Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नशा उतरवली

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीसारखा आदिवासी तालुका. त्यातील लखमापूर येथील ज्योती देशमुख यांनी एक वेगळीच क्रांती घडवली आहे. महिलांना एकत्र करून त्यांनी दारूबंदीची चळवळ उभी केली.

विकासासाठी सहायता निधी

$
0
0
नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आठ कोटी रुपये देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. सिन्नर येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या आमदार निधीतून झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी हा निधी जाहीर केला.

'त्यांच्या' पंखाना लाभणार बळ

$
0
0
खडतर परिस्थितीतही यशाचा मार्ग शोधणाऱ्या गुणवंतांच्या पंखांना बळ देण्यासाठी हजारो नाशिककरांनी हात पुढे केले. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या हाकेसरशी या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा ठेवा जमा झाला.

महापालिका होणार पुन्हा पोरकी

$
0
0
मागील पाच महिन्यांपासून प्रभारी आयुक्त म्हणून कार्यरत असलेले आयुक्त संजीवकुमार दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी मसुरी येथे जाणार आहेत. १८ ऑगस्ट ते १० ऑक्टोबर या कालावधीत प्रभारी आयुक्तांचा पदभार नवीन प्रभारी आयुक्तांकडे सोपवण्यात येणार असल्याने महापालिकेला वालीच राहिला नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

नशा उतरवली

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीसारखा आदिवासी तालुका. त्यातील लखमापूर येथील ज्योती देशमुख यांनी एक वेगळीच क्रांती घडवली आहे. महिलांना एकत्र करून त्यांनी दारूबंदीची चळवळ उभी केली. केवळ अवैध दारूविक्रीच नाही, तर सरकारमान्य देशी दारू दुकानेही बंद करण्यात त्यांनी यश मिळवले.

जैतापूरवर भूमिका स्पष्ट कराः कॉग्रेस

$
0
0
मोदी अणुउर्जेसाठी आग्रही असताना शिवसेना मात्र जैतापूरला विरोध करीत आहेत. शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेवर भाजप नेते काहीच बोलायला तयार नाही. त्यामुळे जैतापूर अणुवीज प्रकल्पासंदर्भात शिवसेना आणि भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केले आहे.

सटाण्यात तीन ठिकाणी घरफोडी

$
0
0
सटाणा शहरातील भाक्षीरोड परिसरातील सुयोग कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद असलेली तीन घरे फोडून सुमारे साडे तीन लाख रुपयांच्या ऐवजासह रोख रक्कमेसह पोबारा केला. शहरातील भाक्षी रोड परिसरातील सुयोग कॉलनीत शिक्षकांची घरे आहेत.

स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा प्रयत्न

$
0
0
सटाणा तालुक्यातील खमताणे, मुंजवाड परिसरातील शेतकऱ्यांना गारपीट व अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई मिळण्यास विलंब झाला. तसेच, चुकीचे पंचनामे करण्याऱ्या ग्रामसेवक व कृषी सहाय्यकाला निलंबित करण्याचे आश्वासन देवून देखील त्याची कार्यवाही होत नसल्याने स्वातंत्र्यदिनी तहसील पटांगणावर सुमारे १८ जणांनी आत्मदहनाचा केलेला प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.

इच्छुकांच्या गर्दीत प्रतापदादांची एन्ट्री

$
0
0
भाजपच्या लाटेवर स्वार होण्यासाठी नाशिक पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी डझनभर उमेदवार इच्छुक असताना माजी खासदार प्रतापदा सोनवणे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढायची तयारी सुरू केली आहे. उमेदवारीसाठी त्यांनी प्रदेशाध्यक्षांना गळ घातली आहे. पश्चिममध्ये कसमादेचा असलेला प्रभाव आणि सोनवणेंच्या जनसपंर्कामुळे पक्षाकडून त्यांना झुकते माप मिळण्याची शक्यता असल्याने मतदारसंघातील डझनभर इच्छुकांना धास्ती वाटू लागली आहे.

कम्प्युटर असोसिएशनच्या संकेतस्थळाचे अनावरण

$
0
0
कम्प्युटर असोसिएशन अॉफ नाशिक (कॅन)च्या अधिकृत संकेतस्थळाचे नुकतेच अनावर करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गांवकरीचे संपादक वंदन पोतनीस होते.

