Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रोकड पळवणारे सक्रीय

$
0
0
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बँक खातेदारांवर पाळत ठेऊन हातोहात रोकड हिसकावरणारे चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. अशा प्रकारच्या सहा गुन्ह्यांमधील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आलेले नाही. त्यातच ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा असे जबरी चोरीचे प्रकार घडू लागल्याने नागरिक धास्तावले आहेत.

तिडके कॉलनी पार्कची दैन्यावस्था

$
0
0
तिडके कॉलनीतील राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र परिसरातल्या उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था झालेली असून, यामुळे लहान मुलांची येथे प्रचंड गैरसोय होत आहे. या खैळण्यातील झोके तुटलेले असून इतर खेळण्या देखील गंजल्या असल्याने यातील काही जुन्या खेळण्या बदलून त्या ठिकाणी नवीन खेळण्या बसवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

१५ लाखांचा पानमसाला जप्त

$
0
0
मानवी आरोग्यास अपायकारक असणारा पानमसाला आणि सुगंधीत तंबाखू विक्रीसाठी घेऊन जात असलेला ट्रक भद्रकाली पोलिसांनी पकडला. महिनाभरातील ही दुसरी घटना असून, त्यामुळे पानमसाला व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

शौचालयांचे पाणी रस्त्यावर

$
0
0
जेलरोड येथील जुना सायखेडा मार्गावरील चंपानगरीमध्ये शौचालयाचे चेंबर तुंबल्याने कॉलनीतील रस्त्यावर घाण पाणी साचले आहे. हेच पाणी महापालिकेच्या गार्डनमध्ये जात असून सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले आहे.

बोगस मतदान

$
0
0
वारंवार मागणी करूनही मृत व्यक्तीचे नाव निवडणूक यंत्रणेने न वगळल्याने अखेर बोगस मतदान झाल्याचा दावा सारडा कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल निवडणूक आयोगाकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.

सभापतीपदासाठी संघर्ष

$
0
0
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी येत्या मंगळवारी (दि. २१) निवडणूक होणार असून, आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चार सदस्यांनी अर्ज सादर केले. उपसभापतीपदासाठी तीन सदस्या इच्छूक असून, मनसे-राष्ट्रवादीच्या समीकरणानुसार राष्ट्रवादीच्या रंजना बोराडे यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडू शकते.

खुर्चीसाठी रस्सीखेच

$
0
0
जिल्हा परिषदेत अध्यक्षांपाठोपाठ सर्वच दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या बांधकाम व अर्थ समितीच्या सभापतीपदासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपचे केदा आहेर आणि अपक्ष किरण थोरे यांच्यासह उपाध्यक्षांनीही या समितीवर वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

कडेकोट बंदोबस्त

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मतमोजणी केंद्रांबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. केंद्रीय राखीव सुरक्षाबल, राज्य राखीव सुरक्षा बलासह तब्बल अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तावर असणार आहे.

मोबाइलवरही एसीबीची टोल फ्री लाइन

$
0
0
टेबलाखालून पैसे घेण्याच्या वृत्तीला चाप बसावा, लाचखोरीचे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, यासाठी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने टोल फ्री क्रमांक सुरू केला होता. विशेष म्हणजे पूर्वी केवळ लँडलाईनहून लागणारा हा क्रमांक आता मोबाइलवरूनही अॅक्टिव्ह होऊ लागला आहे.

बसचालकाला मारहाण

$
0
0
बसच्या केबीनमध्ये घुसून चालकाला मारहाण करणाऱ्या तसेच महिला कंडक्टरजवळील पैसे हिसकावून नेणाऱ्या रिक्षाचालकासह दोघांवर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोनसाखळी चोरास अटक

$
0
0
चेन स्नॅचिंगच्या अनेक घटनांपैकी एक घटना उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट एकला यश आले आहे. चोरट्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून मोटरसायकलसह एकूण ८० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

जळीत वृद्धेची चौकशी

$
0
0
येवला तालुक्यात जाळण्यात आलेल्या वृध्देची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. शनिवारी दुपारी महिला आणि पुरूष मॅजिस्ट्रेट अशा दोघांनी वृध्देचा जबाब नोंदविण्यासाठी तिची भेट घेतली. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती संदिग्ध बोलत असून जबाब नोंदविला गेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चव्हाणच सभागृहनेता?

$
0
0
महापौरपदी अशोक मुर्तडक यांची निवड झाल्यानंतर महापालिकेची पहिलीच महासभा सोमवारी होणार आहे. इतिवृत्त मंजूर करून ही सभा तहकूब होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सभा तहकूब करण्यापूर्वी अपक्ष आघाडीचे नगरसेवक संजय चव्हाण यांची सभागृहनेतेपदी निवड केली जाऊ शकते.

पोलिसांची नकारघंटाच

$
0
0
शहरातील विविध भागातील ४९ ठिकाणावरील फटाके स्टॉल्सबाबत पोलिसांनी शेवटपर्यंत मंजुरीच दिली नाही. त्यामुळे महापालिकेला शनिवारी आयोजित केलेले लिलाव रद्द करावे लागले. तसेच, या ठिकाणी वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या फटाके विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

दिग्गजांचा ठोका चुकणार

$
0
0
विधानसभेच्या पंधरा जागांसाठीची रविवारी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी होणार असून दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. निवडणूक यंत्रणा निकालासाठी सज्ज झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी शनिवारीच मतमोजनी केंद्रावर दाखल झालेत.

भाजपची मुसंडी

$
0
0
मोदी लाटेवर स्वार होत भारतीय जनता पक्षाने उत्तर महाराष्ट्रात जबरदस्त मुसंडी मारली. शिवसेनेला मात्र आपल्या जागा राखण्यात कसेबसे यश मिळाले. काँग्रेसने आश्चर्यकारकरित्या आपली कामगिरी सुधारली असतानाच राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला.

नांदगावमध्ये पंकज भुजबळांचा ऐतिहासिक विजय

$
0
0
एकदा निवडून आलेला आमदार पुन्हा विधानसभेत न पाठविण्याची नांदगाव विधानसभा मतदारसंघाची तब्बल पंचावन्न ते साठ वर्षांची परंपरा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भुजबळ यांनी मोडीत काढली.

दिंडोरीत झिरवाळांनी काढला पराभवाचा वचपा

$
0
0
दिंडोरी-पेठ मतदारसंघात शिवसेनेच्या धनराज महाले यांचा १२,६३३ मतांनी पराभव करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी मागील पराभवाचा वचपा काढला. राष्ट्रवादीने हा बालेकिल्ला पुन्हा काबीज केला तर काँग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

चांदवडमध्ये डॉ. आहेरांनी केले परिवर्तन

$
0
0
चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांनी विद्यमान आमदार काँग्रेसचे शिरीष कोतवाल यांचा ११,१६१ मतांनी पराभव करीत भाजपच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा भगवा फडकविला.

बागलाणला मिळाला पहिला महिला आमदार

$
0
0
बागलाण विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार दीपिका चव्हाण या ४१८१ मतांनी विजयी झाल्या. बागलाण विधानसभेच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान त्यांनी मिळविला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images