Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गोदावरीचा पूर ओसरला

$
0
0
सोमवारच्या जोरदार पावसाने गोदावरीला आलेला मोठा पूर आता हळूहळू ओसरत असला तरी आगामी २४ तास जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे गोदाकाठी पूरस्थिती कायम राहण्याची चिन्हे आहेत.

पावणेतीन लाख मूर्तींचे संकलन

$
0
0
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी महापालिका व विविध स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या आवाहनाला नाशिककरांनी उदंड प्रतिसाद दिला. सोमवारी दिवसभरात जवळपास २ लाख ६२ हजार गणेशमूर्ती, तर १२० टन निर्माल्य संकलित झाले.

अरे रे, राजू शेट्टी, हे काय करताय ?

$
0
0
गेल्या अनेक दशकांपासून कांदाच नव्हे, तर साऱ्या शेतमाल भावाचा प्रश्न अनेक पक्षांची सरकारे आली व गेली तरी तसाच ढिम्म आहे.

कळवण तालुक्यात बहरली झेंडूची शेती

$
0
0
नुकताच संपलेला गणेशोत्सव व येऊ घातलेले नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी सणासाठी झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे पारंपरिक शेतीसोबतच नवनिर्मितीचा ध्यास घेत कळवणसारख्या आदिवासी तालुक्यात झेंडू शेती बहरत आहे.

मनमाडच्या रामगुळणा नदीवर बंधारा बांधण्यास सुरुवात

$
0
0
मनमाडच्या रामगुळणा नदीवर सिमेंट काँक्रिटचा बंधारा बांधण्याची जबाबदारी लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड या संस्थेने उचलली आहे. महिन्याभरात हा बंधारा मनमाडकरांना सुपुर्द करण्यात येईल, अशी ग्वाही लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइडचे अध्यक्ष हेमराज दुगड यांनी दिली.

सटाण्यात दुकानदाराला ५८ हजाराला लुटले

$
0
0
शहरातील ताहाराबाद रोडवरील नमस्ते सुपारी सेंटर या दुकानातून अज्ञात व्यक्तिने भीक मागण्याच्या बहाण्याने सुमारे ५८ हजार रुपये रोखरक्कम असलेली बॅग पळविल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

विंधन विहिरीतून निकवेलला पाणीपुरवठा

$
0
0
बागलाण तालुक्यातील निकवेल येथे अतिसाराची लागण झाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी निकवेल ग्रामस्थांना करण्यात येणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवरील पाणी वितरण बंद करण्यात आले आहे.

चणकापूर, पुनद ओव्हरफ्लो

$
0
0
कळवण तालुक्यात सातत्याने पावसाची संततधार सुरू असून पुनद, चणकापूर इतर छोटे मोठे धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. गेल्या वर्षी १० सप्टेंबरपर्यंत चणकापूर धरण लाभशेत्रात ५०१ मि. मी. पाऊस झाला होता.

पुराने मोसम नदी झाली स्वच्छ

$
0
0
हरणबारी व चणकापूर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभरात ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रविवार व सोमवारी पावसाचा जोर टिकून होता. यामुळे शहरालगतच्या गिरणा-मोसम नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

चांदशी शिवारात भराव खचला

$
0
0
नाशिक शहर व परिसरात गेले दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. संतत धारेमुळे चांदशी शिवारातील खाजगी विकासकाच्या जागेतील मातीचा भराव खचल्याने रस्ता चिखलमय झाला होता. मातीचा भराव नदीत वाहून आल्याने संरक्षक भिंतही खचली होती.

ऐन पावसाळ्यात मिळेना पिण्याचे पाणी

$
0
0
धो-धो पाऊस पडतो आहे. धरणेही तुडूंब भरलेली आहेत. मात्र, तरीही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. होय, ही व्यथा आहे सातपूर गावातील नागरिकांची. गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याचे पुरेसे पाणीच मिळत नसल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

कळवणचे कांदा मार्केट चिखलमय

$
0
0
कळवण कृषी उत्त्पन बाजार समितीच्या कांदा लिलाव मार्केट परिसरात पावसामुळे चिखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे माल वाहतुकीसाठी हाल होत आहेत. चिखलामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, लिलावसाठी चिखल तुडवत जावे लागत आहे.

‘विवरणपत्रे अपलोड करा, अन्यथा कारवाई’

$
0
0
येवला तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांनी ९७ व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७९ (१ अ) व कलम ७९ (१ ब) अन्वये झालेल्या नवीन तरतुदीनुसार नमूद केलेली विवरणपत्रे संस्थेच्या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या स्तरावर ३० सप्टेंबरपर्यंत अपलोड करावीत.

गणेशभक्तांची सुरक्षा होती रामभरोसेच

$
0
0
दरवर्षी गणेशोत्सवाला वाढता प्रतिसाद व ‌विसर्जन मिरवणुकीत वाढती गर्दी लक्षात घेवूनही महापालिका प्रशासन गणेशभक्तांच्या सुरक्षेबाबत उदासीन दिसून आले.

ठेकेदारांसाठी सदस्यांची ‘अर्थपूर्ण’ धावाधाव

$
0
0
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार यांच्या कारभाराविरोधात उघडउघड बंड पुकारणारे उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनीही अध्यक्षांनी जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १५ जणांचा बळी

$
0
0
पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण १५ जणांचा नैसर्गिक आपत्तीतून बळी गेला आहे. यातील सहा जणांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची मदत देण्यात आली असून दोघांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

मनसे, काँग्रेसला फटका; सेनेचा वाढला टक्का

$
0
0
भाजपने साथ सोडल्यानंतर महापौरपदासाठी एक एका नगरसेवकाची जमवाजमव सुरू असतानाच मनसेच्या दोन नगरसेवकांनी मनसेला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेचे नाशिकरोडचे नगरसेवक नीलेश शेलार आणि शोभना शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

जातपंचायत बरखास्त, महिला समितीचा सक्षम पर्याय!

$
0
0
जातपंचायतीच्या सक्तीने आद‌िवासी कुटुंबांचे जीवन त्रस्त करणाऱ्या व्यवस्थेव‌िरोधात बंड पुकारत नाश‌िकच्या अंध‌श्रध्दा न‌िर्मूलन सम‌ितीच्या कार्यकर्त्यांन‌ी प‌ीड‌ीत कुटुंबास न्याय म‌िळवून द‌िला आहे.

‘सिम्युलेशन’साठी तत्काळ माहिती द्या

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात वाहतूक आणि गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सिम्युलेशन मॉडेलसाठी लागणारी माहिती सर्व विभागांनी तातडीने द्यावी, असे निर्देश मेळा अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.

शिर्डी `सी प्लेन`चे नाशिकला ओव्हरटेक

$
0
0
नाशिकमधील गंगापूर धरणातून सी प्लेनची सेवा सुरु होण्याची मोठी उत्कंठा असताना नगर जिल्ह्यातील मुळा धरणात सेवेची घोषणा करुन एमटीडीसी आणि मेहेरने नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. विविध परवानग्या रखडल्यामुळे शिर्डी, शनिशिंगणापूरच्या सेवेने नाशिकला ओव्हरटेक केल्याचे स्पष्ट होत आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images