Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शेतशिवाराची दाणादाण

$
0
0
निफाडच्या पूर्व भागात गुरुवारी सायंकाळी तुफान पाऊस झाला. रौद्ररूप धारण केलेल्या पावसामुळे या परिसरात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने येथील शिवारे उद्ध्वस्त झाली आहेत.

जनार्दन स्वामी आश्रमात उद्यापासून जपानुष्ठान

$
0
0
राष्ट्रसंत जनार्दनस्वामी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तपोवन येथील आश्रमात २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामुदायिक जपानुष्ठान सोहळ्याने कार्यक्रमाला सुरुवात होईल तर, २८ सप्टेंबर रोजी कार्यक्रमांची सांगता होईल.

अभाव‌िपच्या न‌िधी संकलनास प्रत‌िसाद

$
0
0
जम्मू आण‌ि काश्म‌िरमधील आपत्तीग्रस्तांसाठी अख‌िल भारतीय व‌िद्यार्थी परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या न‌िधी संकलन मोहिमेला कॉलेज कॅम्पसमधून चांगला प्रत‌िसाद म‌िळत आहे.

गोसावीसरांचे कार्य दीपस्तंभासारखे

$
0
0
डॉ. मो. स. गोसावी यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा संपूर्ण महाराष्ट्रात मनोभावी विस्तारली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक नंदन रहाणे यांनी केले.

सिडकोत पाणीपुरवठा अधिकाऱ्याला घेराव

$
0
0
रात्री अपरात्री होणाऱ्या अनियमित व अपुऱ्या पाणीपुरवठ्याला कंटाळून पाथर्डी फाटा येथील अयोध्या कॉलनीतील महिलांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घातला.

‘कट प्रॅक्ट‌िस’ संपविण्यासाठी हवी एकजूट

$
0
0
वैद्यकीय क्षेत्राकडे अनेकदा नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. यात आता पॅथॉलॉज‌िस्टचाही समावेश झाला आहे. डॉक्टरांचे डॉक्टर म्हणून पॅथॉलॉज‌िस्टकडे पा‌हिले जाते. मात्र, पॅथॉलॉजीमधील कट प्रॅक्टिसचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

काश्मिरींसाठी हवी ‘कार्डियाक व्हॅन’

$
0
0
महापालिकेने तब्बल ४० लाख रुपये खर्च करून खरेदी केलेली आणि दोन वर्षांपासून बंद असलेली कार्डियाक व्हॅन जम्मू काश्मिरमधील नागरिकांना वरदान ठरू शकते. महापालिका प्रशासनाने अंग झटकून निर्णय घेतल्यास येत्या सोमवारी ही व्हॅन काश्मिरकडे रवाना होऊ शकते.

श्वान निर्बीजीकरणाचा वेग दुप्पट

$
0
0
श्वान निर्बीजकरणाचा ठेका मिळालेल्या उदगिर येथील सोसायटी फॉर द पीपल्स क्रुएल्टी टू अँनिमल (एसपीसीए) या संस्थेने १ जानेवारी २०१४ पासून आपल्या कामास सुरुवात केली.

अमृताच्या संवादाने ‘मटा’चे वाचक चिंब

$
0
0
‘चिंब भिजलेले...’ या गाण्यातून रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अमृता नातूने शुक्रवारी ‘मटा’च्या एसएमएस काँटेस्टमधील विजेत्यांशी संवाद साधला. तिचे या क्षेत्रातील अनुभव आणि ‘अमृता’ हा नवीन अल्बम याविषयी तिने यावेळी माहिती दिली.

उद्योजकांना बजावणार नोटिसा

$
0
0
बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल मुदतीनंतर देखील सादर न केलेल्या जवळपास २३० उद्योजकांना महापालिका प्रशासन लवकरच नोटिसा बजावणार आहे. सातपूर आणि अंबड एमआयडीसीतील कंपन्यांनी वाढीव बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अनधिकृत पॅथलॅब, मंत्र्यांच्या 'घूस'खोरीमुळे

$
0
0
वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्स‌िलकडून प्रयत्न केले जात आहे. सरकारची भूमिका दुटप्पी आणि नागरिकांच्या हिताविरोधात असल्याचाच अनेकदा अनुभव येतो.

‘कष्टातूनच यशाचा मार्ग’

$
0
0
‘यशाकडे जाणाऱ्या वाटेचं अस्त‌ित्व असतचं. पण त्या वाटेवर परिश्रमातील सातत्याची गरज असते. असं सातत्य राखण्यासाठी द‌िलेले प्रोत्साहन माणसाला बळ देते’, असे प्रत‌िपादन उद्योजक चंद्रकांत बागूल यांनी केले.

अधिसूचना आजपासून लागू

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीला आज, शनिवारपासून सुरुवात होणार असून, निवडणुकीची अधिसूचना लागून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आजपासून उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार असल्याने निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंग येणार आहे.

२२ वर्षांपासून रखडले भूसंपादन

$
0
0
टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) घ्या, पैसा मिळणार नाही, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतल्याने गेल्या २२ वर्षांपासून मखमलाबाद येथील एक भूखंडाच्या संपादनाची प्रक्रिया रखडली आहे. महापालिका जागा ताब्यात घेत नाही, की आरक्षणही रद्द करीत नसल्याने जमिन मालक हवालदिल झाले आहेत.

जिल्हाभरात आज ‘बत्तीगूल’

$
0
0
नाशिक शहरासह जिल्ह्यात काही भागात दुरुस्तीची कामे करायची असल्याने शहरातील वीजपुरवठा शनिवारी, २० सप्टेंबर रोजी काही कालावधीसाठी बंद राहील, असे महावितरणने कळविले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजेचे पोल कोसळून तारा तुटल्या होत्या.

आमदार गितेंची बदनामी

$
0
0
‘मनसेचे विद्यमान आमदार वसंत गिते यांचा भाजपमध्ये प्रवेश’ अशा आशयाचे खोडसाळ वृत्त सोशल मीडियाद्वारे पसरवून बदनामी केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

मंत्र्यांचा ‘पॅथलॅब घोटाळा’

$
0
0
वैद्यकीय क्षेत्रात सुरू असलेल्या अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र मेडिकल कौन्स‌लिने मंत्र्यांचा राज्यातील 'पॅथलॅब घोटाळा' समोर आणला आहे.

व‌िद्यार्थ्यांच्या माध्यमातून मनामनात जावा हरितकुंभ

$
0
0
‘पर्यावरणाचं महत्त्व पुढील प‌िढीवर अध‌िक परिणामकारक रितीने ब‌िंबवले पाह‌िजे. व‌िद्यार्थी हे पर्यावरणाचे दूत बनायला हवेत. त्यासाठी कुंभमेळ्याच्या न‌िम‌ित्ताने पुढे आलेली हरित कुंभाची संकल्पना फायदेशीर आहे.

बळकावलेली जमीन आदिवासींना मिळाली परत

$
0
0
पंचवटीतील टकले नगर परिसरात आदिवासींच्या नावे असलेली जमीन व्यावसायिकाने अधिकाऱ्यांच्या संगनमताने बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीपुढे दाखल झालेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन आदिवासी जमीन मालकांना परत देण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रारदारांना शपथपत्र दाखल करण्यास मुदतवाढ

$
0
0
आदिवासी विकास विभागातील नऊ योजनामंधील भ्रष्ट्राचाराच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या न्यायालयीन चौकशी आयोगाने तक्रारदाराकडून दाखल करण्यात येणाऱ्या शपथपत्राची मुदत वाढवली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images