Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

घोलपांची याचिका सुप्रीम कोर्टानेही फेटाळली

$
0
0
उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका फेटाळली आहे. त्यामुळे घोलपांचा निवडणूक लढण्याचा मार्ग आता पूर्णपणे बंद झाला आहे.

निवडणुकीसाठी जिल्ह्यात ११ निरीक्षक

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यात एकूण ११ निरीक्षकांची नियुक्ती केली असून, यातील तीन निरीक्षक नाशकात दाखल झाले आहेत. तर उर्वरित आठ निरीक्षक येत्या शनिवारी जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

पवार कुटुंबियांनी नेले बागलाणमधून अर्ज

$
0
0
बागलाण विधानसभा मतदारसंघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बागलाणमधून आमदार ए. टी. पवार यांचे पुत्र प्रवीण पवार व जि. प. सदस्या भारती पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय पातळीवर घडामोडींना वेग आला आहे.

‘बागलाण विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या’

$
0
0
शेतकऱ्यांच्या कांदा व आणि डाळिंब पिकांच्या भावावर घाला घालणाऱ्या मोदी सरकार प्रणित भाजपाचे शासन सत्तेवर आणावयाचे की, शेती क्षेत्राची जाण असलेल्या शरद पवारांच्या विचारांचे पुरोगामी शासन महाराष्ट्रात सत्तेवर आणावयाचे याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संजय चव्हाण यांनी केले.

सोशल मीडिया बनला बदनामीचे माध्यम

$
0
0
फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या सोशल मिडीयाद्वारे गैरसमज पसरविणाऱ्या मजकूराद्वारे बदनामी केल्या प्रकरणी सरकारवाडा आणि भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दहा जागांवर मैत्रीपूर्ण लढती?

$
0
0
विधानसभेसाठी एक एक जागा महत्वाची असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या एकमेकांच्या जागा ओढण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपाचा तिढा हा दोन्ही पक्षांची ताकद असलेल्या मतदारसंघावर अडल्याने अशा जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा विचार पुढे आला आहे.

बँक ग्राहकांची तारांबळ

$
0
0
पुढील आठवड्यात सहा द‌िवसांमध्ये केवळ दोन ते तीनच द‌िवस बँका सुरू राहणार असल्याने ग्राहकांची तारांबळ उडणार आहे. सलग आलेल्या सुट्या अन् याच कालावध‌ीत येणारे दसरा ईद यांसारखे सण यामुळे बँकेशी निगडीत व्यवहारांची गरजही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर भासणार आहे.

सहा इच्छुकांनी भरले अर्ज

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ९४ इच्छुकांनी बुधवारी २२१ अर्ज नेले असून, सहा जणांनी सर्वपित्री अमावस्या आटोपताच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज नेल्याने तेही निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एटीएमवर मतदानाचे काऊंटडाऊन

$
0
0
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. ती अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने नामी शक्कल लढविली आहे. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यरत असलेल्या बँकांच्या एटीएममध्ये मतदानाचे काऊंटडाऊन लावण्यात येणार आहे.

ग्रामदेवता : काल‌िकादेवी

$
0
0
प्राचीन काळापासून वसलेल्या नाश‌िक नगरीची ग्रामदेवता म्हणून काल‌िका देवीला मान आहे. मुंबई नाका परिसरात असलेले हे जगदंबेचे स्थान जागृत आण‌ि नवसाला पावणारे म्हणूनही भा‌व‌िकांमध्ये व‌िख्यात आहे.

घुमरो घुमरो मारो घागरो

$
0
0
‘फोक’ गरबा ते ‘बॅले विथ गरबा फ्युजन’ अशा विविध गरबा प्रकारांची मेजवानी नाशिककरांनी मंगळवारी अनुभवली. निमित्त होते ‘महाराष्ट्र टाइम्स’ प्रस्तुत ‘रास गरबा’ वर्कशॉप स्पर्धेचे.

अध्यात्माच्या वाटेवर

$
0
0
अपूर्णातून पूर्णाच्या शोधात भ्रमंती करणाऱ्या व‌िश्वाच्या प्रक्री‌येत अपप्रवृत्ती अडसर आणतात. तो अडसर दूर सारून पूर्णत्वाची प्र्रक्रीया पुन्हा सुरळीत करण्यासाठी अन् राक्षसी प्रवृत्तींच्या न‌िर्दालनासाठी व‌िश्वाचे न‌ियमन करणाऱ्या चैतन्यशक्तीने अनादी काळापासून वेळोवेळी दुर्गारूपी सगुणरूप धारण केले आहे.

दुसऱ्या दिवसाचा प्रश्न

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’ नवरात्रीनिमित्त घेऊन आला आहे एक स्पर्धा जिचं नाव आहे ‘देवी ओळखा’. या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसाचा प्रश्न आहे, ‘फोटोमध्ये दिलेली देवी कोणती आहे?’

नवी आव्हानं, नवी क्षितिजं...

$
0
0
नऊ रात्रींच्या युध्दानंतर दुर्गामातेने महिषासुराचा वध केला आणि विजय मिळवला अशी अख्यायिका नवरात्रीबद्दल सांगितली जाते. आजच्या स्त्री समोरची परिस्थिती बदललेली असली तरी तिलाही अशाच अनेक आव्हानांना सामोरं गावं लागतं. त्यांच्याच शब्दात ही आव्हाने आणि त्यांचं सामर्थ्य.

गांधीनगर मैदानावर राम‌ल‌ीलेचा महोत्सव

$
0
0
श्रीरामलीला समिती गांधीनगर यांच्यातर्फे दरवर्षी रामलीला महोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदा या महोत्सवाचे ५९ वे वर्ष असून गांधीनगर प्रेसचे महाप्रबंधक आनंदकुमार सक्सेना यांच्या हस्ते या महोत्सवाचे प्रारंभ होणार आहे.

झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षांनी स्वीकारला पदभार

$
0
0
जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे आणि उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी गुरुवारी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. या पदभार सोहळ्याकडे नाराज असलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पाठ फिरवली.

जगदंबा यात्रोत्सवाला कोटमगावी सुरुवात

$
0
0
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कोटमगाव येथील श्री जगदंबा मातेच्या दर्शनासाठी सुमारे सहा ते सात लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये अंबेचा जागर

$
0
0
घटस्थापनेच्या दिवशी मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसने प्रवास करणारे चाकरमानी आणि प्रवासी रेल्वेतील मंगलमय व प्रसन्न वातावरणाने हरखून गेल्याचे चित्र होते.

मालेगाव बाह्यमधून मनसेच्या संदीप पाटील

$
0
0
पितृपक्षाचा समारोप होताच विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचे अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असल्याने मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्य या दोन्ही मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली आहे.

नाशिकची शक्तीस्थळे

$
0
0
नवरात्र हा देवीचा-स्त्रीशक्तीचा उत्सव. हल्ली सगळीकडे गरबा आणि दांडियाचाच (नाशिकच्या भाषेत टिपऱ्या) गाजावाजा होत असला, तरी नाशिकमध्ये गुजराती समाज शेकडो वर्षांपासून असल्यामुळे इथे गरबा नवीन नाही. शिवाय नाशिकमध्येही देवींची अनेक पुरातन मंदिरे आहेत. तेथे स्थानिक पद्धतीने नवरात्र साजरा करण्याच्या परंपराही आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images