Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एकलहरेचा नवीन प्लान्ट कचाट्यात

$
0
0
एकलहरे येथाल ६६० मेगावाट क्षमतेचा नवीन प्लान्ट प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि देवळालीतील लष्कराच्या परवानगीच्या कचाट्यात सापडला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह लष्करी अधिकाऱ्यांची आज भेट घेतली. लष्करी अधिकाऱ्यांनी दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

बबन घोलपांची आमदारकी रद्द

$
0
0
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेले शिवसेनेचे आमदार बबनराव घोलप यांची आमदारकी राज्यपालांनी रद्द केली असून, त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या शिफारशीनंतर राज्यपालांनी हा आदेश काढला आहे.

घोलपांच्या वारसदाराचा सेनेकडून शोध

$
0
0
शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर राज्यपालांनी त्यांची आमदारकी रद्द करत निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न

$
0
0
जून २००९ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेशन्स व बोनस मिळवण्यासाठी २५० रुपये भरून अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे दाखवत त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

जेवढे बुजवले, त्यापेक्षा दुप्पट पडले खड्डे

$
0
0
शहरात झालेल्या मुसळधार पावसाने बहुतांश रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यात नवीन रस्त्यांचा देखील समावेश असून पावसाने रस्ते ‘साफच’ करून टाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मान्सून पूर्व कामे करताना महापालिकेने जवळपास चार हजार खड्डे बुजवल्याचा दावा केला होता.

‘सर्व्हे करून नियोजन आराखडा तयार करा’

$
0
0
सिंहस्थ कुंभेमेळा काळात कोणतीही आपत्ती उद्भवू शकते. त्यासाठीच प्रत्येक पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीतील बारीकसारीक गोष्टींचा सर्व्हे करावा. त्याबाबतचा आराखडा तयार करून तो सादर करावा, असे आदेश पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी शनिवारी दिले.

सेवकांच्या पाल्यांसाठी ‘मव‌िप्र’ वसत‌िगृह उभारणार

$
0
0
मराठा व‌िद्या प्रसारक संस्थेचे सभासद ज‌िल्हाभरात आहेत. मोठ्या प्रमाणावर या संस्थेचे जाळे पसरले आहे. शहरात श‌िक्षणासाठी या सभासदांचे पाल्य येतात, त्यावेळी त्यांची गैरसोय होऊ नये याकरिता त्यांच्यासाठी वसत‌िगृह उभारण्यात येणार आहे. हा न‌िर्णय मव‌िप्रच्या कल्याण सम‌ितीच्या वार्षिक सभेत घेण्यात आला.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

$
0
0
अबालवृध्दांमध्ये चैतन्य निर्माण करणारा गणेशोत्सव अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्थेत कोणतेही विघ्न निर्माण होऊ नये, यासाठी गणेश मंडळानी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

$
0
0
भरधाव ट्रकने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नाशिकरोड परिसरातील मालधक्का रोडवर शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ह‌ी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम बाबूराव भडांगे (४२ रा. गुलाबवाडी, देवळालीगाव) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

शेरीन ऑटो : कामगारांना वेतनवाढ

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील शेरीन ऑटो प्रा. लि. कंपनीच्या ५३ कामगारांना ५९०० रुपये वेतन वाढ लागू करणारा करार सीटू संलग्न एस. एस. के. (शेरीन गृप) एम्प्लॉईज युनियन व कंपनी व्यवस्थापन यांच्यात नुकताच झाला.

करमणूक कर वसुली : ३० % वाढ

$
0
0
जिल्ह्यात सेट टॉप बॉक्सच्या कडक अंमलबजावणी नंतर जिल्ह्यातील करमणूक शुल्क वसुलीत गेल्या वर्षाच्या तुलनेत सुरुवातीच्या दोन महिन्यातच ३० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी जून आणि जुलै या दोन महिन्यात करमणूक शुल्कापोटी ४ कोटी ८७ लाखांची वसुली झाली होती.

CA इंटरमिजिएटचा निकाल ९.५ %

$
0
0
‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटस् ऑफ इंडिया’ च्या वतीने (आयसीएआय) घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेत दोन्ही ग्रुपचा निकाल अवघा साडेनऊ टक्के लागला आहे.या न‌िकालात पहिल्या ग्रुपमध्ये १६.४१ टक्के तर दुसऱ्या ग्रुपमध्ये १३.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा न‌िकाल घटला आहे.

जिल्ह्यातील ६ धरणातून विसर्ग

$
0
0
जिल्ह्यातील धरणक्षेत्रात शुक्रवारी दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सहा धरणांमधून तब्बल १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दारणा, नांदूरमध्यमेश्वर, कडवा, भावली, आळंदी, वालदेवी या सहा धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

घोलपांची आमदारकी रद्द

$
0
0
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कोर्टाकडून तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेले शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री बबनराव घोलप यांची आमदारकी राज्यपालांनी रद्द केली असून त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

४० लाखांची ‘धुळधाण’

$
0
0
मोठा गाजावाजा करून तसेच तब्बल ४० लाख रुपये खर्च करून महापालिकेने खरेदी केलेली कार्डियाक व्हॅन दोन वर्षांपासून धुळखात पडली आहे. कार्डियाक व्हॅन घेणाऱ्या महापालिकेने त्यासाठी किती कर्मचारी लागतील, याचा विचारच न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

सिंहस्थ कामांकडे ठेकेदारांनीच फिरवली पाठ

$
0
0
सिंहस्थ तोंडावर आला असताना कोट्यवधींच्या आराखड्यास मंजुरी मिळाली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु, कामांना शुभारंभ झाला नाही. याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. इतर वेळेस कामांसाठी साठमारी होत असताना येथे मात्र कामांकडे ठेकेदारांनी पाठ फिरवीली आहे.

पक्षभेद बाजूला सारूनच विकासकामे

$
0
0
इगतपुरी मतदारसंघातील जनतेच्या पाठबळावरच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राजकारण बाजूला सारून प्रयत्नशील आहे. मतदारसंघातील विकासकामे करताना कोणताही पक्षभेद, राजकारण केले नाही आणि यापुढेही करणार नाही.

सर्वांना एकत्र येण्याची गरज

$
0
0
राज्यातील अपंग बंधू भगिनींनी जात-पात बाजूला सारून प्रमाणपत्र व इतर सुविधा मिळविण्यासाठी एकत्र येऊन मोठे जनआंदोलन छेडावे, असे आवाहन प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले.

उंबरदरी, कोनांबे, सरदवाडी धरण भरले

$
0
0
सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे पश्चिम पट्यात असलेल्या उंबरदरी, कोनांबे धरणा पाठोपाठ सरदवाडी धरण पूर्ण पणे भरले आहे. सर्वात मोठे भोजापूर धरण ८० टक्के भरल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवशाहीसाठी कामाला लागा

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना जनतेने गाडले असून आता सिन्नर तालुक्यातील गद्दाराला गाडण्यासाठी भगवी लाट उभी राहिली आहे. शिवशाहीचे सरकार आणण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी सिन्नर येथे केले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images