Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चौघा नगरसेवकांचे सदस्यत्व धोक्यात?

0
0
पक्षाशी बंडखोरी करीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या मनसेसहीत काँग्रेसच्या प्रत्येकी दोघा नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

भुजबळांमुळे राष्ट्रवादीचे नुकसान

0
0
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अपक्ष सदस्याला दिल्याने राष्ट्रवादीतल्या नाराज गटातील माजी आमदार दिलीप बनकर यांनी सोमवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून राष्ट्रवादीच्या नुकसानीचा पाढा वाचला.

भाजप कार्यकर्त्यांना ‘सोशल’ धडे

0
0
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना सोशल मिडीयाद्वारे जोरदार प्रचार आणि प्रसार करतानाच योग्य ती खबरदारी घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोमवारी धडे दिले. मुंबईतून आलेल्या तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केले.

इनोव्हेशन एक्स्प्रेस आज नाशकात

0
0
सॅप प्रणालीचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच योग्य गुणवत्ता आणि व्यवसायाचा दर्जा सुधारण्यासाठीची जागरुकता आणण्यासाठी देशभात फिरणारी ‘इनोव्हेशन एक्स्प्रेस’ मंगळवारी नाशकात येत आहे.

खून प्रकरणी आरोपींना पोलिस कोठडी

0
0
कुणाल हॉटेलच्या जखमी व्यस्थापकाचा मृत्यू झाल्याने पंचवटी पोलिसांनी संबंधीत पाच आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना २५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

महापालिकेला मिळेना ‘तज्ज्ञ’

0
0
पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करून त्यांच्यामार्फत वृक्ष प्राधिकरण समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याच्या खटाटोपात असलेल्या महापालिकेला अद्यापपर्यंत तज्ज्ञ व्यक्तिच सापडलेल्या नाहीत.

ह‌िरा होजिअरीची आग शॉटसर्किटमुळे?

0
0
हुंडीवाला लेनमधील श्री अन्नपूर्णा संकुल ही इमारत १९९५ पासूनची आहे. आगीसारख्या आपत्कालीन घटनांना प्रतिरोध करू शकेल, अशी यंत्रणा तेथे होती का, याची माहिती अग्निशमन विभाग घेत आहे.

जागा घ्या, पण आहे तशा परत द्या

0
0
आगामी सिंहस्थासाठी आवश्यक साधुग्रामच्या जागेचे अधिग्रहण करा मात्र, मूळ स्थितीत असलेली जमीनच उपलब्ध करुन द्या, असे साकडे शेतकरी व जागामालकांनी प्रशासनाकडे मांडले. सोमवारी यासंदर्भात सुनावणी घेण्यात आली.

एमआयडीसीमध्ये तोडफोड

0
0
औद्योगिक वसाहतीतील पथदीपांच्या वीज जोडणींची टवाळखोरांकडून तोडफोड केली जात आहे. रात्रीच्या सुमारास कामगारांची लूट करण्याच्या उद्देशानेच हा प्रकार केला जात असल्याचे महापालिका कर्मचारी व अधिका-यांचे म्हणणे आहे. या भागात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

पारंपरिक लढतीला तिलांजली?

0
0
मालेगाव बाह्य मतदारसंघात यंदा बहुरंगी लढत पहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान आमदार दादा भुसे हे शिवसेनेकडून हॅटट्रीक साधण्यासाठी इच्छुक आहेत.

अखेर घुसमट संपली

0
0
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भुसावळचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी पक्षाकडून मिळत असलेल्या मानहानीकारक वर्तनामुळे व्यथित होत सोमवारी भाजपत प्रवेश केला.

शरद पवार आज मालेगावात

0
0
मालेगाव येथील तिसरा महाजचे आमदार मौलाना मुफ्ती व त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांचा मंगळवारी (२३ सप्टेंबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश होणार आहे.

स्वाइन फ्ल्यू पुन्हा बळावतोय!

