Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अन्नसुरक्षा वाऱ्यावर

0
0
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दहा महिन्यांवर येवून ठेपला असतानाच सिंहस्थासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची अन्नसुरक्षा वाऱ्यावरच असल्याची बाब उजेडात आली आहे. अन्न व औषध प्रशासनातील निम्म्याहून अधिक जागा रिक्त असल्याने उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

0
0
दहा दिवसांपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची सांगता आज, सोमवारी विर्सजन मिरवणुकीने होईल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनी १७ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

मंजुरी अडीच कोटींची अन्...

0
0
अग्निशमनदलासाठी `फ्लड रेस्क्यू व्हॅन` खरेदीसाठी अवघ्या अडीच कोटी रुपयांच्या खर्चाची मान्यता असताना निविदा मात्र साडेचार कोटींची आली असून, यामुळे कोणत्याही ठाम निर्णयाविना प्रशासनाने पुढील कार्यवाही थांबवली आहे.

मनमाडला तरुणाची हत्या

0
0
येथील ईदगाह परिसरात शनिवारी रात्री पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादातून १७ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. या सशस्त्र हाणामारीत इतर दोघे जण जखमी झाले असून, दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या आहेत.

बाप्पाला आज निरोप

0
0
सर्वांचे लाडके गणराय आज, अनंत चतुर्दशीला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी निघाले आहेत. गेले ११ दिवस पाहुणा म्हणून मुक्काम करताना गणरायाने या उत्सवाच्या माध्यमातून भक्तांना किमान पुढील वर्षभरासाठी उत्साह अन् उर्जेचा अखंड स्त्रोत मिळाला आहे.

नाशकात भाजपने मनसेची साथ सोडली

0
0
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच भाजपने नाशिकमधील मनसेसोबतची युती तोडली आहे. प्रदेश भाजपचा आदेश येताच नाशकात भाजपने पुन्हा शिवसेनेचा हात हातात घेतला असून सेना-भाजपचे नगरसेवक जोरदार घोषणा देत महापौर-उपमहापौरपदाचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महापालिकेत थडकले आहेत.

पंकजा मुंडे शुक्रवारी लासलगावमध्ये

0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानली जाणारी भाजप आमदार पंकजा मुंडे यांची संघर्ष यात्रा येत्या शुक्रवारी लासलगावमध्ये दाखल होत आहे.

जातेगावच्या तरुणाचा अपघातात मृत्यू

0
0
नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर झालेल्या अपघातात नाशिक तालुक्यातील जातेगाव येथील त्र्यंबक ऊर्फ पिंटू परशराम सदगीर (वय ३२) हा युवक जागीच ठार झाला. हा अपघात सोमावरी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तळेगाव फाट्याजवळील हॉटेल किनारा जवळ झाला.

पौगंडावस्थेतील आरोग्यावर ‘युवा फॉग्सी’चा जागर

0
0
किशोरवयात आलेली मुले ही अतिशय चंचल असतात, कुमारवयात मुलांमध्ये बरेच शारीरिक, मानसिक बदल होत असतात.

भविष्य निर्वाह निधी कार्यालय होणार ‘पेपरलेस’

0
0
उत्तर महाराष्ट्रातील भविष्य निर्वाह निधी कार्यालय पेपरलेस होणार असल्याची माहिती प्रादेशिक अधिकारी जगदीश तांबे यांनी पत्रकारपरिषदेत दिली. पीएफधारकांसाठी अॉनलाइन युनिव्हर्सल अकाऊंट उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही तांबे यांनी सांगितले.

सोशल मीडियाचा बार ठरला फुसका

0
0
सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा अतिउत्साहीपणामुळे मंगळवारी राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला. निवडणूक तारखांच्या घोषणेसाठी निवडणूक आयोगाच्या पत्रकारपरिषदेचे पत्र सोमवारी सोशल मीडियासह इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये झळकले.

इच्छुकांनी साधली प्रमोशनची संधी

0
0
विधानसभा निवडणुका तोडांवर असल्याने निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आपल्या प्रमोशनची एकही संधी सध्या सोडत नसल्याचे चित्र आहे. प्रमोशनसाठी अनोखे फंडे आजमावणाऱ्या या इच्छुकांनी गणेशोत्सवातही त्याचा पुरेपूर लाभ घेतला आहे.

पवन क्षीरसागरसह ५ जणांवर गुन्हा

0
0
किरकोळ कारणावरून तरुणाची गाडी अडवून त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, याच प्रकरणात धारदार हत्याराने वार केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पितृपक्षाला प्रारंभ; बाजार थंडावणार

0
0
गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही बाजारपेठेवर परिणाम होणार असला तरी जमिनीचे व्यवहार जोरात सुरू आहेत. शहरातल्या सराफ बाजार व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची ग्राहकांनी बुकिंग करून ठेवली आहे.

दूषित पाण्यामुळे तीनशेजण रुग्णालयात

0
0
बागलाण तालुक्यातील निकवेल येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून दूष‌ित पाणी पिण्यात आल्याने मंगळवारी सुमारे तीनशे ग्रामस्थांना गॅस्ट्रोची (अतिसार) लागण झाली आहे. या सर्व रूग्णांना डांगसौदाणे, केळझर, कपालेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महापौरांची कर्मचाऱ्यांना ‘मनसे’भेट

0
0
महापौरपद निवडणुकीच्या ऐन धामधुमीत महापौर अॅड. यतीन वाघ यांनी पदउतार होण्यापूर्वी महापालिका कर्मचाऱ्यांना १३ हजार १११ रूपयांचा घसघशीत बोनस (सानुग्रह अनुदान) जाहीर करून सुखद धक्का दिला.

... तर, स्वबळावर लढणार

0
0
कांदा उत्पादकांवरील अन्यायाची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कांद्राप्रश्नी वेळ आली तर, आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढू, असा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

महापालिकेत MNS-NCP एकत्र?

0
0
महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने मनसेपासून काडीमोड घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. स्थायी समिती निवडणुकीत निर्माण झालेल्या वादानंतर भाजप आपल्याला एकटे पाडणार अशी शक्यता गृहीत पकडून मनसेनहीे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांशी घरोबा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

माझी चौकशी करा

0
0
लाचलुचपत विरोधी विभागामार्फत माझी चौकशी सुरू असल्याबाबत स्वतः अनभिज्ञ आहे. अशी काही चौकशी सुरू असेल तर, आपण त्यास सामोरे जाण्यास तयार आहोत, असे आमदार माणिकरावर कोकाटे यांनी म्हटले आहे.

अखेर काडीमोड!

0
0
अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेला सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर घरोबा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने मंगळवारी मनसेपासून काडीमोड घेतला. त्यानंतर शिवसेनेत चैतन्य भरल्याचे चित्र महापालिकेत दिसून आले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images