Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मैदानात उतरले १९ नगरसेवक

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शहरातील तब्बल १९ नगरसेवक उतरले आहेत. यातील काही आज, सोमवारी माघार घेतील तर, काही पक्षाविरोधात बंडाचा झेंडा उगारतील. पक्षाने थंड केलेल्या इच्छुक नगरसेवकांची संख्या देखील मोठी असल्याने विधानसभेच्या आखाड्याला महापालिका निवडणुकीचे स्वरूप आले आहे.

बहुरंगी लढतींमुळे जिल्ह्यात रंगत

$
0
0
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर जिल्ह्यातील निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. येवला वगळता सर्वच मतदारसंघामध्ये पंचरंगी आणि षटकोनी लढती होणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. युती आणि आघाडीत फाटाफूट झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय गणिते मोठ्या प्रमाणावर बदलली असून, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सद्यस्थितीत असलेल्या जागा राखणेही अवघड होणार आहे.

गडकरींनी टाळली शिवसेनेवर टीका

$
0
0
काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या निवडणूक प्रचाराचा नारळ रविवारी फोडला. नंदुरबारसह पाचही ठिकाणी झालेल्या जाहीर सभांमध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. मात्र, मित्रपक्ष राहिलेल्या शिवसेनेवर टीका करण्याचे त्यांनी जाणीवपूवर्कपणे टाळले तसेच पत्रकारांपासूनही अंतर राखले.

अर्ज बाद झाल्याने उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील कळवण मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज असलेले अपक्ष उमेदवार हरि पवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. उमेदवारी अर्ज बाद झाल्याचे कळल्यानंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.

कांदाभाव पडल्याने येवल्यात रास्तारोको

$
0
0
सोमवारी येवला मार्केट यार्डात व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरू होताच ८०० ते ९०० रुपये क्विंटल भाव पुकारल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत येवला- मनमाड रोडवर रास्तारोको आंदोलन करून शासनाचा निषेध केला.

ग्रामसेवकांच्या श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

$
0
0
नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या श्रमदान वनराई बंधारा उपक्रमाला कळवण तालुक्यातील आठंबे शिवारापासून सुरुवात करण्यात आली.

येवल्यात १७ उमेदवारांचे अर्ज वैध

$
0
0
येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी सोमवारी येवला तहसील कार्यालयात झाली. छाननीत १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर, प्रवीण मढवई, भागवत सोनवणे या दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

निफाड तालुक्यात बिबट्यांची वाढती दहशत

$
0
0
निफाड तालुक्यातील कुरडगाव, कोठुरे, सुंदरपूर, जळगाव, काथरगाव व नांदूरमधमेश्वर परिसरातील काही गावांमध्ये महिनाभरापासून बिबट्याचा पुन्हा मुक्त संचार सुरू असून जनावरांपाठोपाठ बिबट्याने आता माणसांवरही हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.

चव्हाणांचा अर्ज वैध

$
0
0
बागलाण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार दिपाली संजय चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात यावा, या आशयाची मागणी माजी आमदार व भाजपाचे उमेदवार दिलीप बोरसे यांनी बागलाणचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना केली होती.

बागलाणमध्ये सहा अर्ज अवैध

$
0
0
बागलाण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत २४ उमेदवारांपैकी ६ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून १८ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

जिल्ह्यातून दोघे तडीपार

$
0
0
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवायांचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातून दोन जणांना तडीपार करण्यात आले असून विविध गुन्ह्यांमध्ये ३० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

सिंहस्थासाठी एक टीएमसी पाणी राखीव

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन गंगापूर धरण समुहात एक टीएमसी पाण्याचे आरक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यासंबंधीचा निर्णय पालकमंत्री जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाणी आरक्षणाबाबत घेतलेल्या बैठकीत दिली.

गुलाब देवकरांना चार सदस्यांची मंजूरी

$
0
0
जळगाव घरकुल घोटाळ्यातील संशयीत आरोपीच्या खटल्याचे कामकाज सोमवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयात झाले. आमदार सुरेश जैन, माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह इतर चार संशयित आरोपी न्यायालयात हजर होते.

साधुग्रामबाबत ७ ऑक्टोबरला शेतकऱ्यांची बैठक

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात प्रस्तावित असलेली साधुग्रामची जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ७ ऑक्टोबरला ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

आज ‘राजीवची स्मरण मैफील’

$
0
0
‘चित्र तू नाट्य तू अजरामर मित्र तू’ असा साऱ्याच नाशिककर कलावंतांचा लाडका मित्र असलेला विख्यात दिग्दर्शक राजीव पाटील यांचा आज, ३० सप्टेंबर रोजी पहिला स्मरणदिन… अजूनही मित्र आणि आप्तस्वकीयांचा त्याच्या जाण्यावर विश्र्वास बसत नाही… कायमच क्रिएटीव्ह मित्रांना एकत्र बोलवून मैफील रंगवायला आवडणाऱ्या राजीवचा पहिला स्मरणदिन त्याच्या नाशिककर कलावंत मित्रमैत्रिणींनी अशाच गप्पांच्या, आठवणींच्या अनौपचारिक मैफीलीतून रंगवायचं ठरवलंय.

निफाड मतदारसंघात मतदार जागृती मोहीम

$
0
0
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या अभियानाला निफाड मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी फलकांव्दारे नागरिकांना महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.

... या ऋणांतून कसा होऊ उतराई!

$
0
0
अनाथ आश्रमात तो जेव्हा दाखल झाला, तेव्हा अवघा पाच-सहा वर्षांचाच होता. आईवडील लहानपणीच गेल्याने नातेवाईकांनी आश्रमात सोडून एक मोठं कुटूंब दिलं. तिथं आल्यावर आता तो एकटा नव्हता.

झेलमधलं दळण!

$
0
0
सकाळी उठल्यापासून ठकसेनचं अंग आज खूप दुखत होतं. (खरं तर त्याला आजपासून इतरांची अंग दुखवायची होती. तसं कामच त्याला मिळालं होतं.) गेलं दोन-चार दिवसांत त्याची पळापळ झाली होती. होम मिनिस्टरानं रात्री तेल अन् लाटण्यानं पाठीची मालिश करूनही त्याला आराम पडला नव्हता.

जिंकण्यासाठी वाटेल ते करा

$
0
0
निवडणुकीच्या प्रचाराला हाताच्या बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक राहिले असून, सर्वांपुढेच ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. त्यामुळे आपल्या हक्काचे मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी ठोस व्यवस्था करा.

नांदगावमध्‍ये तिघे बाद

$
0
0
नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल ३२ उमेदवारी अर्जांपैकी तीन उमेदवारांचे अर्ज सोमवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत अवैध ठरले. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी. एम. गाडीलकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी सुदाम महाजन यांनी दिली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images