Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

३० वर्षानंतर येणार पंतप्रधान

0
0
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच येत्या ५ ऑक्टोबरला नाशिकला येत आहेत. तब्बल तीन दशकाच्या प्रतिक्षेनंतर प्रथमच देशाचा पतंप्रधान प्रचाराच्या निमित्ताने का होईना नाशिकमध्ये येत असल्याने, पंतप्रधान पाहण्याचे भाग्य नाशिककरांना लाभणार आहे.

एकनाथ खडसेंना रोखणे अवघड

0
0
सरपंच ते विरोधी पक्षनेता अशी तब्बल ३४ वर्षांची राजकीय कारकीर्द भूषविणारे आणि आता थेट मुख्यमंत्रिपदावर दावा करणारे एकनाथराव खडसे यांना पक्षांतर्गत; तसेच विरोधकांकडून चक्रव्यूहात अडकविण्याचा प्रयत्न होत असला, तरी या निवडणुकीत त्यांची नौका हेलकावे खात का होईना काठाला लागण्याची चिन्हे आहेत.

मोदींची रविवारी नाशकात सभा

0
0
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत असून येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये प्रचारसभा घेणार आहे. नाशिकच्या पंचवटी भागात मोदींची प्रचारसभा होणार असल्याची माहिती भाजपचे नाशिक जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी दिली.

‘ओशाळले’ मतदार...

0
0
चित्रपटावर आधारित उमेदवारांचे वाजणारे गाणे, पत्रकांचे वाटप, उमेदवारांच्या वैयक्तिक गाठीभेटी अशा नव्या-जुन्या पध्दतीने प​श्चिम मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार आता जोर पकडू लागला आहे.

गावित-गवळींचे एटींपुढे आव्हान

0
0
कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रमुख सहा पक्षांसह एक अपक्ष असे सात उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत ही तिरंगीच होणार आहे.

जनहितासाठी साथ द्या!

0
0
केंद्र सरकार हे भांडवलदारांचे सरकार असून सर्वसामान्य व शेतकरी हिताविरोधी धोरण राबविणारे आहे. महाराष्ट्रात त्यांची पुनरावृत्ती न करता शेतकरी व गोरगरीब जनतेच्या हितासाठी काँग्रेसचेच उमेदवार विजयी करा, असे आवाहन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

जातपात अन् गणगोताची हवी साथ

0
0
शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचे मिश्रण असलेल्या नाशिक पूर्व मतदारसंघातून सर्वच पक्ष विजयाचा दावा करीत असले, तरी विजयाचे गणित हे भगवी लाट आणि गणगोतावरच अवलंबून आहे.

बाजारपेठेत उत्साह; कोट्यवधीची उलाढाल

0
0
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध वस्तू खरेदी करण्यासाठी शुक्रवीरी शहरातील बाजारपेठ गजबजली होती. यात सोने खरेदीबरोबरच घरगुती वापराच्या अनेक वस्तूंची खरेदी केली.

शिक्षण मंडळाचा हिशेब होणारच!

0
0
यापूर्वी झालेल्या अनागोंदी कारभाराला कुठेतरी लगाम घालण्यासाठी पैशांचा हिशेब घेणे आवश्यक असल्याचा दावा करून शिक्षण मंडळाकडून तो घ्यायचाच, यासाठी लेखा विभागाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

‘अतिक्रमण’चा विमा प्रतीक्षेत

0
0
अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे, यासाठी त्यांचा अपघात विमा काढण्यात यावा, हा प्रस्ताव मागील पाच महिन्यापासून धुळखात पडला आहे. माजी आयुक्त संजय खंदारे हे या प्रस्तावासाठी आग्रही होते.

काँग्रेसच्या फेसबुक पेजवर टीका

0
0
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या फेसबुक वॉलला भेट देणाऱ्यांनी काँग्रेसवरच टीका करण्याची संधी साधली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जसे स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हटलेय तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत.

मोदींच्या सुरक्षेसाठी सज्ज

0
0
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नाशिकमध्ये येत आहेत. पंचवटीतील तपोवन परिसरात ही सभा होणार असून पोलिसांनी बंदोबस्ताची जोरदार तयारी केली आहे.

रावण दहनासाठी उसळली गर्दी

0
0
‘सियावर रामचंद्र की जय’ अशा घोषणा देत पंचवटीतील व्यंकटेश बालाजी ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रामकुंडावर रावण दहनाचा कार्यक्रम झाला. यावेळी ४० फूट रावणाचे दहन करण्यात आले.

सभापतींची आज निवड

0
0
जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी शनिवारी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याने बहुमतासाठी राष्ट्रवादी पुन्हा अध्यक्ष निवडीचाच फार्म्युला वापरण्याची शक्यता आहे.

फाळके स्मारकाला प्रतीक्षाच

0
0
आजपर्यंत दोनदा निविदा प्रसिध्द झाल्या मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जोपर्यंत ठेकेदारांचा शोध संपत नाही, तोपर्यंत हे असेच सुरू राहणार, अशी खेदजनक प्रतिक्रिया कधीकाळी शहराचे भूषण ठरलेल्या दादासाहेब फाळके स्मारकाबाबत महपालिका ​अधिकारी व्यक्त करीत आहेत.

लासलगावला तरुणीवर बलात्कार

0
0
लासलगाव शहरातील एका मोबाईल रिचार्ज कंपनीत काम करणाऱ्या १९ वर्षीय युवतीवर मालकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

ना वासुदेव, ना उमेदवारांचे बलून

0
0
लोकसभा निवडणुकीदरम्यान मिळालेल्या वेळेचा फायदा राजकीय पक्षांनी पुरेपुर उचलला. यातून महायुतीने वासुदेवांचा जागर करून उमेदवारांची माहिती असलेले बलून आकाशात सोडले.

सोनं घ्या...मतं द्या!

0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत असलेला प्रत्येक सण, उत्सवाचा मतांसाठी फायदा करून घेण्याची शक्कल उमेदवार लढवत आहेत. शहरातील तसेच जिल्ह्यातील उमेदवारांनी दसऱ्याचाही मतांसाठी उपयोग करून घेतला.

अपयश पचवून भुजबळ पुन्हा रिंगणात

0
0
‘ओबीसींचे मसिहा’ अशी बिरुदावली मोठ्या अभिमानाने मिरविणाऱ्या छगन भुजबळ यांचा याच बहुमानामुळे लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात मराठा समाजाने पराभव केला. तब्बल पावणे दोन लाख मताधिक्क्याने झालेला पराभव भुजबळांच्याही चांगलाच जिव्हारी लागला.

आजारी मतदार मत कसे देणार?

0
0
सातपूर येथील जाधव संकुल परिसरातील नागरिक दूषित पाण्याने त्रस्त झाले आहेत. जलवाहिन्या फुटल्याने त्यात ड्रेनेजचे पाणी मिसळते. यामुळे परिसराला दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होतो.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images