Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

इको गणेशाशी गट्टी

$
0
0
जेलरोड-सायखेडा मार्गावरील दुर्गामाता देवस्थान ट्रस्टतर्फे शाडू मातीपासून इको फ्रेन्डली गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात झाली. पर्यावरण रक्षणाचा संदेश मिळाल्याने बालगणेशाची इको गणेशाशी गट्टी जमली.

वंचितांसाठी धावले विद्यार्थी

$
0
0
समाजातील वंचित बालकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नवजीवन फाउंडेशनतर्फे आयोजीत केलेल्या ‘वर्षा रन’मध्ये अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. रविवारी सकाळी आठ वाजता शिवशक्ती नवजीवन डे स्कूलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रंगणार ‘समग्र गोपीकृष्ण’

$
0
0
नाशिकमधील कीर्ती कलामंदिरतर्फे नटराज ‘पंडित गोपीकृष्ण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे हे २१ वे वर्ष असून, यंदा ‘समग्र गोपीकृष्ण’ या थीमनुसार यामध्ये नृत्य सादर करण्यात येणार आहे.

उद्यापासून पेट्रोलपंप बंद

$
0
0
महाराष्ट्र पेट्रो डिलर्स असोसिएशनचा महासंघाने पुकारलेल्या राज्यव्यापी बंद आंदोलनाला नाशिक जिल्हा पेट्रो डिलर्स असोसिएशनने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

रवींद्र शिंगेंना सक्तीची निवृत्ती

$
0
0
अनेक गैरव्यवहारांचा ठपका ठेऊन सिव्हिल हॉस्पिटलचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक रवींद्र शिंगे यांनी सक्तीची निवृत्ती घ्यावी, असे आदेश राज्य शासनाचे उपसचिव रा. श. जाधव यांनी दिले आहेत.

पाणीपुरवठा उद्या बंद

$
0
0
बळवंतनगर जलकुंभाजवळील कार्बन नाका ते रामराज्य जलकुंभ भरणारी ५०० एमएम व्यासाची पाईपलाईन जोडणीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे सातपूर तसेच पश्चिम विभागातील अनेक भागात २७ ऑगस्ट रोजी सायंकाळचा तसेच गुरूवारी, २८ ऑगस्ट रोजी सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही.

एलईडी ठेकेदाराची प्रशासनाकडून पाठराखण

$
0
0
एलईडी फिटींग्सचे काम अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, प्रशासन ठेकेदाराची पाठराखण करण्यातचे धन्यता मानत आहे. यामुळे चालढकल करणाऱ्या ठेकेदाराविरुध्द कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल सभापती अॅड. राहुल ढिकले यांनी उपस्थित केला.

सिंहस्थाच्या कामांना गती

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळाच्या विकासकामांसाठी राज्य सरकारने नव्याने ५१ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर केला असून संबधीत विभागांना तत्काळ या निधीचे वितरण करण्यात आल्याने सिंहस्थाच्या कामांना गती मिळणार आहे.

शहरातील पाणीप्रश्नी केवळ चर्चेचे गुऱ्हाळ

$
0
0
दोन वेळेस पाणीपुरवठा करण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा अद्याप संपलेला नाही. सत्ताधारी गटातीलच नगरसेवक दोन वेळेस पाणीपुरवठा करण्याची मागणी सातत्याने करीत असून सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा त्यावर चर्चा झाली.

काचेच्या इमारतींना नियमांचे वावडे

$
0
0
सध्या काचेचा वापर करून इमारती तयार करण्याचे फॅड शहरात पसरले असून हे काम कोणत्या नियमात होते, याचे स्पष्टीकरण स्थायी समिती सदस्य कुणाल वाघ यांनी प्रशासनाकडे मागितले होते.

तेलही गेले, तूपही गेले…

$
0
0
‘चकाकते ते सगळेच सोने नसते’ अशी म्हण प्रचलित आहे. सोने अस्सल असेल तर ते फार चकचकावे, अशी अपेक्षाही नसावी. परंतु, तसे होत नाही. मुळात आपल्याकडे आहे त्याचा देखावा करण्याची मानसिकता, ते इतरांना ठळकपणे दिसावे यासाठी केला जाणारा अट्टाहास हा मोहच अनेकदा स्वत:वर आपत्ती ओढावून घेण्यास कारणीभूत ठरत असतो.

सर्जा-राजाशी बंदीजनांचे जडले नाते

$
0
0
नाशिकरोडसह परिसरातील गावांमध्ये बैलपोळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला. मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी बैलांचे औक्षण करुन त्यांची पूजा केली. मध्यवर्ती कारागृहाची मोठ्या प्रमाणावर शेती आहे.

सटाण्यात बनावट ओळखपत्र

$
0
0
एस. टी. बस प्रवासात सवलत मिळवण्यसाठी तसेच इतर शासकीय लाभ मिळविण्यसाठी बनावट ओळखपत्र बनविणाऱ्या टोळीचा सटाणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सटाणा, मालेगाव व कळवण येथून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मनमाडला आठ दिवसाआड पाणी

$
0
0
मनमाड नगरपालिकेच्या पाटोदा येथील साठवणूक तलावाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून तलावाची साठवण क्षमताही वाढली आहे. वागदरडी धरणावरील तांत्रिक दोष सुधारून येत्या आठवड्यापासून मनमाड शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

साधुग्रामच्या कामास हिरवा कंदील

$
0
0
महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर साधुग्राम उभारणीसाठी काम सुरू करण्यास स्थायी समितीने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. चारपैकी दोन प्रस्तावांना स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. जागा उपलब्ध होईल, त्यानुसार उर्वरीत दोन्ही प्रस्तावांना स्थायी समितीकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

नाशिककरांचा 'घसा' जाम

$
0
0
ढगाळ हवामान, तापमानातील चढ-उतार आणि पावसामुळे नाशिककरांचा घसा ‘जाम’ झाला असून, गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात सर्दी-खोकला, पोटदुखी, डायरिया, डेंगी-मलेरियासदृश तापाने नाशिकरांना घेरले आहे.

चांदवड अन् पेठही टंचाईग्रस्त

$
0
0
राज्यसरकारने आज दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १५ नव्या टंचाईसदृश्य तालुक्याची यादी जाहीर केली असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि पेठ या दोन तालुक्यांचा समावेश केला आहे.

महापालिका आवारात तीन चोऱ्या

$
0
0
शहराची पालकसंस्था असलेल्या महापालिकेतील सुरक्षाव्यवस्थेच्या नाकावर टिचून चोरट्यांनी भरदिवसा ठेकेदाराजवळील तीन लाखांची रोकड हिसकावून नेली. पावणे बाराच्या सुमारास घडलेल्या या जबरी चोरीमुळे महापालिकेच्या ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत.

महापौरपदासाठी भाजप 'राज'दारी

$
0
0
नाशिक महापालिका स्थायी समितीचे सभापतीपद गमावलेल्या भाजपने आता महापौरपदासाठी शिवसेनेसह मनसेशीही पुन्हा हातमिळवणी सुरू केली आहे. स्थायीचे सभापतीपद नाकारल्यानंतर मनसेशी काडीमोडची भाषा करणाऱ्या भाजपने आता महापौरपद आम्हाला द्या, अशी गळ मनसेला घातली असून त्यासाठी बुधवारी (दि. २७) भाजपचे शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार आहे.

महिलांना ३३ टक्के उमेदवारी हवी

$
0
0
विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के निश्चित उमेदवारी मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच, यासाठी आपण पक्षाकडे आग्रह धरू, अशी ग्वाही भाजपच्या राष्ट्रीय महीला आघाडीच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images