Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

MNS चे कंडक्टर वेंडींग मशिन

$
0
0
मतदानाच्या दिवशी मतदार यादीतील नाव व ठिकाण शोधण्याचा त्रास होऊ नये. केंद्रांवर हेलपाटे न मारता स्लिपा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कंडक्टर वेंडींग मशिनद्वारे स्लिपा तयार करणार अहे. या स्लिपांचे मतदारांना वाटप केले जाणार आहे.

महापालिकेला वाइन तूरटच !

$
0
0
द्राक्षापासून बनविल्या जाणाऱ्या वाइनला स्थानिक संस्था करातून (एलबीटी) सूट द्यावी, अशी वाइन उद्योजकांची मागणी धुडकावली आहे. कृषी प्रक्रिया उद्योग असल्यामुळे आणि नाशिक ही देशाची वाइन कॅप‌िटल असल्याचा विचार करुन ही सूट द्यावी, अशी विनंती वाइन उत्पादकांनी केली होती.

आनंदीबेन पटेलही प्रचारात

$
0
0
विधानसभा निवडणुकीत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावाती प्रचार दौरा नियोजित केल्यानंतर आता गुजराती मते मिळविण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनाही पाचारण केले आहे. येत्या रविवारी, १२ ऑक्टोबर रोजी त्यांची नाशकात सभा होणार आहे.

अपघातात दोन महिला ठार

$
0
0
नाशिक-कळवण रस्त्यावर वलखेड फाटा येथे इंडिका व टाटा सुमो यांच्यात अपघात होऊन दोन महिला भाविक ठार झाल्या. रंजना सांगळे (वय ५५) व ताई गुरुकुल (वय ३५) अशी त्यांची नावे आहेत.

दिग्गजांमुळे प्रचार शिगेला

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जिल्ह्यात जोर चढला असून, दिग्गज नेत्यांच्या सभांनी मैदाने गाजत आहे. नरेंद्र मोदींच्या सभेनंतर आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आपल्या दिग्गज नेत्यांना नाशिकच्या मैदानात उतरविले आहे.

पूर्वीचे भ्रष्टाचारी आता भाजपसाठी झाले संत

$
0
0
‘भाजपने काही वर्षांपूर्वी आमच्या मंत्र्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून विधीमंडळात गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज बंद पाडले. मात्र, त्या वेळी भाजपसाठी जे भ्रष्टाचारी होते ते आता संत झालेत,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.

राज ठाकरेंच्या आज तीन सभा

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचाराच्या रणधुमाळीत अखेरच्या टप्प्यात मुसंडी मारली असून, विविध ठिकाणी प्रचाराने चांगलाच जोर पकडला आहे. आज, शनिवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या एकाच दिवशी तीन सभा होणार आहेत.

पवारांनी उडवली ‘अच्छे दिन’ची खिल्ली

$
0
0
आमच्याकडे असणारे भ्रष्टाचारी मंत्री भाजपात गेले की साधू संत कसे होतात. देशाचे सैनिक सीमेवर लढा देत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचारासाठी फिरत असलेल्या पंतप्रधान मोदींच्या भाजपच्या हातात छत्रपती तसेच फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

‘हक्काच्या पाण्यासाठी शिवसेनेला सत्ता द्या’

$
0
0
महाराष्ट्र गिळंकृत करण्यासाठी नव्हे तर, महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनेला सत्ता हवी आहे. सत्ता नसताना आम्ही पाणी दिले. मग, सत्ता असताना हक्काचे पाणी देणार नाही का, असा सवाल करीत शिवसेनेच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनमाड येथे केले.

राज्यातून भाजपला हद्दपार करा

$
0
0
अवघ्या चार महिन्यात पंतप्रधान मोदी सरकारने आपली वाघनखे बाहेर काढली आहेत. शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला उद्धवस्त करणाऱ्या नीतीचा अवलंब करणाऱ्या भाजपला सर्वसामान्य शेतकरी व मतदार छत्रपतींच्या महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिला.

