सहभागी घेतला.

बाजरीचा उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक

$
0
0
बागलाण तालुक्यात बाजरी कापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, यंदा उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. मजूर टंचाईचा सामना करतानाच बाजरी कापणीचा खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

प्लास्टिक कॅरिबॅगचा त्र्यंबकमध्ये सर्रास वापर

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे प्रांताधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेबरोबरच प्लास्टिक कॅरिबॅग वापराबाबत तपासणी केली असता नगरपालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून आला. शहरात अस्वच्छेतेबरोबरच प्लास्टिक कॅरिबॅग सर्रास वापरल्या जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

मांजरपाडासाठी खर्चाला हवी परवानगी

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागाच्या सिंचनासाठी महत्वाकांक्षी असा प्रकल्प समजल्या जाणाऱ्या 'मांजरपाडा वळण योजना' यासाठी प्राप्त निधी खर्चाला परवानगी मिळावी, अशी मागणी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मनमाडमध्ये स्वच्छता मोहीम

$
0
0
शहर व परिसरात डेंग्यू व मलेरियाने नागरिकांना त्रस्त केले असून, शहराचे आरोग्य धोक्यात आल्याने मनमाड नगरपालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.

जिल्ह्यात वाढले डेंग्यूचे संशयित रुग्ण

$
0
0
सटाणा शहरासह परिसरात डेंग्यूसदृश्य आजारांची मोठ्याप्रमाणात लागण झाली असून, तब्बल शंभराहून अधिक रुग्णांची संख्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सटाणा ग्रामीण रुग्णालयाने सहा रुग्णांची अधिकृत माहिती दिली असली तरीही खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने या रुग्णांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय

$
0
0
डेंग्यू व इतर साथीच्या आजारांनी पाय पसरल्याने रुग्णांच्या संख्येत ‌दिवसागणिक वाढ होत आहे. यामुळे डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्याबरोबरच स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय मालेगाव येथे आमदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन व आढावा बैठकीत घेण्यात आला.

दूषित पाण्यामुळे सरपंचास कोंडले

$
0
0
तालुक्यातील सायगाव येथे शुक्रवारी, जंतू मिश्रित पाणीपुरवठा झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी माजी सरपंच भागुनाथ उशीर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच गोरख उशीर, गटनेते गणपत खैरनार, ग्रामसेवक रवींद्र शेलार यांना चार तास कोंडले होते. दरम्यान, पाणीपट्टी वाढ प्रकरणीही चौकशी करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images