Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिल्ह्यात परिवर्तनाची लाट

$
0
0
जिल्हाभरातील आमदारांची कामगिारी समाधानकारक नसल्याने मतदार नाराज असल्याचे निाष्कर्ष एचपीटी आर्टस् अॅन्ड आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे.

दोन विद्यार्थिनी जखमी

$
0
0
परिमंडल दोनचे सहायक पोलिस आयुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्या सरकारी व्हॅनवर महाविद्यालयीन विद्यार्थिनींची मोपेड धडकल्याने दोघी गंभीर जखमी झाल्या. शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनजवळील सिग्नलवर सकाळी सव्वा आठच्या सुमारास हा अपघात झाला.

महायुतीत आम्हाला हव्यात २० जागा

$
0
0
रिपब्लिकन पक्षाने महायुतीला ४७ जागांची यादी दिली आहे. त्यापैकी किमान २० जागा तरी मिळाव्यात, असे पत्र दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, तसेच नाशिकमधील सिन्नर, देवळाली, धुळे शहर, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व शिर्डी या जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी हॉटेल सिल्व्हर पॅलेसमध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

लाच घेताना मुख्याध्यापिकेला अटक

$
0
0
शिवाजीनगर येथील महापालिका शाळा क्रमांक २६ मधील मुख्याध्यापिका छाया रोहिदास गोसावी यांना सातशे रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी पकडण्यात आले. शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी त्यांनी लाच स्वीकाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी भगवान माथुरे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग

$
0
0
जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला असल्याने धरणांतील पाणीसाठा लक्षणीयरित्या वाढला आहे. त्यामुळेच गंगापूर, कडवा, दारणा आणि नांदूरमध्येमश्वर या चारही धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

धर्मादायचा कारभार ‘राम भरोसे’

$
0
0
राज्यात जवळपास सहा लाख विविध संस्था, ट्रस्ट यांचा कारभार हाकणाऱ्या धर्मादाय विभागाच्या कामकाजाचा वेग मंदावला आहे. ३५ जिल्ह्यांपैकी ३० जिल्ह्यामंध्ये सहायक आयुक्त आणि उपायुक्तांची पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे.

‘रेस अॅक्रॉस अमेरिका’साठी नाशिककर

$
0
0
जगातील अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या ‘रेस अॅक्रॉस अमेरिका’ या स्पर्धेसाठी नाशिकच्या हितेंद्र महाजन व महेंद्र महाजन बंधूंची निवड झाली आहे. ‘टूर द फ्रान्स’पेक्षा अवघड असलेल्या या स्पर्धेत नऊ दिवसांत ४ हजार ८०० किलोमिटर अंतर पार करायचे असते.

महिला पथके अन् कवायतींची परंपरा

$
0
0
सोमवार पेठेतल्या गुलालवाडी व्यायामशाळेने सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा १९२५ साली केला. श्रीधर उद्धव गायधनी यांचा त्यात पुढाकार होता. या व्यायामशाळेचे सत्व असे की नाशिकच्या गणेशोत्सवाचे एक झळाळते वैशिष्टे म्हणून गुलालवाडीच्या लेझीम पथकाचा उल्लेख केला जातो.

एटीएम फोडणारे दोघे गजाआड

$
0
0
सिन्नर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या चौदा चौक वाड्यातील सांगळे कॉम्प्लेक्समधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन तोडून सुमारे चोवीस लाख रुपयाची चोरी केल्याप्रकरणी बँकेचा कॅशिअर व त्याच्या भावास सिन्नर पोलिसांनी शिताफीने सुमारे २२ लाख रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.

ऑल इन वन

$
0
0
कोणतीही मोठी स्पर्धा भरवायची असेल किंवा क्रीडाविषयक कार्यक्रम घ्यायचा असेल तर, फार मोठे नियोजन, भरपूर मनुष्यबळ आणि अशा कार्यक्रमांचा अनुभव पदरी असावा लागतो.

मनसेच्या पाच नगरसेवकांची नावे कृष्णकुंजवर

$
0
0
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक पाच नगरसेवकांची नावे कृष्णकुंजवर पाठवण्यात आली आहेत. यातील एका नावावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे वैयक्तिक या उमेदवारांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फाईल्स मंजुरीसाठी वेळ द्या

$
0
0
गेल्या सहा महिन्यापासून असंख्य फाईल्स, प्रस्ताव प्रलंबित होते. आता आचारसंहिता लागू होण्यावेळी नगरसेवक धावाधाव करीत आहेत. रात्र थोडी आणि सोंगे फार अशी तऱ्हा झाली असून त्यामुळे फाईल्स मंजूर करण्यासाठी वेळ लागणारच, अशी भूमिका मंगळवारी महापालिका आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी मांडली.

‘शिवसेना सोडल्याची मोठी चूक झाली’

$
0
0
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादीत दाखल झालेले नांदगावचे माजी आमदार संजय पवार पुन्हा स्वगृही परतले आहेत. त्यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे.

फोटोकॉपीसाठी तब्बल दोन महि्ने ?

$
0
0
उत्तरपत्रिठकांच्या फोटोकॉपीसाठी अर्ज करून दोन महि ने पूर्ण होत आले तरीही इंजिरनीअरिंगच्या वि्द्यार्थ्यांच्या पदरी निीराशाच पडली आहे. सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठाच्या ढिनसाळ कारभारामुळे रिचेकिंगसाठीही वि द्यार्थ्यांना अर्ज करता आलेले नाहीत.

शिवसेनेचे प्रत्युत्तर

$
0
0
विधानसभा जागावाटपाचा घोळ, भाजप नेत्यांची स्वबळाची भाषा आणि सेनेतील पदाधिकाऱ्यांचे भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंगच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना आपत्कालीन आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्याची माहिती मिळाली आहे.

जांबुटकेतील तरुणाचा मृतदेह सापडला

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे कौटुंबिक वादातून पिता-पुत्र व दोन मुली घरातून निघून गेल्या होत्या. मंगळवारी यापैकी मुलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या की घातपात याबाबत उलटसुलट चर्चा होत असून, तिघे जण अद्यापही बेपत्ता आहेत.

नाशिक हॉट फेव्हरीट

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान भेटीमुळे भारतातील जपानी गुंतवणुकीची चर्चा सुरु झाली असतानाच कृषी प्रक्रिया उद्योग क्षेत्रात नाशकात जपानी उद्योग येण्याची चिन्हे आहेत.

गणेश मंडळांवर दामिनी पथकाची नजर

$
0
0
अनधिकृतपणे वीज जोडण्या घेणाऱ्या गणेश मंडळांवर महावितरणच्या दामिनी पथकाने बारीक नजर ठेवली आहे. अशी मंडळे शोधून त्यांना अधिकृत वीज जोडणी घेण्यास हे पथक प्रवृत्त करीत असल्याने स्वागत होत आहे. गणेशोत्सव संपेपर्यंत ही कारवाई सुरुच राहणार आहे.

घोटी-सिन्नर-शिर्डी रस्त्याची चाळण

$
0
0
घोटी, इगतपुरी शहराला जोडणाऱ्या अनेक गावांच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवरून वाहने चालविताना मोठी कसरत करावी करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने पावसाळ्यात रस्ता छोटा खड्डे मोठे अशी स्थिती झाली आहे.

मतदारसंघ अदलाबदलीची डोकेदुखी

$
0
0
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपाचा वाद सुरू असतानाच मतदारसंघातील अदलाबदलीही दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरली आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडे असलेल्या नाशिक पश्चिम, देवळाली, चांदवड, निफाड या चार जागांवर काँग्रेसने दावा केला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images