भुजबळांना जागा दाखवा

$
0
0
केंद्रात सरकार कोणाचेही असले तरी माझी बांधीलकी शेतकऱ्यांशी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न शिवसेना सोडवणारच आहे. मात्र, नाशिक लोकसभा निवडणुकीत उताणे केले आता तुम्हीही येवल्यातही भुजबळांना उताणे करा, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.

व‌िद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक

$
0
0
वाढीव फीच्या मुद्यावरून यंदाच्या शैक्षण‌िक वर्षाच्या सुरुवातीला वादात सापडलेली सेंट फ्रान्स‌िस शाळा अद्यापही व‌िद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे.

‘महापालिकेकडून वृक्षारोपणाची हमी घ्या’

$
0
0
महापालिकेला तोडाव्या लागणाऱ्या २,०१४ झाडांमागे २०,०१४ झाडांचे वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याची मागणी सेवास्तंभ या सामाजिक संघटनेने मुख्य वनसंरक्षकांकडे केली आहे. विविध रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेला हजारो झाडे तोडावी लागणार आहेत.

‘मध्य नाशिक’मध्ये मनसेचा वैयक्तिक भेटीगाठींवर भर

$
0
0
विधानसभा मतदानास अवघे चार दिवस राहिले असल्याने निवडणुकीने रंग भरला आहे. नाशिक मध्य मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान आमदार वसंत गिते यांनी गल्लीबोळ, वाड्या वस्त्यांवर वैयक्तिक गाठीभेटींवर जोर दिला असून त्यांच्या सोबत मतदारही सहभागी होत आहे.

वृंदावन नगरात तरुणांची PSI ला धक्काबुक्की

$
0
0
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी करीत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की आणि दमदाटी करण्यात आली. आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत‌ील वृंदावन नगरमध्ये हा प्रकार घडला.

भ्रष्टाचारमुक्त राज्यासाठी भाजपला साथ द्या

$
0
0
गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर केला. भ्रष्टाचाराने हे राज्य पोखरून टाकले. आज ते मोदींकडे १०० दिवसांचा हिशेब मागत आहेत. पण, या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या या भ्रष्ट सरकारला घरी पाठवा.

बदलाची परंपरा टिकणार, की इतिहास घडणार?

$
0
0
इगतपुरी विधानसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यातील सर्वाधिक विस्तीर्ण मतदारसंघ आहे. आदिवासी मतदारसंघ असूनही निर्णायक मतदार मात्र बिगर आदिवासी असतो. या मतदारसंघात काहीसे जातीपातीचे राजकारण चालते.

पाणी कराराविषयी माहिती द्या

$
0
0
इंडिया बुल्स आणि एनटीपीसीशी झालेल्या पाणी कराराबाबत माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. गोदाप्रदूषणाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान पाणी कराराचा मुद्दा समोर आल्याने कोर्टाने सरकारला आदेश दिले.

सातपूरसह पश्चिम भागात उद्या पाणीपुरवठा बंद

$
0
0
बळवंतनगर जलकुंभाजवळील कार्बन नाका ते रामराज्य जलकुंभ भरणाऱ्या ५०० एमएम व्यासाच्या पाईपलाईनवरील गळती बंद करण्यासाठी तसेच, पाईललाईन जोडणीचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासन १२ ऑक्टोबर रोजी काम सुरू करणार आहे.

‘अच्छे‌ दिन’चे स्वप्न सत्यात उतरलेच नाही

$
0
0
भारतातील जनता, महागाई, बेकारीमुळे वैतागली आहे. मोदी सरकारच्या राजवटीत जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले असून माणसांचे भाव मात्र कमी झाले आहेत. मोदी सरकारचे अच्छे दिनाचे स्वप्न सत्यात उतरलेच नाही, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images