Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ट्रकच्या धडकेने सायकलस्वार ठार

$
0
0
भरधाव ट्रकने धडक दिल्याने सिकंदर भोख या सायकलस्वाराचा मृत्यू झाला. वडाळा नाका येथील नागजी चौफुलीवर गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला.

महापालिकेचे निधीसाठी प्रधान सचिवांना साकडे

$
0
0
महापौर अशोक मुतर्डक, उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा, प्रभारी आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांची भेट घेऊन सिंहस्थासाठी जादा निधी देण्याची मागणी केली. तसेच, कायमस्वरुपी आयुक्त त्वरित नेमण्याची विनंतीही केली.

अबू जिंदालच्या जामिनावर आज युक्तीवाद

$
0
0
महाराष्ट्र पोलिस अकादमी, पोलिस आयुक्तालय आणि आर्टिलरी सेंटरसारख्या ठिकाणांची रेकी करणाऱ्या तसेच दहशतवादी कारवायांसाठी प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अबू जिंदाल याच्या जामिन अर्जावर नाशिक कोर्टात गुरूवारी युक्तीवाद होणार आहे.

लिपिकाला रंगेहाथ अटक

$
0
0
राज्य कामगार विमा रुग्णालयातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक आर. एन. माकरे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. सातपूर विभागात गेल्या पंधरा दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही दुसरी कारवाही आहे.

मुक्त व‌िद्यापीठाच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे पुनर्परीक्षांसाठी ऑक्‍टोबरमध्ये घेण्यात येणारी परीक्षा विधानसभा निवडणूक आणि दिवाळीमुळे आता नोव्हेंबर मह‌िन्यात होणार आहे. २० ऑक्टोबरपासून द‌िवाळी आहे.

मुक्त विद्यापीठाच्या कारभाराला न‌िकालाच्या दुरुस्तीचे प्रायश्च‌ि‌त

$
0
0
मे-जून २०१४ मध्ये राज्यातील व‌िव‌िध केंद्रांवर घेण्यात आलेल्या मुक्त व‌िद्यापीठाच्या परीक्षांच्या न‌िकालानंतर यंदा मोठ्या प्रमाणावर व‌िद्यापीठाकडे तक्रारी आल्या आहेत. व‌िव‌िध केंद्रांवरील न‌िकालात दुरुस्ती करण्यासाठी आता यशवंतराव चव्हाण मुक्त व‌िद्यापीठाने मोह‌िम हाती घेतली आहे.

प्रधान सचिवांनी महापालिकेला फटकारले

$
0
0
आर्थिक स्थिती चांगली असल्याने शासनाने नाशिक महापालिकेचे प्रमोशन `ब` वर्गात केले आहे. त्यामुळे सिंहस्थासाठी निधी कमी असल्याचे रडगाणे बंद करून महापालिकेने सिंहस्थासाठीचा आपला पूर्ण वाटा उचलावा, अशा शब्दांत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी महापालिकेला फटकारले.

सुनावणी काही मिनिटांची, खर्च मात्र लक्षावधींचा!

$
0
0
दहशतवादी कारवायांशी संबंधीत आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर काह‌ी मिनिटांत सुनावणी संपली; परंतु त्यासाठी सरकारचा खर्च काही लाखांत होतो आहे.

नाशिकमध्ये ‘मनसे’त शांतता

$
0
0
राज्यात आघाडी,महायुतीत जागावाटपावरून घमासान सुरू असताना राज्यात तिसरा पर्याय देण्याची भाषा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मात्र निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतरही स्मशान शांतता आहे.

SSC ची परीक्षा रद्द करा

$
0
0
निवडणुकीची आचारसंहिता आणि दिवाळीमुळे नाशिकमध्ये १९ आणि २६ ऑक्टोबर रोजी होणारी स्टाफ सिलेक्शन कमीशनची परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय संचालकांकडे केली आहे.

सभांच्या जागांचे दर निश्चित

$
0
0
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभांसाठी लागणाऱ्या शहरातील अकरा जागांचे दर महापालिकेने निश्चित केले असून, राजकिय पुढाऱ्यांनी बुकिंगसाठी जागा आरक्ष‌ित करण्यास सुरुवात केली आहे.

सिंहस्थासाठी दमडीही नाही

$
0
0
उत्पन्न घटल्याने महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळला असून, पालिकेकडे सिंहस्थासाठी निधी खर्चासाठी दमडीही उरलेली नाही. त्यामुळे शासनाने पालिकेला तत्काळ ४७० कोटींची मदत करावी, अशी मागणी महापालिकेकडून राज्य सरकारकडे नव्याने करण्यात आली आहे.

साधुग्रामला ‘कडकी’चा फटका

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळा अकरा महिन्यांवर असतानाच राज्य सरकारने साधुग्रामसाठी १६३ एकर जागेवर कायमस्वरूपी आरक्षण टाकत भूसंपादनाचे आदेश दिले आहे.

गोदाघाट खूपच भावला!

$
0
0
नाशिकमधील शूटिंग मला खूपच आनंददायी होतं. कारण ‘पीके’ चित्रपटाचं हे शेवटचं शूटिंग. नाशिकमध्येच हा चित्रपट पूर्ण झाला आहे. गोदाघाटचा परिसर खूपच भावला. प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली, पण त्यांचा कोणताही त्रास झाला नाही.

साधुग्रामचा संग्राम

$
0
0
पंचवटीतील तपोवन परिसरातील १६७ एकर क्षेत्रात साधुग्रामचे आरक्षण टाकण्यासंदर्भात नुकतेच सर्व सोपस्कार करून टीडीआर (विकास हस्तांतरण) देण्याबाबतचा चेंडू सरकारने पुन्हा एकदा महापालिकेच्या कोर्टात टोलवला आहे.

एसटीने घेतली आघाडी

$
0
0
नाशिक शहरातील सर्वात मोठा डेपो म्हणून आकाराला येत असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिकरोड येथील डेपो क्रमांक तीनचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

आडगावचा उमेदवारीसाठी आग्रह

$
0
0
गावातील मतदारांची संख्या मोठी असताना अद्यापही जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व मिळालेले नाही. गावातील कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीस विधानसभेची उमेदवारी मिळाली तर एकसंघ राहून विजयासाठी काम करण्याचा निर्धार आज, आडगाव येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी केला.

युतीतील गुंता वाढला

$
0
0
जागावाटपाचा त‌िढा सुटत नसल्याने स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक होतांना दिसत आहेत. नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या मतदारसंघात मेळावे घेवून आव्हान देण्याची भाषा केली आहे.

‘टीडीआर’ पुन्हा महासभेत

$
0
0
साधुग्रामसाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादानाच्या मोबादल्यात शेतकऱ्यांना एकास दहा टीडीआर (विकास हस्तांतरण) देण्याच्या महासभेच्या निर्णयास सरकारने तत्त्वतः मान्यता दिली असून, यावर ९० दिवसांच्या आत सूचना आणि हकरती घेणार असल्याची माहिती महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली.

कोकाटेंना शिवसेनेत `नो एन्ट्री`

$
0
0
सिन्नरचे काँग्रेस आमदार माणिकराव कोकाटे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दिला आहे. खासदार वगळता स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध आणि राजाभाऊ वाजेंना दिलेला शब्द पाळण्यासाठी ठाकरेंनी कोकाटे यांचा प्रवेश नम्रपणे नाकारला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images