Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मुंढेगावकरांनी बांधले ११ वनराई बंधारे

0
0
इगतपुरी तालुका हा पावसाळी भाग असूनही खडकाळ जमिनीमुळे पाणी जमिनीत संचित होत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यातील पाणी वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून अडविण्याचे धोरण मुंढेगाव ग्रामपंचायतीने स्वीकारले अन् यशस्वीपणे राबविले.

विकासासाठी कटिबध्द

0
0
येवला मतदारसंघातील लासलगावसह ४२ गावातील नागरिकांनी यावेळी मोठे मताधिक्य दिल्याने आपला विजय सुकर झाला. विरोधी पक्षात असलो तरी लासलगावसह ४२ गावांच्या विकासासाठी कटिबद्ध असून भरीव कामे केले जातील, असे आश्वासन येवला- लासलगाव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार छगनराव भुजबळ यांनी दिले.

गायी चोरीप्रकरणी येवल्यात निषेध

0
0
तालुका व शहर परिसरात गोवंश व पशुधनाच्या वाढत्या चोरीप्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन उपाय योजना करण्यात यावी, या मागणीसाठी शहरातील शनि पटांगण येथे बुधवारी, सकाळी ११ वाजता गो भक्तांतर्फे मूक निदर्शने करण्यात आले.

त्र्यंबक नगरपालिकेत नेतृत्व बदलाचे वारे

0
0
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत नेतृत्व बदलाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या विशेष सभेतील प्रकाराचे पडसाद आता उमटू लागले आहेत. सत्तेच्या सारीपाटात विकासकामांना शह नको, असे मत नगराध्यक्षा यशोदा अडसरे यांनी व्यक्त करीत राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

चारा, पाणीटंचाईचे नियोजन करा

0
0
यंदा पाऊस कमी झाल्याने चारा, पाणीटंचाई संदर्भात वेळीच नियोजन करा. भारत निर्माण योजनेची अपूर्ण कामे तत्काळ मार्गी लावा. येवला शहराबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये पशुधनासह, वाहनांची चोरी होत असल्याच्या संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रीच्या गस्त वाढवा आणि भयमुक्त वातावरण निर्माण करा, अशा सूचना माजी मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मांजरपाडा प्रकल्पासाठी लढा उभारणार

0
0
येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागाला जलसंजीवनी ठरणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पाच्या कामाला गती मिळावी, यासाठी शासन दरबारी लढा उभारण्याचा निर्णय येवला तालुका जलहक्क संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

ग्रामपंचायतीसाठी ऑनलाइन अर्ज

0
0
ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. निवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज- सादर करण्याचे आयोगाचे निर्देश अनेक अडचणींना तोंड देणारे ठरत आहे.

नाशिककरांनो, बाळगा सावधानता!

0
0
डेंग्यू जातीचे डास साठलेल्या पाण्यात वाढतात. कुंड्या, टायर, नारळाच्या कवट्या, प्लास्टिकची भांडी आदि घराच्या अवतीभवती आढळणाऱ्या वस्तूंमध्ये ते वाढतात. त्यामुळे घरात अन् आजूबाजूला पाण्याचे साठे होणार नाहीत, याची काळजी नाशिककरांनी घ्यायला हवी.

प्रेस प्रमोशनबाबत अन्याय केला दूर

0
0
भारत प्रतिभूती आणि चलार्थ मुद्रणालयातील कामगारांवर अन्यायकारक प्रमोशन पद्धती लादण्यात आली होती. कामगार २५ ते ३० वर्षे एकाच ग्रेडमध्ये राहत होते. एखादे प्रमोशन मिळाल्यानंतर निवृत्त होत होते.

‘आयटीआय’चा निकाल लांबला

0
0
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाकडून घेतल्या जात असलेल्या राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) सुमारे लाखभर विद्यार्थ्यांचे निकाल लागू शकलेले नाहीत.

