Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कोणाच्या हातात देणार महाराष्ट्र माझा!

$
0
0
सिंहस्थासाठी निधीची गरज असताना केंद्र सरकारने एक पैसा दिला नाही. केंद्राचे मंत्री राज्यात गल्लोगल्ली फिरत असताना सिंहस्थासाठी निर्णय घ्यायला वेळ नाही. कांद्याचा प्रश्नही त्यांना सोडवायचा नाही असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.

ई स्कॉलरशीपसाठी ONLINE अर्ज

$
0
0
भारत सरकार मॅट्रीकोत्तर श‌िष्यवृत्ती व श‌िक्षण फी या योजनेसाठी २०१४-१५ या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ई श‌िष्यवृत्तीसाठी व‌िद्यार्थ्यांनी mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे आावाहन समाजकल्याण व‌िभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरात आज वीजपुरवठा बंद

$
0
0
वीजपुरवठा सुरळीत रहावा यासाठी महावितरण आज, शनिवारी दुरुस्तीची कामे हाती घेणार आहे. यासाठी शहरातील व ग्रामिण भागातील वीजपुरवठा खंडित रहाणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

१५० टन कचरा पडून

$
0
0
पगारी रजेच्या वेतनाचे पैसे ठेकेदाराने द्यावे, अशी मागणी करीत घंटागाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी तीन विभागात चक्का जाम आंदोलन केले. यामुळे सातपूर, सिडको आणि पश्चिम विभागातील सुमारे १५० टन कचरा पडून राहिला.

अबू जुंदालचा जामीन फेटाळला

$
0
0
नाशिकमधील महत्वाच्या स्थळांची रेकी केल्याप्रकरणी ऑर्थररोड कारागृहामध्ये असलेल्या अबू जुंदाल याचा जामीन अर्ज शुक्रवारी विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. या खटल्याची लवकरच सुनावणी सुरू होणार असून जुंदालही त्यास उपस्थित राहणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

`डी. जी`, मेंगाळ यांची हकालपट्टी

$
0
0
विधानसभा निवडणुकीत अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणारे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी आणि इगतपुरीचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पाक, चीनविरोधात गप्प का?

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली छबी आणि मार्केटिंग खराब होवू नये, म्हणून ते पाकिस्तान आणि चीनविरुद्ध बोलण्याचे टाळत आहेत. त्यांचा दिखाऊपणा आता उघड झाला असून, भाषाही बदलली आहे.

जैन कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची लढाई

$
0
0
घरकुल घोटाळ्यात धुळे कारागृहात असलेल्या सुरेश जैन यांच्या अनुपस्थित त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, त्यासाठी जैन यांचे बंधू, मुलगा व पत्नी निवडणुकीच्या रणागणात उतरले आहे.

किनारपट्टीवर युद्धपातळीवर मदतकार्य

$
0
0
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले ‘हुदहुद’ चक्रीवादळ धडकण्यापूर्वी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आले आहे.

नावीन्यपूर्ण संकल्पनांतूनच पर्यटन विकास

$
0
0
नाशिक जिल्हा हा टूरिस्ट डेस्टिनेशन म्हणून ओळखला जाणे आवश्यक आहे. नैसर्गिक संसाधने आणि तीर्थाटनासाठी आवश्यक बाबी जिल्ह्यात आहेत. ठोस पाठपुराव्याअभावी नाशिकचा पर्यटन विकास होऊ शकलेला नाही.

वादळामुळे निवडणूक निरीक्षकही ‘रिकॉल’

$
0
0
आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या हूडहूड वादळामुळे निवडणूक आयोगाने राज्याच्या निवडणुकीत नियुक्त केलेले तीन निरीक्षक रिकॉल केले आहेत. त्यात नाशिक आणि बीड जिल्ह्यातील निरीक्षकांचा समावेश आहे.

महिला पोलिसाला चोरट्यांकडून चुना

$
0
0
बँकेतील अधिकाऱ्याला हाताशी धरून एका महिला पोलिसाच्या खात्यातून परस्पर २३ हजारांची रोकड काढण्यात आली. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रतिभा दत्तात्रय आहेर या नवप्रशिक्षणार्थी महिला पोलिसाने फिर्याद दिली आहे.

नाशकात पकडल्या बनावट नोटा

$
0
0
निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यभर कोट्यवधींच्या बेहिशेबी रकमा जप्त होत असताना नाशकातही गुन्हे शाखेने शनिवारी चार लाख वीस हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या. शंभर रुपयांची बनावट नोट ५० रुपये दराने विकली जात असल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.

कार्यकर्ता सेनेचा अन् पाठिंबा भुजबळांना

$
0
0
उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी शिवसेना उमेदवार संभाजी पवार यांना विरोध करण्यासाठी छगन भुजबळ यांच्या पारड्यात आपले वजन टाकणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

अव्दय हिरेंच्या प्रचारासाठी राखी सावंत मनमाडमध्ये

$
0
0
आजवर मराठी मराठी म्हणत मराठीच्या नावाखाली महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या नेत्यांनी जनतेला कधी अन्न, वस्त्र, निवारा दिला का, असा सवाल करीत आणि पंतप्रधान मोदींची दृष्टी लक्षात घेऊन त्यांचे हात बलशाली करण्यासाठी राज्यात भाजपचे सरकार आणा, असे आवाहन अभिनेत्री राखी सावंत हिने केले.

भांडवलदार समर्थक पक्षाला सत्तेत बसवू नका

$
0
0
‘महाराष्ट्रात युती क‌िंवा आघाडी तुटल्याचा देखावा न‌िर्माण केला जात असला तरीही हे सर्व पक्ष आतून एकच आहेत. आण‌ि ते सर्व भांडवालदारांनाच धार्ज‌िणे आहेत. राज्यातील कष्टकरी जनतेच्या व‌िकासासाठी भांडवलदारांच्या समर्थक असलेल्या पक्षांना सत्तेत बसवू नका.

तोफा आज टिपेला

$
0
0
नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला असून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या जाह‌िरसभांचा टप्पाही आता संपला आहे. नरेंद्र मोदी, राहूल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या तोफा धडाडल्यानंतरही जिल्ह्यात निवडणुकांचे वातावरण तयार होऊ शकले नाही.

आगामी काळ इंजिनीअर्सचा

$
0
0
‘उद्योग क्षेत्रात स्पर्धा असेल तरच गुणवत्ता आणि कामगिरीचा कस लागतो. उद्याचे जग हे मोठ्या स्पर्धेचे आणि संशोधनाचे आहे. या काळात इंजिनीअर्सचे योगदान अत्यंत मोलाचे ठरणार आहे,’ असे प्रतिपादन कोकुयो कॅमलिन लिमिटेडचे चेअरमन सुभाष दांडेकर यांनी केले.

डी‌जीपी-अंबड रस्ता खड्ड्यात

$
0
0
डीजीपी नगर येथील माऊली लॉन्स ते अंबड येथील महिंद्रा कंपनी दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाल्याने नागरिकांना खड्डे चुकवित मार्ग शोधावा लागत आहे. याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

आयुक्तांविना रखडली कामे

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काम करू द्यायचे नाही या एकमेव उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी नाशिक महापालिकेला आयुक्त दिला नाही. मनसेच्या नगरसेवकांना काम करू न देता कोंडीत पकडण्याचे तंत्र राज्य सरकारने अवलंबले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images