Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कुशल मनुष्यबळ; महिंद्राचा पुढाकार

0
0
ऑटोमोबाईल क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिंद्रा उद्योग समुहाने या क्षेत्राला आवश्यक असलेला कुशल मनुष्यबळाचा पुरवठा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नाशिकसह एकूण १० शहरांमध्ये महिंद्राने ट्रेनिंग सेंटर सुरु केले असून, याद्वारे दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

लाखो विद्यार्थी ऐकणार मोदींचे भाषण

0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षकदिनानिमित्ताने (५ सप्टेंबर) करणार असलेले भाषण नाशिक विभागातील २८ लाख विद्यार्थ्यांना एकता यावे यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.

केंद्र समन्वयकांची अखेर हकालपट्टी

0
0
नाशिक महापालिाकेच्या शिक्षण मंडळातील शाळेंमध्ये मागील दाराने भरण्यात आलेल्या २४ केंद्र समन्वयकांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यात अनेक दिवसांपासून एकाच शाळेवर हे केंद्र समन्वयक कार्यरत होते.

आपत्ती व्यवस्थापनात असमन्वय

0
0
गोदावरीला २००८ सारखा पुन्हा पूर येणार आहे. तत्काळ घरे सोडा, अशा प्रकारचा संदेश नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाने मंगळवारी रात्रीच्या सुमारास देवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले.

‘मुख्यमंत्री दडपणाखाली’

0
0
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राज्यात विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत होणार असल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्वतःच दडणपणाखाली आहेत. त्यामुळे नैराशातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वक्तव्य केल्याची टीका केंद्रीय अन्न व पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

नाशिककर तापाने फणफणले

0
0
पाऊस आणि थंडीच्या वाढत्या प्रभावामुळे शहरात साथीच्या आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. महापालिकेने केलेल्या पाहणीत शहरातील सुमारे दोन हजार जण तापाने फणफणले आहेत.

तिघा लेकरांसह स्वतःलाही संपविले

0
0
दिंडोरी तालुक्यातील जांबूटके येथील एका शेतकऱ्याने कौटुंबिक वादातून दोन मुली व एका मुलासह स्वतःलाही संपविल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मुलांना मॅक्झिमो गाडीतून गणपती पाहायला म्हणून घेवून जातो, असे सांगत त्याने गाडी पेठ रस्त्यालगतच्या रासेगाव शिवारातील एका तलावात टाकून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

सत्ता टिकवण्यासाठी मनसेची धावाधाव

0
0
महापौरपदाची निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी मनसे, भाजप व युतीसह आघाडी आणि शिवसेनेने आपआपल्या नगरसेवकांची जमवाजमव करायला सुरुवात केली आहे.

महिला पथके अन् कवायतींची परंपरा

0
0
सोमवार पेठेतल्या गुलालवाडी व्यायामशाळेने सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा १९२५ साली केला. श्रीधर उद्धव गायधनी यांचा त्यात पुढाकार होता. या व्यायामशाळेचे सत्व असे की नाशिकच्या गणेशोत्सवाचे एक झळाळते वैशिष्टे म्हणून गुलालवाडीच्या लेझीम पथकाचा उल्लेख केला जातो. तीन ते तेरा वर्ष वयोगटातील विद्यार्थी या पथकात सामील असतात.

...तर शिक्षक होतील इम्प्रेस

0
0
शाळा, कॉलेजांबाहेर आज शिक्षक दिन असल्यानं फुले आणि गुच्छ दिसतीलच. तुम्हीही आपल्या शिक्षकांना असंच काहीसं देण्याच्या विचारात असाल, तर थोड थांबा. फुलांच्या पलीकडे जाऊन विविध प्रकारच्या भेटवस्तू तुमच्या शिक्षकांना इम्प्रेस करण्यासाठी बाजारात उपलब्ध आहेत. त्यावर टाकू या एक नजर...

पौरोहित्यातही महिलाराज

0
0
कोणतंही धार्मिक कार्य करायचं असेल तर त्याचे पौरोहित्य करण्याची जबाबदारी पुरुषांचीच असे चित्र आजही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. पण नाशिकमध्ये मात्र काही महिला या वेगळ्या वाटेवरुन चालताना आपल्याला पाहायला मिळतील.

त्र्यंबकला भेट ३० लाख भाविकांची

0
0
नाशिक आणि आसपासच्या स्थळांना धार्मिक पर्यटनामध्ये मोठे महत्त्व आहे. विशेषत: श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असून यंदाच्या श्रावण महिन्यात जवळपास ३० लाख भाविकांना त्र्यंबकेश्वराला भेट दिली आहे.

शहाणे आणि अतिशहाणे...

0
0
‘मातोश्री’बाहेर काही कार्यकर्ते बसले होते. तसे ते रोजच तिथे असत. अर्थात त्यांना आत यायला बंदी होती. त्यामुळे ते बाहेर बसत. गप्पा ठरलेल्याच.

‘इनकमिंग’मुळे निष्ठावंत शिवसैनिक अस्वस्थ

0
0
विधानसभा निवडणुकांच्या तोडांवर नाशिक जिल्ह्यात शिवसेनेत होणाऱ्या इतर पक्षांतील ‘इनकमिंग’मुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत तब्बल चार माजी आमदारांसह आघाडीतल्या बड्या पदाधिकाऱ्यांनी सेनेत प्रवेश केला असून, आणखीनही काही नेते वेटिंगवर आहेत.

कलावंतांची दांभिकता

0
0
एकदा एक प्रचंड गाजलेलं नाटक त्याकाळातीलच एका श्रेष्ठ नटानं बघितलं आणि त्या नाटकातील प्रमुख अभिनेत्याचा प्रचंड ताकदीचा अभिनय पाहून तो नट थक्क झाला. काम करणारा अभिनेता तर महान होताच, यात शंकाच नाही.

भाऊसाहेब चव्हाणला भारतात आणा

0
0
केबीसी ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना फसविणाऱ्या भाऊसाहेब चव्हाण यास भारतात परत आणण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निवेदन देवांग जानीा आणि मयूर अलई यांनी खासदार महेश गीरीजी व्यास यांना दिले आहे.

सभापतींची महापौरांवर पुन्हा कडी

0
0
एलईडी फिटिंग्ज बसवण्याच्या कामात ठेकेदाराकडून हलगर्जीपणा होतो आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांना दोन वेळा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.

शालिमार चौकाचे पालटणार रुपडे

0
0
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शालिमार येथील चौकाचा कायापालट होणार असून, हा चौक अधिक सुसज्ज आणि शहराच्या वैभवात टाकणारा साकार केला जाणार आहे. त्यासाठी खाबिया ग्रुपने पुढाकार घेतला असून, शुक्रवारी या कामाचे भूमीपूजन होणार आहे.

भाजप मागणीवर ठाम

0
0
महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचीही गुरूवारी महत्त्वपूर्ण बैठक शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बैठकीस भाजपाचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

बदलणार ‘मुक्त’चा अभ्यासक्रम

0
0
अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण करून देण्यासाठी मुक्त वििकद्यापीठाच्या बहुतांश अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहेत. औरंगाबादमधील उपकेंद्रांना नवनिपयुक्त कुलगुरू डॉ. माणिाकराव साळुंखे यांनी भेटी दिलल्या. यावेळी ते बोलत होते.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images