एलबीटी, जकात १५ दिवसांत हद्दपार

0
0
एलबीटी आणि जकात या दोन्ही करपद्धती येत्या १५ दिवसांत राज्यातून हद्दपार होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना दिली आहे. या दोन्ही करांच्या बदल्यात अस्तित्वात येणारा नवा कर व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच निश्चित केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे.

वाहनांवर पोलिसांची वक्रदृष्टी

0
0
कोर्टाबाहेर अनधिकृतपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी दंड थोपटले आहेत. येथील वाहतुकीला होणारा अडथळा, त्यातून बळावणारी अपघातांची शक्यता दूर करतानाच वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी येथे वाहने उभी करण्यास बुधवारपासून मज्जाव करण्यात आला आहे.

गितेंना पायघड्या घालणारे अडचणीत?

0
0
मनसेचे माजी आमदार वसंत गितेंना पक्षात प्रवेशासाठी पायघड्या घालणे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना महागात पडले असून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची कानउघाडणी केल्याचे वृत्त आहे.

गेडाम यांची आयुक्तपदी नियुक्ती

0
0
तब्बल सात महिन्यांपासून रिक्त असलेल्या नाशिक महापालिकेला नव्या सरकारच्या स्थापनेनंतर पूर्णवेळ कारभारी मिळाला आहे. सोलापुरचे जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांची महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थायी समितीच्या सदस्य निवडीवरून गोंधळ

0
0
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे अपेक्षेप्रमाणे प्रभार वाटप झाले असले तरी, स्थायी समितीच्या सदस्यांवरून राष्ट्रवादीत साठमारी सुरू झाली आहे.

कलावंतांच्या अडचणी सोडवू

0
0
नाशिकचे उदयोन्मुख कलाकार मोठे होण्यासाठी व त्यांना लागणाऱ्या सुविधा तसेच कालिदासचा चेहरामोहरा पूर्णतः बदलता येईल. याकरिता मनपातील सर्वपक्ष, गटनेते, पदाधिकारी, नाट्य परिषदेचे पदाधिकारी यांच्याशी एकत्रित चर्चा करून कलावंताच्या अडचणी सोडवल्या जातील, असे आश्वासन महापौर अशोक मुर्तडक यांनी दिले.

रंगभूमीद‌िनी कलाव‌िष्कारांचा जागर

0
0
च‌ित्तवेधक नृत्याव‌िष्कारासह मनाचा ठाव घेणारे काव्यवाचन, अभ‌िनेत्याच्या भाव‌व‌िश्वावर प्रकाश टाकणारे नाट्यसादरीकरण अन् अंतर्मनात डोकावण्यास लावणारे कथावाचन अशा व‌िव‌िधांगी कलाव‌िष्कारांचा जागर कलाप्रेमींनी घडवून आणला. न‌िम‌ित्त होते रंगभूमी द‌िनाचे.

त्र्यंबक मंदिरात श्रीफळ, फुलांना बंदी

0
0
बारा ज्योतीर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ठिकाणी श्रीफळ आणि फुलांना बंदी केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय ट्रस्टच्या बैठकीत घेण्यात आला असून, येत्या १ डिसेंबर किंवा १ जानेवारीपासून हा निर्णय लागू केला जाण्याची शक्यता आहे.

आजपासून कार्तिक महोत्सव

0
0
पंचवटीतील पुरातन कार्तिक स्वामी मंदिरात काशी नाट्टाकोटीनगर छात्रम मँनेजिंग सोसायटीच्या वतीने आजपासून (दि. ६) कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

डेंग्यूच्या तापाने ओलांडली शंभरी

0
0
नाशिक शहरात अस्वच्छेतेचे साम्राज्य पसरल्याने डेंग्यूनेही आपले पाय घट्ट पसरवले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करूनही शहरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याने महिनाभरात तब्बल २७६ डेंग्यू सदृश्य संशयित रुग्ण आढळून आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images