Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बदल्या करा; अन्यथा अधिकारी दोषी

0
0
राजकीय पक्षांशी लागेबांधे असलेल्या शिक्षकांच्या मनाप्रमाणे आणि केव्हाही बदल्या करा; अन्यथा शिक्षणमंडळात अनागोंदी सुरू असल्याचा आरोप राज‌किय पक्षांकडून केला जातो.

१५ कोटींचा होणार खर्च

0
0
साधुग्राममधील साधूमंहताना तसेच भाविकांना २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून जलवाहिनी टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासंबंधी प्रशासनाने सादर केलेल्या चारही प्रस्तावांना स्थायी समितीने गुरुवारच्या बैठकीत हिरवा कंदील दर्शवला आहे.

निवडणुकीसाठी पथकांची स्थापना

0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक विविध पथकांची निर्मिती करण्यात आली असून या सर्व पथकांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुरु झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्याची चिन्हे आहेत.

महाजन यांच्यावर कारवाई होणार?

0
0
नाशिक शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होणार असल्याची अतिरंजित माहिती पसरविल्याप्रकरणी महापालिका अग्निशमन विभागाचे फायर ऑफिसर अनिल महाजन यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महाजन यांच्याकडून तातडीने खुलासा मागविला आहे.

जिल्हा कृती समिती बरखास्त करा

0
0
आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या नागरी सहकारी बॅँका व पतसंस्थांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला होणारी जिल्हा कृती समितीची बैठक बरखास्त करा, अशी विनंती खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच सहकार सचिवांकडे कली आहे.

नगरसेवकांची पळापळ अन् बैठकसत्र

0
0
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज घेण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्जाची मागणी केली नाही. बहुतांश नगरसेवक पळापळीत आणि बैठकीत गुंतले असून, आणखी दोन ते तीन दिवसांनी चित्र काही प्रमाणात स्पष्ट होण्याचे संकेत मिळत आहेत.

लाचखोर अधीक्षकास अटक

0
0
पंचवटी येथील पालिका बाजारातील गाळा भाडेतत्वावर मिळावा यासाठी टिपणी तयार करून ती वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या महापालिकेच्या सहायक कार्यालय अधीक्षकाला अटक करण्यात आली आहे.

झेडपी अध्यक्षांविरुद्ध बंड

0
0
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निधी नियोजनाच्या अधिकाराविरोधात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी बंडाचा झेंडा फडकवला असून, अधिकार रद्द करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

कुत्र्याचा १५ जणांवर हल्ला

0
0
पिसाळलेल्या कुत्र्याने लाखलगाव, चेहडी आणि चितेगाव फाटा परिसरात हैदोस घालत १५ हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे लचके तोडले. त्यापैकी ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरूवारी पहाटे तीन ते साडेपाचच्या दरम्यान हा प्रकार घडला.

शहरात चेन स्नॅचर्सचा धुमाकूळ

0
0
गेल्या महिन्यात लागोपाठ घडलेल्या बॅग लिफ्टिंगच्या घटनांचा तपास लागत नाही तोच शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांनीही पुन्हा डोके वर काढले आहे. एकाच दिवसात चार महिलांच्या गळ्यातील तब्बल अडीच ते पावणेतीन लाखांच्या सोनसाखळ्या हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला आहे.

कार्डधारी

0
0
कार्ड हा शब्द तसा मराठी नसला तरी तो आता मराठी झाला आहे. आणि त्याच्याशी बऱ्याच वर्षाचा आपला संबंध आहे. म्हणजे पोस्टकार्ड, अंतरदेशीय कार्ड, रेशन कार्ड, प्रॉपर्टी कार्ड ( तसं हे कार्ड आत्ताच लोकप्रिय झालाय. पण इथ त्याचा उल्लेख मुद्दाम केला आहे. कारण आपल्याकडे सध्या अनेकांचा पार्ट टाईम जॉब प्रॉपर्टी एजंटच आहे) हे कार्ड साधारण आपल्याला फायदा करून देणारे अथवा स्वस्तात काम करणारे होते.

बागलाणमध्ये शौचालये बनली स्नानगृहे

0
0
बागलाण तालुक्यात हागंदारी मुक्त योजना राबविण्यासाठी पंचायत समिती प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असले तरीही जनतेतील उदासीनता हीच खऱ्या अर्थाने मारक ठरत आहे.

टेम्पोच्या धडकेने दुचाकीवरील दोघे ठार

0
0
नाशिक - पुणे महामार्गावरील संगमनेर नाक्यावर एका मालवाहू आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण ठार झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्र्यंबकमध्ये ८० मि.मी. पाऊस

0
0
त्र्यंबकेश्वर येथे मुसळधार पाऊस सुरू असून धोधो बरसणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायंकाळपर्यंत ८० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत होते.

कांदा, डाळिंबाला हमीभाव द्या

0
0
केंद्र सरकार इजिप्तचा कांदा ३००० रुपये प्रती क्विंटल हमीभावाने खरेदी करत आहे. मात्र, जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांचा कांदा अवघा ५०० रुपये क्विंटल या कवडीमोल मोल भावाने विकला जात आहे.

शिवसेनेचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

0
0
मनसेपाठोपाठ शिवसेनेचे सुमारे २० नगरसेवक शुक्रवारी दुपारी अज्ञातस्थळी रवाना झाले. दुपारी बारा वाजता शिवसेनाभवन येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची व्हिडीओ कॉन्फरन्स होणार होती.

भ्रष्टांना पवित्र, भाजपकडे तीर्थ

0
0
शुद्ध आणि चारित्र्यसंपन्न लोकांचा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपने आदिवासींचे पैसे खाणाऱ्या बबनराव पाचपुतेंना पक्षात प्रवेश दिलाच कसा, असा सवाल आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केला आहे.

भाजपचा नरमाईचा सूर

0
0
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजपचा निम्म्या जागांचा सूर मावळला आहे. महायुतीत जागावाटपाची चर्चा योग्य दिशेने सुरू असून, जागावाटप आकडेवारी ऐवजी गुणवत्तेवर होणार असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितले आहे.

सिंहस्थासाठी हवी यंत्रणा

0
0
महापालिका, केंद्र आणि राज्य सरकारने सयुक्तंपणे नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करण्याचा विचार केला पाहिजे. अलाहाबाद, उज्जैन या शहरांच्या धर्तीवर प्रशासकीय यंत्रणा स्थापित करावी, अशी सूचना अशी सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली.

निनादला पंतप्रधानांचा आवाज

0
0
शिवक्षकदिसनी शाळांमधून पंतप्रधानांच्या भाषणावि षयी यापूर्वी संमिंश्र प्रति्क्रिया उमटल्या असल्या तरीही प्रत्यक्षात हे भाषण ऐकून मात्र विभद्यार्थी भारावले. शहरातील शाळा शाळांमधून पंतप्रधानांचा आवाज शिभक्षक दिवनाच्या निभमिवत्ताने नि्नादला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images