Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

साठेबाजीमुळे युरियाची टंचाई

$
0
0
येवला तालुक्यात विशेषत: पूर्व भागात युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील वितरक, विक्रेते व ग्रामीण भागातील दुकानांमध्ये युरिया शिल्लक नसल्याचे सांगितले जात असून भाववाढीच्या अफवेने व्यापाऱ्यांनी युरिया खताचा साठा केल्याचा आरोप शेतकऱ्याकडून केला जात आहे.

विद्यार्थ्यांच्या श्रेणीच्या खोट्या नोंदी

$
0
0
शैक्षणिक गुणवत्ता विकास कृती कार्यक्रमाच्या पाहणीसाठी आयुक्त एकनाथ डवले यांनी तालुक्यातील मोरेनगर व ताहाराबाद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना भेटी दिल्यात.

संजय चव्हाण यांची याचिका सुनावणीसाठी

$
0
0
बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या जातपडताळणी संदर्भात उच्च न्यायालयाने सदरची याचिका अंतिम सुनावणीसाठी पहिल्या १ ते १० याचिकांमध्ये समाविष्ट करून घेतल्याने अंतिम निर्णयासाठी ठेवण्यात आली आहे.

पवारांच्या निर्णयाला शनिवारचा मुहूर्त

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देणारे माजी आमदार संजय पवार यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शनिवारचा (दि. ३०) मुहूर्त निवडला आहे. नांदगाव येथे होणाऱ्या निर्धार मेळाव्यात कार्यकर्ते सांगतील त्या पक्षात जाण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

शिक्षकांनी गुणवत्ता सुधारावी

$
0
0
शैक्षणिक सुविधेबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. शिक्षणाच्या माध्यमातूनच आदिवासी समाजाचा विकास होऊ शकतो. समाजाला मार्गदर्शन ठरणारी पिढी निर्माण करावी, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केले.

रेनफ्रो इंडियामध्ये कामगारांना वेतनवाढ

$
0
0
गोंदे येथील रेनफ्रो इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या १५२ कामगारांना ७००० ते ७२५० रुपये अशी वेतनवाढ लागू करणारा करार सीटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियन व कंपनी व्यवस्थापन यांच्यात नुकताच झाला.

‘मविप्र’ला उज्ज्वल परंपरा

$
0
0
सर्वांना सोबत घेऊन व‌िधायक मार्गावर पावले टाकणारी स्वप्न क्रांतीकारी असतात. अशी स्वप्न समाजाच्या सर्वांग‌िण व‌िकासासाठी कारक ठरतात. मराठा व‌िद्या प्रसारक संस्थेला अशाच क्रांतीकारी स्वप्नांची परंपरा आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी काढले.

‘पंचक’ मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार

$
0
0
पंचकच्या समर्थ सेवा मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आणि माजी प्रभाग सभापती अॅड. सुनील बोराडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, नगरसेविका ललिता भालेराव, वास्तुविशारद उमेश गायधनी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख बाळासाहेब गाडगीळ, चंद्रभान टिळे उपस्थित होते.

विक्रेत्यांचे स्टॉल करणार ट्रॅफ‌िक जाम

$
0
0
सातपूर रस्त्यावर गणपती विक्रेत्यांचे स्टॉल लागल्याने उत्सव काळात या रस्त्यावर ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होणार आहे. स्टॉल रस्त्यावर थाटल्याने आतापासूनच वाहनचालकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

बेरोजगार तरुणांना संधी

$
0
0
लोकनिर्माण प्रकल्प व व्हर्लपुल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील बेरोजगार तरुणांना रोजगाराची निश्चित संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. किमान दहावी उत्तीर्ण बेरोजगार तरुणांसाठी २२ दिवासांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे.

धनगर आरक्षण, ‘ध’ चा ‘मा’

$
0
0
आदिवासींच्या विरोधात धनगर समाज मुळात कधी नव्हताच. कारण धनगर हे आदिवासीच आहे. त्यामुळे हा समाज आदिवासींच्या विरोधात कसा असणार? नेतृत्वहीन असलेल्या धनगर समाजाच्या अज्ञान, निरक्षरपणामुळे या समाजाला आजपावेतो आपल्या हक्कापासून वंचित रहावे लागले.