खड्ड्यांना वैतागून मनपाचा निषेध

$
0
0
पावसामुळे सारडा सर्कल परिसरातील रस्त्यांना खड्डे पडल्याने मार्गक्रमण करताना वाहनचालकांचे हाल होत आहेत. अनेकदा तेथे वाहने स्लिप होवून अपघातांना निमंत्रण मिळत आहे. या दुरवस्थेबद्दल येथील नागरिक व साई सेवक मित्रमंडळाच्या वतीने मनपा प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. खड्डे बुजवून रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती व्हावी, अशी मागणीही करण्यात आली. नागरिकांनी रस्त्यावर मनपा प्रशासनाविरोधात घोषणा देत आंदोलन केले.

ग्रामीण भागात फिरती प्रयोगशाळा

$
0
0
ग्रामीण भागातील शाळांमध्ये प्रयोगशाळा उपलब्ध होण्याच्या हेतूने क्रॉम्पटन ग्रिव्सने कंपनीने फिरत्या प्रयोगशाळा निर्माण केली आहे. कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांच्या हस्ते या व्हॅनचे उदघाटन करण्यात आले.

कोणतेही सत्कार्य ही देशसेवाच

$
0
0
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेले कोणतेही सत्कार्य ही देशसेवाच असते, असे प्रतिपादन साध्वी आराधनाजी यांनी शुक्रवारी केले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कर्मचाऱ्यांना वाढीव कामाचा मोबदला

$
0
0
घरपट्टी तसेच पाणीपट्टी विभागात कार्यरत असलेल्या सुमारे १०० ते १५० कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे संबंधीत कर्मचाऱ्यांना किमान एका महिन्याचे वाढीव वेतन मिळण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता.

स्वार्थासाठी पक्ष सोडणाऱ्यांना धडा शिकवा

$
0
0
विधानसभा निवडणुकांच्या तोडांवर राष्ट्रवादीची आणि सत्तेची महत्वाची पदे भुषवून व लाभ पदरात पाडून घेणारे काही जण राजकीय स्वार्थासाठी पक्ष सोडून जात आहेत. राजकीय स्वार्थ साधणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवून त्यांना, त्यांची जागा दाखवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जेष्ठ नागरिक सेलचे प्रभारी राजपाल सिंग यांनी केले.

जॉगिंग ट्रॅकवरील पथदीप बंद

$
0
0
मुक्तीधाम मागील महापालिकेच्या शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर जॉगिंग ट्रॅक उभारलेला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यावरील पथदीप बंद असल्याने नागरिकांना मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे. मैदानातील स्वच्छतागृहाची स्वच्छता होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.

भुजबळांकडून विकासकामांचा दाखला

$
0
0
दहा वर्षांपूर्वी येवला मतदारसंघाचे चित्र काय काय होत अन् आज काय आहे हे जरा बघा. कधीही न होणारी कामे करतानाच येथील जनतेच्या अपेक्षांपेक्षा दामदुपटीने कामे आपण केली. येवल्यात झालेली कामे इतर दुसरा कुणीही आमदार, नामदार आणला असता तर झाली नसती. अशी येवला तालुक्यातील जनतेला साद घालतानाच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एकप्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंगच फुकले.

परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हा

$
0
0
नैसर्गिक साधनसंपत्तीचा खरा मालक असतानाही भ्रष्ट राजवटीमुळे आदिवासी बांधव अद्यापही विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर आहे. आदिवासी भागात कुपोषण, आरोग्य, शिक्षणाचा प्रश्न बिकट आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला खाली खेचून परिवर्तानाच्या लढाईसाठी आदिवासी बांधवांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले.

व्यापाऱ्यांना नो‌टिसा सुरूच

$
0
0
जकाती पाठोपाठ सरकारने एस्कॉर्ट वसुली देखील बंद करण्याचा निर्णय घेतल्याने १८ एस्कॉर्ट नाक्यावरील ६३ कर्मचारी इतर विभागात वर्ग करण्यात आले आहेत. एलबीटी की जकात अशा फंद्यात पडण्यापेक्षा प्रशासनाने आपले काम सुरू ठेवले असून विवरणपत्र सादर न करणाऱ्या हजारो व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविण्याचे काम सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उद्धव ठाकरे बुधवारी घोटीत

$
0
0
उशिरा आलेला पाऊस व बऱ्याच ठिकाणी पेरण्याही झालेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तीन हजार आदिवासी बांधवांना मोफत धान्य वाटप केले जाणार आहे. बुधवारी (दि २०) घोटी येथे हा कार्यक्रम होईल.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images