Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

निर्यातमूल्य घटले, पण भाव `जैसे थे`

$
0
0
केंद्र शासनाने कांद्याच्या एमईपी दरात अर्थात किमान निर्यात मूल्यात १५० डॉलरची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला असून, गेल्या काही महिन्यांपासून ५०० डॉलर प्रती टन असणारे कांद्याचे निर्यात मूल्य १५० डॉलरने घटल्याने आता ३५० डॉलर प्रती टन झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज शेतकरी मोर्चा

$
0
0
केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी कृषी धोरणांचा निषेध करण्यासाठी मालेगावला शुक्रवारी (ता. २२) प्रांत कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी मोर्चा काढला जाणार आहे.

डोळ्यावर पट्टी बांधून फोडली दहीहंडी

$
0
0
कोणत्याही गोविंदाला इजा होऊ नये व दहीहंडी उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, या उद्देशाने घोटी शहरात दहीहंडीचा उपक्रम आगल्या वेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आला. डोळ्यावर पट्टी बांधून काठीच्या आधाराने दहीहंडी फोडण्याच्या या उपक्रमाला महिलासह युवाकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत

$
0
0
राजीवनगर येथील युनिक ग्रुपतर्फे यावर्षीच्या गणेशोत्सवात `लकी ड्रॉ`च्या माध्यमातून जमा झालेली वर्गणी आत्महत्या केलेल्या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या विजेत्यांना अनेक बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती युनिक ग्रुपचे अध्यक्ष आणि नगरसेवक सतीश सोनवणे यांनी दिली.

सातपूर बस स्थानकाचे भूमिपूजन

$
0
0
महाराष्ट्रात रस्ते वाहतूकीत अनेक अडथळे असतानाही सार्वजनिक वाहतूक सेवेत एसटीने मातृत्वाचे स्थान आजही कायम ठेवले आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री वनाधिपती विनायक दादा पाटील यांनी केले.

‘त्यांनी’ही लुटला गोपाळकाल्याचा आनंद

$
0
0
राजीवनगर येथील डे केअर सेंटर शाळेत निरीक्षणगृहातील विद्यार्थ्यांसमवेत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, या विद्यार्थ्यांना धान्याची मदतही देण्यात आली.

‘रंगभूमीच्या समृद्धी’चं स्वप्न नेमकं कुणाचं?

$
0
0
नाशिकच्या नाटकावर ते करणार्यांचं खूप प्रेम आहे. बघणाऱ्यांचं मात्र मिळता मिळत नाहीए. नाशिककर रंगकर्मी चांगलं आणि - (पुढचं हे वाक्य लिहायला मला कधीच आवडत नाही!) – आणि मुंबई-पुण्याच्या दर्जाचं नाटक देऊ लागले असतानाही नाशिकच्या प्रेक्षकांचा अजूनही नाशिककर रंगकर्मींवर विश्र्वास बसत नाहीए.

अन् दंगा काबू पथकाची तत्परता दिसली

$
0
0
सण आणि उत्सवांच्या काळात शहरात दंगल उसळलीच तर दंगा नियंत्रण काबू पथक अवघ्या १० ते १२ मिनिटांत वर्दळीच्या ठिकाणी पोहोचू शकते, याचा प्रत्यय गुरुवारी आला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या प्रात्यक्षिकात दंगल काबू नियंत्रण पथकाची तत्परता स्पष्ट झाली.

मुक्त‌ व‌िद्यापीठही देणार उत्तरपत्र‌िकांच्या झेरॉक्स

$
0
0
‘परीक्षा पध्दतीतील पारदर्शकता वाढव‌िण्यासाठी काही नवे उपक्रम हाती घेऊ. यामध्ये व‌िद्यार्थ्यांना त्यांच्या शंका समाधानासाठी उत्तरपत्र‌िकेच्या झेरॉक्स म‌िळवून देण्यापासून सुरुवात करू,’ असे आश्वासन मुक्त व‌िद्यापीठाचे कुलगुरु डॉ. माण‌िकराव साळुंखे यांनी द‌िले.

