Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीदिनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित एकता दौडमध्ये नाशिककरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते शिवाजी स्टेडियम येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

पर्स चोर सीसीटीव्हीत कैद

$
0
0
बांगड्या घेण्याच्या बहान्याने चोरट्यांनी महिलेची पर्स लंपास केल्याची घटना शुक्रवारी अशोक नगर येथे घडली. मात्र, पर्स चोरी करणारे तिघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

८ गायींची चोरी

$
0
0
गुरुवारी मध्यरात्री येवला तालुक्यातील नगरसूल, हडप सावरगाव, धामोडे, साबरवाडी या गाव अन् परिसरातून एकाच रात्री आठ गायी चोरून नेल्या. या घटनेने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

महावितरण आपल्या दारी

$
0
0
येवला तालुक्यात महावितरण आपल्या दारी २०१० ची योजना सुरू करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांनी संबंधितांकडे निवेदनाद्वारे केली आहे

डेंग्यूसदृश्य रुग्णांमध्ये वाढ

$
0
0
डेंग्यूसदृश्य रुग्ण मालेगावात उपचारासाठी धाव घेत आहेत. बाल रुग्णालयांसह इतरही खासगी रुग्णालयांमध्ये तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. निरीक्षणाखाली उपचार घेणाऱ्या डेंग्यू बाधितांची संख्या वाढत आहे. या आजाराची मनपाच्या आरोग्य विभागाकडून अद्याप कारणमीमांसा झालेली नाही.

शरणपूर रोड कच-याचे आगार

$
0
0
शरणपूर रोड येथील जुने पोलिस आयुक्तालय तसेच परिसराच्या विविध ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य असून, हा परिसर दिवसेंदिवस बकाल होत आहे. कचऱ्याचा कुजका वास आणि दुर्गंधीने या भागातील रहिवासी हैराण झाले आहेत.

पाणीप्रश्न सुटणार

$
0
0
बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथे ६१ लाख रुपये खर्चून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी यांनी दिली.

बागलाणमध्ये शेतकरी मेटाकुटीस

$
0
0
बागलाण तालुक्यातील जायखेडा जवळील एकलहरे, मेंढीपाडे, नांदीन व वाडीपिसोळ येथे सिंगल फेज योजना राबविण्याची मागणी अनेक वेळा करण्यात येवून देखील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली.

थकवले जलसंपदाचे साडेसात कोटी

$
0
0
नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातून पाणी वापरापोटी जलसंपदा विभागाची तब्बल साडेसात कोटीची पाणीपट्टी थकविल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे नव्याने धरणातून आरक्षित पाणी उचलण्यापूर्वी सर्वच संस्थांना आता एकूण पाण्याच्या ५० टक्के पाणीपट्टी आगावू भरावी लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली आहे.

झाडू मशिन घेणार

$
0
0
महापालिका हद्दीत साफसफाई करण्याच्या कामासाठी यांत्रिक झाडू मशिन खरेदी करण्याचा निर्णय जानेवारी महिन्यानंतर घेतला जाईल, असे महापौर अशोक मुर्तडक यांनी स्पष्ट केले. या मशिन उत्पादकांच्या एजंटनी मशिन वापाराबाबतचा डेमो शुक्रवारी महापालिकेत सादर केला.

नाशकात पहिले कार सिम्युलेशन

$
0
0
संगणकीय सदृशीकरण तंत्राच्या माध्यमातून चार चाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील पहिल्या वहिल्या कार सिम्युलेशन तंत्राचे उदघाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या हस्ते तिडके कॉलनीत करण्यात आले.

आरोग्यविभागात उलथापालथ

$
0
0
स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेळोवेळी तंबी देऊनही गैरहजेरीचे प्रमाण कमी होत नसल्याने आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी शुक्रवारी सहा विभागीय स्वच्छता निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्यात.

जेलरोडवर डेंग्यूचा प्रभाव

$
0
0
जेलरोडच्या पंजाब कॉलनीत डेंग्यूचे डास आणि आळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यवाही केली. संबंधित बांधकाम मालकाला पाच हजाराचा, तर प्रकाश ट्रेडर्सला दोन हजाराचा दंड केला.

HAL मध्ये सू-३० विमानांची दुरुस्ती

$
0
0
ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये आता सू-३० विमानांची दुरुस्ती आणि नूतनीकरण होणार आहे. संरक्षण उत्पादन खात्याचे सचिव जी. मोहनकुमार यांच्या हस्ते शुक्रवारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

नाशिकमध्ये पाणीकपात?

$
0
0
नाशिक महापालिकेच्या मागणीत अर्धा टीएमसीने पाणीकपात करीत, जिल्हा प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाणी नियोजनाचा चेंडू पालिकेच्या कोर्टात ढकलला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे पालिकेला आता आरक्षित साडेचार टीएमसी पाण्यातच दैनंदिन पाणीपुरवठ्यासह कुंभमेळ्याच्या पाण्याचेही नियोजन करावे लागणार आहे.

RTO जयंत पाटलांना अटक

$
0
0
खासगी ट्रॅव्हल्सच्या दोन सस्पेंड केलेल्या बसेसचे रेकॉर्ड क्लिअर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्या प्रकरणी एका एजंटसह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांना अटक करण्यात आली. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच पाटलांना अटक करण्यात आली.

राज ठाकरेंचा नाशिक दौरा

$
0
0
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जात असलेल्या नाशिकवर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठीच बुधवार ५ नोव्हेंबरपासून चार दिवस ते नाशिकला मुक्काम ठोकणार आहेत.

अनधिकृत भंगार बाजार हटवा!

$
0
0
अंबडलिंकरोडवर वसलेले अनधिकृत भंगार बाजार हटविण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी निवेदनाद्वारे महापाल‌िका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आयुक्तांनी भंगार मार्केट काढण्यासाठी उच्च न्यालायात प्रतिज्ञा पत्र सादर करावे तसेच भंगार बाजाराच्या त्रासातून मुक्तता करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

रंगरंगोटी वादात

$
0
0
नाशिक जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचीत अध्यक्षांसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी पदभार स्विकारताच आपल्या दालनांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी सुरू केली आहे. मात्र या रंगरंगोटी आणि दुरुस्तीला कोणतीही शासकीय मान्यता नसल्याने या कामांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

सी प्लेनची सोमवारी चाचणी

$
0
0
बहुप्रतिक्षित सी प्लेनची चाचणी आता सोमवारी (दि.३) दुपारी होणार आहे. यापूर्वी तीनदा ही चाचणी रद्द झाली असून चौथ्यांदा तरी ती होणार का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने संबंधित कंपनीकडून सर्व कागदपत्रांची विचारणा केली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images