Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जि. प. अध्यक्षांचा लाल दिवा जाणार

$
0
0
शासनाने लाल दिवा वापरण्यासदंर्भात नवे नियम जारी केले असून, जिल्हा परिषद अध्यक्षांचा लाल दिवाही आता काढून घेतला जाणार आहे. नव्या धोरणानुसार जिल्हा परिषद अध्यक्षांना आता लाल दिव्याऐवजी अंबर दिवा लावण्याचे आदेश देण्यात आल्याने नाशिकच्या जिल्हा परिषद अध्यक्षांना लाल दिव्याचा लाभ अल्पकाळासाठी झाला आहे.

दीड कोटीचा बंगले घोटाळा

$
0
0
बंगले विक्रीसाठी काढल्याच्या जाहिरातीच्या माध्यमातून नागरिकांना आकर्षित करीत त्यांची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंगल्यांचा ताबा देण्याऐवजी खोटे दस्ताऐवज दिल्याप्रकरणी तसेच गुंतवणूकदारांना दमदाटी केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

आरटीओ मालामाल !

$
0
0
गत सहा महिन्यांमध्ये शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनसंख्येत मोठी वाढ झाली आहे. मोटरसायकल्स खरेदीकडे नागरिकांचा वाढता कल असून, सहा महिन्यांमध्ये २५ हजार ६५८ नवीन मोटरसायकल्स रस्त्यावर उतरल्या आहेत.

बंडखोरांवर कारवाई

$
0
0
महापौर निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आलेल्या मनसेच्या दोघा नगरसेवकांविरोधात २४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल. निवडणुकीनंतर मनसेने बंडखोर नगरसेवकांविरोधात तक्रार करण्याचे धारिष्ठ दाखवले.

डेंग्यूला रोखण्यासाठी कडक उपाय

$
0
0
जीवघेण्या डेंग्यू आजाराचे अस्तित्व ऑक्टोबरमध्ये कायम राहिले असून पेशंटच्या संख्येत वाढ देखील होत आहे. डेंग्यूला लगाम घालण्यासाठी पुणे तसेच, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेने देखील कडक धोरण अवलंबण्याची गरज निर्माण झाली आहे.

रक्तमित्र पुरस्कार

$
0
0
थॅलेसेमिया सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तमित्र पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आय. एम. ए. हॉल येथे संपन्न होणार आहे.

वसंतदादा कारखान्याचे दशावतार

$
0
0
राज्य सहकारी बँकेच्या तोट्याबाबत तत्कालीन सर्व संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्याने संबंधीतांचे धाबे दणाणले असले तरी या कारवाईचा फटका आता जिल्ह्यातील साखर कारखान्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चोरट्यांचा सुळसुळाट

$
0
0
नाशिकरोड बसस्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांजवळील किंमती ऐवज चोरीस जाण्याचे प्रकार वाढले असून, या स्थानकात साध्या वेषातील पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कृषी प्रदर्शन

$
0
0
कृषी प्रदर्शनामुळे शेतकरी बांधवांपर्यंत अद्यायावत तंत्रज्ञान व शासनाच्या विविध योजना पोहचविण्यास मदत होणार आहे. परिसंवाद व तत्सम कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडणार असल्याचे प्रतिपादन नाशिक कृषी विभागाचे सहसंचालक कैलास मोते यांनी केले.

नगरसेवक, सरपंचही लाचलूचपतच्या कक्षेत

$
0
0
केवळ सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचारीच नव्हे तर सरकारकडून मानधन स्वीकारणारे सरपंच, नगरसेवकही लाचलूचपत प्रतिबंधक कारवायांच्या कक्षेत येत असल्याचे गुरुवारी ग्रामीण आणि शहरी भागातील बहुतांश नागरिकांना स्पष्ट झाले.

रेडिरेकनर ‘जैसे थे’च ठेवा

$
0
0
जमिनींचे सरकारी मूल्य (रेडिरेकनर) अवास्तवरित्या यंदा वाढविण्यात आल्याने अनेकांच्या गृहस्वप्नावर पाणी फेरले आहे. त्यामुळे २०१५ या वर्षात रेडिरेकनरचे दर ‘जैसे थे’च ठेवावे, अशी कळकळीची विनंती क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षकांकडे केली.

तरुणाला धमकी

$
0
0
माझ्या मुलीशी ओळख का ठेवतो, अशी विचारणा करीत तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई नाक्यावरील कालिका माता मंदीराजवळ हा प्रकार घडला.

रेल्वे प्रवासी बेहाल

$
0
0
अमरावतीहून मुंबईकडे जाणाऱ्या अमरावती एक्सप्रेसचा डबा कल्याण स्थानकाजवळ रूळावरुन घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या, तर मुंबईहून नाशिकरोडकडे येणाऱ्या गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत होत्या.

गावगाडा ऑनलाइन होणार

$
0
0
जिल्हा परिषदेतल्या शाळामंधील शिक्षक आणि ग्रामसेवकांची गावामंधील हजेरी हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. जिल्हा परिषदेने आता या वादावर पडदा टाकण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व ३३६६ शाळांमध्ये बायोमेट्रीक प्रणाली बसवण्याचा विचार सुरू केला आहे.

सी प्लेनची चाचणी रद्द

$
0
0
बहुप्रतिक्षीत असलेली सी प्लेनची सेवा सुरू करण्यासंदर्भात शुक्रवारी होणारी चाचणी रद्द झाली आहे. तब्बल तिसऱ्यांदा ही चाचणी रद्द झाली असली तरी पुढील आठवड्यात ती घेण्याचे सांगितले जात आहे.

नाशिकचे महत्त्व घटेल?

$
0
0
नाशिक जिल्ह्यातून कोणताही वजनदार आमदार नसल्याने शुक्रवारी होणाऱ्या राज्यातील भाजपच्या पहिल्या वहिल्या मंत्रिमडळ शपथविधी सोहळ्यात नाशिकला प्रतिनिधीत्व मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर नॅनो मंत्रिमंडळामुळे विस्तारातही नाशिकला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळणार नसल्याची चिन्हे आहेत.

वलखेड-ननाशीचा निकृष्ट रस्ता

$
0
0
वलखेड-ननाशी या प्रमुख रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या रस्त्याची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी नळवाडपाड्याचे सरपंच हिरामण भुसारे, युवानेते संतोष वाघ, निगडोळचे ग्रामपंचायत सदस्य मोतीराम मालसाने यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

झुलेलाल पतसंस्थेत अपहार

$
0
0
कर्जाच्या नावाखाली अनधिकृत व्यवहार करून सुमारे ३५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांसह उपाध्यक्ष, सचिव आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कादवा'चा गळीत हंगाम सुरू

$
0
0
कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ अण्णासाहेब मोरे, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, सचिव बाळासाहेब उगले यांच्या हस्ते उसाच्या मोळीचे पूजन करून करण्यात आला.

होमगार्डस् उपेक्षेचेच धनी

$
0
0
पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्त करणारे होमगार्डस् शासनदरबारी उपेक्षेचे धनी ठरत आहेत. पोलिसांवरील कामाचा बराचसा ताण हलका करणाऱ्या बहुतांश होमगार्डसला गणेशोत्सव, नवरात्र आणि विधानसभा निवडणुकीमध्ये केलेल्या बंदोबस्त ड्युटीचा सेवाभत्ताही मिळालेला नाही.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images