हक्क द्या, अन्यथा बहिष्कार !

$
0
0
‘जन्मगावी जातीचा दाखला’ हा शासनाचा निर्णय जाचक असून, अशा निर्णयांमुळे मागासवर्गीयांचे हक्क डावलेले जात आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी जातीच्या दाखल्याचा निर्णय तसेच नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या जाचक अटी सरकारने तातडीने रद्द कराव्यात अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती संशोधन संस्थेतर्फे आयोजित पंचवटीत आयोजित शिक्षण हक्क परिषदेत घेण्यात आल्याची माहिती सरचिटणीस बापू बैरागी यांनी दिली.

१६ अधिकाऱ्यांवर जबाबदारी

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील १६ अधिकाऱ्यांना निवडणूक काळातील जबाबदारी सोपविली आहे.

KBC गुंतवणूकदारांचा बहिष्कार

$
0
0
केबीसीचा संचालक भाऊसाहेब चव्हाण यास निवडणुकीपूर्वी अटक न केल्यास विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गुंतवणुकदारांनी दिला आहे.

नवनिर्माणाला 'मनसे' दांड्या

$
0
0
नाशिकच्या नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनसेच्या आमदारांमधील हेवेदावे आणि वर्चस्वाच्या लढाईची पुन्हा एकदा नाशिककरांना प्रचिती सातपूर बसस्थानकाच्या भूमिपूजनप्रसंगी आली आहे.

भुजबळांना रोखण्याची सेनानीती

$
0
0
गेल्या विधानसभा निवडणुकीत नांदगाव आणि येवल्याकडे न फिरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या निवडणुकीत येवल्यात प्रचाराला जाण्याची जाहीर घोषणा केल्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या आहेत.

टेम्पो ट्रॅक्स उलटून १ ठार

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे भात लावणीसाठी मजुरांना घेऊन जाणारी टेम्पो ट्रॅक्स उलटून एकाचा मृत्यू झाला, तर १९ मजूर जखमी झाले. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गुरूवारी सकाळी नऊच्या सुमारास खुंटवाडी बंधाऱ्याजवळ हा अपघात झाला.

सोशल मीडियाला चाप?

$
0
0
लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर झालेल्या अपप्रचाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हावार स्वंतत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

मेळाचा बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

$
0
0
तालुक्यातील ममदापूर परिसराला जलसंजीवनी देणाऱ्या मेळाचा बंधारा प्रकल्पाला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने ६ कोटी ५३ लाख रुपये खर्चासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही माहिती संपर्क कार्यालयातून बाळासाहेब लोखंडे यांनी दिली.

‘केंद्र सरकारकडून विश्वासघात’

$
0
0
लोकसभा निवडणुकीत शेतकरी व कष्टकरी जनतेला मोठी स्वप्ने मोदी सरकारने दाखवली. जनतेने देखील विश्वासाने मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला स्पष्ट बहुमत देत सत्ता दिली. मात्र, गेल्या दोन महिन्यात या केंद्र सरकारने शेतकरी हितापेक्षा ग्राहक हिताला प्राधान्य देत चुकीचे निर्णय घेत धोरण अमलात आणीत शेतकऱ्यांचा विश्वास घात केला आहे.

पैठणीला मिळणार प्रोत्साहन केंद्राचे बळ

$
0
0
येवल्यातील पैठणी तयार करण्याच्या पद्धतीबाबत पर्यटकांना माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या येवला ग्रामीण पर्यटन माहिती व पैठणी प्रोत्साहन केंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी झाला.

शेती महामंडळाची जमीन अल्प दरात देणे थांबवा

$
0
0
मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील शेती महामंडळाची हजारो एकर जमीन अल्प मोबदल्यात काही मूठभर लोकांना कराराने दिली जात आहे. हा प्रकार आमदार दादा भुसे यांचा लक्षात आल्याने शेती महामंडळाने या करार प्रक्रियेला तत्काळ स्थगिती द्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images