Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चांदवडमध्ये ७ अर्ज अवैध

0
0
चांदवड देवळा मतदारसंघातील एकूण २५ उमेदवारी अर्जांपैकी ७ अर्ज छाननीत अवैध ठरले. डॉ. आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल, प्रवीण ठाकरे, गोविंद पगार, रमजान पठान, उदयकुमार आहेर, बाळासाहेब माळी यांचे अर्ज छाननीत बाद झाले.

नांदगावमध्ये रंगणार 'स्‍थानिक-उपरा' संघर्ष

0
0
नांदगाव मतदारसंघ यंदा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. या मतदारसंघात स्‍थानिक विरुध्द उपरा असा संघर्ष जोरू धरू लागला आहे. शिवसेनेतर्फे सुहास कांदे, भाजपतर्फे अव्दय हिरे, काँग्रेसतर्फे अनिल अहेर तर राष्ट्रवादीतर्फे पंकज भुजबळ यांच्यात लढत रंगणार असून आहेर-हिरे हे स्‍थानिक उमेदवार आहेत तर, कांदे व पंकज भुजबळ हे उपरे उमदेवार आहेत.

शिवसेनेचे मायक्रोप्लॅनिंग

0
0
विधानसभा निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट होताच शिवसेनेने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मायक्रोप्लॅनिंग सुरू केले आहे. उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी नाशिक मध्य विधानसभेचे उमेदवार अजय बोरस्ते यांच्या प्रचारासाठी बैठक घेवून प्रचाराचे नियोजन केले आहे.

पाणी कपातीची टांगती तलवार

0
0
पाणी आरक्षणात वाढ करण्यास नकार देणाऱ्या जिल्हा प्रशासनाने महापालिकेचा अतिरिक्त पाणी पुरवठा कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. प्रती व्यक्ती १५० लिटर्स पाणी देणे अपेक्षित असताना, महापालिका सुमारे २०० लिटर्स प्रती व्यक्ती पाणी देत असल्याने जिल्हा प्रशासनाचा यावर आक्षेप आहे.

इगतपुरीत पोलिसाची आत्महत्या

0
0
इगतपुरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत हवालदार विठ्ठल सखाराम जाधव (४८) यांनी पोलिस वसाहतीमधील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.

तुळजाभवानी मंद‌िर

0
0
घनकर गल्लीतील तुळजाभवानी देवीचे मंद‌िर सुमारे दीडशे वर्षांपासून भाव‌िकांचे श्रध्दास्थान बनले आहे. या मंद‌िरातील काळ्या पाषाणातील तेजस्वी मूर्ती भाव‌िकांच्या मनाला अभय प्रदान करते.

प्रकाश जावडेकर आज नाशकात

0
0
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळावे यासाठी पक्षाने मुलुख मैदान ही मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत पक्षाचे केंद्रीय मंत्री येत्या दोन दिवसात राज्यभरात प्रचार दौरे करणार असून याचाच एक भाग म्हणून केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे मंगळवारी नाशकात येणार आहेत.

शहरांचा विकास शाश्वत हवा

0
0
‘केंद्र सरकारने देशातील काही शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकस‌ित करण्याचे घोषित केले आहे. ही अत्यंत परिणामकारक बाब असून या शहरांचा विकास हा शाश्वत व्हायला हवा,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध आर्किटेक्ट हाफीद कॉन्ट्रॅक्टर यांनी केले.

भावनाशून्य पाल्यांना जिजाऊंची गरज

0
0
‘मार्कस आणि टक्केवारी याच्या रेट्यापुढे विद्यार्थी हे भावनाशून्य बनत आहेत. विद्यार्थ्यांमधील शुष्कता दूर करण्यासाठी आई-वडिलांचा विचारातही बदल होणे गरजेचे आहे. तसेच, आजच्या विद्यार्थ्यांना जिजाऊंसारख्या मातेची नितांत गरज आहे,’ असे प्रतिपादन सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे ड‌ीन सुरेश नेरकर यांनी केले.

