Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिक ते दिल्ली १७ तासांत

$
0
0
मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते निजामुद्दीन (दिल्ली) या मार्गावर राजधानी एक्स्प्रेससारखी नवीन गाडी सुरू करण्याचा निर्णय मागील अर्थसंकल्पात जाहीर केला. त्यानुसार ही गाडी येत्या काही दिवसांत सुरू होणार असून मध्य रेल्वेने त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

'वारक-यांनी सहकार्य करावे'

$
0
0
समाजातील अनिष्ठ रूढींबाबत संतांच्या विचारांची जाण ठेवत जादूटोणाविरोधी विधेयकाला वारक-यांनी सहकार्य करावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.

माळढोकसाठी ३ संवर्धन प्रकल्प

$
0
0
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोकच्या संवर्धनासाठी राज्यात तीन ठिकाणी प्रकल्प साकारले जाणार आहेत.

जेलरोडला पोहचल्या घंटागाड्या

$
0
0
जेलरोडच्या काही भागामध्ये घंटागाडी येत नसल्याच्या पार्श्वभुमीवर स्थानिक स्वच्छता निरीक्षक व प्रभागातील नगरसेवकांनी विषेश लक्ष दिल्याने प्रभाग क्रमांक ३३ व ३५ कचरामुक्त झाला आहे.

पांडवलेणीसाठी सरसावले नाशिककर

$
0
0
शहराचे वैभव म्हणून ओळख असलेल्या पांडवलेण‌ी डोंगराभवती शहरीकरण वेगाने सुरू आहे. याचा विचार करून या डोंगराच्या संरक्षणासाठी उपाययोजनाची गरज असल्याचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते.

मुक्त विद्यापीठातून विद्यार्थी संसदच हद्दपार

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात विद्यार्थी संसदच नसल्याने विद्यापीठाचा केंद्रबिंदू असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मुक्त विद्यापीठातून डावलण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

कॉलेजेसने अतिरीक्त शुल्क वसुली थांबवावी

$
0
0
मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा वसुल केली जात असलेले अतिरिक्त शुल्क कॉलेजेस घेऊ नये. कॉलेजेसवर विद्यापीठाने नियंत्रण न ठेवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेने पुणे विद्यापीठाला दिला आहे.

पार्किंगचे नव्हे, दंडाचे नियोजन

$
0
0
नाशिकरोड परिसरात पार्किंगचे नियोजन नसताना वाहन उचलण्याची कारवाई सुरू झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी आधी पार्किंगचे नियोजन करा नंतर दंडात्मक कारवाई करा अशी मागणी केली आहे.

अहो जरा थांबा...

$
0
0
काही सोहळ्यांमधील कार्यक्रम पत्रिकेतील आपली भूम‌िका कोणती ? याचा उलगडा अनेकदा चांगल्या जाणकारांनाही होत नाही. अभिव्यक्तीच्या ओघात हे जाणकार वहावत जाण्याचाच धोका अधिक असतो.

‘त्या’ निर्णयाचा गैरफायदा नको !

$
0
0
खासगी शाळांची फी वाढ हा केवळ नाशिकचाच नव्हे, तर संपूर्ण राज्याचा प्रश्न बनला आहे. अन्य शहराच्या तुलनेत नाशिकमधील पालक याबाबत अधिक सजग बनल्यामुळे शहरात या समस्येतून शाळा विरुध्द पालक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

निर्यात सुविधांच्या नावानं...!

$
0
0
भाजीपाला, द्राक्ष, कांदा, बेदाणा, फुले, फळे आदिंच्या उत्पादनाचे माहेरघर म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील या कृषी आणि फलोत्पादनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत चार ठिकाणी निर्यात सुविधा केंद्र स्थापले जाणार आहे.

एका ‘स्वप्नील’ प्रवासा‌ची गोष्ट

$
0
0
'मुंबई-पुणे-मुंबई', एका लग्नाची दुसरी गोष्ट, पापडपोल यांसारख्या सुपरहिट सिनेमा मालिकांद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर करणारा गुणी कलाकार म्हणजे स्वप्नील जोशी.

आजपासून ‘हाल’

$
0
0
लोकल बॉडी टॅक्स अर्थांत एलबीटी विरोधात फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फाम) या संघटनेने दोन दिवस बंद (१५ आणि १६ जुलै) पुकारला आहे.

फुलबाजारप्रश्नी आज तोडगा?

$
0
0
पारंपरिक फुलबाजार स्थलांतर करण्याचा ठराव मनपाने मंजूर केला असून मनपाच्या वतीने फुलविक्रेत्यांवर सोमवारी धडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

गोहत्या, दारूबंदीबाबत दिरंगाई का?

$
0
0
जादुटोणा कायदा पास करणारे सरकार अद्याप गोहत्या व दारूबंदी का करीत नाही, असा सवालही वारकरी महामंडळाने विचारला आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत या आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

पाली भाषेला मिळणार बळकटी

$
0
0
भारतातील अन्य महत्त्वाच्या भाषांइतकीच प्राचीन आणि महत्त्वपूर्ण भाषा असूनही केवळ दुर्लक्षामुळे विस्मरणात जाऊ लागलेल्या पाली भाषेला बळकटी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

लॉ च्या विद्यार्थ्यांची दांडी गुल

$
0
0
एप्रिल २०१३ मध्ये पुणे विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांमध्ये लॉ विद्याशाखेच्या ज्युरिस्प्रुडेन्स (न्यायशास्त्र) या विषयात शेकडो विद्यार्थ्यांची दांडी गुल झाली आहे.

विद्यार्थिनीची आत्महत्या

$
0
0
बारावीच्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. संबंधित विद्यार्थिनी १२ जुलैपासून बेपत्ता होती.

नाशिक होतंय बुलेट सिटी

$
0
0
नाशिकमध्ये महिन्याला दिडशे बुलेटची नोंदणी करण्यात येत असून नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता नाशिक बुलेटविक्रीत राज्यातील तिसऱ्या क्रमांकावर झेपावेल.

खोलेच्या दाव्यावरील धोंगडेंचे अपील रद्द

$
0
0
महापालिकेच्या निवडणुकीत स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे यांना तिसरे अपत्य असल्याबाबतचा दावा प्रतिस्पर्धी शाम खोले यांनी दाखल केला होता. तो दावा दाखल करु नये म्हणून रमेश धोंगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले होते.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images