विकास आराखडा अन् ‘भुक्ते पॅटर्न’

$
0
0
नाशिक शहरासाठी नव्याने विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारने नगररचना विभाग सहसंचालक प्रकाश भुक्ते यांच्यावर सोपविल्यानंतर कामाची सूत्रे महानगरपालिकेकडून सरकारकडे गेली.

नवी बँक खाते योजना, आर्थिक विकासाची संधी?

$
0
0
केंद्र सरकार 'घर तिथे बँक खाते' योजना सुरू करीत आहे ही उत्सावर्धक व आनंदाची बातमी आहे. या योजनेचा तपशील अजून यायचा आहे. पण मुख्यतः, प्रत्येक घराला बँकिंग सेवा पुरविण्यासाठी घरटी एक (तरी) खाते उघडण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असून, आगामी चार वर्षांत २०१८ पर्यंत शहरी भागात तीन कोटी व ग्रामीण भागात बारा कोटी बँक खाती उघडण्यात येणार आहेत.

कॉलेजरोडवर सिनेस्टाईल हाणामारी

$
0
0
सुट्टी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भरगच्च गर्दी असलेल्या कॉलेजरोडवर संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेमुळे कॉलेजरोडवरील नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.

नारळीकर सरांचा प्रश्नोत्तराचा तास

$
0
0
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांचे गेल्या आठवड्यातील नाशिकमधील डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यानच नव्हे, तर त्या नंतरच्या प्रश्नोत्तरांचा तासही श्रोत्यांसाठी उदबोधक ठरला.

आयुष्याचे हुमान सोडविण्यासाठी ‘त्याने’ केली मदत

$
0
0
‘हुमान म्हणजे कोडे. माझे आयुष्याचे हुमान सोडविण्यासाठी मला माझ्या नवऱ्याने मदत केली. त्याचे नावही उत्तम होते व तो कलागुणांनीही उत्तमच होता. त्याने लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मला अल्लड हा किताब बहाल केला होता, त्याच्या व माझ्या वयात १० वर्षांचे अंतर होते हे अंतर त्याने कायसाठी ठेवले,’ असे प्रतिपादन ‘हुमान’ आत्मचरित्राच्या लेखिका, सनदी अधिकारी संगीता धायगुडे यांनी केले.

सिंहस्थाची ८० टक्के कामे कागदावर पूर्ण

$
0
0
भूसंपादन प्रक्रियेसाठी राखीव असलेले २०० कोटी रूपये वगळता उर्वरीत ८५२ कोटी रूपयांच्या आराखड्यापैकी तब्बल ६९३ कोटी ११ लाख रूपयांच्या वर्क ऑर्डर महापालिका प्रशासनाने ​दिल्या आहेत. उर्वरीत कामांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, सिंहस्थ कुंभमेळ्याशी निगडीत सर्व कामे कागदावर तरी पूर्णत्वाकडे निघाल्याचे दिसते.

किडनीची गरज पाचशे जणांना, नोंद एकाचीच!

$
0
0
नाशिकमध्ये ५०० हून अधिक पेशंट डायलेसिसवर आहेत. किडनी ट्रान्सप्लांट या पेशंटसाठी जीवदान ठरू शकते. मात्र, झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन कमिटी (झेडटीसीसी) बाबत पुरेशी माहिती नसल्याने फक्त एकाच पेशंटने किडनीसाठी नावनोंदणी केली आहे.

आदिवासींच्या आरक्षणला धक्का लावू देणार नाही

$
0
0
आमचा कुणाच्या आरक्षणाला विरोध नाही. परंतु, आमच्या आरक्षणाला कुणी धक्का लावत असेल तर आदिवासी बांधव शांत बसणार नाही, असा इशारा अादिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी रविवारी (ता.१७) दिला.

सातपूरकरांना विजेचा फटका

$
0
0
विजेच्या कमी अधिक दाबामुळे रविवारी मध्यरात्री सातपूर परिसरातील नागरिकांना मोठे नुकसान सोसावे लागले. अचानकपणे वीजपुरवठा खंडीत झाल्याने घरातील इलेक्ट्रानिक वस्तूंचे नुकसान झाले. परिसरात यापूर्वीही असेच प्रकार घडूनही महावितरण कंपनीकडून लक्ष दिले जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images