Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मतदार नावनोंदणीला शेवटच्या दिवशी गर्दी

$
0
0
मालेगाव बाह्य आणि मध्य आशा दोन्‍ही मतदारसंघातून अखेरच्या दिवशी मतदार नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी उशिरापर्यंत नावनोंदणी सुरू होती. दिवसभर निवडणूक शाखेत अर्ज स्वीकृतीसाठी मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

$
0
0
हुंड्याच्या रक्कमेच्या मागणीपोटी झालेल्या शारीरिक मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप नातलगांनी केला.

२ एकर कोबी फवारणीमुळे नष्ट

$
0
0
कळवण तालुक्यातील बगडू येथील शेतकरी राजू दादाजी वाघ यांच्या कोबी पिकावर कीटकनाशक व रोगप्रतिबंधक फवारणीच्या तयार द्रावणात अज्ञात माथेफिरूने तणनाशक औषध मिसळविल्याने दोन एकर कोबीचे पीक पिवळे होऊन नष्ट झाले.

जिल्ह्यात ४०८ लिटर दारूचा साठा जप्त

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच इच्छूक उमेदवारांकडून मतदारांना दारूचे आमिष दाखवण्याचे काम सुरू झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने बुधवारी टाकलेल्या धाडीत एका गाडीतून ४०८ लिटर दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पाऊस सरासरीकडे

$
0
0
यंदा वरूणराजा उशिरा का होईना चांगलाच मेहरबान झाला. गणेशोत्सवात तर दहा दिवस पाऊस धो धो कोसळत होता. यामुळे यंदा जिल्ह्यातील धरणांमधील साठा गेल्यावर्षाच्या तुलनेत वाढला आहे. तसेच, पावसाने सप्टेंबरपर्यंत जवळपास सरासरी गाठली आहे.

सातपूरकर वैतागले कंटेनरच्या त्रासाला

$
0
0
ट्रक व मोठे कंटेनरांचा त्रासाला अंबड व सातपूरकर वैतागले असून, अनेकांना अपघातामध्ये प्राण गमवावे लागले आहेत. अनधिकृतरित्या रस्त्यालगत उभे राहणारे हे कंटेनरवर वाहतूक विभागाकडून कारवाई का होत नाही. असा सवाल नागरिकांनी केला आहे.

स्ट्रिट लाईटचे पोलच गायब

$
0
0
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सातपूर परिसरात रस्त्यांची कामे सुरु आहेत. परंतू सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात स्ट्रिट लाइटच गायब झाल्याने नागरिकांना रात्री अंधारात मार्ग काढावा लागतो आहे. महापाल‌िकेकडून रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे मात्र सातपूर रस्त्यातील खांब काढल्याने स्ट्रिट लाईट बंद पडल्या आहेत.

डीम्ड कन्व्हेएन्सला केराची टोपली

$
0
0
इमारत बांधून पूर्ण झाल्यावर आणि त्यातील कमीतकमी दहा सदन‌िका अथवा गाळे विकल्यावर बिल्डरने सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून तिची नोंदणी सहकार खात्याकडे करणे बंधनकारक आहे.

अध्यक्षपद अपक्षांना देण्यास राष्ट्रवादीच्या सदस्यांचा विरोध

$
0
0
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसावंर येवून ठेपल्याने राजकीय घडामोंडीना वेग आला आहे. अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत आता संघर्ष सुरू झाला असून, अपक्षांना अध्यक्षपद देण्यास राष्ट्रवादीच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला आहे.

कोकाटेंच्या तळ्यात-मळ्यात भूमिकेने संभ्रमावस्था

$
0
0
राजकीय पक्षांपेक्षा व्यक्तीच्या मागे उभा राहणारा तालुका म्हणून सिन्नरची ओळख आहे. या मतदारसंघात शिवसेनेचा हक्काचा मतदार आहे. तर काँग्रेसचाही परंपरागत मतदार आहे. पण त्याचबरोबर राजकीय पक्षांना उमेदवार आयातच करावा लागतो, असा आजवरचा इतिहास आहे.

जिल्ह्यात ४१८ शस्रे जमा

$
0
0
निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर शस्रे जमा करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या आव्हानाला अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्हात केवळ ४१८ शस्रे जमा झाली असून, अद्याप पावणे दोन हजाराच्या वर शस्रांची प्रतीक्षा आहे.

नाशिक बाजार समितीने भरली थकबाकी

$
0
0
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जमुक्त झाल्याचा दावा सभापती देविदास पिंगळे यांनी केला आहे. शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डच्या विकासकामांसाठी राज्य सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची बँकेच्या सामोपचार योजनेत परतफेड करण्यात आल्याचे पिंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

ठिकाण एक मेळावे दोन

$
0
0
नाशिक महापालिकेत नुकत्याच झालेल्या महापौर निवडणुकीत मनसेची साथ सोडत भाजपाने शिवसेनेशी युती केली. मात्र, विधानसभा निवडणुकीत एकमेंकापेक्षा वरचढ दाखविण्याची स्पर्धा लागली आहे. सिडकोतील भोळे मंगल कार्यालयात शिवसेना व भाजपाचा बुथ मेळावा घेण्यात आला.

कर्मचारी शोधण्याचा वनवास संपला

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १५ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची जुळवाजुळव पूर्ण झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडे २५ हजार कर्मचारी व अधिकारी उपलब्ध झाले असून, दोन दिवसात या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.

मतदार नावनोंदणीसाठी लांबच लांब रांगा

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी नावनोंदणीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नावनोदणीची बुधवारी शेवटची संधी असल्याने जिल्हातील पंधरा मतदारसंघामध्ये असलेल्या नावनोंदणी केंद्रावर मोठी गर्दी झाली होती.

संकल्पित रिपाइं जिल्ह्यात ६ जागा लढवणार

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्ह्यात सहा जागा लढवणार आहे. ही माहिती पक्षाचे नेते प्रकाश पगारे यांनी दिली.

आमदार मौलाना मुफ्ती राष्ट्रवादीच्या वाटेवर?

$
0
0
मालेगाव मध्यचे जनसुराज्य आघाडीचे आमदार मौलाना मुफ्ती मोहमंद ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलण्याच्या तयारीत असून, ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मौलानांच्या या खेळीने काँग्रेससह राष्ट्रवादीच्या इच्छुकांची कोंडी झाली आहे.

शहरात होर्डिंग हटावला वेग

$
0
0
विधानसभेच्या आदर्श आचरसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील एक हजार आठशे होर्डिंग, बॅनर काढले असून शहरातील कारवाई पूर्णत्वाकडे असल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त बहिरम यांनी दिली.

चिमुरडीवर अतिप्रसंग

$
0
0
सहा वर्षांच्या बालिकेवर घरासमोर राहणाऱ्या एका १९ वर्षीय युवकाने अतिप्रसंग केल्याचा प्रकार विंचूरमध्ये उघडकीस आला आहे. लासलगाव पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाईची शक्यता

$
0
0
नाशिकरोड कारागृहात होत असलेल्या गैरप्रकारांबाबत जेलचे अधिकारी सुनील कुंवर यांनी उधळलेल्या मुक्ताफळांची जेलच्या आवारात बुधवारी दिवसभर चर्चा होती. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images