0
0
डेंग्यू आजाराला लगाम घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाशिक महापालिकेच्या दारात आता जीवघेणा स्वाईन फ्ल्यू येऊन उभा ठाकला आहे. आतापर्यंत शहरात या आजाराचे चार पेशंट आढळले असून, वातावरणातील चढ-उतार संसर्गजन्य आजारांना खतपाणी घालण्याचे काम करीत आहे.

आजच्या पिढीला वाचनाची गरज

0
0
‘टीव्ही चॅनल्स, इंटरनेट, फेसबुक, व्हॉटस् अॅप यांच्या नादात आजची पिढी पुस्तकांना विसरत चालली असून या पिढीला वाचनाची गरज आहे’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले. कालिदास कलामंदीरामध्ये झालेल्या नाशिक जिल्हा सहकारी व परिषद कर्मचारी सहकारी सभासद व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात त्यांनी संवाद साधला.

उत्तर द्या बक्षीस मिळवा

0
0
नवरात्रोत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव. स्त्री म्हणजे देवीची विविध रुपेच जणू. या देवींचे वर्णन करणाऱ्या ‘अंबे उदयोस्तु’ या सीडीचा लाभ घेण्याची संधी तुम्हाला ‘महाराष्ट्र टाइम्स’मार्फत दिली जात आहे. परंतु यासाठी तुम्हाला आमच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर द्यावे लागणार आहे.

इत‌िहासात‌ून जागवा स्वाभ‌िमानाची प्रेरणा

0
0
‘इत‌िहास माणसाला भव‌िष्याकडे आशेने बघण्याची प्रेरणा देतो. इत‌िहास समजावून घेतला तर मनात स्वाभिमान जागतो. कोणत्याही व‌िद्याशाखेत अभ्यास करा, कोणत्याही व‌िषयात प्राव‌ीण्य म‌िळवा पण इत‌िहासाचे भान असू द्या तरच स्वाभ‌िमानाने जगता येईल’, असा संदेश श‌िवाजी ट्रेलचे म‌िलिंद क्षीरसागर यांनी द‌िला.

ऑक्टोबरपूर्वीच वाढली हीट

0
0
ऑक्टोबर महिना उजाडण्यापूर्वीच ऑक्टोबर हीटची चाहूल नाशिककरांना लागली आहे. दुपारच्या वेळी या झळा अधिक जाणवू लागल्याने विशेष काळजी घेण्याची गरज आता भासू लागली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हाला आता सुरुवात झाली असून नाशिककरांना याचे चटके सहन करावे लागत आहेत.

माजी आरोग्य मंत्रीच तक्रार करतात तेव्हा...

0
0
पेशंटने हॉस्प‌िटलच्या फॉर्मासिस्टकडून औषधे घ्यावीत, अशी सक्ती वोक्हार्ट हॉस्प‌िटलने करू नये, अशी तक्रार खुद्द माजी आरोग्य मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांनीच केल्यानंतर हॉस्प‌िटल प्रशासनाने हॉस्प‌िटलमध्ये लावलेली नोटीस मागे घेतली.

संशोधनाला प्राधान्य मिळावे

0
0
‘संशोधनाच्या बाबतीत आपल्या देशाची पाश्चात्य देशांशी तुलना सद्यस्थ‌ितीत होऊ शकत नाही. तुलना करायची झाल्यास आपल्याकडील संशोधन व‌िषयक दृष्टीकोनात आमुलाग्र बदल करावे लागतील. त्याची सुरुवात केवळ व‌िद्यार्थी आण‌ि प्राध्यापकांपासून होते. या स्तरापासून संशोधन व‌िषयक संकल्पनेला चालना म‌िळावी, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी व्यक्त केली.

महापालिकेला हवा वाढीव पाणीसाठा

0
0
विविध धरणातील पाण्यासाठ्यातील आरक्षण निश्चित करण्यास सुरुवात झाली आहे. गत वर्षाच्या तुलनेत महापालिकेने आपल्या मागणीत वाढ केली असून, २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता यासंदर्भांतील पहिली बैठक आयोजित केली आहे. पाच हजार दलघफू पाण्यासाठी महापालिकेचा आग्रह आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images