Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मोदी सरकारकडून कांदा उत्पादकांची थट्टा

$
0
0
केंद्रातील मोदी सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घालण्याबरोबरच पाकिस्तानातून कांदा खरेदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता भाजपाच्या उमेदवारांना धुळ चारल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे यांनी दिला.

नगरसूलला शेतकऱ्यांचा मोर्चा

$
0
0
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या खंडित वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नगरसूल परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी नगरसूल येथील वीज उपकेंद्रावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घातला.

देवी मंद‌िरात भाविकांच्या रांगा

$
0
0
सप्तमीनिमित्त शहरातील देवी मंद‌िरांमध्ये विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी घागर फुंकण्याचा कार्यक्रम झाला.

दुर्गा महोत्सवाला सुरुवात

$
0
0
बंगा संज्योग फाऊंडेशनतर्फे गंगापूर रोड येथील दिप लॉन्समध्ये नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून साईबाबा हार्ट फाऊंडेशनचे डॉ. अनिरुध्द धर्मार्धिकारी उपस्थित होते.

आम्हाला पाणी मिळेल का पाणी?

$
0
0
प्रभाग क्र. ४९ मधील चाणक्यनगर परिसरातील रहिवाशी गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पाणी प्रश्नाने हैराण झालेले आहेत. नगरसेवक, मनपा अधिकाऱ्यांना सांगूनही पाणी प्रश्न सुटत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

सुपर स्पेशालिटीमध्ये हृदय दिन साजरा

$
0
0
जागतिक हृदय दिनानिमित्त सुपर स्पेशालिटी हॉस्प‌िटलमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हृदयाची काळजी आणि ह्दय विकार होऊ नये म्हणून उपाययोजनांवर जनजागृती करण्यात आली.

तुळजाभवानी

$
0
0
महाराष्ट्रातील बहुतांश भाव‌िकांचे कुलदैवत तुळजाभवानी द‌ेवी आहे. प्रत्यक्षात तुळजापुरास जाणे शक्य नसेल तर भाव‌िक प्रात‌िन‌िधीक मंद‌िराच्या शोधात असतात.

निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाच्या निमित्ताने ‘माझे आवडते शिक्षक’ या विषयावर निंबध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांचा ‘मटा’च्या कार्यालयात बक्ष‌िस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राम थत्ते अनंतात विलीन

$
0
0
शहरातील ज्येष्ठ शिल्पकार व अजिंठा लेण्यांचा इतिहास शब्दबध्द करणारे लेखक राम अनंत थत्ते यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी १० वाजता अमरधाममध्ये अंत्यसंस्कार झाले. ते ८0 वर्षांचे होते.

पैसे वसुलीवरून अपहरण नाट्य

$
0
0
ऊसनवार द‌िलेले पैसे परत करीत नसल्याच्या वादावरून स‌िडको परिसरातील एका इसमाचे अपहरण करण्यात आले होते. या संदर्भात अंबड पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपी मह‌िलेला पोल‌िसांनी ताब्यात घेतले आहे.

इंडियन सिल्क एक्स्पो सुरू

$
0
0
कॉटन सिल्क विर्क्स असोसिएशनतर्फे शहरातील हॉटेल ग्रीन व्ह्यूमध्ये इंडियन सिल्क एक्स्पो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या कपड्यांच्या व्हरायटी आणि देशभरातील विविध संस्कृतीचे कपडे ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत.

‘आडगावकर फेस्टिव्हल’मध्ये जिंका घर

$
0
0
नवरात्रीच्या सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना गंगापूर रोड लिंक रोड परिसरात २ बीएचके घर बक्षिस म्हणून जिंकण्याची संधी शहरातील आडगावकर सराफ प्रा. लि. यांनी उपलब्ध करून दिली आहे.

मिळाले १८; देणी ८० कोटी

$
0
0
एलबीटीतील एक टक्का सरचार्ज, शेतसारा तसेच करमणूक कर असे मिळून राज्य सरकारने महापालिकेला सुमारे १८ कोटी रुपये दिले. यातील काही रक्कम महापालिकेच्या तिजोरीत देखील जमा झाली.

आज हरित कुंभाची प्रत‌िज्ञा

$
0
0
‘भोवतालच्या प‌र्यावरण रक्षणासाठी तत्पर राहू’, अशा आशयाची प्रत‌िज्ञा आज शहर आण‌ि ज‌िल्हाभरातील व‌िव‌िध शाळांमधील सुमारे साडेबारा लाख व‌िद्यार्थी घेणार आहेत. कुंभमेळ्याच्या न‌िम‌ित्ताने समाजात पर्यावरण जागृतीचा संदेश जावा, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

पंचवटीच्या पाण्यासाठी आंदोलन

$
0
0
पंचवटी विभागातील अनेक भागात पाणीच पोहचत नाही. ज्या ठिकाणी पोहचते तिथे पाण्याला दाबच राहत नाही. अनेक वेळा तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. १० ऑक्टोबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नगरसेविका शालिनी पवार, सिंधू खोडे, रंजना भानसी आदींनी दिला.

निफाडमध्ये पंचरंगी लढत

$
0
0
निफाड विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे या सर्वच प्रमुख पक्षांनी निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली आहे.

वर्कर मिळंल का वर्कर!

$
0
0
ठकसेनला आज जरा बरं वाटत होतं. घरच्या हायकमांडनं डीपीच्या तेलानं पाठीचं केलेलं मालिश आणि सोबतीला डोक्शाला किक देणारा अतिकडवट काढा पाजल्यानं त्याला आराम पडला होता. परसाकडं जावून आल्यावर तर त्यांनं व्हरांड्यात दोनचार जोरबैठकाही काढल्या होत्या.

महिलेचा गळा आवळून खून

$
0
0
कुरापत काढून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा नोंदव‌िण्यात आला आहे. या प्रकरणी सासऱ्याने जावयाच्या व‌िरोधात पंचवटी पोल‌िस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

SMS : ग्राहकाला ‘एअरटेल’ने भरपाई द्यावी

$
0
0
ग्राहकांना नकोसे झालेले एसएमएस पुन्हा पुन्हा पाठवून मनस्ताप द‌िल्याप्रकरणी एअरटेल कंपन‌ीने मोबाइल ग्राहकास नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश नाश‌िक ज‌िल्हा ग्राहक पंचायतीने एका सुनावणीदरम्यान द‌िले आहेत.

चांदवडमध्ये लाचखोर पोलिसासह दोघांना अटक

$
0
0
मोटार अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच वाहनाची जप्त केलेली कागदपत्रे परत करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षकासह आणखी एकाला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images