Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रेल्वे स्टेशनवर गर्दीचा महापूर

0
0
दिवाळीचा सण अखेरच्या टप्प्यात आला असताना मामाच्या गावी जाण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर छोट्यांसह नागरिकांनी गर्दी केली असून रोजच्या तुलनेत तिप्पट गर्दी होत असल्याने तिकीट काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागत आहे.

ऐन दिवाळीत गारठले नाशिककर!

0
0
दिवाळीनंतर गुलाबी थंडी अनुभवणाऱ्या नाशिकरांना यंदा ऐन दिवाळीत अचानकपणे गारठ्याला सामोरे जावे लागले आहे. अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप डिप्रेशन) निर्माण झाले आहे.

वातावरणातील बदलाने इगतपुरीही गारठले

0
0
जिल्ह्याचे काश्मिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातही वातावारणाच्या फेरबदलामुळे तालुका गारठला असून, टप्याटप्याने पावसाचा शिडकावाही होत आहे.

ग्रामीण आरोग्य सेवेलाच उपचाराची गरज

0
0
तालुक्यातील तीन ग्रामीण रुग्णालये व ११ प्राथमिक आरोग्य केंद्राचा भलामोठा पसारा असलेल्या तालुक्यातील आरोग्यसेवा कागदावर मोठी असली तरी प्रत्यक्षात सेवेचा बोजवारा उडाला आहे.

ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांवर बुरशीचा प्रादुर्भाव

0
0
वातावरणात बदल झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. अधूनमधून पावसाचा शिडकावा व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

फटाका स्टॉल गेले, कचऱ्याचे काय?

0
0
दिपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सातपूर क्लब हाऊस मैदानावर फटाक्यांचे अठरा स्टॉल लागले होते. दिवाळी सण झाल्यानंतर हे स्टॉल हटल्यानंतर येथील कचरा मात्र तसाच पडून आहे.

तयार डांबरी रस्त्यावर खडी टाकून रुंदीकरण

0
0
शहरातील होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. परंतु, शहराचे भूषण असलेला त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पपया नर्सरीजवळ डांबरी रस्त्यावरच डांबर टाकून खडीकरण करण्यात आले आहे.

जवखेडा घटनेच्या निषेधार्थ त्र्यंबकेश्वरमध्ये मोर्चा

0
0
त्र्यंबकेश्वर येथे फुले, शाहू, अंबेडकरी विचार अभियान राबविणाऱ्या संघटनेने नगर जिल्ह्यातील जवखेडा येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. बौध्द समाज बांधव लक्षणीय संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

सरकी ढेप चोरी : घोटीत दोघे ताब्यात

0
0
गेल्या दोन महिन्यांपूर्वी घोटी शहरातील एका व्यापाऱ्याच्या मालकीच्या खंबाळे येथील गोडावूनमधून सरकी ढेपच्या २६० गोण्या चोरीस गेल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयित युवकांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली आहे.

झोपडीस आग लागून तीस शेळ्यांचा मृत्यू

0
0
कळवण तालुक्यातील देवळी वणी येथे ऐन दिवाळीत झोपडीला आग लागून वीस लहान बछडे व दहा मोठ्या बकऱ्या आगीत जळून खाक झाल्या. या घटनेत एकूण १,९८,००० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

कचरा डेपोचा प्रश्न सुटता सुटेना

0
0
त्र्यंबक नगरपालिकेच्या सफाई कामगरांचे आरोग्य धोक्यात आले असून, दिवाळीचा सण कामगार चाळीसह परिसरातील रहिवासींना दुर्गंधीने बेजार करणार ठरला. त्र्यंबकेश्वर येथील कचरा डेपोचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.

शिवाजी गार्डन नव्हे; दारुड्यांचा अड्डा

0
0
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शिवाजी गार्डनला अवकळा आली असून लहान मुलांच्या खेळण्यासाठी नव्हे तर दारु पिणाऱ्यांचा अड्डा बनला आहे. दिवाळीच्या सुटीच्या काळात मौजमजा करण्यासाठी येणाऱ्यांचा शिवाजी गार्डमध्ये आल्यानंतर हिरमोड होत आहे.

चोरट्यांची दहशत; ग्रामस्थांचे जागरण

0
0
सिन्नर तालुक्यातील दोडी दापूर आणि आसपासच्या गावांमध्ये चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून त्यामुळे ग्रामस्थांना रात्र अक्षरश: जागून काढावी लागते आहे. चोरट्यांनी येथे दहशत पसरविली असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.

पीडितांच्या दारी ‘एसीबी’चे अधिकारी

0
0
लाचखोरीचा समूळ नायनाट करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कंबर कसली आहे. सापळा यशस्वी व्हावा आणि तक्रारींचाही ओघ वाढावा या उद्देशाने ‘एसीबी’चे अधिकारी पीडित नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी ते बोलावतील तेथे जाऊ लागले आहेत.

चोर पावलांनी थंडीचे आगमन

0
0
दोन दिवसांपूर्वी ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालेल्या नाशिककरांना अचानक आलेल्या थंडीमुळे हुडहुडी भरली आहे. चोरपावलांनी आलेल्या या थंडीची चाहूल लागताच नाशिककरांची पावले स्वेटरच्या दुकानांकडे वळू लागली आहे. मेनरोड बरोबरच तिबेटीयन मार्केटमध्ये स्वेटर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

ग्रामपंचायत सदस्याची इगतपुरीत आत्महत्या

0
0
प्रेयसीच्या घरासमोरच स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत एका ग्रामपंचायत सदस्याने आत्महत्या केली. इगतपुरी तालुक्यातील ठोकळवाडी येथे ही घटना घडली. तुकाराम रामजी गंभीरे (३५, रा. गंभीरवाडी) असे त्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.

‘रन फॉर युनिटी’साठी हालचाली

0
0
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) रन फॉर युनिटीचे आयोजन करण्याबाबत हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक झाली असून, विविध संस्था-संघटनांसह विद्यार्थ्यांच्या सहभागाचे नियोजन करण्यात येत आहे.

सोनोग्राफी केंद्र धुळखात

0
0
कळवण उपजिल्हा रुग्णालयात गेल्या कित्येक दिवसांपासून सोनोग्राफी केंद्र बंद असून, यासाठी निधी उपलब्ध असूनही पडून आहे. सर्व आधुनिक साधनसामग्री धुळखात पडून असताना जिल्हा प्रशासनाला कुणी सोनोग्राफी तज्ज्ञ मिळू नये, याबाबतच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अतिक्रमण काढा अन् वन वे करा

0
0
आगामी सिंहस्थासाठी प्रस्तावित प्रकल्पांसाठी नाशिक शहरातील तब्बल २४०० झाडांची तोड रोखण्यासाठी अतिक्रमण काढा, वन वे करा, कमीत कमी झाडे तोडून प्रकल्प साकारा, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली. मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या जनसुनावणीला वृक्षप्रेमी उपस्थित होते.

आयुक्त घेणार सिंहस्थाचा आ‍ढावा

0
0
विधानसभा निवडणुका आटोपल्यामुळे आता सिंहस्थ कामांना गती देण्यासंदर्भात विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक होणार आहे. या बैठकीमुळे सिंहस्थ कामांना अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images