वीज अभियंत्याला दीड वर्ष कारावास

0
0
इमारत‌ीमध्ये सिंगल फेजचे कनेक्शन देण्यासाठी ३ हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या राज्य वीज वितरण कंपनीच्या कनिष्ट अभियंत्याला न्यायालयाने दीड वर्ष कारावास आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

नगरसेवक शेलार, शिंदे यांच्याविरुद्ध तक्रार

0
0
महापौर निवडणुकीत पक्षाविरुद्ध भूमिका घेणारे मनसेचे जेलरोडचे नगरसेवक निलेश शेलार आणि सौ. शोभना शिंदे यांचे नगरसेवकपद रद्द करावे, असा अर्ज मनसेतर्फे सोमवारी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना सादर करण्यात आला.

भेसळ दुधातली

0
0
आपल्या जन्मापासूनच दूध महत्त्वाचे मानले जाते. नवजात बालकाचे पोषण ते एक वर्षाचे होईपर्यंत, आईच्या दुधावरच होत असते. त्यानंतर सुद्धा आयुष्यभर दूध हा आपल्या आहाराचा अतिशय महत्त्वाचा घटक असतो.

आम्हाला पाणी मिळेल का पाणी?

0
0
प्रभाग क्र. ४९ मधील चाणक्यनगर परिसरातील रहिवाशी गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पाणी प्रश्नाने हैराण झालेले आहेत. नगरसेवक, मनपा अधिकाऱ्यांना सांगूनही पाणी प्रश्न सुटत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

राजीव पाटीलचा स्मरणकट्टा!

0
0
राजीव, आज आम्ही सगळे तुझ्या कट्ट्यावर येतोय. गप्पा मारायला. तुझ्याबद्दल बोलणार, गप्पा करणार. तुझ्या धमाल आठवणींनी मैफील रंगवणार! म्हणजे तुला जसं आवडतं, तसं! (तू ओरडला असशील, की अरेऽऽऽ नाटक करा रेऽऽऽ त्यापेक्षा!!) तुला जाऊन वर्ष झालं असं म्हणतात.

हिमायत बेगला मिळणार उपचार

0
0
‘मेरे दात मे दो साल से दर्द है. रुटल कॅनल करना पडेगा ऐसा जेल की डॉक्टर का कहना है. लेकीन मुझे इलाज नही दिए जा रहे,’ हिमायत बेगच्या या तक्रारीची दखल न्यायालयाने घेतली आहे.

जिल्ह्यात ५२ अर्ज अवैध

0
0
विधानसभा निवडणुकीत एकूण ३१३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर या अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, जिल्ह्यात एकूण ५२ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता २४७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, निफाड मतदारसंघातील हरकतींवर मंगळवारी निर्णय घेण्यात येणार आहे.

कालिकेची सुरक्षा ‘राम’भरोसे

0
0
नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका देवीच्या यात्रेतील सुरक्षाव्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन हे रामभरोसेच असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिस आयुक्तांनी केलेल्या पाहणीतून ही बाब उघड झाली असून, या असुरक्षेचा अहवालच त्यांनी तयार केला आहे.

फटाके स्टॉल्स निवडणूक आयोगाच्या ‘दारात’

0
0
शहरातील विविध भागात फटाके स्टॉल्स उभारणीच्या कामाची प्रक्रिया राबवण्यासाठी महापालिका प्रशासन निवडणूक आयोगाकडून मंजुरी घेणार आहे. ग्राहकांची सुरक्षा तसेच, निवडणुकीच्या रणधुमाळीत समन्वय साधण्यासाठी निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे.

जगदंबा चरणी भुजबळांनी वाढविला प्रचाराचा नारळ

0
0
येवला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोटमगाव येथील श्री जगदंबा मातेच्या चरणी श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला.

इगतपुरीत फडकवा राष्ट्रवादीचा झेंडा

0
0
नाशिक जिल्ह्यात विकासाचे वैभव कायम ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा. इगतपुरी हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तयार करण्यासाठी हिरामण खोसकर यांच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images